बुधवार, २५ डिसेंबर, २०१३
Overwhelming response for Talent hunt at UAFT
Thane, December 22, 2013: As the Christmas is around the corner, Santa Claus is gifting a big surprise to the Thaneites with UPVAN ARTS FESTIVAL. The Upvan Art Festival is organizing the biggest Talent hunt at Thane in the performing arts involving vocals (gaayan), dance(Nritya) and playing of musical instruments (vaadan).
Shripad Bhalerao, Director of Performing Arts, Upvan Arts Festival speaking at the auditions said, “We have received more than 400 entries from Thane, Mumbai, Nashik, Ahmednagar, and Ambernath. It took us 15-20 days to plan and organize this, with participants in the age group of 11 to 16 years, 16 to 25 years and more than 25 years categories. This has been the largest registration of participants in Thane district till date. Entries are for non-Bollywood performing arts, pure classical and semi-classical art forms.”
For the talent hunt, the organizers bottom to top approach helped to reach out to all schools, and colleges across Thane and neighboring districts, more than 200+ circulars were sent across to make this possible. The winners in the final rounds will be given prizes of more than Rs. 3 lakhs. This includes, top prize of Rs. 25,000 in each category, 18 prizes each of Rs. 10,000 and Rs. 7000.
Giving more details on organizing the talent hunt, the entire talent team headed by Shripad Bhalerao along with Lata Rajesh, Ravi Nawale, Swati Dixit, were excited with the response they got from the contestants.
Shripad Bhalerao, Director Performing arts UAFT, smiling along with few contestants added further, “We had a challenge to manage the logistics and data management of 18 categories in total. We are selecting 90 best participants, from more than 400 participants. These top 90 participants from all categories will be performing on the 10th, 11th and 12th January. You are requested to encourage and promote the upcoming talents. However, surprisingly the local people along with participant’s parents and siblings have volunteered for free to make this a successful event. All the local authorities have also been very helpful”.
The festival has organized workshops and seminars on art related subjects by experienced professionals in their respective art fields. It has various events such as demonstrations, exhibitions along with street stalls and food fiestas. The festival is a feast for senses and an unmissable opportunity to open your eyes to the world of art.
About Upvan Art Festival
Upvan Arts Festival is organized by the Upvan Art Foundation. The foundation is dedicated to giving a strong platform for untapped and unidentified artists of Indian arts to showcase their talents and to promote India’s rich cultural heritage among all sections of society.
The festival is organized on 10th, 11th and 12th January 2014. Apart from Performing arts, Fine and traditional arts, Culinary arts, visual and digital art, art installations, sculptures, interactive art, contemporary art and folk centric art, the UAF also includes workshops and seminars on relevant art related subjects by scholars of repute, various demonstrations, exhibitions, street stalls, food fiesta and beautification of the lake.
रविवार, ८ डिसेंबर, २०१३
प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करावे- शिवराज
इंदूर- ता. ८ डिसेंबर- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अपेक्षानुरुप विजयाचा आनंद ओसंडून वाहणार्या मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रदेशाच्या विकासात काँग्रेसने सहकार्य करण्याचे आवाहन आज आपल्या आभारप्रदर्शनात केले. श्री. चव्हाण यांनी देखील गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हॅटट्रिक केली आहे. मध्यप्रदेशात तिसर्यांदा कमळ फुलल्याचा आनंद श्री. चव्हाण यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
आज संध्याकाळी श्री. शिवराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१३ मध्ये प्रदेशातील मतदारांनी भाजपास बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे आभार मानले. निवडणुकीत आरोप-दोषारोप होतच असतात, माझा कोणावरही राग नाही. निवडणुका पार पडल्या. व्हायचे तेवढे राजकारण झाले. आता काँग्रेसने देखील प्रदेशाच्या विकासासाठी आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जनता जनार्दनाच्या स्नेह आणि प्रेमामुळेच पक्षास बहुमत प्राप्त झाले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. आपण अद्याप सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचे सेवक आहोत. पक्षाने आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. मध्यप्रदेश हे आपल्यासाठी मंदीर असून प्रदेशातील सर्व नागरीक आपले देव असल्याचे त्यांनी सांगितले. विजयासोबत विनम्रतेस कधीही विसरू नये, घमेंड करू नये असा मोलाचा सल्ला देखील श्री. चव्हाण द्यावयास विसरले नाहीत.
क्षणचित्रे-
* शिवराज चव्हाण यांना पेढा भरविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी.
* आपल्या सर्व भाच्यांचे आभार..असा उल्लेख श्री. चव्हाण यांनी केल्यानंतर...शिवराज मामा की जय...घोषणांनी परीसर दुमदुमला.
चहास्तोत्रम्...
शीण सुस्ती महानिद्रा, क्षणात पळवी चहा
प्रभाते तोंड धुवोनी, घेता वाटे प्रसन्नता...
अर्धांगिनी हस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे
पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे...
लिंबुयुक्त विना दुग्ध, अरुची पित्त घालवी
शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी...
शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरुफुरा
गवतीपत्र अद्रकयुक्त, प्राशित जाई सत्वरा...
भोजनपूर्व प्राशिता, मंदाग्नी, पित्तकारका
घोटता घोटता वाढे, टॅनिन जहरकारक...
चहाविना आप्त स्नेह्यांचे, स्वागतासी अपूर्णता
यास्तव भूतल जन म्हणती ह्याची अमृता...
इति सुहासविरतिम् चहास्तोत्रम्
चहाबाजप्रित्यर्थम् संपूर्णम्...।।।
(संग्रहित...)
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत समाधान घोडकेचे आव्हान संपुष्टात
पिंपरी (3 डिसेंबर 2013) : महाराष्ट्र केसरीचा दुसरा मुख्य दावेदार असलेला सोलापूरचा समाधान घोडके याचे आव्हान मुंबई उपनगरच्या सुनिल साळुंके याने एक गुणाने कुस्ती जिंकून संपुष्टात आणले.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या वतीने पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढ दिवसानिमित्त भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रिडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे सामने घेण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्पर्धा प्रमुख विलास कथुरे, संयोजक व नगरसेवक महेश लांडगे, ऑलिम्पीक मारुती आडकर, सितारामभाऊ भोतमांगे, पिंपरी चिंचवड कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, विजय बनकर, पंच उत्तमराव पाटील, दिनेश गुंड, अंकुश वलकडे, दिलीप पवार, संभाजी वरुटे, बंकट यादव आदींसह हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते. या कुस्ती सामन्यांचे सुत्रसंचालन बाबा लिम्हण, शंकर पुजारी यांनी केले.
74 किलो गादी विभागात संतोष गायकवाड (अहमदनगर) आणि रणजित नलावडे (कोल्हापूर जिल्हा) हे सुवर्ण पदकासाठी भिडणार आहे. तर प्रसाद सस्ते (पिंपरी चिंचवड) आणि चंद्रशेखर पाटील (लातूर) हे दोघे कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
74 किलो माती विभागात रविंद्र करे (पुणे जिल्हा) याने जयदिप गायकवाड (सातारा) याच्यावर 11 विरुध्द 4 असा 7 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर विश्वभंर खैरे (बीड) याने अण्णा गायकवाड (अहमदनगर) याच्यावर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत फेरी गाठली.
60 किलो माती विभागात दादा सरवदे (सोलापूर शहर) याने देवानंद पवार (लातूर) याचा 5 विरुध्द 3 अशा 2 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. तर अरुण खेंगले (पुणे जिल्हा) याने राहूल यादव (मुंबई उपनगर) याच्यावर 7 विरुध्द 5 अशा 2 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
60 किलो गादी विभागात विशाल माने (कोल्हापूर जिल्हा) आणि सोनबा गोंगाणे (कोल्हापूर शहर) यांची अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे.
96 किलो माती विभागात दुस-या फेरीत मुंबईच्या संतोष सुतारने पिंपरी चिंचवडच्या प्रमोद मांडेकरवर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित आपली घौडदौड सुरु ठेवली असे तुळशीदास शिंदे यांनी कळविले आहे.
सोमवार, २ डिसेंबर, २०१३
धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले.
धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले.
वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.
शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३
वाशिम जिल्हा परिषद व 6 पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान
मुंबई दि. 29 – वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 3 डिसेंबर 2013 ते शनिवार दि. 7 डिसेंबर 2013 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 9 डिसेंबर 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जेथे अपिल नाही तेथे शनिवार दि.14 डिसेंबर 2013 व जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. 18 डिसेंबर 2013 हा असून रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात येऊन निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येतील.
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी
नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013:
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे.
नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील याप्रसंगी उपस्थित होते.
आजवर ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू होती. या योजनेचे सामान्यांना मिळालेले लाभ लक्षात घेता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आघाडी सरकारने घेतला आहे.
या योजनेचे लोकार्पण केल्यानंतर यूपीए अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी भाषणासाठी उभ्या झाल्या तेव्हा लाखोंच्या जनसमुदायाने “सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी आगे बढो”चा एकच जयघोष केला. सभास्थळावर आल्यानंतर त्यांनी या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या 78 रूग्णांशी थेट संवाद साधला. सदर रूग्णांशी झालेली चर्चा गहिवरून आणणारी होती, असे श्रीमती गांधी म्हणाल्या. दुर्दैवाने एखादा गंभीर आजार जडला तर अनेकांना परिस्थितीअभावी उपचार घेणे शक्य होत नसे. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन यूपीए सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू केल्याचे श्रीमती सोनिया गांधी यांनी सांगितले. या योजनेंतर्गत केवळ शस्त्रक्रियाच होणार नसून, रूग्णाचा औषधोपचार, भोजन आणि त्याला घरापर्यंत पोहोचविण्याचीही तरतूद असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमती सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्रातील डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि राज्यातील श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या कामाचे कौतूक केले. आयुष्यातील विविध जबाबदा-यांचे यशस्वीरित्या वहन करायचे असेल तर सुदृढ आरोग्याची गरज आहे. त्यामुळेच गावा-खेड्यात राहणा-या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यूपीए सरकार कटिबद्ध असून, सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यूपीएने नागरिकांना केवळ सुविधाच दिल्या नाहीत तर थेट कायदेशीर अधिकारच प्रदान केल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनांसारख्या अनेक योजनांची सुरूवात महाराष्ट्रात झाली आणि त्यांची उपयोगिता लक्षात घेऊन अशा योजना देशपातळीवरही राबविल्या गेल्या, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांचे हित समोर ठेवूनच योजना आणल्या आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती सोनिया गांधी यांनी या योजनेच्या कार्डांचे वितरण केले. श्रीमती गांधी यांच्यासह सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये बालकांचाही समावेश होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी या चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस केली. योजनेचे कार्ड वितरण करतेवेळीही त्यांनी तिथे आलेल्या महिलांशी मनमोकळा संवाद साधला.
दरम्यान, जनसामान्यांच्या हिताच्या असंख्य योजना लागू केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी तर आभार प्रदर्शन आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान यांनी केले. याप्रसंगी संपूर्ण राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे सचिन सावंत,प्रवक्ता व प्रभारी, कम्युनिकेशन्स विभाग यांनी कळविले आहे.
गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३
भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होत आहेत.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व आयोजक नगरसेवक महेश लांडगे, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पोपटअण्णा फुगे, रुस्तम-ए- हिंद पै. अमोल बुचडे, भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू शंकर कंधारे, उपमहाराष्ट्र केसरी विशालअप्पा कलाटे, नगरसेवक नितीन लांडगे, शांताराम बापू भालेकर, वस्ताद मारूतीदादा गव्हाणे, पै. मारुती कंद, वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. रंगा फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार दि. 1 डिसेंबर 2013 रोजी भोसरी येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, पिं.चिं.कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, माजी महापौर व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, माजी महापौर व पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, दत्ता साने, नितीन काळजे, चंद्रकांत वाळके, समीर मासुळकर, राहुल जाधव, धनंजय आल्हाट, महिंद्रा कंपनीचे एच.ओ.डी. विजय नायर, जालिंदर शिंदे, ॲड. नितीन लांडगे, संजय वाबळे, नगरसेविका सुरेखाताई गव्हाणे, सुनीताताई गवळी, शुभांगी लोंढे, डॉ. श्रद्धा लांडे, माजी नगरसेवक पंडीतशेठ गवळी, साहेबराव खरात, संतोष (अण्णा) लोंढे, अण्णासाहेब मगर बँकेचे नंदकुमार लांडे, माजी नगरसेविका सिमाताई फुगे, जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष संदीप (आप्पा) भोंडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम बुधवार दि. 4 डिसेंबर 2013 रोजी सायं. 7 वा. कृषीमंत्री मा. ना. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे सभापती दिलीप वळेस पाटील साहेब, गृहमंत्री मा.ना.आर.आर. पाटील साहेब माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर मा. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पिं.चि. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा भोसरी स.नं. 1 येथे 15 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या 60 हजार प्रेक्षक क्षमता असणा-या भव्य स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रथमच 15 फुट बाय 20 फुट आकाराचे 4 अत्याधुनिक एल.सी.डी. स्क्रीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धा पाहणे सुखकर होणार आहे. 25 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था स्टॅण्ड गॅलरी मध्ये व 35 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था मॅटवर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी 40 बाय 40 आकाराचे दोन मॅटचे आखाडे व एक 40 बाय 40 मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. आखाड्यात वापरण्यासाठी लाल माती खास कोल्हापूर वरून आणली असून गेल्या 10 दिवसांपासून तिची मशागत करण्यात येत आहे. या मातीत दही, लिंबू, तेल, हळद, कापूर टाकून तिची मशागत करण्यात येत आहे. या ठिकाणी 100 फुट बाय 60 फुट असे तीन टप्प्यातील भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
आखाड्याचे सुत्रसंचालक ज्येष्ठ कुस्ती तज्ज्ञ पुजारी तर व्यासपीठाचे सुत्र संचालन ज्येष्ठ सुत्र संचालक राणाप्रताप तिवारी हे करणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून 44 जिल्हा संघाचे गट सहभागी होणार आहेत. एकूण 7 वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये 55 किलो, 60 किलो, 74 किलो, 84 किलो, 96 किलो वजनी गटाचा समावेश आहे. या प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना गोल्डन, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा 84 ते 120 किलो या वजनी गटात होणार असून विजेत्या मल्लाला चांदीची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व मल्लांना ट्रॅक सूट देण्यात येणार आहे.
शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणी पैलवानांचे आगमन होणार असून त्याच वेळी स्पर्धकांचे वजन घेण्यात येईल. रविवारी दि. 1 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता सहभागी पैलवानांचे संचलन भोसरीत होणार आहे. यामध्ये भोसरीतील सर्व तालीम मंडळे, वस्ताद, भोसरी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, सर्व सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास, भोजन, वाहनव्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे.
वाहन पार्किंगसाठी स्टेडियमच्या तिनही बाजूस 15 एकर जागेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस अधिकार-यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरात 100 हून जास्त सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी स्टेडियम मध्ये येताना पाण्याची बाटली, कॅरीबॅग आणू नये असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 100 खासगी बाऊन्सर, 100 सुरक्षा रक्षक, 500 स्वयंसेवक, पोलीसांना सुरक्षा व्यवस्थेसाठी मदत करणार आहेत. कुस्ती आराखड्याच्या कडेला 10 फुटांवर एक व 5 फुटांवर एक असे दोन रेलिंग लावण्यात येणार आहे.
आखाड्यात फक्त मल्ल, पंच आणि प्रशिक्षक यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पत्रकारांसाठी, वैद्कीय पथकांसाठी खेळाडूंच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी दोन पथके, रुग्णवाहीका अग्निशामक दलाचे दोन बंब असणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.किसनराव लांडगे, पै. रामचंद्र लांडगे, पै. मारुती दादा गव्हाणे, पै. पोपटराव फुगे, पै. किसन शिंदे, पै. पितांबर शिंदे, पै.तुळशीराम लोंढे, पै.कचदेव लोंढे, पै. गुलाब फुगे, पै. चंद्रकांत लांडगे, पै. हिरामण लांडगे, पै.महादु लांडगे, पै.बाबा लांडगे, पै. लाला लांडगे, पै. मदन गव्हाणे, पै. गणपत गव्हाणे, पै. बाळासाहेब गव्हाणे, पै. भरत फुगे, पै. बाजीराव लांडगे आदी परीश्रम घेत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा मागील 25 वर्षामध्ये वेगाने औद्योगीक विकास झाला त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात भोसरीच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. शहराच्या या सर्वांगीण विकासात भोसरीकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसचे शहराच्या क्रीडा विकासात भोसरीचे नाव आदराने घेतले जाते. कुस्ती तसेच कबड्डीचे शेकडो खेळाडू भोसरीच्या तालमीत व मैदानात आतापर्यंत तयार होऊन त्यांनी भोसरीचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे.
यामध्ये कुस्तीपटू कै. पै. नामदेव लांडगे, कै. पै. सोपानराव गुळवे, कै. पै.सदाशिव फुगे, कै. पै. विश्वनाथ पांडुरंग लांडगे यांचे नाव आदराने घ्यावे लागते. तसेच पै. चंद्रकांत लांडगे, पै. तुळशीराम लोंढे, पै. नारायण लांडगे, पै. विष्णुपंत लांडे, पै.कचदेव लोंढे, पै. वस्ताद रामचंद्र लांडगे, पै. मारुतीदादा गव्हाणे, पै. किसनराव लांडगे, पै. रंगनाथ फुगे, पै. किसन शिंदे, पै. पिलाजी शिंदे, पै. लक्ष्मण शिंदे, पै. हिरामण लांडगे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
या स्पर्धेचे आयोजन भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नगरसेवक महेश लांडगे यांच्या प्रेरणेतून या फाऊंडेशनची स्थापना 2002 मध्ये झाली. त्यानंतर फाऊंडेशनने खेळाडूंसाठी विविध उल्लेखनीय उपक्रम राबविले व स्पर्धांचे आयोजन केले आहे.
यात प्रामुख्याने 2009 साली ‘‘महाराष्ट्र श्री 2009’’ ही स्पर्धा भोसरीत घेण्यात आली. या स्पर्धेत 700 हून जास्त खेळाडूंचा सहभाग होता. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे खो-खो मध्ये वरीष्ठ महिला गट व कुमारी गट असे दोन संघ राज्यभर दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. या संघामध्ये पूजा शेलार व लविना गायकवाड या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वरिष्ठ महिला गटात 50 हून जास्त महिला खेळाडू रोज सरावाला उपस्थित असतात.महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या क्रीडा उपक्रमांतर्गत कराटे क्लब, मेडीटेशन हॉल, बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. याचा शेकडो खेळाडूंना लाभ होत आहे. 2007 सालापासून महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने चार ठिकाणी योग शिबिर सुरु आहेत.
रविवार, २५ ऑगस्ट, २०१३
कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले- अजित पवार
मुंबई, ता. 25 : जागतिक उद्योगविश्वात भारताची शान वाढविणारे द्रष्टे उद्योजक डॉ. नीळकंठराव कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. कल्याणी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. भारत फोर्ज कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी ते दिशादर्शक होते. उद्योग संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या कल्पकतेने केले. त्याचवेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उद्योगांचा विस्तार केला. आपल्या समूहाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादाचा सेतू साधला होता. कर्मचाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक होते. कर्मचाऱ्यांनाही कुटुंब प्रमुखासारखा त्यांचा आधार वाटायचा. कर्मचारी आणि त्यांच्यात केवळ औपचारिक संबंध नव्हते तर आपुलकीचे नाते होते. हेच त्यांचे बळ होते. त्याच जोरावर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचे विशेषत: महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
शनिवार, १ जून, २०१३
सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता
मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.
नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले.
बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंजूरी दिली. या धोरणानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यासाठी संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्याचप्रमाणे भाडेपट्टयने वितरित करण्यात आलेल्या भूखंडांवरील बांधकामांकरिता नवी मुंबई जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार कालावधी देण्यात येतो त्यात वाढ करण्यासंदर्भातील प्रस्तावासही मंजूरी देण्यात आली असून शासनाच्या आदेशानंतर या संदर्भात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
द्रोणागिरी सेक्टर-50 व 51 मध्ये 12.5 टक्केयोजनेअंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 17.84 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी यावेळी मंजूरी देण्यात आली. 12.5 टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी येथील सेक्टर-52 ते 55 येथे एकात्मिक भौतिक सुविधांच्या विकासासाठी रु. 36.23 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच द्रोणागिरी येथील सेक्टर-15 मधील रस्त्याचा विकास, पावसाळी पाण्याची गटारे, पाणी पुरवठा वाहिन्या व उर्वरित मलनि:सारण वाहिन्यांच्या विकासासाठी रु. 13.35 कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पाच्या भविष्यातील विकासाकरिता तांत्रिक, आर्थिक व्यवहार्यता अभ्यासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
नेरुळ-बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता अंदाजित अर्थसंकल्पानुसार रु. 739.46 लाख खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंबंधातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. याचबरोबर नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरती परिक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याच्या योजनेसही या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
वाळूज महानगर प्रकल्पातील नगर-1, 2 व 4 मधील पायाभूत सुविधांसंदर्भातील उर्वरित विकासाकरिता रु. 667 कोटी खर्चासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
