माझे माहेर पंढरी, विठ्ठल नामाचा रे टाहो...अशा अनेक भजनांपासून प्रभू अजि गमला..अशी विविध नाट्यगीते, मिले सुर मेरा तुम्हारा...आदी प्रकार सादर करून केवळ रसिकांना थक्क करून सोडणार्या आणि जागेवरच खिळवून ठेवणार्या पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे अवघं रसिक जनांचं मन हळहळलं आहे.
आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत असताना, लहानपणापासूनच संगीत क्षेत्राकडे कल असणार्या पंडित भीमसेन जोशी यांच्या व वडिलांच्या मतभेदामुळे अत्यंत लहान वयातच भीमसेन जोशी यांनी घर सोडले होते. ग्वाल्हेर येथे किराणा घराण्याचे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. पंडितजींनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे १९५२ साली सुरू केला. आजही दरवर्षी पुणे येथे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नामवंत गायक येथे येऊन हजेरी लावणे हे भाग्य समजतात.
कोणत्याही कलाकाराला साजेशा अशा पंडित भीमसेन जोशी यांनी केवळ मराठी रसिकच नाही, तर गैरमराठी रसिकांची मने देखील आपल्या खड्या आवाजामुळे जिंकली होती. मराठी व्यतिरिक्त कानडी आणि हिंदी भाषेतही त्यांनी उपशास्त्रीय संगीतास सुरवात केली. पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास मानला जायचे. पंडितजींच्या गायनाला सुरवात झाल्यानंतर मैफलित झोपेमुळे पेंगणारे रसिक त्वरीत खडबडून जागे व्हायचे.
पंडितजींना मिळालेले विविध पुरस्कार-
* भारतरत्न पुरस्कार
* पद्मश्री पुरस्कार
* संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
* पद्मभूषण पुरस्कार
* पद्मविभूषण पुरस्कार
* संगीताचार्य
* पुण्यभूषण पुरस्कार
* स्वरभास्कर पुरस्कार
* तानसेन पुरस्कार
* डॉक्टरेट डि. लिट्.