गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०११

प्रतापगडच्या जीर्णोद्धारासाठी तातडीने १ कोटी ३१ लाख मिळणार


IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 

मुंबई, ता. २ - प्रतापगड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय समाधानकारक असल्याने तातडीने १ कोटी ३१ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
येथील सह्याद्री अतिथिगृहात किल्ले प्रतापगडच्या जीर्णोद्धारासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यमंत्री सचिन अहिर आदींसह स्थानिक आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. प्रतापगड जीर्णोद्धार समिती, पर्यटन विकास निधी आणि लोकसहभागातून हे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या माध्यमातून पुरातत्व दृष्टिकोनातून हा विकास केला जाणार आहे. त्यात किल्ल्यावरील अवशेषांचे मूळ स्वरूपात जतन करणे, गडाची तटबंदी, दरवाजे, बुरूज यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे आदींचा समावेश आहे.
कामाचा आवाका प्रचंड असल्याने जीर्णोद्धार समितीने प्रतापगड विकासाच्या पहिल्या भागाचा आराखडा चार टप्प्यात तयार करून सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार वर्षात १२ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात १ कोटी ३१ लाख रुपयांची आवश्यकता असून यातून ध्वजबुरुज ते जुन्या दरवाज्यापर्यंतच्या दोन्ही तटबंदीचे नूतनीकरण केले जाईल. ही रक्कम तातडीने उपलब्ध करून दिली जाईल. सीएफ फंडातून देखील निधी दिला जाईल, हा निधी जिल्हाधिकार्‍यांमार्फत खर्च केला जाईल. कामाच्या पूर्ततेप्रमाणे जिल्हाधिकारी तो वितरीत करतील आणि कामावर लक्ष देखील ठेवतील. नंतरच्या टप्प्यासाठी दरवर्षी डीपीटीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...