मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नकुल पाटील यांच्या निधनाने आदरणीय व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

मुंबई, ता. ३० - सिडकोचे चेअरमन आणि राज्याचे माजी मंत्री नकुल पाटील यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की राज्याचे माजी मंत्री आणि सिडकोचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून सामाजिक, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात त्यांनी वावरताना सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने युवक कार्यकर्त्यांचा आधार आणि मार्गदर्शक हरपला आहे.

नकुल पाटील यांचे निधन

मुंबई, ता. ३० - सिडकोचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री नकुलपाटील यांचे बुधवारी (ता. २९) रात्री ११.४५ च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने डोंबिवली येथे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. ३०) डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कार्यकर्तेही माणूसच...

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...

कार्यकर्तेही माणूसच...

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...

या पैशाला काय म्हणतात...?

एकीकडे रामदेव बाबा आणि अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करीत असून लाखो नागरीकांचे याला समर्थन आहे. तर, दुसरीकडे काही संस्था, आश्रमांमध्ये कोट्यवधी, खोर्‍याने पैसा असल्याचे चित्र समोर येत आहे..या पैशाला नेमकं काय नांव द्यावं...? या प्रश्नाला यक्ष प्रश्न म्हणावं काय? देशातल्या नागरिकांच्या मनातही असा प्रश्न येत असेल काय? 

ठळक बातम्या

जे. डे. खून प्रकरणी सात संशयित ताब्यात... छत्तीसगड: दंतेवाडा येथे भूसुरुंगाच्या स्फोटात ४ जवान ठार १ बेपत्ता... सिंकदराबाद: अर्जुन कुमार यादव यांच्या पुतणीचा मृतदेह आढळला... रायगड: पोलिसांचा रेव पार्टीवर छापा- १० युवक ताब्यात...

Hightlight: ठळक बातम्या

*     अभिषेक बच्चन - यापूर्वी 'पा' चा दिग्दर्शक म्हणून मीडियासमोर उभा होतो...आता होणारा 'पा' (अर्थातच पापा, बाप) म्हणून उभा आहे. *     पाच लाख टन साखर निर्यातीस केंद्राचा हिरवा कंदील... *     इंदूर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस

आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा; पथक सज्ज

मुंबई, ता. २३ - श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीनित्त आळंदी ते पंढरपुर मार्गावर पालख्यांबरोबर जाणार्‍या वारकरी बांधवांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे २२ जून ते ११ जुलै या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेचे पथक सज्ज झाले आहे. यावर्षी संस्थेचे वैद्यकीय पथक शनिवारी (ता. २५) नेहरूनगर, कुर्ला, मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास के. ई. एम. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, असे संस्थ्चे विश्वस्त डॉ. सुनिल हलुरकर यांनी कळविले आहे. ही मोफत वैद्यकीय सेवा संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपुर या मार्गावर वारकर्‍यांना दिली जाईल. यासाठी संस्थेने सुमारे आठ रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा आणि सेवाभावी १०० डॉक्टर व १५० स्वयंसेवकांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. या समाजसेवी उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर पंढरपुरकडे पायी जाणार्‍या वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक ते औषधोपचार व वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे अगदी मोफत पुरविली जाईल. पालखीच्या मार्गा...

वेळ आत्मचिंतन करण्याची...

इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड होण्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच उज्जेनहुन इंदूरला वास्तव्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्त्या करण्यात आली. पोलिसांनी तीन-चार दिवसातच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक युवती आणि दोन युवकांचा समावेश आहे...। या दुर्दैवी घटनेविषयी महाबली ब्लॉगचे नियमित वाचक रविंद्र बर्गले यांनी पाठविलेली ही प्रतिक्रिया: इस नृशंस और वीभत्स घटना से सभी को झकझोर दिया है. लेकिन विचार करें तो पाते हैं, कि आधुनिक जीवन शैली से उपजे भटकाव और विकृति के मूल में वह आधुनिक जीवन-शैली है, जो युवा मनोविज्ञान को फैशन, लड़के-लड़कों की मित्रता, प्यार, फिल्मी ग्लैमर, क्लब और रेस्त्रां में मौज, शराबखोरी, दादागिरी, हिंसा के प्रति आकर्षित करती है. वास्तव में इस घटना के लिए समाज और समाज में नैतिकता और व्यवहारिकता के मानदंड निर्धारित करने वाला अन्य वर्ग (इनमें मुख्य रूप से मीडिया शामिल है) भी समान रूप से जिम्मेदार है, जिसने प्रत्यक्...

अभिरूची...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार

 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला ...

उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत 'हिंदुत्व' प्रमुख मुद्दा नसेल: उमा भारती

लखनौ, ता. २२ (वृत्तसंस्था) - सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि राम मंदीर हा भाजप चा प्रमुख मुद्द नसेल. असे भाजप च्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. उमा भारती म्हणाल्या, की हिंदुत्व आणि राम यांच्यावर आपला विश्वास आहे. आम्हांला इथे रामराज्यच अपेक्षित आहे. राम मंदीराचा प्रश्न हा श्रद्धेचा भाग आहे मात्र राज्याच्या निवडणुकीसाठी तो राजकीय अजेंडा नसेल. आम्ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविणार आहोत. मी हिंदुत्व आणि राम मंदीर प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मध्यंतरी साडेपाच वर्षे भाजप मध्ये नसताना देखील आपण याबाबत तडजोड केलेली नाही. काँग्रेस सुद्धा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे घेणार असल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की केंद्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसने उत्तर देणे अपेक्षित आहे. "चोराकडे चोरच बोट कसे दाखवू शकेल?" असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख दिग्विजय सिंग ...

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी...

राक्षस

दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ता. १७: माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. दहावी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन करत त्यांनी भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध संधीचा शोध घेऊन त्यात यश मिळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तळ्यात नव्हती बदके दोन...

तळ्यात नाही..मळ्यात तर नाहीच नाही...तर...अन्नासाठी चक्क रस्त्यावर आलेली बदकं

बाळ-गोपाळ मंडळी

तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधणार: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १६ - राज्यातील तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीत तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आवश्यकता असते. यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. तमाशा कलेला चालना देण्यासाठी कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा शासन विचार करीत आहे. याबरोबरच या कलावंतांसाठी निवासी संकुल उभारण्यासाठी पुण्याजवळ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईत तमाशासाठी थिएटर उभारण्यासाठी सिडकोमार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल. ते पुढे म्हणाले की, तमाशा कलावंतांना स्वतःचा फड तसेच थिएटर उभारण्याकरिता कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच निर्णय घेतला जाईल. तमाशा कलावंतांना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्...

Rainbow: Chrosome of Nature.

green

wonder of nature...

पर्यटनासह विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्याची महाराष्ट्र व स्लोव्हानियाला मोठी संधी

मुंबई, दि. 13 जून : भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हेनिया यांना पायाभूत सुविधा, रस्ते-विकास आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वृध्दीस मोठी संधी असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले. युरोपीय समूह देशांतील 'प्रजासत्ताक स्लोव्हेनिया' या देशाच्या वित्त मंत्री श्रीमती दार्जा रॅडिक यांनी शिष्टमंडळासह श्री. भुजबळ यांची त्यांच्या 'रामटेक' निवासस्थानी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्लोव्हानियाच्या व्यापार मंत्री श्रीमती मोइका ऱ्होवॅटिक तसेच सेक्रेटरी श्रीमती मेत्का अर्बास तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आणि महाव्यवस्थापक विजय चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्रीमती रॅडिक यांनी भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हानिया यांच्यामधील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने आपण मुंबई भेटीवर आल्याचे भुजबळ यांना सांगितले. त्यावर श्री. भुजबळ यांनी श्रीमती रॅडिक यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींविषयी सव...

जे. डे यांच्या कुटुंबियांचे भुजबळ यांच्याकडून सांत्वन

मुंबई, दि. 12 जून : राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास जे. डे यांचा पार्थिव देह जे.जे. रुग्णालयातून त्यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी आणण्यात आला आणि तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. श्री. भुजबळ यांनी जे. डे यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अखेरचे अभिवादन केले. 'एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तरी, त्याची गांभिर्याने दखल घेण्यात येते. इथे तर डे यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे राज्य शासन आणि पोलीस प्रशासन संबंधित माफियांविरोधात कठोर पावले उचलल्याखेरीज राहणार नाही,' असे भुजबळ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

जे. डे यांच्या हत्येचे वृत्त धक्कादायक : छगन भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : 'दैनिक मिड-डे'चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जे. डे यांच्या हत्येचे वृत्त समजून आपल्याला अत्यंत धक्का बसला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्राइम रिपोर्टिंग आणि शोध पत्रकारितेच्या क्षेत्रात जे. डे यांनी गेली कित्येक वर्षे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. पोलीस, खबरे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. डे हे अत्यंत उमद्या व उत्साही स्वभावाचे पत्रकार होते. माझेही त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांची अशा प्रकारे हत्या व्हावी, ही घटनाच क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जे. डे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि खबऱ्यांचे जाळे या विषयावर        झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या 'खल्लास' आणि 'झिरो डायल' या आपल्या पत्रकारितेतील अनुभवावर अत्यंत रोमहर्षक आणि थरारक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या. गेल्...

रमेश वांजळे यांच्या निधनामुळे धडाडीचा लोकप्रतिनिधी हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनामुळे एक धडाडीचा आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 'गोल्ड मॅन' म्हणून राज्यभरात प्रसिध्द झालेल्या आमदार रमेश वांजळे यांनी आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील जनतेची मनेही जिंकली होती. महाराष्ट्र विधीमंडळातही त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काम करत चमक दाखविण्यास सुरवात केली होती. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मतदारसंघातील जनतेवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. रमेश वांजळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही श्री. भुजबळ यांनी केली आहे.

तारकर्ली, गणपतीपुळे ऑक्टोबरनंतरच गाळमुक्त होणे शक्य

तारकर्लीमधील संगम पॉईंट येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तेथे हायस्पीड बोटी चालविण्यात मोठा अडथळा येतो आहे. त्याचप्रमाणे गणपतीपुळे येथील खाडीमध्येही बराच गाळ साचलेला आहे. तो गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता श्री. भुजबळ यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर मेरिटाईम बोर्डाच्या ताफ्यात येत्या ऑक्टोबरपर्यंत चार नवीन ड्रेझर दाखल होत असून त्यानंतरच हा परिसर गाळमुक्त करता येऊ शकेल, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.             मुंबईला गेटवे ऑफ इंडियासमोर तरंगती जेटी तयार करण्याच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांना यावेळी दिली.             याखेरीज सागरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाशी संबंधित विषयही बोर्डाने तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

एमटीडीसी कडून प्रशिक्षित व्यक्तींनाच यापुढे कोकणात स्नॉर्केलिंगचा परवाना

मुंबई, दि. 10 जून : मालवणसह कोकणात अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर खाजगी स्नॉर्केलिंग व्यवस्थापनांना पायबंद घालण्यासाठी या परिसरात केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींनाच परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची शिफारस करण्याचा अधिकार (Recommending Authority) हा सुद्धा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडेच असायला हवा, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे स्पष्ट केले. श्री. भुजबळ यांच्या या मागणीशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी काल श्री. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर, महाव्यवस्थापक श्री. चव्हाण, मेरिटाईम बोर्डाचे...

एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने रंग गहिवरले: अजित पवार

मुंबई, ता. ९ - जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने चित्रकला सृष्टीचे रंग गहिवरले आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पिकासो म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मविभूषण एम. एफ. हुसेन यांनी स्वतःची चित्रकला शैली निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अवलिया चित्रकाराने भारतीय चित्रकलेला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे.

पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेली बैठक

एम.एफ. हुसेन यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार हरपला

मुंबई, दि. 9 जून : सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांच्या निधनामुळे भारत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला कायमचा मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या सिद्धहस्त रंगरेखांच्या माध्यमातून या कलंदर कलाकाराने जगप्रसिद्ध कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या काही कलाकृती वादग्रस्त ठरल्या असल्या तरी भारताला विशेषतः महाराष्ट्राला कलेच्या जागतिक कॅनव्हासवर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या माध्यमातून एम.एफ. हुसैन यांनी जागतिक कलाविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील शिल्पग्रामसाठी एमटीडीसीची महापालिकेकडे जागा हस्तांतराची मागणी

मौजे मजासगाव, ता. अंधेरी येथे उपलब्ध असलेल्या 15 एकर जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून `शिल्पग्राम` विकसित करण्यात येणार आहे. तथापि, सातत्याने पाठपुरावा करूनही ही जमीन मुंबई महानगरपालिकेने महामंडळाकडे अद्यापही हस्तांतरित व केल्यामुळे या कामासाठी केंद्राकडून आलेला 5 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी वापरता येऊ शकलेला नाही. ही जागा महामंडळाला देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांना केली. सदर जमिनीचे मूळ आरक्षण हे मनोरंजन मैदान असे होते. मात्र नगरविकास विभागाने ते बदलून `शिल्पग्राम` असे केले आहे. या जमिनीच्या ताब्यासाठी सन 2007पासून महामंडळाकडून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली. हरियाणातील सूरजकुंडच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त असा शिल्पग्राम प्रकल्प उभारण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफा जवळच असल्याने या शिल्पग्रामला त्याचा निश्चितच लाभ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त क...

मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी

मुंबई , दि. 9 जून : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करून घ्यावा , असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला. श्री. भुजबळ म्हणाले , मुंबईच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिका , दोन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्हा नियोजन समित्या , केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग , वन , पर्यावरण आणि तत्सम अन्य सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संस्थांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. या विविध यंत्रणांमधील प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन करावी. तसे झाले तरच त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीतही सुसूत्रता प्रस्थापित होईल आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास साधणे शक्य होईल , असेही मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार , मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक , मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख ...

पाण्यावर सहज उतरु शकणाऱ्या विमानसेवेच्या सादरीकरणाने पर्यटन मंत्री छगन भुजबळ प्रभावित

मुंबई, दि. 9 जून : जमिनीवरुन पाण्यावर किंवा पाण्यावरुन नोकेवर अशा प्रकारे सर्व सहज संचार करण्यास सक्षम असणाऱ्या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणाऱ्या विमानसेवेचे (अँफिबियन विमान) सादरीकरण पाहून राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आज अत्यंत प्रभावित झाले. ही सेवा पुरविणाऱ्या `मेहेर` या कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MAHAIR) ही अशा प्रकारची सेवा पुरविणारी भारतातली पहिली विमानसेवा कंपनी आहे. अंदमान व निकोबार बेटांवर त्यांनी ही अँफिबियन विमानसेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. या कंपनीच्या वतीने आज श्री. भुजबळ यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर आदी यावेळी उपस्थ...

आचार्य रत्नानंद यांच्या निधनाबद्दल भुजबळ यांना शोक

मुंबई, ता. ८ - आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक असलेले अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी (वय ८७) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, योग व अध्यात्मिक गुरू असलेल्या श्री श्री रवीशंकरयांचे अनुयायी जगभरात आहेत. सदैव हसतमुख असणार्‍या या महान गुरूच्या जीवनावर त्यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी यांच्या मानवतावादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. आचार्य रत्नानंद यांच्या निधनामुळे श्री श्री रवीशंकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभावे व आचार्य रत्नानंद जी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना श्री. भुजबळ यांनी केली आहे.

शून्य हुआ देशभक्त व्यक्ति...

योगगुरू स्वामी रामदेव यांच्या बेमुदत उपोषण स्थळी सरकारने मध्यरात्री केलेल्या कारवाईनंतर सर्वत्र निषेध, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत...लोकप्रिय "महाबलि" ब्लॉगचे नियमित वाचक आणि मार्गदर्शक रविंद्र बर्गले यांनी व्यक्त केलेले हे मत... (रविंद्र बर्गले, इंदौर) मैं नहीं समझता कि भ्रष्टाचार के मुद्दे पर समग्र देश में इतना बड़ा तूफान खड़ा कर देने वाले महान संत, योगगुरू  को बदनाम करने का षड्यंत्र रचने और केंद्र सरकार में बैठी जनता के प्रति जवाबदेह सरकार द्वारा 1 लाख देशभक्त युवा, वृद्ध, बाल, स्त्रियों पर देश के आमजन पर हुए असामयिक बर्बर अत्याचार के बाद कुछ कहने के लिए शेष बचा है? दिल्ली में उस पूरे दिन और रात तक केंद्र सरकार ने जो किया, जो दृश्य उपस्थित किया वह देखने के बाद देशभक्त व्यक्ति शून्य हो जाता है, समय उसके लिए थम जाता है. शब्द उन भावों को स्वर नहीं दे सकते, देना भी नहीं चाहिए. जीभ की अपनी सीमा है, जीभ अपना काम कर चुकी. सत्ताधीश भी अपना कार्य कर चुके. जो कुछ भी क्रम से हुआ, मीडिया ने देखा. सारे देश ने देखा, बाबा रामदेव द्वारा उठाए गए देशभक्ति के उस भीषण ज्वार को, भा...