मुंबई, ता. १४ - मुंबई मॅरेथॉन आज केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे. हजारो आंतरराष्ट्रीय स्पर्धक यात सहभागी होतात. आता मुंबई सायक्लोथॉनचा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे आणि यासाठी प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे स्पर्धेस मिळणार्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत अडथळा आणण्यासाठी दर करण्याकरिता भुजबळांची धाव
आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर सर्व स्पर्धक सी-लिंकच्या दिशेने रवाना झाले. यावेळी केबलस्टेडच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धकांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही छायाचित्रकार मध्येच उभे होते. काही अक्षरश: रस्त्यावर आडवे झाले होते. आधीच्या राऊंडचे काही सायकलस्वारही नेमके याच मार्गाने उलटे येत होते. यांना भुजबळ यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून छायाचित्रे काढण्याची विनंती केली. स्पर्धेत सी-लिंकवरील एकूण १०४ किमी च्या १२ लॅप सुरळीत आणि उत्कंठापूर्ण पद्धतीने पार पडल्या.