मुंबई, ता. १६ - राज्य शासनाने आयोजित केलेल्या ५० व्या महाराष्ट्र राज्य व गोवा संगीत नाट्य स्पर्धेत वसई येथील मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या पाईकदेव भोलनाथ संस्थेच्या संगीत मीरा मधीरा या नाटकास ३५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ चे दिग्दर्शन हृदयनाथ कडू यांनी केले होते. अश्विनीशेठ ची भूमिका करणारे दशरथ राऊत यांना साभिनय गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृत्तिकेची भूमिका करणारी श्रीयंका देसाई व भादव्याच्या भूमिकेसाठी महेश पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ऑर्गन व तबल्यासाठी श्रीरंग परब व श्रीनिवास शेंबेकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले.