मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता लक्ष लंकेला विरुद्ध विजयी गुढी उभारण्याचे...

टीम इंडिया ने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या पाकिस्तान संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश करून संपूर्ण क्रिकेट विश्वातून वाहवा मिळवली आहे. आता येत्या २ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला हरवून हिंदू नववर्षाच्या सुरवातीपू्र्वीच विजयाची गुढी उभारण्याची अपेक्षा आणि सप्तरंगी स्वप्न चाहत्यांनी रंगविले आहे. पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळताना आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे थोडी निराशा पदरी पडलेला सचिन अंतिम सामन्यात हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून नववर्षाची भेट देईल असा विश्वास देखील क्रिकेटच्या विश्वासह जनसामान्यांना वाटत आहे.

भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद: अजित पवार

मुंबई, ता. ३० - पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या भारतीय संघाचे अभिनंदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत संघभावनेच्या आधारे भारतीय संघाने विजयश्रीला गवसणी घातली. भारतीय संघाच्या विजयामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत इतिहास रचून विजयाची गुढी उभारावी, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या संघावर विजय प्राप्त करून अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या भारतीय संघाच्या या विजयामुळे रात्री अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे शहरात अनेक उपनगरांमध्ये दिवसभर शुकशुकाट असणारे प्रमुख रस्ते रात्री दिवस उजाडल्याप्रमाणे नागरिकांच्या गर्दीने फुलले होते. ठंडा...ठंडा..कूल..कूल झाल्यानंतर कुटुंबियांसह आईस्क्रीम खाणारे लोक दिसत होते.

दे घुमाके...स्पेशल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (ता.30) झालेला सामना पाहण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.

"माही" च्या सैन्याने नमविले "रन" भूमीत पाक ला...

पंजाबपुत्र आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या टीम इंडियाने आज मोहाली येथे पार पडलेल्या विश्वचषक 2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाशी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला 29 धावांनी गारद करून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 2 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात देखील भारतीय संघालाच अपेक्षित विजय मिळून भारतच विश्वचषक करंडक स्पर्धेचा अंतिम विजेता ठरेल असे भाकित आतापासूनच वर्तविण्यात येत आहे. आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकर शंभर धावांची शंभरी पूर्ण करण्यात असमर्थ ठरला असला, तरीही धावांच्या डोंगराच्या निकषावर सचिन याला आजचा सामनावीर घोषित करण्यात आले. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेत तरी सचिन आपली शंभर धावांची शंभरी पूर्ण करेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आज सचिन याला किमान तीन वेळा जीवदान मिळाल्याचा लाभ घेत सचिनने 85 धावा काढल्या. आजही संपूर्ण देशात ठिकठिकाणी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली. अनेकांनी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी फटाके आगाऊ आणून ठेवले आहेत. दरम्यान आजचा सामना अत्यंत महत्वपूर्ण मानला जात ह...

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

भारत-पाक संघाच्या सामन्याची उत्कंठा वाढतेय क्षणाक्षणाला...

  विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी केवळ चोवीस तास (हे वृत्त लिहिपर्यंत) बाकी आहेत. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच धूळ चाखल्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्ता यांच्यापैकी विजेता ठरणारा संघ अंतिम सामन्यात खेळेल हे निश्चित आहे. या सामन्याबद्दल संपूर्ण देशात वृत्तपत्र माध्यमांसह विविध प्रसार माध्यमे आणि सामान्यांची उत्कंठा देखील क्षणाक्षणाला वाढते आहे. अनेक ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये मात्र सुटी नसल्यामुळे कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला आहे. अनेक नोकरदारांनी तर हा सामना पाहण्यासाठी चक्क सुटी टाकली असून काही कर्मचारी ऐनवेळी कारण सांगून सुटी घेण्याच्या विचारात आहेत. सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक या सामन्यात पूर्ण करतो अथवा नाही, यावर सट्टेबाजी सुरू आहे.

संकटांना घाबरू नका, त्यावर मात करायला शिका: सिंधुताई सपकाळ

अंधार झाल्याशिवाय पहाट उगवतच नसते म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधार येत असतो, एक रात्र येते अंधारी त्याचं नाव संकट असतं, पण आता बायानो तुम्हाला सांगते, जर तुमच्यावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहिला शिका. संकटाची उंची तुमच्यापेक्षाही कमी होईल म्हणून संकटाला घाबरू नका, मरू नका, डरू नसा त्यावर स्वार व्हायला शिका आणि संकट त्याच्यावरच येतात जो सहन करू शकतो. असे मनोगत सिंधुताई सपकाळ यांनी सिडको भवनमध्ये आयोजित, शंभराव्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, समारंभात व्यक्त केले. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील अध्यक्षस्थानी होते. सिंधुताई सपकाळ यांनी श्रोत्यांना हासू व आसू यांच्या हिंदोळ्यावर सर्वांना खिळवून ठेवत, स्त्री हीच सर्वांना सावरणारा स्तंभ असतो हे स्पष्ट करून स्त्रीची तुलना सायकलच्या मागच्या चाकाशी केली. कारण पुढचं चाक स्त्री-पुरुषाच्या हाती देते. कारण मागच्या चाकावर पूर्ण प्रवास अवलंबून असतो हे ती जाणते. कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांगताना त्यात सायकलला गती देणारी चेन, ओझे सावरणारी कॅरियर, प्रकाश दाखविणारा डायनामो तसेच आधार देणारे स्टँड अशा अनंत पातळ्यांवरच्या जबाबदार्‍या साय...

भारतीय संघ विजयाच्या रंगात रंगलाः रंगपंचमीचा पंच

गुरुवारी (ता. 24 मार्च) अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात अक्षरशः करो या मरो..प्रमाणे जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या विश्वचषक सामन्यात अखेर भारतीय संघाच्या संयमी खेळीने संघाने देशातील नागरिकांना रंगपचमीनिमित्त विजयाची भेट दिली. काही षटकांमुळे श्वास रोखलेल्या प्रेक्षकांना आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर हा सामना पाहणाऱ्यांचे श्वास रोखून धरले होते. परंतू युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. युवराजसिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रेक्षकांना अपेक्षित यश मिळवून देऊन कांगारूंच्या संघाला रंगपंचमीचा पंच मारून हम भी कुछ कम नही...हे दाखवून दिले. पाच गडी आणि 14 चेंडू राखून भारताने कांगारूंवर विजय मिळवला. रंगपंचमी जणू काही दिवाळी... आजच्या महत्वपूर्ण सामन्याची विजयीपताका रोवण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असतानाच भारताने विजय मिळवल्यासारखेच चित्र स्पष्ट झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आतषबाजी करण्यात आली. सामना संपल्यानंतर बराच वेळ ठिकठिकाणी आतषबाजी सुरूच होती, जणूकाही दिवाळीच साजरी करण्यात येत असल्याचा भास होत होता. विश्वचषकाचा गतविजेता आणि यंदाही प्रबळ...

रंग-पंच-मी...

देशात साजरे केल्या जाणाऱ्या विविध सण-वार, उत्सव, महोत्सवांचे स्वरूप गेल्या दशकात बदलत आहे. वर्षानुवर्ष असलेली बंधने आता बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदी विहार करत आहेत. मर्यादा सुद्धा अमर्यादपणे अथांग वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहापणे वहात आहेत हे चित्र तर गेल्या पाच वर्षात स्पष्ट झालेच आहे. परिणामी महिला देखील पुरुषांप्रमाणेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. स्त्री-पुरुष भेद हे अंतर बव्हंशी कमी झाले असून कामानिमित्त महिला देखील अहोरात्र पुरुषांप्रमाणेच रस्त्याने येताजाताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर आजकालच्या नवीन ट्रेंडनुसार होळी, धूळवड, रंगपंचमी अशा सणवार, उत्सवांना मोठ्या संख्येने महिला सुद्धा मित्र-मैत्रीणींकडे धूळवड, रंग खेळण्यासाठी थाटामाटात जाताना दिसतात. परंतु विविध रंगांनी रंगलेले चेहरे धुण्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. रंग तयार करताना करण्यात आलेले रसायनाचे मिश्रण किंवा अबीराऐवजी पेन्ट्स चा वाढलेला वापर हे याचे कारण आहे. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांवर, पादचाऱ्यांवर सर्रासपणे पाण्याने भरलेले, रंगांनी भरलेले फुगे फेकल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अप...

राज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर्थसंकल्प- छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्याती...

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ

मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले. हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्य...

नयनरम्य मांडू (मांडव)

black money..सोने की चिड़िया

Few days ago (Friday: 18-03-2011 on Sanskaar Channel), there was a telecast of Lt. honble Rajeev Dixit, saying that the Indian Black Money deposted in World Bank comprises 380 Lakh Crore. If this amount is brought to India, It is such a huge amount that we can distribute 10 Kg. gold to each family of India with this and this way we can again become "Sone ki Chidiya" or "Sone ka Sher". He further added that this can be possible by 3 ways- 1. If Indian Govt. signs UN's "Treaty Against Curruption (TAC) for which UN itself has appealed to India many a times earlier. 2. Indian Govt enacts a law to this effect. 3. Supreme Court directs Indian Govt to do so (recently supreme court has issued guideline to form a panel in this regard) It should be noted that even after distributing 10 kg gold, we would be in position to pay off our whole debts and will be in a position to lend to the world bank and other countries of strategic importance. This way we can press...

कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भुजबळ

मुंबई, दि. 21 मार्च : कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी आपले ठोस प्रयत्न सुरू असून येत्या वर्षभरात पर्यटन विकासाची जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले. विधान परिषद सदस्य सर्वश्री राजन तेली, संजय दत्त, भाई जगताप, परशुराम उपरकर, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री. भुजबळ बोलत होते. श्री. भुजबळ यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण रिव्हिएरा सर्किट अंतर्गत सर्किट-1, सर्किट-2 व सर्किट-3 साठी अनुक्रमे 3 कोटी 2 लाख रुपये, 2 कोटी 88 लाख 54 हजार रुपये व 1 कोटी 34 लाख 42 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास प्राप्त झाला. हा सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाला असून त्याअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून विजयदुर्ग येथील निवास ...

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्था...

होळीनिमित्त जनतेला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, - होळीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यानी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांची उधळण करत आपल आनंद द्विगुणित करताना दुसर्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तसेच पर्यावरणाची हानी न पोहोचवता होळी, धूळवड व रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

धूळवडीला विजयी होण्याचे वेस्ट इंडीज् चे स्वप्न धुळीत...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळी न खेळल्यामुळे तोंडाशी आलेला विजय न झाल्यामुळे सगळीकडूनच रोष ओढावलेल्या भारतीय संघाने आज सुटकेचा निश्वास सोडला. होळी आणि धूळवडीनिमित्त संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या आजच्या सामन्यात इंडीजच्या संघाला चांगलीच धूळ चारून विजयी होण्याचे इंडीज संघाचे स्वप्न अक्षरशः धुळीत मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा संघाचा निर्णय निर्णायक ठरला. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अत्यंत ढिसाळ खेळी आणि फलंदाजी करून आफ्रिकेला सहज विजय मिळवून दिल्याबद्दल संघाविरुद्ध सगळीकडेच रोष होता. तर संघाच्या वरिष्ठांनी संघावर ताशेरे ओढून संघाला सक्त ताकीद दिली होती. याचा चांगलाच परिणाम झाल्याचे आज चेन्नई येथे झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या एक दिवसीय सामन्यात जाणवले. सचिनचे शतकांचे शतक आजच्या सामन्यात पूर्ण होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. काही वेळातच तंबूत परतणाऱ्या सचीनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. आजच्या यशाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंह याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. संघात नव्यानेच सामील झालेल्या अश्विनी याची कामगिरी देखील लक्षात ...

धन्य ते जपान...

गेल्या आठवड्यात जपानमध्ये रिश्टर स्केल 8.1 तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात झालेली प्रचंड हानी आणि यानंतर आलेली त्सुनामी यांचा सामना अजूनही जपान करतोय. सुमारे 15 हजार नागरिक बेपत्ता असल्याचा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितच फार मोठी असेल. फुकुशिमा शहर जवळपास फुंकलेच गेले असून शिमग्यापर्यंत शिमा शिल्लक राहणार की नाही अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना वाटत असून अभ्यास करून त्यांनी 48 तासांची मुदत दिली. जपानच्या अणूभट्ट्यांमध्ये लागलेली आग यानंतर झालेले रेडिएशन यामुळे तर आता रेडिएशनचे हे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या अणूभट्ट्या वाचविण्यासाठी अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतू सदैव सैनिका पुढेच जायचे..या उक्तीप्रमाणे या देशाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि विकास निश्चितच प्रशंसनीय आहे. वारंवार किरकोळ प्रमाणावर भूकंप होत असल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकास, लहान मुलांना देखील भूकंपजन्य परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि काळजीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणच फार मोठी भूमिका पार पाडत आहे. त्सुनामी येऊन पुढे झालेले नुकसान हा भाग वेगळा...मात...

निघाले देश बुडवायला..

  जपानमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या भूकंप आणि त्सुनामी मुळे सगळीकडे पाणीच पाणी होऊन आणि हजारो घरे, मालमत्ता पुरात वाहून गेल्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली. जीवंत राहिलेल्यांनी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून पाणी-पाणी झाले. संपूर्ण देशच जणू निसर्गाने पाण्यात बुडविल्यासारखी स्थिती जपानमध्ये निर्माण झाली आहे. जपानमध्ये निसर्गानेच देश बुडवला आहे. तर भारतात मात्र विविध घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा साठविणे, कर चुकवेगिरी आदी विविध प्रकाराने माणसांकडूनच मानव-निर्मित सुनामी येऊन यातच बहुदा देश बुडवला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज: भुजबळ

  मुंबई, ता. १५ - ऍम्युझमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. इंडियन असोसिएशन ऑफ ऍम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित अकराव्या "ऍम्युझमेंट एक्स्पो" या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञान जितक्या गतीने विकसित होते तितक्याच गतीने ऍम्युझमेंट (मनोरंजन) उद्योगांनी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या विविध उपक्रमात सुद्धा सातत्याने नाविन्यपूर्णता आणि अभिनवता आणण्याची गरज असते. तसे झाले तरच एकदा येणारा पर्यटक, ग्राहक पुन्हा तिथे येईल. तसेच नवीन ग्राहकांची देखील भर पडेल. ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिण्याची गरज आहे. सुमारे पाच हजार कोटिंचा ऍम्युझमेंट उद्योगाच्या आशिया-पॅसिफिक विभागातील वृद्धीचा दर ५.५ टक्के प्रतिवर्ष इतका आहे. तोच युरोपसह अन्यत्र ५ टक्के आहे. म्हणूनच अनेक परकीय गुंतवणुकदार ...

उपनिबंधक राजेंद्र मगर यांचे निधन

शिरूर (जिल्हा पुणे) येथे तहसील कार्यालयात उपनिबंधक असलेले राजेंद्र गुलाबराव मगर (वय ४६) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , एक मुलगी , वडील , भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. सोमवारी दुपारी कोपरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील उपखेड (ता. चाळीसगाव)   येथील राहिवाशी असलेले मगर गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव बेट येथे स्थायिक होते. अत्यंत दानशूर आणि धार्मिक तसेच त्यांच्या मनमिळावू परिस्थितीमुळे त्यांचा मित्रपरिवारही दांडगा होता. ' राजाभाऊ ' या नावाने ते तहसील विभागात व मित्रपरिवारातही लोकप्रिय होते. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून   ते पहिल्याच प्रयत्नात स्टाफ सिलेक्शनमार्फ़त सरकारी सेवेत दाखल झाले होते. त्यांना तहसील विभागाचा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा तसेच राजपत्रीत अधिकारी महासंघाचाही गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते  

पंछी बनू

पंछी बनू..उडते फिरू..मस्त गगन में...।।।

तूच घडविता..!!!

तूच घडविता, मी तर घटना...तूच चेतविता, तूच चेतना..., तूच करविता, मी तर कारण..., तुझेच देणे, तुलाच अर्पण

chintan...Dr. Nikam Smriti Pusarkar..

Chintan Group's Sevaprabodhini's Dr.Da.Vi.Nikam Smriti Puraskar presented to Nitesh Bansode (Nagar's Savli orgzn working for children hailing from HIV positive families ).Rajjyotishi Puraskar prsntd to Vijaykumar Swami at hands of MP Ranjitsinh Mohite Patil & Prabhat Editor Arun Khore. Also present were Sadanand More,D.V.Atre,Dilip Jagtap,Rahul Shinghavi, Ravi Chowdhary,Pandurang Kolage,Satish Gadale,Sunanda Gadale,Lokmat Pune Editor Vijay Bawiskar Ulhas Latkar,Hari Chikne,etc.Chintan Thorat anchored show. Swati Thorat gave vote of thanks.Abhinandan Thorat envisaged various activities of Chintangroup in his speech. On the dias were MP Ranjitsinh Mohite-Patil,Appa Dingankar, Arun Khore,Leelatai Nikam, and awardees.

99 + 1 = 100...बस्स...!!!

  मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर आता आपल्या जागतिक विश्वविक्रमापासून अवघे एक पाऊल दूर आहे. शंभर धावांची अर्थात शतकांच्या शतकांसाठी शतकी शतक पूर्ण करण्यासाठी सचिनला आता अगदी थोडीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी, धीरोदत्त असणाऱ्या सचिनने 99 वे शतक झळकविण्यापूर्वी सुद्धा शांतपणे स्थिर बुद्धीने प्रत्येक चेंडूवर खेळी खेळून योग्य वेळी 4, 6 धावा काढून आणि अक्षरशः काही धावा पळून काढल्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतच सचिन आपले हे 100 वे शतक करणार हे मात्र नक्की...

me..and..U..Only!!!

CIDCO conducts special workshop to expedite the NMIA Project

To discuss the learnings from various airport projects commissioned in the country under PPP structure and the way forward for the development of the prestigious Navi Mumbai International Airport (NMIA) project, a one-day workshop was organised by CIDCO for the senior officials of Central Govt., State Govt., consultants and senior officials of CIDCO. The objective of the workshop was the deliberation on the formalization of legal and bidding parameters for NMIA. The workshop was organised by CIDCO, in association with M/s Hemant Sahai & Associates on 10th March, 2011 at Vivanta By Taj, President Mumbai to expedite the bidding process of the Airport. In the introductory remark, Mr. T.C. Benjamin, IAS, Principal Secretary, Urban Development, GoM, made a key note, where he briefed about the NMIA project, the activities undertaken and its current status. Mr. Tanaji Satre, VC & MD, CIDCO, also shared his views on the subject and briefed about the workshop to the participants. The...

स्व. गुरुनाथ कुलकर्णींचे कोकण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ८ - सर्वसमावेशक राजकारणी, निर्भीड वक्ता, अभ्यासू नेता आणि पत्रकार-कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे सर्वांचे मित्र अशी ओळख असलेल्या स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांचे कोकण विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुलकर्णी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार सर्वश्री प्रताब आसबे यांना गुरुकुल पुरस्कार, प्रकाश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, प्रकाश सावंत, शशिकांत सांडभोर, निशांत सरवणकर यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार उल्हास पवार, माजी आमदार अरविंद सावंत, श्रीमती स्वप्नगंधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र पांचाळ यांनी केले. स्वप्नगंधा कुलकर्णी यांनी आभार मा...

'मी मराठी" चा ४०० वा प्रयोग सादर

मुंबई, ता. ७ - प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात काल (ता. ६) लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरची प्रस्तुती असलेला 'मी मराठी' या सांगितिक कार्यक्रमाचा चौथा वर्धापनदिन तसेच ४०० वा प्रयोग सादर करण्यात आला. राज्याचे पर्यावरणमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, की लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वारसा त्यांचे सुपुत्र नंदेश आणि संदेश यांनी अत्यंत समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. विठ्ठल उमप यांची लोककलेवरील निष्ठा, संचार, प्रभुत्व इ. कौशल्याची प्रचिती 'मी मराठी' या कार्यक्रमातून येते. विठ्ठल उमप यांना जनतेने जे प्रेम दिले तसेच प्रेम उमप बंधूंना देखील लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ढोलकीसम्राट राजाराम जामसंडेकर, पंडित बी. ए. तुपे गुरुजी, पत्रकार युवराज मोहिते यांच्यासह श्रीमती वत्सला विठ्ठल उमप उपस्थित होत्या.

एलिफंटा महोत्सवास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. ६ - महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एलिफंटा महोत्सव-२०११ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे पर्टटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ऐतिहासिक घारापुरी बेटांवर दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवाचे उदघाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ, निवृत्त न्यायाधीश राधाकृष्णन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे उपस्थित होते. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडण्याच्या दृष्टीने पर्यटनास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने असे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरते, यात खंड पडू न देण्याची दक्षता घेतली पाहिजे असे मत यावेळी श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवात डॉ. राजा आणि राधा रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने वातावरणात गहिरे रंग भरले तर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाच्या दुसर्‍या (शेवटच्या) दिवशी गीता चंद्रन यांचे भरतनाट्यम् आणि ...

अर्जुनसिंग यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्याला मुकलो: अजित पवार

मुंबई, ता. ४ - माजी केंद्रीयमंत्री अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे आपण एका ज्येष्ठ नेत्याला मुकलो आहोत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की अर्जुन सिंग प्रदीर्घ काळ देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळून सामान्यांच्या हितास प्राधान्य दिले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून काम करताना देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दीर्घ काळ स्मरणात राहतील.

अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे मागासवर्गीयांचा भक्कम पाठीराखा हरपला: भुजबळ

मुंबई , दि. 4 फेब्रुवारी : ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे देशातील अल्पसंख्य , मागासवर्गीय समाजाचा भक्कम पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे , अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की , अर्जुन सिंग हे भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घेतलेल्या कणखर पुढाकारामुळेच मागासवर्गीय समाजाला हा लाभ होऊ शकला. अल्पसंख्य , मागासवर्गीय समाज याबद्दल नेहमीच अर्जुन सिंग यांचा ऋणी राहील , असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे

21 व्या शतकातील महिला

 

माया..माया..

असले जरी हे मागे जोडे...आहे मजला तव कवतुक थोडे..  

लोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने संवर्धनाचे काम करावे: भुजबळ

मुंबई, ता. ४ - लोणार सरोवर परिसरातील प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. तशाच तोडीचे काम राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मंत्रालयात लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभाग मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन उपसचिव राजीव निवतकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद सर्कलचे उपअधिक्षक ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम्, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी रामस्वामी तसेच सार्व. बांधकाम व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोणार सरोवराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबतही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) यांच्याकडून सरोवरात लोणार शहरातून जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत सविस्तर अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सरोवराभोवती चेन-लिंक फेन्सिंग कर...

शिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार: भुजबळ

मुंबई ता. ४ - शिवकालिन रायगड जसाच्या तसा उभारण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री, केंद्रीय सचिवांसह भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. याबाबत श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह त्यांनी रायगडखेरीज राज्यातील अन्य पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांच्या संवर्धनाच्या कामाबाबतही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

डाव्यांनी फुलेंचा शेतर्‍यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडे

मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्‍यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...! हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन स...

उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ

ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता ...

कृषिधन...

हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेतील विद्यार्थी संघास सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी सार्व. बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ ३० हजारांचा धनादेश प्रदान करताना..