गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी रोजी

विशेष प्रतिनिधी- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अर्हता विनंती निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी निघणार अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 29 जानेवारी 2014 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सिडकोच्या निर्मल मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको व श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने विमानतळातकरिता संपादित करावयाच्या जमीनीच्या मोबदल्यात सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या मोबदल्यात भूधारकांना 22.5% जमीन मिळणार आहे. त्याचबरोबर पुनर्वसन आणि पुन:स्थापन संदर्भातीलही सर्वोत्तम पॅकेज जाहीर केले आहे. यास बहुतांश प्रकल्पबाधित सहमत आहेत. काही गावांचा या पॅकेजला विरोध असून त्यांनाही या पॅकेजसंदर्भातील सविस्तर माहिती अवगत करून दिल्यास त्यांची सहमती मिळविणे शक्य होईल असेही श्री. हिंदुराव यांनी यावेळी सांगितले. अर्हता विनंती निविदेच्या दस्ताऐवजास केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून आता या संदर्भातील निविदा 5 फेब्रुवारी 2014 रोजी जागतिक निविदेद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस 90 दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून त्यानुसार प्राप्त अर्जांची तपासणी करून पात्र संस्थांची यादी जाहीर करण्यात येईल. तद्नंतर स्वारस्य अभिव्यक्ती निविदा मागविण्यात येतील. या प्रक्रियेअंती नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदार निवडला जाईल. ज्यांच्यामार्फत विमानतळ विकासाचे कार्य सुरू करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेस 9-10 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. सार्वजनिक खाजगी भागीदाराच्या निवडीनंतर लवकरच विकास कामास सुरूवात करण्यात येईल. विमानतळाकरिता आवश्यक जमीनीच्या भूसंपादनसंदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व भूधारकांची सहमती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. हिंदुराव यांनी सांगितले. मूळ विमानतळ प्रकल्पाकरिता 1160 हेक्टर जमीनीची आवश्यकता असून त्यापैकी 292 हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. विमानतळ आणि संलग्न विकास क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 2268 हेक्टर असून त्यापैकी 75 टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. उर्वरीत 25 टक्के जमीनीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. या जमीनीचे संपादन भूधारकांच्या सहमतीनेच करण्यात येणार आहे. विमानतळ क्षेत्रातील जमीन विकासासंदर्भातील 50 टक्के कामे प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्यात येणार असून सद्यस्थितीत पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या पुष्पक नगरीतील जमीन विकासासाठी 300 कोटी रूपये किंमतीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाकरिता संपादित केलेल्या जमीनीच्या बदल्यात पुष्पक नगर येथे 22.5 टक्के जमीन देण्यात येणार आहे. राहत्या घरांच्या पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी वडघर आणि वहाळ येथील क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे अशीही माहिती श्री. हिंदुराव यांनी दिली.

सोमवार, २७ जानेवारी, २०१४

प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल 2 नवे चिटणीस व 8 जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्त्या

मुंबई, दि. 27 जानेवारी 2014: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी संघटनेमध्ये अनेक फेरबदल केले आहेत. नव्या फेरबदलांमध्ये नागपूरचे श्री जयप्रकाश गुप्ता आणि जळगावचे श्री सलिम पटेल यांची प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील 8 जिल्हा काँग्रेस कमिटींचे नवे अध्यक्ष नेमले आहेत. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री विकास ठाकरे, चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश देवतळे, जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्री अर्जून भंगाळे, जळगाव जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अॅड. श्री संदीप पाटील, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीमती आश्विनी बोरस्ते, अकोला जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री हिदायत पटेल, सांगली जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री मोहनराव कदम तर बीड जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री सर्जेराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आणखी काही जिल्हाध्यक्ष येत्या 3-4 दिवसात बदलण्यात येणार असून, प्रदेश पदाधिकारीपदी काही नवीन नियुक्त्यासुद्धा केल्या जाणार आहेत.

मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

वीज दर कपातीबाबत काँग्रेसच्या मागणीला राज्य सरकारची मंजुरी- प्रदेश काँग्रेसने केले निर्णयाचे स्वागत

मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: वीज दरांमध्ये कपात करण्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, या निर्णयाचे प्रदेश काँग्रेसने स्वागत केले आहे. सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राकडून विजेचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून विजेच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वीज दरात सरसकट 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. वीज दरांचा पुनर्विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्यातील वीज ग्राहकांच्या मागणीला अनुकूल भूमिका घेऊन दर कमी करण्याबाबत शिफारस केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार सरकारने सरदहू निर्णय घेतला आहे. दरकपातीच्या निर्णयासाठी राज्य सरकारला सुमारे 7200 कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील दर कपातीप्रमाणेच मुंबई महानगरातही वीजेचे दर कमी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. राज्यातील शेतकरी नुकतेच कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे कनेक्शन्स थकबाकीसाठी तोडली जाऊ नये, असेही प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.

राज्यातील बहुतांश काँग्रेस उमेदवारांची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

मुंबई, दि. 20 जानेवारी 2014: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पातळीवरील पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची मोठी संख्या असेल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. दि. 20 जानेवारी 2014 रोजी टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मंडळाचे सदस्य मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.श्री गुरूदास कामत, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.श्री जनार्दन चांदूरकर, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण, वनमंत्री श्री पतंगराव कदम, श्री सुरूपसिंग नाईक, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ.श्री राजीव सातव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष आ.श्री जयप्रकाश छाजेड, एनएसयुआयचे अध्यक्ष श्री शिवराज मोरे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले की, या बैठकीत राज्यातील सर्वच्या 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे व परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. परंतु, काँग्रेसने नेहमीच धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन समोर जाण्याची काँग्रेसची भूमिका घेतली आहे व ती आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढण्यास प्रदेश काँग्रेसचे निवड मंडळ अनुकूल आहे. विविध पक्षांसोबत आघाडीचा निर्णय घेणा-या संरक्षण मंत्री श्री ए. के. अॅन्थनी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीकडे तसा अहवाल देखील रवाना करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरून बोलणी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर लगेच उपरोक्त समविचारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी केली जाईल, असेही आ.श्री ठाकरे म्हणाले.

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प या नव्या गृहसंकुलाच्या योजनापुस्तिकेची विक्री 16 जानेवारीपासून सुरु

नवी मुंबई (खारघर)दि. १५ - महाराष्ट्रातील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारे सिडको पुन्हा एकदा व्हॅलीशिल्प हा भव्य गृहप्रकल्प घेऊन येत आहे. नवी मुंबई, खारघर, सेक्टर 36 मध्ये साकारलेला हा गृहप्रकल्प 16 जानेवारी 2014 पासून लोकांसाठी खुला होत आहे. या प्रकल्पासाठीचे अर्ज 16 जानेवारी ते 5 फेबुवारी 2014 या काळात सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत तर शनिवारी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे अर्ज उपलब्ध होणार नाहीत. व्हॅलीशिल्पच्या अर्जाची किंमत रुपये 500/- (+ रु. 25/- वॅट) एवढी असेल. हे अर्ज, तळ मजला, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, तिसरा मजला, पणन विभाग-2, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, अकरावा मजला, निर्मल, नरिमन पाँईट, मुंबई, टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा या ठिकाणी उपलब्ध होतील. अर्जदारांनी नोंदणी शुल्काच्या रकमेचा सिडको लिमिटेडच्या नावे काढलेला व नवी मुंबई येथे देय असलेल्या डीडी अथवा पे ऑर्डर सहीत अर्ज 20 फेबुवारी 2014 पर्यंत टीजेएसबी सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत सादर करावा. कुरीअर अथवा पोस्टाने पाठवलेले अर्ज गाह्य धरले जाणार नाही. या गृहसंकुलासाठी सिडकोने पात्रतेचे काही निकष ठेवले आहेत. अर्जदाराचे कौटुंबिक मासिक उत्पन्न 62,000/- रुपये पर्यंत असेल तर त्यांना मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकेसाठी अर्ज करता येईल. उच्च उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा नाही. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कमीतकमी 15 वर्षांचा रहिवासी असावा, तसेच अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणाचेही नवी मुंबईत घर नसावे. शासनाच्या आरक्षण धोरणानुसार या गृहसंकुलात विविध प्रवर्गांसाठी काही सदनिका राखीव असतील. त्याचबरोबर सिडको यावेळी प्रथमच विशेष प्रवर्गांसाठी राखीव कोट्यातील काही सदनिका उपलब्ध करुन देणार आहेत. त्यात महाराष्ट्र विधानसभा/परिषदचे विद्यमान सदस्य, नवी मुंबईतले पत्रकार तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांचा समावेश आहे. व्हॅलीशिल्प हे 6.45 हेक्टरच्या विस्तीर्ण भूखंडावर साकारण्यात आलेलं निसर्गाच्या सान्निध्यातलं आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असं भव्य गृहसंकुल आहे. यात मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी मिळून एकूण 1224 सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी 802 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1015.42 + 55.58 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 609 + 45.19 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 49 ते 60 लाख रुपये एवढी आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 422 सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांचे बांधीव क्षेत्रफळ 1515.76 + 58.96 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) तर चटई क्षेत्रफळ 1024.56 + 58.18 चौ.फू. (ड्राय बाल्कनी) एवढं आहे. या सदनिकेची किंमत 96 लाख ते 1.07 कोटी रुपये एवढी आहे. व्हॅलीशिल्पमध्ये उत्तमोत्तम आणि आधुनिक सुविधा देण्याचा सिडकोने पूरेपूर प्रयत्न केला आहे. यात दोन उद्वाहकांसहित वातानुकुलित क्लब हाऊस, सर्व आधुनिक सोयींनीयुक्त फिटनेस सेंटर (टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, टेबल टेनिस, स्नूकर, चेस, कॅरम इ.), जॉगिंग ट्रॅक, स्नेहसंमेलनांसाठी आणि कार्यकमांसाठी सभागृह, लहान मुलांसाठी खेळांसह बगीचे, मैदाने, पाळणाघर, लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी जलतरण तलाव, बहुस्तरीय वाहनतळ आदी सुविधा आहेत. घराच्या अंतर्गत सुविधांबाबतीत सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. घराचा मुख्य दरवाजा अग्नी रोधक असून फेम्स आणि फिटिंग्सने परिपूर्ण आहे तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत. उत्तम प्रकल्प स्थळामुळे हे गृहसंकुल नवी मुंबईत लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते. हा गृहप्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो स्थानकापासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोयीच्या वाहतुकीने जोडलेला आहे. प्रसिध्द सेन्ट्रल पार्क आणि गोल्फ कोर्स केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर तर खारघर रेल्वे स्थानक 7 किमी अंतरावर आहे. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक आदी सर्व सुविधा संकुलाच्या अगदी जवळ आहेत तर पांडवकडा धबधबा हे प्रसिध्द पर्यटनस्थळ केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. नवी मुंबई मध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न व्हॅलीशिल्पच्या माध्यमातून साकार होईल याची सिडकोला खात्री आहे. ज्यांना या प्रकल्पाचा एक भाग होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रकल्पस्थळी सॅम्पल फ्लॅट अवलोकनार्थ उपलब्ध आहे. सिडकोने या पूर्वीही उन्नती, वास्तुविहार, सेलिबेशन्स, स्पॅगेटी तसेच सीवूडस इस्टेटच्या माध्यमातून अनेकांना आपले घराचं स्वप्न साकार करण्याची संधी दिली आहे आणि सिडको कायमच या कामाप्रती बांधील राहील.

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाई समस्या तीव्र - संच क्र. ५ बंद

मुंबई, ता. १३ - महानिर्मितीच्या ११३० मेगावॉट क्षमतेच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा टंचाईची समस्या तीव्र झाली असून सध्या जेमतेम सरासरी १ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या संच क्र. ५ बंद करण्यात आला असून अन्य संच देखील पुरेशा कोळशाअभावी पूर्ण क्षणतेनेचालविता येत नाहीत. परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळसा पुरवठा करणार्‍या मे. एम.सी.एल., मे. एस.ई.सी.एल., मे. डब्ल्यू.सी.एल. या सर्व कोळसा कंपन्यांशी पुरेसा कोळसा मिळण्यासाठी महानिर्मितीचा सातत्याने पुरवठा सुरू आहे. याआधी गेल्या वर्षी सुमारे ६ महिन्यांहून अधिक काळ परळी औष्णिक विद्युत केंद्र पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने बंद ठेवावे लागले होते. असे महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी कळविले आहे.

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने महान उद्योजक हरपला -- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 10:- ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दाजीकाकांच्या निधनाने संवेदनशील मनाचं, सामाजिक बांधिलकी जपणारं आणि महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाची सुवर्णमुद्रा सातासमुद्रापार उमटवणारं महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्रातल्या सराफी उद्योगाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात दाजीकाकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सराफी उद्योगात ‘पीएनजी’ हा ब्रॅन्ड स्थापन करुन त्याला जगभर विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मूळच्या कोकणातील असलेल्या आणि सांगली, पुणे, मुंबईसह देश-विदेशात ‘पीएनजी’च्या शाखा स्थापन करण्यात आणि याब्रॅन्डच्या माध्यमातून व्यवसाय वाढविण्यात दाजीकाकांनी मुख्य भूमिका बजावली होती. जीवनाच्या अखेरपर्यंत कार्यरत असणारे दाजीकाका हे मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व होते. दाजीकाका हे मालक असले तरी व्यवसायातील कारागिर आणि कामगारांच्या श्रमांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे आपल्या यशाचं श्रेय त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच यशात सहभागी करुन घेतलं, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. माणसं जोडणं, संघटना बांधणं, लोकांच्या हक्कांसाठी लढणं, संकटांच्या-अडचणींच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणं या आपल्या स्वभावगुणांमुळे त्यांनी पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. पुणेकरांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. अनेक मानसन्मानांनी त्यांचा गौरव केला. दाजीकाकांनी त्यांच्या पत्नी कमलाबाईंच्या निधनानंतर त्यांच्या अंगावरचे दागिने न उतरवता ते वैकुंठधामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ठेवून देण्याचा निर्णय घेतला होता. लातूर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव निधी उभारण्यातही त्यांचा पुढाकार होता. अशा अनेक घटनांमधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करुन दाखवली. त्यांच्यासारखा उद्योजक आणि उमद्या मनाचा माणूस निघून जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्यांचा भरती प्रक्रियेत विचार करणे बंधनकारक - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7: शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांनी भरती प्रक्रिया राबविताना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाही विचार करणे कायद्याने बंधनकारक आहे; तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपले वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यात ‘रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती बजेटचा समावेश करणे अनिवार्य केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाचे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष तथा रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री संजय सावकारे, समितीचे सदस्य श्री.सुधीर मुनगंटीवार, श्री. सुरेश हाळवणकर, श्री. विनायक मेटे, डॉ. सुधीर तांबे, प्रा. सुरेश नवले, डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे सचिव राजेश अगरवाल, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाचे आयुक्त विजय कुमार गौतम आदी यावेळी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या वेळी प्राधान्य देणे खासगीसह सर्वच आस्थापनांना बंधनकारक आहे. त्यासंदर्भातला विशेष कायदा अस्तित्वात आहे. त्याचे उलंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या कायद्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत केवळ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये नावनोंदणी केलेल्या उमेदवारांचाच समावेश करावा, असा आग्रह नाही; परंतु इतर उमेदवारांबरोबरच याही उमेदवारांचा विचार झाला पाहिजे. सर्वांसाठीच परीक्षा किंवा चाळणी प्रक्रिया राबवून पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करावी. याबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभागाने सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कृषी प्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाईल, बँकिंग, वित्त आणि विमा, बांधकाम, आरोग्य, माहितीतंत्रज्ञान, रिटेल, फार्मासिटिकल आणि केमिकल, वस्त्रोद्योग आदी निवडक 11 क्षेत्रांमध्येसन 2022 पर्यंत 5 कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. शिवाय राज्यात 15 ते 44 वयोगटातील लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशी माहिती श्री. गौतम यांनी दिली. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाला आपल्या वार्षिकवित्तीय अंदाजपत्रकात ‘रोजगार स्वयंरोजगार निर्मितीब जेट’ या घटकाचा समावेश करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात येतील. त्याचबरोबर राज्याच्या उद्योग, पर्यंटन, महिला व बालविकास, क्रीडा, शिक्षण आदी धोरणांमध्येही रोजगार, व स्वयंरोजगारनिर्मिती च्या तपशिलाचा; तसेच त्याबाबतचे नियोजन, कार्यवाही आणि कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील. त्याचबरोबर बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.रोजगार व स्वयंरोजगार विभागाने बेरोजगारी दूर करण्यासाठी नव्या संकेतस्थळासह विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या, रोजगारांची उपलब्धता, उपलब्ध झालेले रोजगार आदींची अद्ययावत माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. बेरोजगारांची आता सेवाकेंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही नोंदणी करता येते. त्यामुळे सेवा योजन कार्यालयात रांगा लावण्याची आश्यकता नाही. सादरीकरणातील ठळक मुद्दे व निर्णय:- • बेरोजगारांची कौशल्यक्षमता चाचणी घेऊन गरजेनुसार प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रांचे ‘व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रांमध्ये रुपांतर करणार. • राज्यातील निवडक 5 जिल्ह्यांमध्ये पथदर्शी योजने अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. • बेरोजगार उमेदवारांना रोजगारानुरुप कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्कील व्हाउचर्स योजना’ राबविणार. • राज्यात खाजगी प्लेसमेंट एजन्सीच्या कामकाजाचे नियमन करण्यासाठी कायदा करण्या संदर्भात कार्यवाही करणार. • अनुसूचित जातीजमातीच्या उमेदवारांसाठीच्या ‘स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजने’त सुधारणा करणार. • रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी करिअर ग्रंथालय व अभ्यासिका योजनेस आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. • बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना विनानिविदा 5 लाख रुपयांपर्यंत ची कामे देण्याची मर्यादा वाढवून देण्यात येईल. • रोजगार नोंदणी आणि विविध आस्थापनांना पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे www.maharojgar.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

Makar Sankranti Mela at CIDCO Urban Haat - Belapur

BELAPUR - Makar Sankranti a major harvest festival celebrated in India is here. It is known and celebrated by different customs in different parts of the country. The festival in southern parts of India is celebrated as Pongal whereas in Punjab as Maghi. Since Makar Sankranti is celebrated for innumerable reasons and in innumerable ways CIDCO Urban Haat also gives you a reason to celebrate this auspicious festival from 3rd to 19th January, 2014 at CIDCO Urban Haat near CBD Belapur Railway Station. In this grand Sankrant Mela, artisans from West Bengal, Maharashtra, Assam, Tripura, Rajasthan, U.P, Tamil Nadu, Gujarat, Punjab, Jammu & Kashmir and Bihar are participating with exclusive handloom and Handicraft products. In handicrafts terracotta, leather products, jute products, bamboo products, wall hangings, artificial jewellery, stone arts, paintings, bangles, carpets, statues will be exhibited by master craftsmen from various states of Maharashtra. Apart from handloom and handicraft articles, Urban Haat this time has come up with an exclusive food court for the food lovers. There will be a special display of Konkan food products from Sindhudurg, Kolhapur, Raigarh and Ratnagiri by the Self Help Groups, wherein one can enjoy delicious Kolhapuri, Malvani and Sea food items all under one roof. Makar Sankrant Mela will start with a huge ovation this New Year at Urban Haat. CIDCO has proposed many events like Gandhi Shilp Bazaar, National Handloom Expo, Vasant Mela, Chaitra Mela and Summer Festival at the Haat till June 2014. The calendar of event for the same is ready. Many cultural programmes are held in the amphitheatre in the weekends. Some of the programmes scheduled are fashion designing shows, Film Festivals, Dance, Drama, Orchestra and many other cultural activities by schools and colleges of Navi Mumbai. So, don’t forget to participate in the upcoming cultural programs organized at the Haat. If any colleges, schools, NGO's, cultural organizations are interested for organizing cultural activities in the amphitheatre of CIDCO Urban Haat they can contact Manager CIDCO Urban Haat for booking and further details. Urban Haat now days, is becoming ever permanent Haat for genuine rural Indian craftsmen to display their special handloom & handicraft products directly to the citizens of Navi Mumbai.

बुधवार, १ जानेवारी, २०१४

धुळे शहरातील रस्ते आणि रुग्णालयांसाठी महापालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई, दि.1 : धुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. धुळे महानगरपालिकेला अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन 80 फुटी रोड येथे मॅटर्निटी होम; तर चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच धुळे शहरातील विविध मुख्य रस्ते तयार करण्यासाठी 10 कोटी रुपयांची गरज आहे. असे एकूण 20 कोटी रुपये महानगरपालिकेला उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी श्री. कदमबांडे यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लहान महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन शहरांच्या विकासाला गदी देण्यावर शासनाचा भर आहे. धुळ्यातील नागरी सुविधांची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कामांसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.सांगली महानगरपालिकेला दिलेल्या अनुदानाच्या धर्तीवर हा निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल. त्यात नगरविकास राज्यमंत्री श्री. सामंत स्वत: लक्ष घालतील.अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था झालेल्या रस्त्यांची कामे या अनुदानातूनप्राधान्याने करावीत; तसेच सर्व कामे दर्जेदारच झाली पाहिजेत. विकास आराखडा सादर करावा धुळे महानगरपालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनशहराचा विकास आराखडा शासनास सादर करावा. शहराच्या आवश्यकतेनुसार आराखड्यात उद्याने, क्रीडांगणे, शाळांच्या जागा, वीज उपकेंद्रांच्या जागा आदींच्या योग्य त्या आरक्षणांचा त्यात समावेश असावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. गळती रोखल्यास भारनियमन बंद करणार धुळे शहरातील यंत्रमागधारकांची गैरसोय टाळण्यासाठी भारनियमन कमी करण्यात यावे; तसेच यंत्रमागधारकांना वीज दरात सवलत देण्यात यावी, अशी मागणी धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात विजेची पुरेशी उपलब्धता आहे. परंतु अधिक गळती असलेल्या भागातच भारनियमन केले जाते. आपल्या असोशिएशनने आणि धुळ्यातील इतर नागरिकांनी गळती रोखण्यासाठी सहकार्य केल्यास केवळ भारनियमन कमीच नाही तर ते पूर्णत: बंद केले जाईल. तुमची तयारी असल्यास आम्ही 15 दिवसांत भारनियमन बंद करु शकतो. उपमुख्यमंत्र्यांची ही सूचना धुलिया पॉवरलूम ओनर्स ट्रेड असोशिएशनने मान्य केल्याने शहरातील गळती कमी झाल्यानंतर लगेच भारनियमन बंद केले जाईल. कबीरगंज, वळजाई रोड आणि मोहाडी फिडरमध्ये यंत्रमागधारकांची असलेली संख्या लक्षात घेऊन तिथे प्राधान्याने ही उपयायोजना केली जाईल, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील यंत्रमागधारकांना आपण वीजबिलांत जवळपास 1100 कोटी रुपयांची सवलत देतो. त्यात आणखी वाढ करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. नवनिर्वाचित महापौर जयश्री अहिरराव आणि धुळे पंचायत समितीच्या सभापती ज्ञानज्योती भदाणे यांचा यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.माजी उपमहापौर सव्वाल अन्सारी, म्हाडाचे नाशिक विभागीय माजी सभापती किरण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, नगरसेवक चंद्रकांत केले, मनोहर भदाणे आदी यावेळी उपस्थित होते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...