मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार

मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.

स्टर्लिंग महाविद्यालयाचे औषध साक्षरता जनजागृती अभियान

नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरवि...

नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’

वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. ...

जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान कें...

जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर

जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अ‍ॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारण...

ज. स. सहारिया राज्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान

मुंबई दि. 5- माजी मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज सकाळी स्वीकारला. नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज सकाळी श्री.सहारिया यांचे आगमन झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने बँकिंग व्यवसायाचा मानवी चेहरा हरपला --उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

मुंबई, दि.7 :- सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं दिलखुलास व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हापणसारख्या दुर्गम खेड्यात जन्म झालेल्या ठाकूर साहेबांनी गरिबीशी सामना करत स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत नोकरी मिळविली. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारं खुली करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने केलेली प्रगती इतर बँकांसाठी मार्गदर्शक आणि प...

नवी मुंबईने पाडला स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीचा नवा पायंडा

नवी मुंबई, (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही देखरेखीसाठी स्वेच्छेने आचारसंहिता राबविणारे नवी मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने स्वेच्छा सीसीटीव्ही कॅमेरा देखरेखीची आचारसंहिता तयार केली. सिडको अधिकारकक्षेतील खाजगी तसेच सरकारी आस्थापनांनी या आचारसंहितेला मान्यता दिली आहे. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सिडकोने सुकाणू समिती स्थापन केली होती. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश अग्रवाल हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राइसवॉटरहाऊसकूपर्स हे सिडकोचे या प्रकल्पासाठी सल्लागार आहेत. समितीने नवी मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी संघटना, संस्था आणि कंपन्यांच्या वरिष्ठांशी या संहितेबाबत चर्चा करून ती निश्चित केली. या संहितेनुसार रेल्वे स्थानके, दुकाने, मॉल्स, चित्रपटगृह, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण प्रकल्प, कारखाने, गोदामे अशा विविध सार्वजनिक स्थळी छुपे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही...

नवी मुंबईकरांना टोलचा भार लावणार नाही – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण निरोप

मुंबई दि. 5 (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त पदाची पाच वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण करुन श्रीमती सत्यनारायण आज निवृत्त होत आहेत. यानिमित्त आज आयोगाच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना एका अनौपचारिक समारंभात भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव, मधुकर गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. कोणत्याही प्रकारे आपला औपचारिक निरोप समारंभ करु नये अशा प्रकारच्या सूचना श्रीमती सत्यनारायण यांनी आधीच कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांनी निरोप घेतला आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा आगळावेगळा निरोप समारंभ भाषणाविनाच पार पडला.

पारगाव ग्रामस्थांनी दिले नवी मुंबई विमानतळ भूखंडासाठी संमतीपत्र

मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने जाहीर केलेले आणि राज्य शासनाने मंजूरी दिलेले नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि पुन:स्थापना पॅकेज मान्य असून यासंदर्भातील गावांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आणि आपल्या जमिनी सिडकोकडे हस्तांतर करण्यास सहमत असल्याचे पत्र पारगाव ग्रामस्थांनी सिडको व्यवस्थापनाकडे सादर केले. दिनांक 26 जून 2014 रोजी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपले सहमतीपत्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांचेकडे सुपूर्द केले. या शिष्टमंडळात सरपंच श्रीमती बेबी वाघ, उपसरपंच श्री. संतोष म्हात्रे, सदस्य श्री. विकास पाटील, प्रफुल्ल मेहर, प्रल्हाद नाईक, जागृती कारेकर, वंदना पाटील यांचेसमवेत डॉ. प्रकाश पाटील, बाबूराव पाटील, सदाशिवराव पाटील, भास्कर पाटील, रत्नदीप पाटील, विजय पाटील, सुहास पाटील, सुरेश म्हात्रे, मोहनराव नाईक यांचा समावेश होता.

औरंगाबाद झालर क्षेत्रातून सिडकोची माघार - सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

औरंगाबाद (वि. प्र.) - औरंगाबाद झालर क्षेत्र हे राज्यातील विविध नवीन शहरांपैकी एक असून सिडकोची त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या (मंगळवार 24 जून 2014) बैठकीत औरंगाबाद झालर क्षेत्र नियोजन आणि विकासाची जबाबदारी अन्य प्राधिकरणाकडे सोपवावी याबाबत एकमत झाले. सिडकोला या जबाबदारीतून मुक्त करावे यासाठी शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, प्रधान सचिव, नगरविकास-1 मनुकुमार श्रीवास्तव, जेएनपीटीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एन. एन. कुमार, संचालक नामदेव भगत, वसंत भोईर आणि कंपनी सचिव प्रदीप रथ हे उपस्थित होते. भूसंपादनास होत असलेला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, पायाभूत सुविधा विकास कर देण्यास नागरिकांचा नकार तसेच विकासाची अंदाजे किंमत आणि विकास कामांवर होणारा खर्च यातील वाढती तफावत या कारणास्तव संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. झालर क्षेत्राच्या आराखड्याबाबत हरकती आणि सूचना मागवि...

94 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान - २३ जून ला मतमोजणी

मुंबई दि. 22 : राज्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 77 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते सप्टेंबर, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम दि. 26 मे, 2014 रोजी जाहीर केला होता. यापैकी 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर 94 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. उद्या दि. 23 जून रोजी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला: अजित पवार

मुंबई, दि. 26: ज्येष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश खाडे यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, बाळू-काळू यांची जोडी म्हणजे लोककलेच्या क्षेत्रातील एक मोठे आकर्षण होते. लोककलेच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ही जोडी म्हणजे अनेक यात्रा-जत्रांचेही महत्वाचे आकर्षण असायची. विविध वगनाट्यांमध्ये बाळू यांनी केलेल्या भूमिका खूपच गाजल्या. बाळू यांच्या भूमिका कायमस्वरुपी रसिकांच्या ह्रदयावर कोरल्या गेल्या आहेत. वगनाट्यांद्वारे त्यांनी अंद्धश्रद्धा आणि अस्पृश्यतेसारखे प्रश्न हाताळून सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश देण्याचेही काम केले आहे. शिक्षणाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदतही केली आहे. त्यांनी अनेक संस्थांसाठी मोफत कार्यक्रमही केले आहेत. त्यातून त्यांनी सामाजिक भान जोपासण्याचे आणि वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कायस्वरुपी आपल्या स्मरणात राहील.

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील निर्णयाने माता-भगिनींचे जीवन सुरक्षित होण्यास मदत -- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 4 :- मुंबईच्या शक्ती मिल परिसरातील सामुहिक बलात्कार खटल्यातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा न्यायालयाचा निर्णय दूरगामी आणि विधायक परिणाम करणारा असून या निर्णयाने समाजात योग्य संदेश पोहचला आहे. यापुढे बलात्कारासारखे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही आणि भविष्यात आपल्या माता, भगिनींचे जीवन सुरक्षित करण्यात हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर शासनाने बलात्कारासंदर्भातील कायदा अधिक कडक करुन ३७६ (ई) कलमाची तरतूद केली. या तरतुदीने बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कलमाचा वापर पहिल्यांदा आपल्या राज्यात करावा लागावा हे दुर्दैवी असले तरी यापुढे असा गुन्हा करण्यास कुणी धजावू नये आणि या कायद्याचा वापर करण्याची वेळ देशात कुठेही येऊ नये, अशा पद्धतीचे निकोप वातावरण निर्माण झाले पाहिजे.न्यायालयाचा आजचा निर्णय महिलांच्या सुरक्षा आणि सुरक...

मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

मुंबई, दि. 11 मार्च 2014: मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री पतंगराव कदम यांनी दि. 11 मार्च 2014 रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानाचा आढावा घेतला. या दौ-यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी व कनबस येथे नुकसान झालेली द्राक्ष, केळी व पपईची बाग, तसेच गहू, हरबरा व ज्वारीच्या शेतावर जाऊन शेतक-यांच्या हानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री श्री चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री ठाकरे आणि पुनर्वसनमंत्री श्री कदम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे पपई बाग, गहू, हरबरा, ज्वारीचे पीक आणि वादळामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तीनही नेत्यांनी मंगरूळ येथे ग्रामस्थांशी चर्चा केली व मदतीसंदर्भात त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. या नेत्यांनी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लामजाना येथे द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी करून शेतक-यांच्या नुकसानाचा आढावा घेतला. किल्लारी य...

काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये हिंगोली-रायगड मतदारसंघांची अदलाबदल- हातकणंगलेमध्येही काँग्रेसचा उमेदवार लढणार

मुंबई, दि. 8 मार्च 2014: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली व रायगड लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 मध्ये काँग्रेसने लढवलेली रायगडची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली हिंगोलीची जागा काँग्रेस लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दि. 8 मार्च 2014 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बैठकीत दोनही पक्षांच्या संमतीने वरील निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस 27 मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेस 21 मतदारसंघ लढवेल.

काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी 5 व 6 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर

मुंबई, दि. 3 मार्च 2014: काँग्रेस उपाध्यक्ष खा.श्री राहुल गांधी दि. 5 व 6 मार्च 2014 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणार आहेत. प्रस्तावित दौ-यानुसार खा. राहुल गांधी दि. 5 मार्च 2014 रोजी सकाळी 10 वाजता धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आदिवासी भागातील अभियांत्रिकी व पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11.30 वाजता ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते दुपारी 2 वाजता धुळे ते शिरपूर मार्गावर जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दौ-याच्या दुस-या दिवशी दि. 6 मार्च 2014 रोजी सकाळी 11 वाजता राहुल गांधी वर्सोवा बीच येथे कोळी बांधवांशी चर्चा करतील. दुपारी 12.30 वाजता ते सोनाले गाव, भिवंडी बायपास येथे कोकण विभागीय जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाशजी, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी ...

564 ग्रामपंचायतींच्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. 16 – एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा, उल्हासनगर, सोलापूर, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा तसेच जामनेर, अकोले, अक्कलकुवा, अहमदपूर आणि पोंभुर्णा या पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून, 2014 या कालावधीत राज्यातील 22 जिल्ह्यातील एकूण 564 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या कार्यक्रमानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवार दि. 4 मार्च ते शनिवार दि. 8 मार्च 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 10 मार्च 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 12 मार्च 2014 हा असेल. नगरपरिषद निवडणुकांसाठी शुक्रवार दि....

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धा- जळगाव, परभणी विद्यापीठांचे संघ स्पर्धेबाहेर

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल पुरूष गटाच्या स्पर्धेमध्ये आज बाद फेरीच्या सामन्यांत गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (अजमेर), वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ (सूरत), पॅसिफिक विद्यापीठ (उदयपूर) आणि मोहनलाल सुकादिया विद्यापीठ (उदयपूर) यांच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या जळगाव आणि परभणीच्या संघांनी चुरशीची लढत देऊनही पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर पडावे लागले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), महारामा प्रताप विद्यापीठ (उदयपूर) आणि धर्मसिंह देसाई विद्यापीठ (नाडियाद) या संघांनी उपस्थिती न दर्शविल्यामुळे अनुक्रमे चारोतार विद्यापीठ (चुंग, जि. आणंद), जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ (उदयपूर) आणि सरदार पटेल विद्यापीठ (वल्लभ वैद्यनगर) यांना पुढे चाल देण्यात आली. अत्यंत चुरशीच्या लढतीत अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २५-१९, २५-१९, १२-२५, १६-२५, १५-१० असा ३-२ ने पराभव केला. जळगावच्या संघाने अ...

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन

कोल्हापूर, दि. १४ फेब्रुवारी: राष्ट्रीय व राज्य स्तरावर क्रीडा संघटनांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना व्हॉलीबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून त्यासाठी युवा खेळाडूंकडूनही सहकार्य आणि प्रयत्नांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू संजय नाईक यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरूष) स्पर्धेचे उद्घाटन श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. एन.जे. पवार अध्यक्षस्थानी; तर प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. एस.एस. हुंसवाडकर, शांताराम माळी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सूर्यवंशी, रेफ्री मंडळाचे समन्वयक डॉ. सुनील चव्हाण, पी.एस. पंत आणि अतुल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीब...

Anand Mahindra accepts Sustainable Development Leadership Award

February 06, 2014, New Delhi: Mr. Anand Mahindra, Chairman of the USD 16.7 billion Mahindra Group, today received the Sustainable Development Leadership Award from The Energy and Resources Institute (TERI). Mr. Mahindra accepted the award from External Affairs Minister, Mr. Salman Khurshid on behalf of the Mahindra Group, at a special ceremony held in the National Capital. Mr. Mahindra was presented with the award in recognition of the dynamic and visionary leadership he has shown in spearheading the Mahindra Group on the path of sustainability and environmental awareness. “With its dynamic and visionary approach, TERI has greatly contributed to the global dialogue on finding solutions to global problems in the fields of energy, environment and sustainable development and I am honoured to accept this award from them on behalf of the Mahindra Group,” said Mr. Anand Mahindra, Chairman, Mahindra Group. Instituted by TERI in 2005, the Sustainable Development Leadership Award felicitates ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी

विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. अर्हता विनंती नि...

प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल 2 नवे चिटणीस व 8 जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्त्या

मुंबई, दि. 27 जानेवारी 2014: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी संघटनेमध्ये अनेक फेरबदल केले आहेत. नव्या फेरबदलांमध्ये नागपूरचे श्री जयप्रकाश गुप्ता आणि जळगावचे श्री सलिम पटेल यांची प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील 8 जिल्हा काँग्रेस कमिटींचे नवे अध्यक्ष नेमले आहेत. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री विकास ठाकरे, चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश देवतळे, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्री अर्जून भंगाळे, जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अॅड. श्री संदीप पाटील, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती आश्विनी बोरस्ते, अकोला जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री हिदायत पटेल, सांगली जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री मोहनराव कदम तर बीड जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री सर्जेराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आणखी काही जिल्हाध्यक्ष येत...

वीज दर कपातीबाबत काँग्रेसच्या मागणीला राज्य सरकारची मंजुरी- प्रदेश काँग्रेसने केले निर्णयाचे स्वागत

मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: वीज दरांमध्ये कपात करण्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, या निर्णयाचे प्रदेश काँग्रेसने स्वागत केले आहे. सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राकडून विजेचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विजेच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वीज दरात सरसकट 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. वीज दरांचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वीज ग्राहकांच्या मागणीला अनुकूल भूमिका घेऊन दर कमी करण्याबाबत शिफारस केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने सरदहू निर्णय घेतला आहे. दरकपातीच्या निर्णयासाठी राज्य सरकारला सुमारे 7200 कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील दर कपाती...

राज्यातील बहुतांश काँग्रेस उमेदवारांची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड,...

सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु

नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे. या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला, पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट, मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील. अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत ...

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाई समस्या तीव्र - संच क्र. ५ बंद

मुंबई, ता. १३ - महानिर्मितीच्या ११३० मेगावॉट क्षमतेच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाईची समस्या तीव्र झाली असून सध्या जेमतेम सरासरी १ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या संच क्र. ५ बंद करण्यात आला असून अन्य संच देखील पुरेशा कोळशाअभावी पूर्ण क्षणतेनेचालविता येत नाहीत. परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळसा पुरवठा करणार्‍या मे. एम.सी.एल., मे. एस.ई.सी.एल., मे. डब्ल्यू.सी.एल. या सर्व कोळसा कंपन्यांशी पुरेसा कोळसा मिळण्यासाठी महानिर्मितीचा सातत्याने पुरवठा सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी सुमारे ६ महिन्यांहून अधिक काळ परळी औष्णिक विद्युत केंद्र पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने बंद ठेवावे लागले होते. असे महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी कळविले आहे.

दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवस...

रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्यांचा भरती प्रक्रियेत विचार करणे बंधनकारक - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7: शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांनी भरती प्रक्रिया राबविताना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाही विचार करणे कायद्याने बंधनकारक आहे; तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपले वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यात ‘रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती बजेटचा समावेश करणे अनिवार्य केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाचे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष तथा रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री संजय सावकारे, समितीचे सदस्य श्री.सुधीर मुनगंटीवार, श्री. सुरेश हाळवणकर, श्री. विनायक मेटे, डॉ. सुधीर तांबे, प्रा. सुरेश नवले, डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे सचिव राजेश अगरवाल, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाचे आयुक्त विजय कुमार गौतम आदी यावेळी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार ...

Makar Sankranti Mela at CIDCO Urban Haat - Belapur

BELAPUR - Makar Sankranti a major harvest festival celebrated in India is here. It is known and celebrated by different customs in different parts of the country. The festival in southern parts of India is celebrated as Pongal whereas in Punjab as Maghi. Since Makar Sankranti is celebrated for innumerable reasons and in innumerable ways CIDCO Urban Haat also gives you a reason to celebrate this auspicious festival from 3rd to 19th January, 2014 at CIDCO Urban Haat near CBD Belapur Railway Station. In this grand Sankrant Mela, artisans from West Bengal, Maharashtra, Assam, Tripura, Rajasthan, U.P, Tamil Nadu, Gujarat, Punjab, Jammu & Kashmir and Bihar are participating with exclusive handloom and Handicraft products. In handicrafts terracotta, leather products, jute products, bamboo products, wall hangings, artificial jewellery, stone arts, paintings, bangles, carpets, statues will be exhibited by master craftsmen from various states of Maharashtra. Apart from handloom and handi...

धुळे शहरातील रस्ते आणि रुग्णालयांसाठी महापालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई, दि.1 : धुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. धुळे महानगरपालिकेला अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन 80 फुटी रोड येथे मॅटर्निटी होम; तर चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच धुळे शहरातील विविध मुख्य रस्ते तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची गरज आहे. असे एकूण 20 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. कदमबांडे यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लहान महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सु...