भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर दीर्घ काळ अभूतपूर्व तेजाने तळपणार्या स्वरभास्कराचा अस्त झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. संगीताच्या ध्यासापोटी वयाच्या अकराव्या वर्षापासून भीमसेन जोशी यांनी केलेले कष्ट, प्रयत्न यातून एका अद्भूत गायकीचा जन्म झाला. पंडितजींनी गायलेल्या अभंगरचना, शास्त्रीय संगीतातील त्यांनी आळवलेले विविध राग, चीज, पुण्यात त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ सन १९५३ पासून सातत्याने साजरा होणारा सवाई गंधर्व महोत्सव अजरामर राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या रुपाने एक मौलिक रत्न आज आपण गमावले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.