मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाताळ, नववर्षानिमित्त शुभेच्छा

" लेखणी " च्या समस्त वाचक, हितचिंतकांना नाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! लेखणी वर आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सदिच्छा असेच कायम राहो, हीच प्रार्थना...

पुन्हा एकदा नापाकांचे लक्ष्य: मुंबई

मुंबईत लष्कर ए तैय्यबा चे चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिल आहे. २६-११ ची घटना अजून शमत नाही तोच पुन्हा एकदा नापाक अतिरेक्यांचे लक्ष्य शांत आणि सर्वधर्मसमभावासाठी पवित्र मानल्या जाणार्‍या मुंबईकडे आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, स्थानके, विविध धार्मिक स्थळे आणि अतीसंवेदनशील भागांना अतिरेकी लक्ष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही तासातच नाताळ सण सुरू होत असून लवकरच नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव याच्या उधाणाचा उत्साह पसरेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांना व विशेष पथकास पाचारण करण्यात आले असून नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. २६-११ घटनेतील हाती लागलेला आरोपी कसाब हा पाकिस्तानचा नागरीक असल्याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध झाल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात आले आहे. विविध क्लुप्त्यांनी कसाब स्वतःची सुटका न्यायालयातून करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संसदेवर हल्ला करणार्‍यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आलेली असली तरीही अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतिंकडे प्रकरण गेले असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. क...

विठ्ठल महाराज यांच्या निधनामुळे प्रबोधनाचा वारसा खंडित

मुंबई, ता. २३- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी यांच्या निधनामुळे भक्तीच्या मार्गाने प्रबोधनाचा वारसा पुढे नेणार्‍या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की वारकरी संप्रदायाच्या शिक्षण परंपरेचा पाया घालणार्‍या आणि देशाला नवनवीन प्रवचनकार व कीर्तनकार देणार्‍या गुरुवर्य जोग महाराजांच्या संस्थेचे अध्यक्षपद चौधरी यांनी भूषविले, हेच त्यांच्या आयुष्यातील महान कार्य व महान गौरव आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेचे केलेले अत्यंत सखोल व भावगर्भ असे विवेचन हे जोग महाराज संस्थेचे वेगळे वैशिष्ट्य सांगता येईल. संस्थेच्या या वैशिष्ट्यात आणि लौकिकात मौलिक भर घालण्याचे कार्य चौधरी महाराज यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा वाढल्या

गेल्या आठवड्यात कांद्याने रडविल्यामुळे, काळ्या बाजाराचे व्यापारी हसले होते. कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. कांद्याचे प्रकरण ताजे असतानाच काही भागातील बाजारपेठेत टोमॅटो देखील निकृष्ट दर्जाचे  दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासह भुईमुगाच्या तेलासह, साबुदाणा, शेंगदाणा, खोबरे, तीळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महागाईविरुद्ध शासनाशी संघर्ष करण्याची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत.

क्षण आनंदाचा...

...तर रायगड जसाच्या तसा उभारू! -भुजबळ

मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण व...

"सावित्रीचे सावित्रीपण" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई येथे मंगळवारी (ता. २१) प्रकाश धुळे यांच्या "सावित्रीचे सावित्रीपण" या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री सचिन अहिर, श्री. धुळे, नंदकुमार वाघ आदी.

उपमुख्यमंत्र्यांकडून पहिलवान बुचडे यांचे अभिनंदन

मुंबई, ता. २२- पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मानाचा "रुस्तम-ए-हिंद" किताब पटकावून सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी कामगिरी बजावलेल्या पहिलवान अमोल बुचडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काळात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्री. बुचडे यांनी ही कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे राज्यात कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाची भर पडून नवोदितांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या शब्दात श्री. पवार यांनी बुचडे यांचे अभिनंदन केले.

देशात पाचव्या पिढीची विमाने तयार होणार

भारत आणि रशियात नुकतेच विविध ३० करार झाले आहेत. यात प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही रशियाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेच भर दिलेला दिसतो. दोन्ही देशांमध्ये येत्या दोन वर्षात सुखोई सारखीच लढाऊ विमानांची पाचवी पिढी तयार करण्याचा प्रस्ताव असून सन २०३० पर्यंत अशा प्रकारची सुमारे तीनशे विमाने तयार होतील. ही विमाने तिसर्‍या देशास दोन्ही देश मिळून विकणार आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे ब्रह्मोस मिसाईल देखील तयार करण्यात आले आहे. यासह अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातीस सहकार्याचा देखील महत्वपूर्ण करार करण्यात आला. भारतातील वैज्ञानिकांचे एक पथक लवकरच रशियात जाणार आहे. एक पथक यापूर्वीच रशियात दाखल झाले असून डिझाईन आणि संशोधन दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे सुरू केले देखील आहे.

सिडकोतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न

मुंबई, ता. २२- नवी मुंबई येथील सिडको भवनमध्ये सिडकोतर्फे नुकताच नवी मुंबईतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक व शाळांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण हा एक यज्ञ असून त्यात आपल्या श्रमाची आहुती टाकल्यानंतर त्यातून येणारी निष्पत्ती ही देशाचे भाग्य असते. गुणवंत विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन आपली कारकीर्द घडविण्यापेक्षा आपल्या देशाच्या महासत्तेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातच आपले योगदान द्यावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे हे कल्याणकारी राज्यांचे धोरण असावे. नोडल क्षेत्रासाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नेरूळ येथील अपीजय स्कूलच्या चंद्रिका एरी, दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळच्या मोनिका शर्मा, खारघरच्या अपीजय स्कूलच्या कुसुम प्रजापती, ज्युडिथ जॉन यांना देण्यात आला. प्रकल्प क्षेत्रासाठी बेलापूर येथील विद्या प्रसारक हायस्कूलचे विश्वास ठाकूर, कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्था हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शोभा पाटील, ज्युनियर कॉलेजचे अशोक...

२१ डिसेंबर सगळ्यात लहान दिवस-झोपाळूंची मजा

मंगळवार ता. २१ डिसेंबर हा दिवस वर्षातला सगळ्यात लहान दिवस ठरणार आहे. मंगळवारी सकाळी ७.०८ वाजता सूर्योदय आणि सूर्यास्त संध्याकाळी ६.०५ वाजता होईल. पृथ्वीच्या उत्तरायणास मंगळवार ता. २१ पासून सुरवात होईल उत्तरायण वर्षातून दोनदा होते. यापैकी एक दिवस लहान आणि एक दिवस मोठा असतो. यासाठी १८० दिवसांचा कालावधी लागतो. हिवाळ्यात सूर्य विषूववृत्तापासून लांब जातो म्हणून दिवस लहान होतो. २१ डिसेंबरला सूर्य आणखी लांब जाईल परिणामी सूर्यास्त आणखी लवकर होईल. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो.   झोपाळूंची मज्जा.. केव्हा एकदा दिवस संपून रात्र होते आणि आपण झोपतो अशी वाट पाहणार्‍या झोपाळू लोकांसाठी आजचा दिवस पर्वणीच असून आज (मंगळवार) दिवस हा १०.५७ मिनिटांचा आणि सगळ्यात मोठी रात्र १३.०३ मिनिटांची असेल. अशी माहिती विनायकशास्त्री जोशी यांनी दिली.

कांद्याची निर्यात थांबविणे स्तुत्य

शासनाने भारतातून केली जाणारी कांद्याची निर्यात तूर्त थांबविली आहे. सद्य परिस्थितीत उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आणि स्तुत्य आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा, द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गुदामांमध्ये साठविलेला कांदा अक्षरशः सडल्यामुळे फेकून द्यावा लागला. यातही, जीवो जीवस्य जीवनम्.. प्रमाणे केवळ हातांवर आणि पायांवरच पोट चालणार्‍या घटकांनी यातूनही थोडा सुस्थित असलेला कांदा वेचून विकला आणि काही दिवस कशीबशी उपजिवीका सुरू ठेवली. मात्र व्हायचे तेच होऊन हा कांदा देखील अंकूरल्यामुळे फेकून द्यावा लागला. बाजारपेठेतून कांदा पूर्णपणे नाहीसा होण्याची चिन्हं दिसू लागली. धनदांडगे व्यापारी आणि काही गुदामांमध्ये असलेला उर्वरित कांदा चढ्या भावाने विक्रीस सुरवात होऊन याचा परिपाक म्हणजे अवघ्या आठ ते बारा रुपये प्रति किलो दराने मिळणारा कांदा आज महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पन्नास ते सत्तर च्या घरात पोहोचला आहे. शासनाने नुकतीच तातडीची बैठक बोलावून सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन देशातून केली जाणारी कांद्याची निर्यात थांबविण्याचे आदेश नाफेडला दिले आहेत. किंमतीचा उंचावणारा आलेख कुठेतर...

सिडको गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी

मुंबई, ता. २०- बेलापूर येथे उद्या (ता. २१) सिडको गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सिडकोतर्फे दरवर्षी मुंबई कार्यक्षेत्रातील शालांत परिक्षा, उच्च माध्यमिक शालांत परिक्षा आणि सीबीएसई, आयसीएसई च्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते. सिडको भवन, सातवा मजरा, सिडको सभागृह, सीबीडी-बेलापूर नवी मुंबई ४००६१४ येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, आमदार आणि संचालक सुभाष भोईर, संचालक नामदेव भगत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. असे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी कळविले आहे.

साहित्यिक डॉ. भेंडे यांना पवार, भुजबळ यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या निधनामुळे गंभीर लेखनाबरोबरच विनोदी लेखनावरही प्रभुत्त्व गाजविणार्‍या आणि नाविन्याचा दृष्टीकोन बाळगणार्‍या लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. भेंडे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या शैलीतून प्रबोधनाचे कार्य केले. नजरेच्या मिस्किल चष्म्यातून जीवनातील घडामोडींकडे ते खेळकर दृष्टीने बघत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांनाही ते सहभागी करून घेत. विनोदाच्या पायवाटेवरून चालताना गंभीर आणि समस्याप्रधान कादंबर्‍यांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या कादंबर्‍यांमधील आशयात विलक्षण विविधता जाणवते, असा दिलदार आणि अंगभूर रसिकता असलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट संवेदनशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. सुभाष भेंडे उत्कृष्ट साहित्यिक होतेच परंतु एक उत्तम माणूस देखील होते, या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

कांद्याने अखेर नाकात दम आणलाच!

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक झळ बसलेला कांदा या पीकाच्या किंमती वाढणार हे स्वाभाविक होतेच. यातूनही काही बहाद्दरांनी फेकलेल्या सडक्या कांद्यातून त्यांना बरा वाटणारा कांदा वेचला. नागरीकांनी देखील विशेषतः महिलांनीही दोन पैसे वाचतील म्हणून स्वस्तात मिळणारा कांदा दोन, पाच किलो घेऊन ठेवला. मात्र  हा कांदा देखील जास्त दिवस टिकू शकला नाही. चार-पाच दिवसातच कांद्याला अंकूर फुटल्यामुले पुन्हा एकदा हा फेकण्यात आला. यानंतर कांद्याच्या किंमती सातत्याने गगनाला गवसणी घालत असल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणले होते. याच कांद्याने आता त्यापेक्षा पलिकडे जाऊन न खाताच चांगला झोंबून तिखट लागल्यामुळे नाकात दम आणला आहे. सांगलीसह काही शहरांमध्ये तर चक्क ६५ (पासष्ट) रूपये प्रति किलो या दराने कांदा विकला जात आहे. नाशिक, मुंबई चाळीस ते पन्नास रूपये असा दर आहे. मध्यमवर्गीयांनी मात्र कांदा न खाणेच पसंत केले आहे. या दरवाढीमुळे, नुकतेच चंपा षष्ठीला संपलेले चातुर्मास आणखी काही दिवस सुरू राहतील, असे गृहिणी मानत आहेत.

साहित्यिक डॉ. भेंडे यांना पवार, भुजबळ यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या निधनामुळे गंभीर लेखनाबरोबरच विनोदी लेखनावरही प्रभुत्त्व गाजविणार्‍या आणि नाविन्याचा दृष्टीकोन बाळगणार्‍या लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. भेंडे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या शैलीतून प्रबोधनाचे कार्य केले. नजरेच्या मिस्किल चष्म्यातून जीवनातील घडामोडींकडे ते खेळकर दृष्टीने बघत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांनाही ते सहभागी करून घेत. विनोदाच्या पायवाटेवरून चालताना गंभीर आणि समस्याप्रधान कादंबर्‍यांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या कादंबर्‍यांमधील आशयात विलक्षण विविधता जाणवते, असा दिलदार आणि अंगभूर रसिकता असलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट संवेदनशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. सुभाष भेंडे उत्कृष्ट साहित्यिक होतेच परंतु एक उत्तम माणूस देखील होते, या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

बोगस "बहिरे" झालेल्यांसाठी शासनानेही व्हावे 'बहिरे'...

धुळे जिल्ह्यात अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मॅनेज् करून अर्थातच बोगस बहिरे झाल्याचे वृत्त आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आता शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि सर्वात आदराने पाहिले जाणारे काही शिक्षक देखील सरसावले आहेत. अशा सर्व बोगस, खोटा दाखला देऊन, अहवाल सादर करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटे बहिरे बनणार्‍या कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी शासनानेही बहिरे होऊन दुर्लक्ष करावे म्हणजे खरेपणा ऐकू येईल, हीच अपेक्षा!

सेंचुरियन मध्ये ५० वी सेंचुरी..वेल डन् सच्यू..

क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर याने काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंचुरियन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सेंचुरी केली. आपल्या कारकीर्दितली सचिन याची कसोटी सामन्यातील पन्नासवी सेंचुरी (शतक) आहे.सचिनचे करावे तितके कौतुक थोडे आहे... सुरवातीपासूनच उत्कृष्ट फलंदाजी करून भल्या भल्यांना पाणी पाजणार्‍या सचिनकडे क्रिकेटप्रेमी अपेक्षेनेच पाहू लागले. कसोटी सामन्यात पन्नासवे शतक झळकावणारा सचिन हा आज संपूर्ण जगातला, क्रिकेट विश्वातला पहिला बॅट्समन् झालाय. सचिनचे आता वय झाले आहे, सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणणार्‍यांना त्याने अजूनही आपण 'फिजिकली-फिट्' असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.  ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सुद्धा ते म्हातारे झाले पण सचिन अजूनही तरूण आहे या शब्दात सचिनबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. गानसम्राज्ञी आशा भोसली यांनी तर सचिनला आता भारत-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन केले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्येही सचिनची ४६ शतके पूर्ण झाली असून तिथेही सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी सचिनला मिळणार आहे. हा विक्रम नोंदवण्यास सुद्धा केवळ चार शतक...

"डॉक्टरांची माफिया गँग" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, ता. १८ (वार्ताहर)- राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत उर्फ काकासाहेब पुरंदरे यांच्या "डॉक्टरांची माफिया गँग" या पुस्तकाचे काल (ता. १७) प्रकाशन करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या कार्यक्रमात शिवनेर चे संपादक नरेंद्र वाबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी, माउंट अबू येथील डॉ. सचिन परब, योगतज्ज्ञ दादा वैशंपायन, श्रीकृष्ण चैतन्यप्रभू, डॉ. वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, की पुरंदरे यांचे अनुभव तसेच सामान्य माणसाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक वास्तवावर आधारित आहे. व्याधी दूर व्हाव्यात म्हणून योगोपचार उत्तम औषध असल्याचं भुजबळ म्हणाले. तीस वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा योगोपचाराचं महत्व पटलेलं आपण पाहिलं आहे. काका पुरंदरे म्हणजे समाजाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी परखड शब्दात डोळ्यात अंजन घालणारा ज्येष्ठ पत्रकार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काही अपप्रवृत्ती असल्या तरी नि:स्वार्थीपणे व पैशाची अपेक्षा न ठेवता कार्य करणारे डॉक्टर्ससुद्धा असंख्य आ...

शासकीय वसूलीनुसार वेतन,भत्ता वाढ देण्यात यावी...

विधानसभेत विविध विषयांवर चर्चा होवो न होवो, अनेक महत्वाच्या, जीवनावश्यक गोष्टींबाबत निर्णय लागो न लागो...याकडे दुर्लक्ष करून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांच्या भत्त्यात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. हा ठराव मात्र एकमताने पारित करण्यात आला. लोकप्रतिनिधी म्हणवणार्‍या या महनीयांना बहुदा स्वतःची नागरीक, मतदारांसाठी असलेल्या जबाबदारी आणि आपण लोकप्रतिनिधी असल्याचा बहुदा विसर पडला असावा. दिवसेंदिवस महागाई गगनाला गवसणी घालतेय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सारखे वाढतच आहेत, वर्षभरात पाच वेळा वाढलेल्या पेट्रोल दराचे उदाहरण पुरे आहे. असे विविध विषय प्रलंबित असून महत्वाच्या विषयांच्या चर्चेसाठी वादविवाद, राजकारण, गदारोळ, गोंधळ घातला जातो. या वाढीमुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे सोळा कोटिंचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. शासकीय तिजोरीचा बोजा वाढवायचा की कमी करायचा, त्या तिजोरीत भर घालायची याबाबत सर्व महनीय साशंक झालेले वाटत असून केवळ शासनाच्या तिजोरीऐवजी स्वतःची तिजोरी भरण्यातच धन्यता मानणारे राजकारणी तयार झाले आहेत. एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांशी चर्चा करणे गैर मानणारे नेते वेतन...

ढगांच्या उबेत लपला सूर्य..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संशोधक खोब्रागडे यांना जमीन

मुंबई, ता. १४- नांदेड (जि. चंद्रपूर) येथील तांदळाच्या वाणाचे संशोधक शेतकरी दादाजी खोब्रागडे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासनातर्फे दीड एकर जमीन देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोब्रागडे यांना जमिनीचा सातबारा उतारा सुपूर्द केला. अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त गोपाळ रेड्डी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विजय वाघमारे आदी उपस्थित होते. खोब्रागडे यांनी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. यानुसार आज पूर्तता करण्यात आली. नांदेड येथेच त्यांना ही जमिन देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असतानाही तांदळाच्या विविध वाणांचे संशोधन करून त्यांनी मोठे कार्य केले आहे.

आता लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमन वेल्थ गेम्स, आदर्श गृहनिर्माण घोटाळा या विषयांमुळे विरोधक व सत्तारूढ पक्ष यांच्यातील मतभेद व खडाजंगी होऊन परिणती शून्य झाली. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची शक्यता असून यात काय होते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी सुरळीत पार पडेल अशी आशा लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केली आहे.

संसद हिवाळी अधिवेशन- खर्च १४६ कोटी:निष्पत्ती शून्य

संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाने आजपर्यंतचे सर्व नीचांक मोडित काढले असून २३ दिवस कामकाज न होण्याचा नीचांक मात्र गाठला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, या अधिवेशनात एकूण १४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. १) लोकसभेचे १२७.४० तास वाया गेले. २) राज्यसभेचे कामकाज १०० तास झाले नाही. ३) लोकसभेत अवघे २.३० तास आणि राज्यसभेत ७.३० तास कामकाज. ४) लोकसभेत १० सरकारी विधेयकेपास, ६ पारित १ माघारी. ५) राज्यसभेत ३ विधेयके पास अन्य ४ माघारी ६) दररोज ६.३५ कोटी रुपये खर्च ७) एकूण १४६.०५ कोटी रुपये खर्च ८) निष्पत्ती शून्य...

पत्रकार शैलेंद्र चव्हाण त्रिची येथे सन्मानित

तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय केळी परिषदेतील उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल सोमवारी (ता. १३) त्रिची येथे जळगावचे पत्रकार शैलेंद्र चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. फ्रान्समधील बायोडायव्हरसिटी नॅशनल अकॅडमीचे डॉ. स्टीफन बेईज यांच्या हस्ते चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

संसदेच्या अधिवेशनास थंडी बाधली: अधिवेशन समाप्त

गेल्या नऊ नोव्हेंबरपासून सुरू असलेले संसदेचे अधिवेशन आज १३ डिसेंबरला समाप्त झाले. सत्तारूढ व विरोधकांमधल्या वारंवारच्या खडाजंगीमुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनास दिल्लीची थंडी बाधल्याची स्थिती आज अखेर चित्र होते. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा या प्रमुख विषयाच्या मागणीसह काही मागण्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गाजल्या. केवळ पहिल्या दिवशी अधिवेशन काहीसे सुरळीत होऊन दुसर्‍या दिवसापासून विविध मागण्या, खडाजंगी, विरोधकांचे न जुमानणे आदी कारणांमुळे लोकसभेची दोन्ही सदने दिवसातून अनेकदा तहकूब करावी लागली होती. लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांनी अधिवेशनाबाबत असमाधान व्यक्त केले. तर हमीद अन्सारी यांनी  "आत्मचिंतन" करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

राजकारणात देखील वयोमर्यादा असावी...

एरवी शासकीय नोकर्‍यांच्या निवृत्तीसाठी असलेली वयोमर्यादा राजकारणात देखील निश्चित करण्यात यावी, अशी एक मागणी पुढे येत आहे. शासकीय, निमशासकीय क्षेत्रात वयाची अट्ठावन्न ते साठ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस निवृत्त होण्याची तरतूद असून याचप्रमाणे राजकारणी मंडळींच्या राजकारणात वावरण्याची वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात यावी. वय वाढते तशी परिपक्वता वाढते हे सत्य असले तरीही याचबरोबर माणसाचे शरीर देखील थकते, हे देखील नाकारता येणार नाही. राजकीय क्षेत्रात निवृत्तीची कोणतीही वयोमर्यादा अद्याप तरी नाही. वयाची सत्तरी, ऐंशी वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती देखील मोठमोठ्या पदांवर विराजमान असते. या माध्यमातून पैसाही पाहिजे तसा मिळत असल्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी बहुतेक मातब्बर राजकारणी मंडळींना खुर्चीचा मोह असतो, त्यांना सहजासहजी खुर्ची सोडावीशी वाटत नाही. बोटावर मोजण्याइतकी मंडळी राजकारणातून सन्यास घेतात. तरीही मधुनमधून त्यांची राजकारणात ढवळाढवळ करण्याची सवय जात नसल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षात युवक वर्ग देखील राजकारणात प्रवेश करत असल्याचे, सक्रिय होत असल्याचे दिसून येते. 'युवक म्हणजे अपरिपक्व...

भारनियमनमुक्ती धोरणाचे कौतुकच...

संग्रहित छायाचित्र राज्यातील एक हजार मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे वीजप्रकल्प असलेल्या जिल्ह्यांना भारनियमनमुक्ती देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कौतुकास्पद आहे. याची अंमलबजावणी लवकर होण्याची अपेक्षा आहे. सरासरी पाच हजार मेगावॉट वीजेच्या टंचाईस राज्य तोंड देत असून, एक हजार मेगावॉटपेक्षा अधिक क्षमतेचे वीजप्रकल्प असलेल्या जिल्ह्यांना भारनियमनमुक्ती देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच स्पष्ट केले. यासाठी नियामक आयोगास प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. वीजप्रकल्पांच्या पाच किलोमीटर परीघ असलेल्या परीसरास भारनियमनमुक्त करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले आहे. डिसेंबर २०१२ अखेर संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त होणार असल्याचे आणि २०१७ पर्यंत शासनाचे नियोजन तयार असल्याचे त्यांचे वक्तव्य विचार करण्यासारखे आहे. राज्यात दरवर्षी सरासरी आठ टक्के वीजेची मागणी वाढत असून येत्या उन्हाळ्यात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाच किलोमीटर परीसर भारनियमनमुक्त करण्याचा कालावधी मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. डिसेंबर २०१२ अखेरच बहुदा...

धन्य ती संसद..

संसदेचे आज विसाव्या (२०) दिवशी सुद्धा कामकाज झाले नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे आज पुन्हा एकदा संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आले. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. विविध भ्रष्टाचार प्रकरणांसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी करत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी १९ दिवस संसदेचे कामकाज बंद पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. आज दुपारनंतर देखील संसदेचे कामकाज होऊ शकले नसल्याच्या वृत्तास सूत्रांनी दुजोरा दिला आहे. विरोधक अथवा सत्तारूढ पक्षाचे सदस्य असले तरी देखील काळ, अर्थाचा अपव्यय होऊ न देता चर्चा करून शेवटी तोडगा काढणे, उपाययोजना करणे, समाधान शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे.

विदर्भात पर्यटनाद्वारे अर्थकारणास चालना शक्य-भुजबळ

नागपूर, ता. ८ - विदर्भात मुबलक प्रमाणात असलेल्या वनसंपदेचा तसेच वन्यजीव सृष्टीचा येथील स्थानिक निसर्ग पर्यटनास (इको-टुरिझम) चालना देण्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यासह अर्थकारणासही मोठ्या प्रमाणात चालना देणे शक्य आहे. असे मत पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. विदर्भाचा एकात्मिक पर्यटन विकास करण्यासाठी तसेच निसर्ग पर्यटनास चालना देण्यासाठी वन आणि पर्यटन विभागांच्या संयुक्त सहकार्यातून नेमके काय करता येऊ शकेल याचा आढावा घेण्यासाठी श्री. भुजबळ यांनी आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. रवीभवनमधील श्री. भुजबळ यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. विदर्भातील पर्यावरणास कोणतीही हानी न पोहोचवता आपल्याला येथील निसर्ग पर्यटनाचा विकास करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग हा आज जगातील सर्वाधिक मोठा उद्योग बनला असल्याचे सांगून यामुळे राज्यात विविध प्रकारच्या पर्यटनास चालना देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अन्य देशांचे वन, पर्यावरणविषयक कायदे वेगळे असले तरी किमान आपल्याच देशातील मध्यप्रदेश, कर्नाटक आद...

राजकारणी होण्यासाठी निश्चित शिक्षण अनिवार्य करण्याची गरज...

प्राध्यापक होण्यासाठी यापुढे नेट परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होणार असून याप्रमाणेच राजकारणात देखील निश्चित स्वरूपाचे शिक्षण अनिवार्य करणे आवश्यक आहे. देशातील निरक्षरतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी केवळ इयत्ता दहावी मॅट्रिक उत्तीर्ण किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीकडे आदराने पाहिले जात होते. अर्थात तेव्हा परिस्थिती देखील तशीच होती. परंतु सातत्याने होणारा विकास, शिक्षणासाठी शासनाने उचललेली पावलं, बदललेलं समाज-मन यामुळे आज निरक्षरतेचे प्रमाण कमी होऊन साक्षरता वाढली आहे. काही ठिकाणी आजही रात्रशाळांमध्ये अभ्यासवर्ग घेतले जातात. काळाच्या ओघात दहावीचे शिक्षण म्हणजे नाममात्र शिक्षण झाले असून आता उच्च शिक्षा विभूषित व्यक्तीकडे आदराने पाहिले जाते. पूर्वीचा "गावचा पोर्‍या" आता गावात साहेब होऊन कर्तव्य बजावतोय, परदेशात सेवा देऊन गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करतोय. पूर्वीची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सुद्धा आता पूर्णपणे शंभराच्या घरात पोहोचली आहे. ५०% गुण म्हणजे भरपूर झाले... असा समज आता गैर झाला आहे. आता प्रचंड स्पर्धा असून ९०%, ९५%, ९९.९९% गुण प्राप्त करणार्‍या विद...

वाराणसी ब्लास्ट- पुन्हा शांत का आहे सरकार?

वाराणसी येथे काल (ता. ७) संध्याकाळी बॉम्बस्फोट होऊन दोन ठार तर सुमारे २५ जखमी झाले. दोन जीवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याची जबाबदारी एका अतिरेकी संघटनेने स्वीकारल्यानंतर देखील सरकारने कठोर पावले उचलण्याऐवजी केवळ शांततेचे आवाहन केले आहे.  मुंबईवर २६-११ चा भीषण हल्ला होऊन देखील तेव्हा संधी असूनही आणि पुरावे उपलब्ध असून देखील पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा या माध्यमातून संधी आहे. सरकारने शांत न बसता काहीतरी करण्याची गरज आहे.

आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त

1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८    2. के.व्ही.के. सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७    3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२    4. डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३    5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७    6. एक्स.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२    7. आर.के. त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५    8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०    9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०   10. टी.एन. शेषन् : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६   11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१   12. जे. एम. लिंगदोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४   13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५   14. बी.बी. टंडन : १६ मे २००५ to २८ जुन २००६   15. एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९   16. नवी...

मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर

मुंबई, ता. ६- लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोहर जोशी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तसेच शिवसैनिकांनी जोशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.  माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही श्री. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.

सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आशेला पालवी

(वृत्तसंस्था)- अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरूंगात जीवंतपणीच जगण्याची आशा मावळलेल्या भारतीय वंशाच्या सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आणि तुरूंगातून सुटका होण्याच्या आशेला पालवी फुटली आहे. त्याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. काही वर्षांपूर्वी लाहोर येथील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरबजितसिंग याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित प्रकरणात मनजितसिंग ही व्यक्ती खरा आरोपी असल्याचे सरबजितसिंग याचे वकील ओवेस शेख यांनी सांगितले असून ते लवकरच तसे पुरावे देखील न्यायालयात सादर करणार आहेत. मनजितसिंग सुमारे तीन वर्षे कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असून, तो बॉम्बस्फोटाच्या वेळी लाहोरमध्ये होता असे पुरावे सापडल्याचे शेख यांनी सांगितले. सरबजितसिंग याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी भेटवस्तू बनविल्या असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीडी प्रकाशन

जन्माचे सार्थक झाले भीमा तुझ्यामुळे या सीडीचे अनावरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रमोद हिंदूराव

सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

नागपूर, ता. ५- अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय  खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी या स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ दाखवत आपली चुणूक दाखविली आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कर्णधार निकिता पवार, प्राजक्ता कुचेकर, पौर्णिमा सपकाळ आदींचा संघात समावेश होता. चंद्रकांत कांबळी यांनी मार्गदर्शक म्हणून तर एस. जी. भास्करे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

नवीन पनवेल येथे शहीद तुषार चव्हाण उद्यानाचे पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते उदघाटन

नवीन पनवेल, ता. ५- येथील सेक्टर-११ मध्ये लेफ्टनंट तुषार शामराव चव्हाण नूतनीकृत उद्यानाचे राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री. तटकरे म्हणाले, की भविष्यातील गरज ओळखून भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सिडकोचा भर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्यामुळे सिडकोची जबाबदारी भविष्यात वाढणार आहे. नवी मुंबईचा विकास करताना सिडकोने प्रामुख्याने लोकोपयोगी मोकळ्या जागेवर सौंदर्यात भर घालणार्‍या उद्यानांची निर्मिती केल्यामुळे आजचा क्षण आपण पहात आहोत. सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील म्हणाले, की नवीन पनवेल येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता सकारात्मक विचार केला जात आहे. कार्यक्रमास नगरपरिषद अध्यक्ष सुनिल मोहोड, नगरसेविका शशिकला सिंह, शहीद लेफ्टनंट चव्हाण यांचे आई-वडिल, सिडकोचे मुख्य अभियंता ए. एस. पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे, उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे आदी उपस्थित होते. आभार सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन न...

जैतापूर प्रकल्पामुळे कोणतीही हानी नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, ता. ५- जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. विधान परिषद अधिवेशन प्रसंगी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत एका प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसून नागरीकांचा फायदाच होणार आहे. अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनीही या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्याला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्याचे शासनाचे नियोजन आहे. राज्याच्या विविध भागात कार्यान्वित होणार्‍या नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे राज्याला वीज उपलब्ध होईल. याचबरोबर वाढीव वीज मिळण्याची विनंती देखील केंद्राकडे करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. फीडर सेपरेशन, सिंगल फेजिंग आदी सुधारणाही केल्या जात आहेत. दरवर्षी होणारी विजेची मागणी ध्यानात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे. आपले मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चांगले ट्यूनिंग असून त्यांच्य...

मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही-भुजबळ

नागपूर, ता. ५- मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेतून पाच डिसेंबरला निवृत्त होणार्‍या अकरा सदस्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधानपरिषदेचे अकरा सदस्य पाच डिसेंबरला निवृत्त होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळ यांच्या मनोगतावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा रोख भुजबळ यांच्याकडेच असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न श्री. रावते यांनी केला. यावर भुजबळ यांनी त्यांच्या टिप्पणीवर बोलताना म्हणाले, की अभिनय ही एक अभिजात कला आहे. ती कोणालाही सहजसाध्य नाही. नाट्य आणि नाटकीपणा यातही फरक असतो. माझ्या या नाट्यामुळेच मी २५ वर्षे तुमचा नेता होतो. विरोधी पक्षनेता बनलो आणि सत्तारूढ पक्षाला धारेवर धरले ते देखील याच नाट्याच्या जोरावर, याचं भान असू द्या. मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य ड...

थंडीस सुरवात: गहू पीकास पोषक हवामान

मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी गेल्या आठवड्यापासून थंडीस सुरवात झाली आहे. मध्यंतरी अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा पावसाळा बराच लांबला होता. डिसेंबर महिना उजाडला तरी देखील पाऊस सुरू असल्यामुळे थंडी पडण्याबद्दल साशंक असतानाच दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. सर्वत्र कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. रात्रीच्या किमान तापमानात लक्षणीय घसरण झाल्यामुळे पाऊस पूर्ण गेल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गहू, हरभरा या रब्बी पिकांना हे वातावरण पोषक असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

सदस्यांचे वेतन कापण्याची तरतूद होणे आवश्यक

लोकसभेच्या अधिवेशनात चौदा दिवस सभा तहकूब करण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. लोकसभा अथवा विधानसभा अधिवेशन असले, तरीही यासाठी दररोज लाखो रुपये खर्च होतो. सदस्यांच्या निवास व्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंत सर्वच तरतूद शासनास करणे आवश्यक असते. या अधिवेशनासाठी सदस्यांना दररोजचा भत्ता दिला जातो. एकूण लाखोंच्या घरात असलेल्या या खर्चासाठी सामान्य नागरिकांकडूनच कर आदी माध्यमातूनच जमा झालेल्या पैशातूनच हा भत्ता दिला जातो, हे जगजाहीर आहे. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांमुळे अनेकदा सभा तहकूब झाली. विरोधक अथवा सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी कोणत्याही उपाययोजनेस अथवा नवीन अंमलबजावणी, प्रश्नोत्तरी, चर्चा या मार्गांनी देखील समस्येचे निराकरण होत नसल्यास, दिवसभर सभा तहकूब करावी  लागल्यास सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही सदस्यांना दररोज दिल्या जाणाऱ्या भत्त्यात कपात करण्याची तजवीज, तरतूद कायद्यात करण्यात यावी, त्यांना त्या दिवसाचा कोणताही भत्ताच किंबहुना देण्यात येऊ नये, दंड म्हणून त्यांच्याकडून प्रति दिव...

अपंग विद्यार्थ्यांचे "रामायण ऑन व्हील्स" वाखाणण्यासारखे...

पुणे येथे नुकतेच अपंग विद्यार्थ्यांनी "रामायण ऑन व्हील्स" हे महानाट्य सादर केले. चांगल्या शरीरयष्टीच्या धडधाकट मुलांनी यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. या अपंग विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून अनेक दिवस तासन् तास मेहनत केली. या महानाट्यास मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचे अभिनय कौशल्य खरोखर वाखाणण्यासारखे आहे. हातपाय धडधाकट असूनही काम नसल्याचे रडगाणे गाणार्‍या मुलांनी, युवकांनी अपंग मुलांचे हे गुण लक्षात घेऊन स्वतः देखील एखादा मोठा गट स्थापन करून अशाप्रकारचे महानाट्य अथवा कोणतेही चांगले काम, कार्य करावे, हीच अपेक्षा...!

स्मार्टकार्ड माध्यमातून पथकर : प्रायोगिक चाचण्या सुरू- भुजबळ

आधुनिक स्मार्ट कार्डद्वारे पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या वार्तांकनासाठी येणार्‍या पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानास त्यांनी आज दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, की पथकर गोळा करणार्‍या नाक्यांवर कर भरण्यासाठी सध्या वाहनांना थांबावे लागते. त्यांना असे थांबावे लागू नये, यासाठी आधुनिक स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पथकर गोळा करण्याच्या यंत्रणेच्या प्रायोगिक चाचण्या सध्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्या की टोल नाक्यांवर वाहनधारकांना अजिबात थांबावे न लागता टोल वसूल करता येऊ शकेल. खासगीकरणातून बांधा-वापरा-हस्तांतरीत करा अर्थात बीओटी तत्वावर रस्त्यांची कामे करताना ही संपूर्ण प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. हे रस्ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बांधले जातात. यासंबंधीचे प्रस्ताव वित्त व नियोजन विभाग, मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ पायाभूत उपसमिती इ. टप्प्यांवर मंजूर झाल्यानंतरच कंत्राटदारांकडे कामे ...

राज्यातील २३ पथकर नाके बंद;११ पथकर नाक्यांवरील वसुलीस स्थगिती: भुजबळ

संग्रहित छायाचित्र नागपूर, ता.१- राज्यात अर्थसंकल्पीय निधीतून तसेच खासगीकरणांतर्गत (बीओटी) करण्यात आलेले २३ पथकर नाके कायमस्वरुपी बंद तर ११ पथकर नाक्यांवरील वसूलीस स्थगिती देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात खासगीकरणांतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी निविदा शर्तींनुसार संबंधित उद्योजकांवर आहे. तथापि, आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नूतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्य पथकर वसूलीस स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यातही जे उद्योजक रस्त्याचे नूतनीकरण करणार नाहीत, त्यांची पथकर वसूली स्थगित करण्यात यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. उद्योजकांनी वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती अथवा नूतनीकरण न केल्यामुळे स्थगिती देण्यात आलेले रस्ते: १) पूर्णा-शिरूर रस्ता (राज्यमार्ग क्र. ६०), २) वडगाव-चाकण-शिक्रापूर (राज्यमार्ग क्र. ५५), ३) सातारा-पंढरपूर-मोहोळ (राज्यमार्ग क्र. ७४), ४) अक्कलकोट-मैंदर्गी (जि. सोलापूर), ५) अहमदनगर-करमाळा (राज्यमार्ग क्र. १४१), ६) अहमदनगर-दौंड (...

मध्य प्रदेशात गुलाबी थंडीची चाहुल...

गेल्या महिन्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा थंडी उशीरा पडते की काय? असा विचार डोकावत असतानाच मध्य प्रदेशात दोन दिवसापासून हवामानात बदल झाला आहे. काही भागात सकाळी धुके दिसत असून वाहनांवर दव पडलेले दृश्य सकाळी दिसते. नोकरीनिमित्त बाहेरगावी जाणार्‍या लोकांच्या अंगावर स्वेटर, मफलर, कानटोपी तर महिलांच्या अंगावर शाल दिसत आहे. पारा देखील खाली घसरला असून रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. गुलाबी थंडीत पहाटे फिरायला जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. तज्ज्ञांनी देखील आता पावसाळा संपला असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तम कांबळे यांना मानाचा मुजरा...

दैनिक सकाळचे मुख्य संपादक, साहित्यिक आणि नियोजित अखील भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे साहित्य आता कन्नड भाषेत देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. श्री. कांबळे यांच्या समृद्ध लेखणीतून तयार झालेल्या प्रत्येक शब्दाने साहित्य आणखी समृद्ध परिपक्व केल्याचे हे द्योतक ठरावे. मराठी भाषेत आणि विशेष म्हणजे लेखणी-साहित्यात किती गोडवा आहे हे यावरून लक्षात येते. श्री. कांबळे यांनी लेखणीत मराठी शब्द असे वळविले की दुसर्‍या भाषेला सुद्धा मराठीकडे वळावे लागले असून फलश्रृती म्हणजे कन्नड भाषेत देखील त्यांच्या साहित्याचा अनुवाद करण्यात येणार आहे. साहित्यिक सर्जू काटकर यांनी, कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रूपांतर कन्नडमध्ये केल्यानंतर कन्नड भाषेत सुद्धा अल्पावधीतच हे पुस्तक बहुश्रृत झाले. श्री. कांबळे यांच्यावर आईने मायेने फिरवलेला हात आणि मोरपिसाच्या मंद वार्‍याची झुळूक आणि शब्दांचा दरवळ या जादूने हे साध्य झाले आहे. इंग्रजाळलेली मराठी बोलणार्‍या, मराठी असूनही एकमेकांशी इंग्रजी अथवा दुसर्‍या भाषेत संवाद साधणार्‍या बांधवांनी यातून बोध जरूर घ्यावा, ही अपेक्षा..!