मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2011 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुखेड नगरपरिषदेसाठी ७३ टक्के मतदान

मुंबई, ता. २५- नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणुक आयोगाने व्यक्त केला आहे. येथे एकूण १७ जागा असून दुपारपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये: निवडणूक आयोग

मुंबई, ता. २३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे न करण्याचे आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे. भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांचे नियंत्रण आणि संचलन राज्य निवडणूक आयोगाकडून केले जाते. या निवडणुकांदरम्यान काही उमेदवार किंवा राजकीय पक्ष निवडणूक प्रचारासाठी किंवा काही बाबींचा निषेध करण्यासाठी प्राण्यांचा वापर करतात, असे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले आहे. बैल, हत्ती, गाढव आदी प्राण्यांना अमानवी पद्धतीने वागविले जाते. गाढवांना चपलांचा हार घालणे, त्यांच्या तोंडाला काळे फासणे यासारखे क्रूर प्रकार करून प्राण्यांचे हाल केले जातात. हे प्रकार अमानवी असल्याने प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० च्या उद्देशांशी विसंगत आहेत. यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात किंवा त्यासाठीच्या मिरवणुकांमध्ये प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये. या सूचनांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध कायदेशी...

सहा नगरपरिषदांसाठी ६८ टक्के मतदान

मुंबई, ता. २३- नांदेड जिल्ह्यातील पाच आणि लातूर जिल्ह्यातील एक अशा सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) झालेल्या मतदानात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत कुंडलवाडी येथे सर्वाधिक ५९.२७ टक्के तर कंधार येथे ५८.४६ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर सर्वच ठिकाणी मतदानास वेग आला. सर्व सहा नगरपरिषदांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित घटना घडली नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

The Shadow...

THE SHADOW...

Indian Tortoise...

tortoise made by coconut & Dry Fruits...

...अखेर "हिंग्लिश" च्या पगड्याची पगडी बसली डोक्यावर!

आज कालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्‍या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे... अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्‍या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले.. अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकण...

१८ नगरपरिषदांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान

मुंबई, ता. १३ - राज्यातील १८ नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. १३ डिसेंबर) सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली, असे राज्याचे निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे. मतदान झालेल्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे- पुणे- दौंड, अहमदनगर-संगमनेर, सातारा-सातारा, पाचगणी, सांगली-इस्लामपूर, उस्मानाबाद- उस्मानाबाद, तुळजापूर, पारंडा, लातूर-औसा, अमरावती-अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, अकोला-अकोट, मूर्तिजापूर, नागपूर-खापा, कामठी, चंद्रपूर-बल्लारपूर, सोलापूर-मैंदर्गी इ. सर्वाधिक ७२ टक्के मतदान तुळजापूर आणि पारंडा येथे झाले. कुठेही अनुचित प्रकार किंवा अप्रिय घटना घडली नाही, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

न. पा. निवडणुकीशी संबंधित अधिकारी-कमर्चारी संपात सहभागी नाहीत- निवडणूक आयुक्त

मुंबई, ता. ११- राज्यातील नगरपरिषदांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामांसाठी सेवा अधिग्रहित करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी १४ डिसेंबरच्या प्रस्तावित संपात सहभागी होणार नाहीत व ते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील. अशा सूचना राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिल्या आहेत. राज्यात सध्या १९५ नगरपरिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तसेच १० महानगरपालिका, २७ जिल्हापरिषदा आणि ३०९ पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू आहे. यासाठी भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून निवडणूक आयोगाने २ मार्च १९९५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशान्वये अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. यामुळे निवडणुकीच्या जबाबदारीतून त्यांना रजा, संप आदी कोणत्याही कारणास्तव सूट दिली जाणार नाही. कामाच्या जबाबदारीची टाळाटाळ केल्यास ते फौजदारी व विभागीय चौकशीच्या कारवाईस पात्र ठरतील असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात रविवारी (ता. ११) सर्व जिल्हाधिकार्‍यांना आणि महानगरपालिका आयुक्तांना स्पष...

बदलतेय तंत्र- प्रचारासाठी "सोशल वेबसाइट्स" चा वापर..

पुढल्या आठवड्यात राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. यंदा विशेष म्हणजे सुशिक्षित उमेदवारांची संख्या वाढली असून आपल्या प्रचारासाठी अनेक उमेदवार सोशल वेबसाइटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. गेल्या दशकापासून राजकारणाबाबत समीकरणे बदलत असून दोन वर्षांपासून तर, राजकारणात भ्रष्टाचारमुक्त वातावरणासाठी सुशिक्षित युवा पीढिचा समावेश केला जाण्यावर भर दिला जात आहे. सुशिक्षित व्यक्ती भ्रष्टाचार करायला सहसा धजावत नाही, तिचे विचार, वागणूक, कल इच्छाशक्ती या सगळ्याच गोष्टींमध्ये कमी शिकलेल्या व्यक्तीपेक्षा फरक जाणवतो. परिणामी, खर्‍या अर्थाने विकास आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण तयार करायचे असल्यास युवा पीढितल्या लोकांची आवश्यकता ही काळाची गरज ठरू लागली आहे. येत्या ११ आणि १३ डिसेंबरला राज्यात होणार्‍या राज्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने युवक उमेदवार सरसावल्याचे दिसून येते. सुशिक्षित आणि चाणाक्ष बुद्धीमुळे हे उमेदवार इंटरनेटचा योग्य वापर करून घेणे जाणतात. एरवी प्रचारासाठी कालमर्यादा घालून दिलेली असली, तरी इंटरनेटवरून प्रचार करणे, न करण्यासाठी अद्याप आवश्यक तशी आचारसंहिता अथवा नियम...

नगरपरिषदांच्या मतदानाच्या तारखेत बदल- ८ डिसेंबरऐवजी ११ डिसेंबर

मुंबई, ता. २ - राज्यातील १८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका ८ डिसेंबर २०११ रोजी होणार होत्या. परंतु बर्‍याच नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभागातील उमेदवारी अर्जांसंदर्भात न्यायालयात अपील दाखल झाल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता १७७ नगरपरिषदांच्या निवडणुका ११ डिसेंबर २०११ रोजी, तर आज (ता. २ डिसेंबर) न्यायालयाचा निकाल लागलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका १३ डिसेंबर रोजी होणार आहेत, असे निवडणुक आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. अपील दाखल न झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतींबाबत तसेच अपीलांवरील न्यायालयाचा निर्णय १ डिसेंबर २०११ पर्यंत प्राप्त झाला आहे. त्यांचे मतदान ११ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांचा जाहीर प्रचार ९ डिसेंबर २०११ रोजी रात्री बाराला संपेल. त्यांची मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाला किंवा दुसर्‍या दिवशी १२ डिसेंबरला होईल. (उर्वरित वृत्त शनिवार (ता. ३) च्या पोस्टमध्ये वाचा...)

अपीलाव्यतिरिक्त इतर जागांचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणेच [नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०११]

 मुंबई, ता. ३०- नगरपरिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या उमेदवारी अर्जासंदर्भातल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल झालेल्या जागेकरिता अपीलाचा निकाल लागल्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. परंतु अपील दाखल न झालेल्या जागांचे चिन्हवाटप आणि इतर कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसारच होईल.   राज्यातील १८८ नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी ८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जाबाबत अपील दाखल झालेल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा टप्पा पूर्ण झाला असल्याने या जागांचा निवडणूक कार्यक्रम पू्र्वीच निश्चित केल्यानुसार पार पडेल.   महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नियम १९६६ मधील नियम ४ च्या पोटकलम ३ अनुसार अपीलाचा निकाल लागण्यानंतर तिसर्‍या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. तसेच यानंतर मतदान दिनांक राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

चिदंबरम यांचे आवाहन : स्वतःपासून सुरूवात करण्याची अपेक्षा!

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठांनी तरुणांसाठी जागा रिकामी करण्याचे आवाहन नुकतेच युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय मेळाव्यात केले आहे. या माध्यमातून युवकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला आहे. चिदंबरम यांनी स्वतःपासून सुरूवात करणे अपेक्षित आहे. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा व्होट बँक आपल्याकडे खेचुन आणण्यासाठी देखील ही तयारी असावी. काहीही असो. हे मात्र खरे आहे. राजकारण्यांनी सत्तेची अभिलाषा न बाळगता तरुणांसाठी राजकारणात संधी उपलब्ध करणे ही काळाची गरज ठरत आहे. तरुण म्हणजे मॅच्युअर, परिपक्व नसतो हा समज आताच्या तरुणांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर आणि चुणुक दाखवून खोटा ठरवला आहे. केवळ काँग्रेस पक्षच नव्ह, तर सर्वच राजकीय पक्षातील ज्येष्ठांनी आता नव्या दमाच्या तरुणांना राजकारणात संधी द्यावी. त्यांच्या राजकीय वाटचालीतील चांगल्या कार्याच्या अनुभवाचेच केवळ मार्गदर्शन तरुणांना करावे. राजकाराणातून देखील निवृत्त होण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे. राजकारणात राहून वडिल आणि मुलगा वेगवेगळ्या पक्षात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु हे सारे उपलब्ध...

मतदाराच्या ओळखीसाठी आता आधार ओळखपत्रासही मान्यता

मुंबई, ता. २२ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १६ पुराव्यांमध्ये आता आधार ओळखपत्राचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयानुसार मतदाराकडे ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसल्यास किंवा त्यावरून मतदाराची ओळख पटत नसल्यास आधार ओळखपत्रासह १७ पुराव्यांपैकी एक पुरावा सादर करावा लागेल. यानंतरच मतदारास मतदान करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी मतदाराच्या ओळखीसाठी पुढीलपैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे: १. पासपोर्ट, २. वाहन चालविण्याचा परवाना ३. आयकर विभागाकडील पॅनकार्ड, केंद्रशासन, राज्यशासन, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्या संस्थेने आपल्या कर्मचार्‍यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँका किंवा टपाल कार्यालयातील खातेदाराचे छायाचित्र असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकार्‍याने अनुसूचित जाती, अनुसूचि...

विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना: ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

शिर्डी ता. १८ - राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. कारखान्याने ६१ गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मुळा प्रवरा इले. को. ऑप. सोसायटी लि. श्रीरामपूरचे चेअरमन अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते. या कारखान्याचा आदर्श राज्यातील अन्य कारखाने घेत असल्याची प्रशंसा श्री. भुजबळ यांनी करून नगर-मनमाड रस्त्यासह राज्यातील इतर रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील असे सांगितले. यावेळी अध्यक्ष श्री विखे पाटील यांनी कारखान्याच्या कार्याचा आढावा घेतला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर उत्पादनास सुरवात होणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर, यंदाच्या दिवाळीसाठी कामगारांना १८ टक्के बोनस जाहीर केला.

सोन्याची संधी..संधीचं सोनं करण्याची योग्य वेळ!

जग जवळ येऊन आता बरेच दिवस झालेत. गेल्या काही वर्षात तर व्यस्तता सुद्धा वाढली आहे. आलेली संधी ही सोन्याची असून, संधीचं सोनं करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक वर्षांपूर्वी पाचव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना फारसा अभ्यास नसल्याने सुट्टीत गावी जाणे, भरपूर खेळणे, दिवाळीत फराळ तयार करण्यात आईला मदत करणे अशा गोष्टी सहज शक्य होत्या. मात्र आता ही परिस्थिती बदलली असून आजकालच्या अगदी बालवाडीत जाणार्‍या (सध्याच्या भाषेत के.जी.) जाणार्‍या विद्यार्थ्यांना सुध्दा अभ्यासाचं ओझं प्रचंड असतं, काहींना हे पेलता पेलवत नाही. के.जी. पासून कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यालाच (अर्थात अभ्यास करणार्‍या) अभ्यास, ट्यूशन, प्रॅक्टिकल असा अक्षरशः ताण असल्याचं जाणवतं. नोकरदार मंडळींचे, सकाळी टिफिन घेऊन जाणे आणि संध्याकाळी घरी येणे, हे सुद्ध आता जवळपास दुर्मिळ झाले आहे (शासकीय नोकरी मात्र काही प्रमाणात अपवाद). नोकरीची चाकोरी, चाकोरीबद्ध जीवन आणि जॉब सॅटिसफॅक्शन आता संपुष्टात आले आहे. प्रायव्हेट कंपनीत पॅकेज जरी चांगलं मिळत असलं तरीही कंपनी त्याचा मो-बदला घेणारंच. खाजगी नोकरीत असं चालायचंच.....

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या सर्वेक्षणास सुरुवात

मुंबई, ता. १० - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त कुटुंबियांच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणाच्या कामास सोमवार (ता. १०) पासून सुरुवात करण्यात आली. चिंचपाडा येथील काळभैरव मंदिराच्या प्रांगणात बैठक होऊन सुरुवात झाली. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना धोरण निश्चित करायची प्रक्रिया सुरू असून, सर्वेक्षणासाठी 'स्पार्क' या अशासकीय स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्वेक्षणाची प्रत संबंधित प्रकल्पग्रस्तास देण्यात येणार असल्याची माहिती संस्था प्रमुख श्री. जोकिन यांनी सांगितले.

कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रविवारी रक्तदान

पुणे, ता. १० - येथील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळात रविवारी (ता. ११ सप्टेंबर) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री कसबा गणपती गणेशोत्सव उत्सव मंडपात सायंकाळी सहापासून ते रात्री नऊपर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करता येईल. मंडळ यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण करीत असून यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत, असे मंडळ अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी कळविले आहे.

श्री. कसबा गणपती प्राणप्रतिस्थापना आणि पुरस्कार सोहळा

पुणे, ता. ३१- पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती- श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तसेच पुण्यनगरीच्या नावलौकिकात भर घालणार्‍या ५ मान्यवरांना “श्री कसबा गणपती पुरस्कार” डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यंदा सर्वश्री सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार), रुता देशमुख (छत्रपती पुरस्कार विजेती – रोप मल्लखांब ) ,डॉ. संचेती (संचेती हॉस्पिटल), कैलाश आणि संजय काटकर (संस्थापक - क्विक हिल  कंपनी), वेदमूर्ती गणेश कृष्ण जोशी कोतवडेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल. यावर्षी मंडळातर्फे देखावा म्हणून कलादिग्दर्शक श्री. गिरीश कोळपकर यांच्या सादरीकरणातून गणाधिशाय राजमंडप सादर केला आहे. श्री. कसबा गणपती प्राणप्रतिस्थापना आणि पुरस्कार सोहळा- श्री. कसबा गणपती उत्सव मंडप येथे गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरीक परीश्रम घेत आहेत,...

दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा आवाज हरपला- भुजबळ

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय नारायण उर्फ दत्ता पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज हरपला, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दत्ता पाटील यांनी अमूल्य योगदान दिले. 25 वर्षांहून अधिक काळ अलिबागचे नेतृत्व करीत असताना त्यांनी या विभागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हित कधीही नजरेआड होऊ दिले नाही. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रालाही त्यांनी मोलाचे योगदान दिले. या लोकांचा विधिमंडळातील एक कणखर आवाज म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा, तळमळीचा लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खाजगीकरणांतर्गत रस्ते चौपदरीकरणाच्या चार प्रकल्पांना पायाभूत सुविधा समितीची मान्यता

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाजगीकरणांतर्गत (बीओटी) चौपदरीकरणाच्या चार महत्त्वाच्या निविदा प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत एकूण 176.29 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावांमध्ये शिरोली (कोल्हापूर) ते सांगली, अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी, हडपसर-सासवड-बेलसरफाटा अधिक बेल्हा-पाबळ-उरुळीकांचन-जेजुरी-निरा आणि मोहोळ-कुरूल-कामती-मंद्रुप या रस्त्यांच्या चौपदरीकरण प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मंजूर झालेल्या प्रकल्पांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे : 1) शिरोली (कोल्हापूर) ते सांगली रस्ता (प्र. रा.मा. क्र.3 व रा.मा. 75) : या टप्प्यातील शिरोली ते अंकली आणि अंकली ते सांगली या 25.66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि 26.95 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. 2) अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी (रा.मा. क्र. ...

मुंबई अनुभवणार 'हवाई फॉम्युला-1' चा थरार

मुंबई, दि. 3: अनेक अभिनव उपक्रमांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात तत्पर असणाऱ्या मुंबईकरांना 'हवाई फॉर्म्युला-1' म्हणून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या 'एअरो-जीपी' या विमान स्पर्धेचा थरार या वर्षअखेरीस अनुभवावयास मिळणार आहे. या स्पर्धेचे भारतातील संयोजक असलेल्या मे. आय इंडिया इनोव्हेटिव्ह मिडिया या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) विनावित्तीय सहकार्यासाठीचे पत्र काल प्रदान केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची आय-इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हरभजन सिंग सहगल यांनी गेल्या सोमवारी या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भेट घेऊन त्यांना पॉवरपॉइंट सादरीकरण दाखविले आणि मुंबईमध्ये या उपक्रमाच्या आयोजनासाठी एमटीडीसीकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 'इएसपीएन-स्टार' वाहिनीच्या माध्यमातून जगभरातील 50हून अधिक देशांत या चित्तथरारक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले...

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 50 कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता

मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन वर्षात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे विविध महत्त्वपूर्ण योजनांसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्चाला आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,  अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत किल्ले मालिका (फोर्ट सर्किट), लोणार सरोवर परिसर विकास, एलिफंटा, अष्टविनायक, बुद्धिस्ट गुंफा/ लेणी, रायगड किल्ला आदी ठिकाणी पर्यटनविषयक सोयीसुविधा विकसित करण्याबरोबरच समुद्रकिनारे (बीच) सुरक्षा, जिल्हानिहाय पर्यटनाचा बृहत्आराखडा तयार करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. •        किल्ले मालिका (फोर्ट सर्किट) : थोर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या महान कर्तृत्वाची साक्ष देणारे 350हून अधिक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील प्रमुख अशा किल्ल्यांचा अभ्यास करण्यात येऊन पर्यटनदृष्ट्या चार किल्ले मालिका विकसित करण्याचा निर्धा...

उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई ता. १६ - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर २२ जुलैचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युमुळे मला तीव्र दुःख झाले असून येत्या २२ जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करू नये. सेच वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याबरोबरच स्फोटातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन देखील श्री. पवार यांनी केले आहे.

मुंबई येथे सिरियल ब्लास्ट १०० जखमी- १३ ठार

मुंबईचे वातावरण सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच बुधवारी (ता. १३) संध्याकाळी मुंबई पुन्हा एकदा सिरियल बॉम्ब स्फोटामुळे हादरली आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुमारे ११३ जखमी आणि २० ठार झाल्याचे आत्तापर्यंत वृत्त हाती आले आहे. दादर, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस परीसरात सायंकाळी ६.४५ ते ७.०० दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबई हादरली आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या थकित वीजबिलावरील व्याज माफ करणार- अजित पवार

मुंबई, ता. १२ - औरंगाबाद महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलापोटीच्या महावितरणाची थकबाकी दोन महिन्यात एकरकमी भरल्यास त्यावरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल, असे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की औरंगाबाद महानगरपालिकेकडे १९९० पासून १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास २११ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम दोन महिन्यात महावितरणकडे जमा केल्यास थकबाकीवरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेने सर्व पाणी जोडण्यांना मीटर लावावे तसेच पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाणी वापरावरून विविध क्षेत्रांसाठीचे पाण्याचे दर ठरविणे आवश्यक आहे. यासंबंधी आमसभेचा ठराव पारित करून महानगरपालिकेने तो शासनाकडे पाठवावा. यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, पाणीपुरवठा विभाग मुख्यसचिव मालिनी शंकर, ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव सुब्रत रथो, नगरविका...

ठळक बातम्या

* पुरी एक्सप्रेस अपघात- लोहमार्गावर बॉम्बस्फोटाने पुरी एक्सप्रेस घसरली १३ जखमी * कालका एक्सप्रेस अपघात- आतापर्यंत ६२ मृतदेह काढण्यात यश * तेलंगाणा मागणी- ओस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थ्यांचे आज उपोषण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मुंबई येथे आता 14 जुलैला गौरव समारंभ

मुंबई, दि. 5 : रांची येथे झालेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या गौरव समारंभाच्या तारखेत बदल झाला असून आता हा समारंभ 14 जुलै 2011 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील के. सी. महाविद्यालयात होणार आहे. पूर्व नियोजनानुसार हा समारंभ 15 जुलैला होणार होता. या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत 41 सुवर्ण, 44 रौप्य आणि 47 कास्य अशी एकूण 132 पदके संपादन करून देदीप्यमान कामगिरी केली आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही कामगिरी बजावणाऱ्या 212 खेळाडूंचा आणि त्यांच्या 31 क्रीडा मार्गदर्शकांचा या समारंभात गौरव केला जाईल. सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख, तर कास्यपदक विजेत्यास 1.50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्णपदकासाठी 50 हजार, रौप्यपदकासाठी 30 हजार, तर कास्यपदकासाठी 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. एकूण 9.30 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या...

खासगी वाहनचालकांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याचा शासनाचा निर्धार

मुंबई, ता. ६ - खासगी वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मंगळवारी (ता. ५) मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, खासगी वाहनचालकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना निवृत्ती वेतन देणे आवश्यक आहे. रिक्षा, खासगी बस, ट्रक, टॅक्सी यासारख्या सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहन चालकांना अत्यंत खडतर परिस्थितीस सामोरे जावे लागते. हा घटक सामान्य जनतेला देत असलेली सेवा लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा विचार शासन करते आहे. मंडळाची स्थापना करण्यासाठी परिवहन विभाग आणि कामगार विभाग पुढाकार घेईल. यासाठी तामिळनाडूमध्ये अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या मंडळाचा अभ्यास केला जाईल. या बैठकीला कामगारमंत्री हसन मुश्रीफ, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, वित्त विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्ताव, कामगार विभ...

ठळक बातम्या

बराक ओबामा उद्या दुपारी दोन वाजता ट्विटरवर, ट्विटरच्या प्रयोक्त्यांची अमेरिकन इकोनॉमी या विषयावर प्रश्नोत्तरी (सौजन्य-ट्विटर). तेलंगाणा राज्याच्या मागणीसाठी दुसर्‍या दिवशी सुद्धा बंद..जनजीवन विस्कळीत. तेलंगाणा बंद- ऑटोरिक्षा चालकांकडून दुप्पट भाडे आकारणी. ----------------------------------------------------------------------------------------------------------- सुविचार - प्रत्येक दिवस हा चांगला असतोच असे नसते. मात्र दररोज काही ना काही चांगले होतेच.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मुंबई येथे 15 जुलैला गौरव समारंभ

मुंबई , दि. 5 : रांची येथे फेब्रुवारी 2011 मध्ये झालेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा राज्य शासनातर्फे 15 जुलै 2011 रोजी सायंकाळी सहा वाजता येथील बिर्ला मातोश्री सभागृहात (मरीन लाईन्स) गौरव करण्यात येणार आहे , अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी दिली आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत 41 सुवर्ण , 44 रौप्य आणि 47 कास्य अशी एकूण 132 पदके संपादन करून देदीप्यमान कामगिरी केली आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही कामगिरी बजावणाऱ्या 212 खेळाडूंचा आणि त्यांच्या 31 क्रीडा मार्गदर्शकांचा या समारंभात गौरव केला जाईल. सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख , रौप्यपदक विजेत्यास 3 लाख , तर कास्यपदक विजेत्यास 1.50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्णपदकासाठी 50 हजार , रौप्यपदकासाठी 30 हजार , तर कास्यपदकासाठी 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. असी एकूण 9.30 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खेळाडूंचा आणि मार्गदर्शकांचा गौरव केला जाईल. उपमुख्यमंत्री अ...

संबंधित विभागांमधील अधिकार्‍यांनी संपत्ती जाहीर करावी...

दिल्ली आणि मुंबई येथील सीबीआय अधिकार्‍यांनी आपली संपत्ती जाहीर करावी. असा आदेश मंगळवारी (ता. ५) केंद्रीय माहिती आयोगाने सीबीआय ला दिला आहे. एका दृष्टीने हे चांगले पाऊल असले, तरीही इतक्यात समाधान मानता येणार नाही. सीबीआय प्रमाणेच लाच-लूचपत खाते, व्हिजिलन्स खाते अशा प्रकारच्या संबंधित सर्वच खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी देखील आपली खरी संपत्ती जाहीर करणे आवश्यक आहे. या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्यासह कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेली संपत्ती देखील जाहीर केल्यास वास्तव सामोरे येईल... यात शंका नाही.

नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात कार्यशाळा संपन्न

मुंबई, ता. ३ - नवी मुंबईत सीबीडी बेलापूर ते पेंधर या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विकास कामास एक मे २००१ पासून सुरवात करण्यात आली. सिडकोतर्फे प्रथमच मेट्रो रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला असून सिडकोच्या सर्व अभियंते, अधिकार्‍यांना मेट्रो रेल्वेच्या बारकाव्यांची माहिती होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत मेट्रो प्रणाली, स्थापत्य, अभियांत्रिकी कार्य, रोलिंग स्टॉक, विद्युत पुरवठा, सिग्नलिंग, स्वयंचलित प्रवास शुल्क संकलन आदी बारकाव्यांविषयी माहिती देण्यात आली. प्रास्ताविक 'द लुईस बर्जर ग्रुप' चे पुनीत अरोरायांनी प्रास्ताविक केले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अतिरिक्त मुख्य अभियंता एन. एस. पितळे, अधिक्षक अभियंता बी. एस. कुलकर्णी, दीपक हरताळकर, एस. व्ही. वैद्य यांनी परीश्रम घेतले.

राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांची सिडकोस भेट

मुंबई, ता. ३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी तसेच विविध नियोजन संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सामायिक बाबी सोडविण्याच्या अनुषंगाने संबंधित संलग्न विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच विभाग प्रमुखांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळ्यांवरील प्रलंबित प्रकरणे तसेच या संस्थांच्या कार्यक्षमतेच्या वृद्धीसंदर्भात उपाय योजना किंवा सूचना सादर करण्याच्या अनुषंगाने सिडकोच्या अनुभवी तज्ज्ञजनांमार्फत प्रस्ताव-निवेदन सादर करण्यात यावे, त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होईल असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला नवी मुंबई शेजारील क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली. महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी मायनर मिनरल ऍक्टमधून सूट मिळावी, विशेष अनुदान मिळावे किंवा कर सवलत मिळावी याबाबत माहितीही त्यांनी दिली. बैठकीस विविध विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हंगामी पोलिस पाटलांची कायम नियुक्ती

मुंबई, दि. ४ : सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या हंगामी पोलिस पाटलांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.       गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस पाटलांच्या मागण्यांसंदर्भात जानेवारीमध्ये बैठक झाली होती. त्यात सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हंगामी पोलिस पाटलांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात शासनाने सर्वांगीण विचार करून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या हंगामी पोलिस पाटलांना आवश्यक वय आणि शिक्षणातून सूट देऊन प्रथम पाच वर्षे किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तेवढ्या कालावधीसाठी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार आहे.     हंगामी पोलिस पाटलांना कायमस्वरुपी नियुक्तीसाठी शासनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दावे विनाशर्त मागे घेणे बंधनकारक राहील. दावे मागे घेतल्याची कागदपत्रे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सादर ...

ठळक बातम्या

मार्क झुकेरबर्गही गुगल प्लसवर... तेलंगाणा काँग्रेस सदस्य आज राजीनामा देण्याची शक्यता... महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता... मुंबईतल्या कार्यालयातील भोजनावर लागणार अंकुश- वारंवार घडणार्‍या घटनांची दखल...

सिडकोची ऍम्नेस्टी योजना ७ जुलैपासून कार्यान्वित

मुंबई, ता. ४ - सिडकोने नवी मुंबईमध्ये बांधलेल्या सदनिका/दुकाने/कार्यालयांचे केवळ करारनामा व कुलमुखत्यारपत्राच्या (पॉवर ऑफ अटर्नी) आधारे सिडकोच्या परवानगीशिवाय करण्यात आलेले हस्तांतरण नियमाधीन करण्यासाठी आखलेली ऍम्नेस्टी योजना ७ जुलैपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय झाला आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्यात येत आहे.

"गुगल प्लस" चा सामना करण्यास फेसबुक तयार...

अल्पावधीतच गुगलच्या 'ऑर्कुट'ला मागे टाकून संपूर्ण जगातल्या विशेषतः तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या 'फेसबुक'ने गुगलने नुकत्याच सुरू केलेल्या "गुगल प्लस" या सोशल वेबसाइटचा अर्थातच 'गुगल'चा सामना करण्याची तयारी केली आहे. यानुसार काही दिवसातच 'फेसबुक' "एक खास सेवा" देणार असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. यासह आणखी काही सुविधा देण्याबाबत काम सुरू असून त्याबाबत मात्र पुढच्या आठवड्यातच माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज आत्ता...

*     रेव पार्टी- रेव पार्टी आयोजक अपराजित मित्तलला अटक- मित्तल अखेर पराजित. *     शनिवारी (ता. १ जुलै) बुढ्ढा होगा तेरा बाप रिलिझ होणार. अमिताभच्या चाहत्यांना अभिषेककडून धन्यवाद. *     बुढ्ढा होगा तेरा बाप...अमिताभच्या चाहत्यांनी अमिताभच्या चाहत्यांसाठी तयार केलेली फिल्म.

नकुल पाटील यांच्या निधनाने आदरणीय व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

मुंबई, ता. ३० - सिडकोचे चेअरमन आणि राज्याचे माजी मंत्री नकुल पाटील यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की राज्याचे माजी मंत्री आणि सिडकोचे चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून सामाजिक, राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात त्यांनी वावरताना सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या निधनाने युवक कार्यकर्त्यांचा आधार आणि मार्गदर्शक हरपला आहे.

नकुल पाटील यांचे निधन

मुंबई, ता. ३० - सिडकोचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री नकुलपाटील यांचे बुधवारी (ता. २९) रात्री ११.४५ च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने डोंबिवली येथे निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. ३०) डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कार्यकर्तेही माणूसच...

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...

कार्यकर्तेही माणूसच...

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, नांदेड आदी शहरांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष नाही परंतू अप्रत्यक्षपणे या प्रश्नी विरोधकांना सुद्धा सहमती दर्शवून साथ दिली. मुंबईत सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीला विरोध करून शासनाला घरचाच आहेर दिला आहे. वास्तविक सामान्य नागरीकांना असे यापूर्वीच होणे अपेक्षित होते. महागाई आणि इंधन दरवाढीस विरोध करणारे जरी सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच असले तरीही आपणही माणसंच आहोत हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. विशेषतः नेहमीच महागाईची सर्वाधिक झळ मध्यम वर्गीयांनाच बसते. कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधावरून, दशकात राजकीय पक्षांमध्ये दाखल झालेले कार्यकर्ते देखील मध्यम वर्गीय असल्याचे आणि सुशिक्षित असून प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना असल्याचे प्रथम दर्शनी जाणवते. हे खरं सुद्धा आहे. केवळ विरोधाला विरोध करून गलिच्छ राजकारण करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी, जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यासाठी राजकारण करणे केव्हाही चांगले...

या पैशाला काय म्हणतात...?

एकीकडे रामदेव बाबा आणि अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करीत असून लाखो नागरीकांचे याला समर्थन आहे. तर, दुसरीकडे काही संस्था, आश्रमांमध्ये कोट्यवधी, खोर्‍याने पैसा असल्याचे चित्र समोर येत आहे..या पैशाला नेमकं काय नांव द्यावं...? या प्रश्नाला यक्ष प्रश्न म्हणावं काय? देशातल्या नागरिकांच्या मनातही असा प्रश्न येत असेल काय? 

ठळक बातम्या

जे. डे. खून प्रकरणी सात संशयित ताब्यात... छत्तीसगड: दंतेवाडा येथे भूसुरुंगाच्या स्फोटात ४ जवान ठार १ बेपत्ता... सिंकदराबाद: अर्जुन कुमार यादव यांच्या पुतणीचा मृतदेह आढळला... रायगड: पोलिसांचा रेव पार्टीवर छापा- १० युवक ताब्यात...

Hightlight: ठळक बातम्या

*     अभिषेक बच्चन - यापूर्वी 'पा' चा दिग्दर्शक म्हणून मीडियासमोर उभा होतो...आता होणारा 'पा' (अर्थातच पापा, बाप) म्हणून उभा आहे. *     पाच लाख टन साखर निर्यातीस केंद्राचा हिरवा कंदील... *     इंदूर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस

आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा; पथक सज्ज

मुंबई, ता. २३ - श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीनित्त आळंदी ते पंढरपुर मार्गावर पालख्यांबरोबर जाणार्‍या वारकरी बांधवांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे २२ जून ते ११ जुलै या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेचे पथक सज्ज झाले आहे. यावर्षी संस्थेचे वैद्यकीय पथक शनिवारी (ता. २५) नेहरूनगर, कुर्ला, मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास के. ई. एम. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, असे संस्थ्चे विश्वस्त डॉ. सुनिल हलुरकर यांनी कळविले आहे. ही मोफत वैद्यकीय सेवा संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपुर या मार्गावर वारकर्‍यांना दिली जाईल. यासाठी संस्थेने सुमारे आठ रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा आणि सेवाभावी १०० डॉक्टर व १५० स्वयंसेवकांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. या समाजसेवी उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर पंढरपुरकडे पायी जाणार्‍या वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक ते औषधोपचार व वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे अगदी मोफत पुरविली जाईल. पालखीच्या मार्गा...

वेळ आत्मचिंतन करण्याची...

इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड होण्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच उज्जेनहुन इंदूरला वास्तव्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्त्या करण्यात आली. पोलिसांनी तीन-चार दिवसातच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक युवती आणि दोन युवकांचा समावेश आहे...। या दुर्दैवी घटनेविषयी महाबली ब्लॉगचे नियमित वाचक रविंद्र बर्गले यांनी पाठविलेली ही प्रतिक्रिया: इस नृशंस और वीभत्स घटना से सभी को झकझोर दिया है. लेकिन विचार करें तो पाते हैं, कि आधुनिक जीवन शैली से उपजे भटकाव और विकृति के मूल में वह आधुनिक जीवन-शैली है, जो युवा मनोविज्ञान को फैशन, लड़के-लड़कों की मित्रता, प्यार, फिल्मी ग्लैमर, क्लब और रेस्त्रां में मौज, शराबखोरी, दादागिरी, हिंसा के प्रति आकर्षित करती है. वास्तव में इस घटना के लिए समाज और समाज में नैतिकता और व्यवहारिकता के मानदंड निर्धारित करने वाला अन्य वर्ग (इनमें मुख्य रूप से मीडिया शामिल है) भी समान रूप से जिम्मेदार है, जिसने प्रत्यक्...

अभिरूची...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार

 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला ...

उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत 'हिंदुत्व' प्रमुख मुद्दा नसेल: उमा भारती

लखनौ, ता. २२ (वृत्तसंस्था) - सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि राम मंदीर हा भाजप चा प्रमुख मुद्द नसेल. असे भाजप च्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. उमा भारती म्हणाल्या, की हिंदुत्व आणि राम यांच्यावर आपला विश्वास आहे. आम्हांला इथे रामराज्यच अपेक्षित आहे. राम मंदीराचा प्रश्न हा श्रद्धेचा भाग आहे मात्र राज्याच्या निवडणुकीसाठी तो राजकीय अजेंडा नसेल. आम्ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविणार आहोत. मी हिंदुत्व आणि राम मंदीर प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मध्यंतरी साडेपाच वर्षे भाजप मध्ये नसताना देखील आपण याबाबत तडजोड केलेली नाही. काँग्रेस सुद्धा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे घेणार असल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की केंद्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसने उत्तर देणे अपेक्षित आहे. "चोराकडे चोरच बोट कसे दाखवू शकेल?" असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख दिग्विजय सिंग ...

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी...

राक्षस

दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ता. १७: माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. दहावी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन करत त्यांनी भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध संधीचा शोध घेऊन त्यात यश मिळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तळ्यात नव्हती बदके दोन...

तळ्यात नाही..मळ्यात तर नाहीच नाही...तर...अन्नासाठी चक्क रस्त्यावर आलेली बदकं

बाळ-गोपाळ मंडळी

तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधणार: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १६ - राज्यातील तमाशा कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज तमाशा कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीत तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करणार्‍या या कलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची आवश्यकता असते. यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्यात येईल. तमाशा कलेला चालना देण्यासाठी कायमस्वरूपी निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा शासन विचार करीत आहे. याबरोबरच या कलावंतांसाठी निवासी संकुल उभारण्यासाठी पुण्याजवळ भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईत तमाशासाठी थिएटर उभारण्यासाठी सिडकोमार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल. ते पुढे म्हणाले की, तमाशा कलावंतांना स्वतःचा फड तसेच थिएटर उभारण्याकरिता कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच निर्णय घेतला जाईल. तमाशा कलावंतांना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्...

Rainbow: Chrosome of Nature.

green

wonder of nature...

पर्यटनासह विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्याची महाराष्ट्र व स्लोव्हानियाला मोठी संधी

मुंबई, दि. 13 जून : भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हेनिया यांना पायाभूत सुविधा, रस्ते-विकास आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वृध्दीस मोठी संधी असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले. युरोपीय समूह देशांतील 'प्रजासत्ताक स्लोव्हेनिया' या देशाच्या वित्त मंत्री श्रीमती दार्जा रॅडिक यांनी शिष्टमंडळासह श्री. भुजबळ यांची त्यांच्या 'रामटेक' निवासस्थानी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्लोव्हानियाच्या व्यापार मंत्री श्रीमती मोइका ऱ्होवॅटिक तसेच सेक्रेटरी श्रीमती मेत्का अर्बास तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर आणि महाव्यवस्थापक विजय चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्रीमती रॅडिक यांनी भारत विशेषत: महाराष्ट्र आणि स्लोव्हानिया यांच्यामधील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने आपण मुंबई भेटीवर आल्याचे भुजबळ यांना सांगितले. त्यावर श्री. भुजबळ यांनी श्रीमती रॅडिक यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींविषयी सव...

जे. डे यांच्या कुटुंबियांचे भुजबळ यांच्याकडून सांत्वन

मुंबई, दि. 12 जून : राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास जे. डे यांचा पार्थिव देह जे.जे. रुग्णालयातून त्यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी आणण्यात आला आणि तेथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. श्री. भुजबळ यांनी जे. डे यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना अखेरचे अभिवादन केले. 'एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तरी, त्याची गांभिर्याने दखल घेण्यात येते. इथे तर डे यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे राज्य शासन आणि पोलीस प्रशासन संबंधित माफियांविरोधात कठोर पावले उचलल्याखेरीज राहणार नाही,' असे भुजबळ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

जे. डे यांच्या हत्येचे वृत्त धक्कादायक : छगन भुजबळ

मुंबई, दि. 11 जून : 'दैनिक मिड-डे'चे ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जे. डे यांच्या हत्येचे वृत्त समजून आपल्याला अत्यंत धक्का बसला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व शोक व्यक्त केला आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्राइम रिपोर्टिंग आणि शोध पत्रकारितेच्या क्षेत्रात जे. डे यांनी गेली कित्येक वर्षे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. पोलीस, खबरे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. डे हे अत्यंत उमद्या व उत्साही स्वभावाचे पत्रकार होते. माझेही त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांची अशा प्रकारे हत्या व्हावी, ही घटनाच क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. जे. डे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि खबऱ्यांचे जाळे या विषयावर        झगझगीत प्रकाश टाकणाऱ्या 'खल्लास' आणि 'झिरो डायल' या आपल्या पत्रकारितेतील अनुभवावर अत्यंत रोमहर्षक आणि थरारक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या. गेल्...