मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अभिरूची...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार

 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला एक क

उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत 'हिंदुत्व' प्रमुख मुद्दा नसेल: उमा भारती

लखनौ, ता. २२ (वृत्तसंस्था) - सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि राम मंदीर हा भाजप चा प्रमुख मुद्द नसेल. असे भाजप च्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. उमा भारती म्हणाल्या, की हिंदुत्व आणि राम यांच्यावर आपला विश्वास आहे. आम्हांला इथे रामराज्यच अपेक्षित आहे. राम मंदीराचा प्रश्न हा श्रद्धेचा भाग आहे मात्र राज्याच्या निवडणुकीसाठी तो राजकीय अजेंडा नसेल. आम्ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविणार आहोत. मी हिंदुत्व आणि राम मंदीर प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मध्यंतरी साडेपाच वर्षे भाजप मध्ये नसताना देखील आपण याबाबत तडजोड केलेली नाही. काँग्रेस सुद्धा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे घेणार असल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की केंद्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसने उत्तर देणे अपेक्षित आहे. "चोराकडे चोरच बोट कसे दाखवू शकेल?" असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख दिग्विजय सिंग

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी

राक्षस

दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ता. १७: माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. दहावी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन करत त्यांनी भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध संधीचा शोध घेऊन त्यात यश मिळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तळ्यात नव्हती बदके दोन...

तळ्यात नाही..मळ्यात तर नाहीच नाही...तर...अन्नासाठी चक्क रस्त्यावर आलेली बदकं

बाळ-गोपाळ मंडळी

तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधणार: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १६ - राज्यातील तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीत तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आवश्यकता असते. यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. तमाशा कलेला चालना देण्यासाठी कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा शासन विचार करीत आहे. याबरोबरच या कलावंतांसाठी निवासी संकुल उभारण्यासाठी पुण्याजवळ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईत तमाशासाठी थिएटर उभारण्यासाठी सिडकोमार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल. ते पुढे म्हणाले की, तमाशा कलावंतांना स्वतःचा फड तसेच थिएटर उभारण्याकरिता कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच निर्णय घेतला जाईल. तमाशा कलावंतांना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्

Rainbow: Chrosome of Nature.

green

wonder of nature...

पर्यटनासह विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्याची महाराष्ट्र व स्लोव्हानियाला मोठी संधी

मुंबई, दि. 13 जून : भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हेनिया यांना पायाभूत सुविधा, रस्ते-विकास आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वृध्दीस मोठी संधी असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले. युरोपीय समूह देशांतील 'प्रजासत्ताक स्लोव्हेनिया' या देशाच्या वित्त मंत्री श्रीमती दार्जा रॅडिक यांनी शिष्टमंडळासह श्री. भुजबळ यांची त्यांच्या 'रामटेक' निवासस्थानी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्लोव्हानियाच्या व्यापार मंत्री श्रीमती मोइका ऱ्होवॅटिक तसेच सेक्रेटरी श्रीमती मेत्का अर्बास तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आणि महाव्यवस्थापक विजय चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्रीमती रॅडिक यांनी भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हानिया यांच्यामधील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने आपण मुंबई भेटीवर आल्याचे भुजबळ यांना सांगितले. त्यावर श्री. भुजबळ यांनी श्रीमती रॅडिक यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींविषयी सव

जे. डे यांच्या कुटुंबियांचे भुजबळ यांच्याकडून सांत्वन

मुंबई, दि. 12 जून : राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास जे. डे यांचा पार्थिव देह जे.जे. रुग्णालयातून त्यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी आणण्यात आला आणि तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. श्री. भुजबळ यांनी जे. डे यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अखेरचे अभिवादन केले. 'एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तरी, त्याची गांभिर्याने दखल घेण्यात येते. इथे तर डे यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे राज्य शासन आणि पोलीस प्रशासन संबंधित माफियांविरोधात कठोर पावले उचलल्याखेरीज राहणार नाही,' असे भुजबळ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

जे. डे यांच्या हत्येचे वृत्त धक्कादायक : छगन भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : 'दैनिक मिड-डे'चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जे. डे यांच्या हत्येचे वृत्त समजून आपल्याला अत्यंत धक्का बसला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्राइम रिपोर्टिंग आणि शोध पत्रकारितेच्या क्षेत्रात जे. डे यांनी गेली कित्येक वर्षे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. पोलीस, खबरे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. डे हे अत्यंत उमद्या व उत्साही स्वभावाचे पत्रकार होते. माझेही त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांची अशा प्रकारे हत्या व्हावी, ही घटनाच क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जे. डे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि खबऱ्यांचे जाळे या विषयावर        झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या 'खल्लास' आणि 'झिरो डायल' या आपल्या पत्रकारितेतील अनुभवावर अत्यंत रोमहर्षक आणि थरारक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या. गेल्या दोन दशक

रमेश वांजळे यांच्या निधनामुळे धडाडीचा लोकप्रतिनिधी हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे एक धडाडीचा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात प्रसिध्द झालेल्या आमदार रमेश वांजळे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील जनतेची मनेही जिंकली होती. महाराष्ट्र विधीमंडळातही त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काम करत चमक दाखविण्यास सुरवात केली होती. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मतदारसंघातील जनतेवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. रमेश वांजळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही श्री. भुजबळ यांनी केली आहे.

तारकर्ली, गणपतीपुळे ऑक्टोबरनंतरच गाळमुक्त होणे शक्य

तारकर्लीमधील संगम पॉईंट येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तेथे हायस्पीड बोटी चालविण्यात मोठा अडथळा येतो आहे. त्याचप्रमाणे गणपतीपुळे येथील खाडीमध्येही बराच गाळ साचलेला आहे. तो गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता श्री. भुजबळ यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर मेरिटाईम बोर्डाच्या ताफ्यात येत्या ऑक्टोबरपर्यंत चार नवीन ड्रेझर दाखल होत असून त्यानंतरच हा परिसर गाळमुक्त करता येऊ शकेल, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.             मुंबईला गेटवे ऑफ इंडियासमोर तरंगती जेटी तयार करण्याच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांना यावेळी दिली.             याखेरीज सागरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाशी संबंधित विषयही बोर्डाने तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

एमटीडीसी कडून प्रशिक्षित व्यक्तींनाच यापुढे कोकणात स्नॉर्केलिंगचा परवाना

मुंबई, दि. 10 जून : मालवणसह कोकणात अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर खाजगी स्नॉर्केलिंग व्यवस्थापनांना पायबंद घालण्यासाठी या परिसरात केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींनाच परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची शिफारस करण्याचा अधिकार (Recommending Authority) हा सुद्धा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडेच असायला हवा, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे स्पष्ट केले. श्री. भुजबळ यांच्या या मागणीशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी काल श्री. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर, महाव्यवस्थापक श्री. चव्हाण, मेरिटाईम बोर्डाचे

एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने रंग गहिवरले: अजित पवार

मुंबई, ता. ९ - जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने चित्रकला सृष्टीचे रंग गहिवरले आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पिकासो म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मविभूषण एम. एफ. हुसेन यांनी स्वतःची चित्रकला शैली निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अवलिया चित्रकाराने भारतीय चित्रकलेला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे.

पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेली बैठक

एम.एफ. हुसेन यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार हरपला

मुंबई, दि. 9 जून : सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांच्या निधनामुळे भारत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला कायमचा मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या सिद्धहस्त रंगरेखांच्या माध्यमातून या कलंदर कलाकाराने जगप्रसिद्ध कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या काही कलाकृती वादग्रस्त ठरल्या असल्या तरी भारताला विशेषतः महाराष्ट्राला कलेच्या जागतिक कॅनव्हासवर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या माध्यमातून एम.एफ. हुसैन यांनी जागतिक कलाविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील शिल्पग्रामसाठी एमटीडीसीची महापालिकेकडे जागा हस्तांतराची मागणी

मौजे मजासगाव, ता. अंधेरी येथे उपलब्ध असलेल्या 15 एकर जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून `शिल्पग्राम` विकसित करण्यात येणार आहे. तथापि, सातत्याने पाठपुरावा करूनही ही जमीन मुंबई महानगरपालिकेने महामंडळाकडे अद्यापही हस्तांतरित व केल्यामुळे या कामासाठी केंद्राकडून आलेला 5 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी वापरता येऊ शकलेला नाही. ही जागा महामंडळाला देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांना केली. सदर जमिनीचे मूळ आरक्षण हे मनोरंजन मैदान असे होते. मात्र नगरविकास विभागाने ते बदलून `शिल्पग्राम` असे केले आहे. या जमिनीच्या ताब्यासाठी सन 2007पासून महामंडळाकडून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली. हरियाणातील सूरजकुंडच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त असा शिल्पग्राम प्रकल्प उभारण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफा जवळच असल्याने या शिल्पग्रामला त्याचा निश्चितच लाभ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त क

मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी

मुंबई , दि. 9 जून : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करून घ्यावा , असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला. श्री. भुजबळ म्हणाले , मुंबईच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिका , दोन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्हा नियोजन समित्या , केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग , वन , पर्यावरण आणि तत्सम अन्य सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संस्थांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. या विविध यंत्रणांमधील प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन करावी. तसे झाले तरच त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीतही सुसूत्रता प्रस्थापित होईल आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास साधणे शक्य होईल , असेही मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार , मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक , मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख

पाण्यावर सहज उतरु शकणाऱ्या विमानसेवेच्या सादरीकरणाने पर्यटन मंत्री छगन भुजबळ प्रभावित

मुंबई, दि. 9 जून : जमिनीवरुन पाण्यावर किंवा पाण्यावरुन नोकेवर अशा प्रकारे सर्व सहज संचार करण्यास सक्षम असणाऱ्या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणाऱ्या विमानसेवेचे (अँफिबियन विमान) सादरीकरण पाहून राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आज अत्यंत प्रभावित झाले. ही सेवा पुरविणाऱ्या `मेहेर` या कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MAHAIR) ही अशा प्रकारची सेवा पुरविणारी भारतातली पहिली विमानसेवा कंपनी आहे. अंदमान व निकोबार बेटांवर त्यांनी ही अँफिबियन विमानसेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. या कंपनीच्या वतीने आज श्री. भुजबळ यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर आदी यावेळी उपस्थ

आचार्य रत्नानंद यांच्या निधनाबद्दल भुजबळ यांना शोक

मुंबई, ता. ८ - आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक असलेले अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी (वय ८७) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, योग व अध्यात्मिक गुरू असलेल्या श्री श्री रवीशंकरयांचे अनुयायी जगभरात आहेत. सदैव हसतमुख असणार्‍या या महान गुरूच्या जीवनावर त्यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी यांच्या मानवतावादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. आचार्य रत्नानंद यांच्या निधनामुळे श्री श्री रवीशंकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभावे व आचार्य रत्नानंद जी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना श्री. भुजबळ यांनी केली आहे.

शून्य हुआ देशभक्त व्यक्ति...

योगगुरू स्वामी रामदेव यांच्या बेमुदत उपोषण स्थळी सरकारने मध्यरात्री केलेल्या कारवाईनंतर सर्वत्र निषेध, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत...लोकप्रिय "महाबलि" ब्लॉगचे नियमित वाचक आणि मार्गदर्शक रविंद्र बर्गले यांनी व्यक्त केलेले हे मत... (रविंद्र बर्गले, इंदौर) मैं नहीं समझता कि भ्रष्टाचार के मुद्दे पर समग्र देश में इतना बड़ा तूफान खड़ा कर देने वाले महान संत, योगगुरू  को बदनाम करने का षड्यंत्र रचने और केंद्र सरकार में बैठी जनता के प्रति जवाबदेह सरकार द्वारा 1 लाख देशभक्त युवा, वृद्ध, बाल, स्त्रियों पर देश के आमजन पर हुए असामयिक बर्बर अत्याचार के बाद कुछ कहने के लिए शेष बचा है? दिल्ली में उस पूरे दिन और रात तक केंद्र सरकार ने जो किया, जो दृश्य उपस्थित किया वह देखने के बाद देशभक्त व्यक्ति शून्य हो जाता है, समय उसके लिए थम जाता है. शब्द उन भावों को स्वर नहीं दे सकते, देना भी नहीं चाहिए. जीभ की अपनी सीमा है, जीभ अपना काम कर चुकी. सत्ताधीश भी अपना कार्य कर चुके. जो कुछ भी क्रम से हुआ, मीडिया ने देखा. सारे देश ने देखा, बाबा रामदेव द्वारा उठाए गए देशभक्ति के उस भीषण ज्वार को, भा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ           मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मर

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील. समता परिषदेच्या

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव: अजित पवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.

संतांनी समाज घडविण्याचे कार्य केले- छगन भुजबळ

कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बां

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली. उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

  मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभाराव

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी

मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते. श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करा: भुजबळ

मुंबई, दि. 11 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वर सातत्याने होत असलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण महामार्गाची जाता-येता अशी दुतर्फा पाहणी करून 15 दिवसांच्या आत तपशीलवार अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. सदर पाहणी करत असताना संबंधित जिल्ह्यातील अभियंत्यांनाही सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे, महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ लक्षात घेऊन श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयात संबंधितांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्

"सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे. रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" (अर्थात सोलर एनर्जी) ही काळाची गरज नक्कीच ठरेल... कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

गोंदे ते पिंपळगाव टप्प्याचे बहुतांश काम आगामी सहा महिन्यात पूर्ण: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) - आगामी सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोंदे ते पिंपळगाव या साठ किलोमीटरपैकी पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण पूर्ण होणार असून उर्वरित पंधरा किमी अंतरावरील काम जून २०१२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यामुळे मुंबई ते धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आगामी दीड वर्षाच्या आत चौपदरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्‍यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्‍यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.

लातूर-औसा-लामजना राज्यमार्गाची दुरुस्ती 5 जूनपूर्वी झालीच पाहिजे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 मे : लातूर-औसा-लामजना या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या 5 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. या रस्त्याच्या कामाबाबत आज भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औसा-लातूर हा 19 किलोमीटरचा चौपदरी तर औसा-लामजना हा 13 किलोमीटरचा दुपदरी मार्ग आहे. या मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे फलक, दिशादर्शक बसविण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली. 'जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरा' यानंतर झालेल्या अन्य एका बैठकीमध्ये श्री. भुजबळ यांनी डयुरोफ्लेक्स हे जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम सचिवांना केली. सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामातील एकूण ला

खतवाटपाच्या नियोजनाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी - छगन भुजबळ

नाशिक - "देशभरातच खतांची अडचण असून, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या खताचे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वितरण होण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,' असे स्पष्ट आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहात आज नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा व नियोजनाची बैठक झाली. त्यात श्री. भुजबळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, खासदार हरिश्‍चंद्र महाले, प्रतापदादा सोनवणे, समीर भुजबळ, राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यासह पंधरा तालुक्‍यांतील आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते. अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत, खतांचे वितरण, अपघात विमा योजना, ट्रॅक्‍टरचे अनुदान, तेल्या रोगावरील रखडलेले अनुदान या विषयावरील विविध प्रश्‍न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल यांनी खतांसंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, ""खतांच्या विक्रीतील लिंकिंग थांबली पाहिजे. खतांबाबत अधिकारी परस्पर कोटे ठरवून मोकळे होतात. त्यामुळे सहकारी सोसाय

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र , मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली , की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ ? याचा विचार कायम आई करत असते. आईचं महत्व काय आहे ? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्ष