मुंबई, ता. २७ - आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून राज्यांना पर्यटन विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राने या निधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी आज येथे व्यक्त केले. कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. सहाय म्हणाले की, भारतात कृषि व कृषि आधारित प्रक्रिया उद्योगांना देखील मोठे भविष्य आहे. देशात सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स किंमतीची फळफळावळ, शेतमाल प्रक्रियेअभावी वाया जातात. आजमितीस आपण त्यापैकी केवळ सहा ते सात टक्के मालावरच प्रक्रिया करू शकतो. या पार्श्वभूमीवर लघु-मध्यम उद्योजकांना प्रक्रिया उद्योगातही गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
गेल्या दोन दशकात भारतीय उद्योगाने मोठी झेप घेतली असून यात लघु-मध्यम उद्योगांचे अमूल्य योगदान आहे. संपूर्ण भारतीय उद्योगाचे प्रतिबिंब या उद्योगांमध्ये दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीच्याही सर्वाधिक संधी आहेत. असे केंद्रीय उद्योगमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.
यावेळी राज्याचे पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पद्मश्री भवरलाल जैन, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका आदी मान्यवर उपस्थित होते.