मुंबई, ता. 25 : जागतिक उद्योगविश्वात भारताची शान वाढविणारे द्रष्टे उद्योजक डॉ. नीळकंठराव कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. कल्याणी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. भारत फोर्ज कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी ते दिशादर्शक होते. उद्योग संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या कल्पकतेने केले. त्याचवेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उद्योगांचा विस्तार केला. आपल्या समूहाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादाचा सेतू साधला होता. कर्मचाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक होते. कर्मचाऱ्यांनाही कुटुंब प्रमुखासारखा त्यांचा आधार वाटायचा. कर्मचारी आणि त्यांच्यात केवळ औपचारिक संबंध नव्हते तर आपुलकीचे नाते होते. हेच त्यांचे बळ होते. त्याच जोरावर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचे विशेषत: महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...