एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १५ मार्च, २०११

उपनिबंधक राजेंद्र मगर यांचे निधन

शिरूर (जिल्हा पुणे) येथे तहसील कार्यालयात उपनिबंधक असलेले राजेंद्र गुलाबराव मगर (वय ४६) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, वडील, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. सोमवारी दुपारी कोपरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील उपखेड (ता. चाळीसगाव)  येथील राहिवाशी असलेले मगर गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव बेट येथे स्थायिक होते. अत्यंत दानशूर आणि धार्मिक तसेच त्यांच्या मनमिळावू परिस्थितीमुळे त्यांचा मित्रपरिवारही दांडगा होता. 'राजाभाऊ' या नावाने ते तहसील विभागात व मित्रपरिवारातही लोकप्रिय होते. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून  ते पहिल्याच प्रयत्नात स्टाफ सिलेक्शनमार्फ़त सरकारी सेवेत दाखल झाले होते. त्यांना तहसील विभागाचा उत्कृष्ट कार्यक्षमतेचा तसेच राजपत्रीत अधिकारी महासंघाचाही गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते