मुंबई, ता. १२ - औरंगाबाद महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलापोटीच्या महावितरणाची थकबाकी दोन महिन्यात एकरकमी भरल्यास त्यावरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल, असे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की औरंगाबाद महानगरपालिकेकडे १९९० पासून १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास २११ कोटी रुपयांचे व्याज झाले आहे. महानगरपालिकेने थकबाकीची रक्कम दोन महिन्यात महावितरणकडे जमा केल्यास थकबाकीवरील २११ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेने सर्व पाणी जोडण्यांना मीटर लावावे तसेच पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पाणी वापरावरून विविध क्षेत्रांसाठीचे पाण्याचे दर ठरविणे आवश्यक आहे. यासंबंधी आमसभेचा ठराव पारित करून महानगरपालिकेने तो शासनाकडे पाठवावा.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, पाणीपुरवठा विभाग मुख्यसचिव मालिनी शंकर, ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव सुब्रत रथो, नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, डॉ. कल्याण काळे, सतीश वाघचौरे, प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.