मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मुंबई येथे 15 जुलैला गौरव समारंभ


मुंबई, दि. 5 : रांची येथे फेब्रुवारी 2011 मध्ये झालेल्या 34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा राज्य शासनातर्फे 15 जुलै 2011 रोजी सायंकाळी सहा वाजता येथील बिर्ला मातोश्री सभागृहात (मरीन लाईन्स) गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी दिली आहे.
महाराष्ट्राने या स्पर्धेत 41 सुवर्ण, 44 रौप्य आणि 47 कास्य अशी एकूण 132 पदके संपादन करून देदीप्यमान कामगिरी केली आहे. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ही कामगिरी बजावणाऱ्या 212 खेळाडूंचा आणि त्यांच्या 31 क्रीडा मार्गदर्शकांचा या समारंभात गौरव केला जाईल. सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख, रौप्यपदक विजेत्यास 3 लाख, तर कास्यपदक विजेत्यास 1.50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्णपदकासाठी 50 हजार, रौप्यपदकासाठी 30 हजार, तर कास्यपदकासाठी 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. असी एकूण 9.30 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खेळाडूंचा आणि मार्गदर्शकांचा गौरव केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार ॲनी शेखर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव सुमित मलिक आदी यावेळी उपस्थित राहतील.
गौरव समारंभासाठी खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा संघटना, संस्था आणि मंडळांचे पदाधिकारी, क्रीडा संघटक आदींनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाशी 020-26140048, 26140095, 26140169 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा विभागातर्फ करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012