मुंबई, ता. १३- रस्ते सुरक्षा पंधरवाड्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५० कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री. भुजबळ यांनी स्वतःची रक्त-साखर तपासून शिबिराचे उद्घाटन केले. शासकीय वाहनचालक व कर्मचार्यांनी आपल्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी भुजबळ यांनी केले.
दिवसभरात सुमारे ३५० वाहनचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्रचिकित्सा, रक्तदाब तपासणी आणि ई. सी. जी. तपासणी करण्यात आली. डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. मुख्तार देशमुख, डॉ. संदेश श्रीप्रभू, डॉ. अजित कोठावाला, डॉ. महेश रावखंडे, डॉ. मयूर जावळे, डॉ. समीर अन्सारी, डॉ. रविकिरण पवार, आदी डॉक्टरांनी तपासणी केली.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
