मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ           मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मर...

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील. समता परिषदेच्या ...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव: अजित पवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.

संतांनी समाज घडविण्याचे कार्य केले- छगन भुजबळ

कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून ...

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बां...

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली. उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

  मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभ...

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी

मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते. श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करा: भुजबळ

मुंबई, दि. 11 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वर सातत्याने होत असलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण महामार्गाची जाता-येता अशी दुतर्फा पाहणी करून 15 दिवसांच्या आत तपशीलवार अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. सदर पाहणी करत असताना संबंधित जिल्ह्यातील अभियंत्यांनाही सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे, महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ लक्षात घेऊन श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयात संबंधितांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्...

"सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे. रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" (अर्थात सोलर एनर्जी) ही काळाची गरज नक्कीच ठरेल... कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४...

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

गोंदे ते पिंपळगाव टप्प्याचे बहुतांश काम आगामी सहा महिन्यात पूर्ण: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) - आगामी सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोंदे ते पिंपळगाव या साठ किलोमीटरपैकी पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण पूर्ण होणार असून उर्वरित पंधरा किमी अंतरावरील काम जून २०१२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यामुळे मुंबई ते धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आगामी दीड वर्षाच्या आत चौपदरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्‍यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्‍यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.

लातूर-औसा-लामजना राज्यमार्गाची दुरुस्ती 5 जूनपूर्वी झालीच पाहिजे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 4 मे : लातूर-औसा-लामजना या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचे काम येत्या 5 जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. या रस्त्याच्या कामाबाबत आज भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औसा-लातूर हा 19 किलोमीटरचा चौपदरी तर औसा-लामजना हा 13 किलोमीटरचा दुपदरी मार्ग आहे. या मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचे फलक, दिशादर्शक बसविण्याची सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली. 'जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरा' यानंतर झालेल्या अन्य एका बैठकीमध्ये श्री. भुजबळ यांनी डयुरोफ्लेक्स हे जर्मन अस्फाल्ट रोड ऍडिटिव्ह प्रायोगिक तत्त्वावर वापरून पाहण्याची सूचनाही सार्वजनिक बांधकाम सचिवांना केली. सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामातील एकूण ला...

खतवाटपाच्या नियोजनाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी - छगन भुजबळ

नाशिक - "देशभरातच खतांची अडचण असून, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या खताचे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वितरण होण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी,' असे स्पष्ट आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहात आज नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा व नियोजनाची बैठक झाली. त्यात श्री. भुजबळ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, खासदार हरिश्‍चंद्र महाले, प्रतापदादा सोनवणे, समीर भुजबळ, राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्यासह पंधरा तालुक्‍यांतील आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते. अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत, खतांचे वितरण, अपघात विमा योजना, ट्रॅक्‍टरचे अनुदान, तेल्या रोगावरील रखडलेले अनुदान या विषयावरील विविध प्रश्‍न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल यांनी खतांसंबंधी प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, ""खतांच्या विक्रीतील लिंकिंग थांबली पाहिजे. खतांबाबत अधिकारी परस्पर कोटे ठरवून मोकळे होतात. त्यामुळे सहकारी सोसाय...

एक+विसाव्या शतकातली आई आणि एक+विशीतली मुलं...

सोळावं वरीस धोक्याचं गं बाई..सोळावं वरीस धोक्याचं! असं अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं. मात्र एकविसाव्या शतकात सोळाव्या वर्षी मुलांना बर्‍यापैकी समज येते आणि एकवीस वर्षांचा मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असतो. एकविसाव्या शतकातली आई सुद्धा मुलाने चांगला उद्योग-धंदा करून नावलौकिक प्राप्त करावा किंवा चांगली नोकरी करून लवकरच एखादी सुन घरी येण्याची स्वप्न पहाते. हेच मुलींच्या बाबतीतही लागू होते. मात्र , मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली , की तिचं एखादं छान स्थळ पाहून लग्न लावून जबाबदारीतून मोकळं कधी होऊ ? याचा विचार कायम आई करत असते. आईचं महत्व काय आहे ? हे सांगण्याची विशेष गरज नाही. परंतू दिवसेंदिवस मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि त्यांना सुसंस्कारित करण्याची आईची जबाबदारी वाढते आहे. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा अशा घोषणा करणार्‍या सरकारने घोषणे पलिकडे काहीच न केल्यामुळे युवक मंडळी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात एमएनसी अर्थातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन/कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. कारण अगदी जोरात सुरू असलेले खाजगी क्ष...

बहात्तर वर्षांचे तरूण शिकताहेत "इंटरनेट"...

जिद्द आणि चिकाटी हे दोन गुण अंगी असले तर नशीब सुद्धा बदलतं. अनेकदा जवळ अत्यंत मोजके पैसे घेऊन घराबाहेर पडलेली व्यक्ती तिच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमुळे मोठी उद्योगपती, मोठ्या पदावर विराजमान झाल्याची उदाहरणे आहेत. माणसाने मिळेल ते शिकत रहावं, अर्जित करावं त्याने लाभच होतो. याचबरोबर काळाबरोबर चालणारी व्यक्ती सुद्धा प्रगती करू शकते, तिचे कुठेही अडून रहात नाही, हे सिद्ध केलंय युवकांनाही लाजवेल अशा इंदूरच्या अवघे ७२ वय असलेल्या एन. पी. बरगले यांनी...! भारतीय आयुर्विमा महामंडळातून उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झाल्यानंतर श्री. बर्गले कधीही स्वस्थ बसलेले नाहीत. दररोज काही ना काही वाचन करणे, फिरायला जाणे ही त्यांची दैनंदिनी आहे. वाचाल तर वाचाल...या उक्तीप्रमाणे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचून स्वतःला अपडेट करूनच ते घराबाहेर पडतात. ग्लोबलायझेशनच्या काळात इंटरनेटचं महत्व वाढलं असल्याचं आणि हा आलेख उंचावतच राहणार असल्याचं महत्व त्यांना पटलं आहे. आपले चिरंजीव रविंद्र यांच्याकडून ते सध्या दररोज इंटरनेटचे धडे घेत आहेत. रविंद्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनुवादक म्हणून सध्या कार्यरत असून इंग्रजीवर त्या...

जेव्हा पुतळे बोलू लागतात...

मध्य प्रदेशातल्या धार येथील फडके स्टुडिओमध्ये तयार करण्यात आलेले हे पुतळे एकमेकांशी बोलत आहेत असा भास न झाल्यास नवलच...

अजित पवार यांची 6 मे स सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

मुंबई, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत उद्या (ता. ५ मे) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे. पत्रकार राजू परुळेकर यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षातील प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वैभवशाली महाराष्ट्राबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. राज्याची कृषीप्रगती, शैक्षणिक विकास, अर्थव्यवस्था, सिंचनक्षमता, उर्जास्थिती अशा विविध विषयांवर देखील उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयीचे गैरसमज दूरही केले आहेत. मा हिती व जनसंपर्क महासंचालनालयातील निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातील या एक तासाच्या मुलाखतीचे पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत करण्यात येणार आहे.

मुंबई येथे राष्ट्रीय पातळीवर खुली लेख स्पर्धा

मुंबई, ता. ३ - मुंबई येथे संवादिनी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संवादिनी संस्था प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी कार्यरत असून या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. याचा एक भाग म्हणून संस्थेने राष्ट्रीय पातळीवर लेख स्पर्धा आयोजित केली आहे. लेख स्पर्धेचे विषय असे- १. बहुजनांच्या विकासात शासकीय योजनांची भूमिका, २. मी, माझी संस्था आणि बहुजन विकास, ३. आजचा बहुजन समाज आणि राजकारण, ४. आजच्या बहुजन स्त्रियांचे अस्तित्व इ. उपरोक्त चार विषयांसाठी स्पर्धा असून शब्दमर्यादा १५०० ते २०००० पर्यंत असावी. ही लेख स्पर्धा सर्वांसाठी खुली असून २० मे २०११ पर्यंत अरूण लावंड, सी/२४, सहकार नगर, वडाळा, मुंबई - ३१ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी अरूण लावंड ९८६९७४६५१८ किंवा श्रीकृष्ण नाईक ९७५७१७५३९४ येथे संपर्क साधावा.

गीतसम्राट हरपला: अजित पवार

मुंबई, ता. ३ - शब्दशृंगारात न्हालेल्या लावणीला मराठी चिरंतन गुंजत ठेवणारा आणि मराठी चित्रपट गीतांना आपल्या शब्दांनी सजवणारा गीतसम्राट हरपला आहे. अशा शब्दात गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात श्री. पवार म्हणाले, की खेबुडकरांच्या शब्दांनी भक्तांना दत्तगुरुंचं दर्शन घडवं, लहानग्यांना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्याचं सांगितलं, कोल्हापूरच्या लवंगी मिरचीचा ठसका दाखवला, तर बुगडी सांडल्याची चुगली न करण्याची गळ देखील घातली. पिंजरा, सामना, साधी माणसं या चित्रपटातील त्यांच्या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला आहे. मराठी चित्रपटगीतांना लोकप्रिय करणार्‍या गीतकारांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च होते. त्यांच्या लेखणीतून साकारलेली भक्तीगीते, भावगीते, लोकगीते, चित्रपटगीते मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटगीते पोरकी झाली आहेत.

खेबुडकर यांच्या निधनामुळे श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड - भुजबळ

मुंबई, दि. 3 मे : अनेक वर्षांपासून आपल्या गीतांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांचे मंगळवारी (ता. ३ मे) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर येथील आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सोपी, सहजसुंदर शब्दरचना, नादमाधुर्य आणि गेयता ही जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीची प्रमुख वैशिष्टये होती. पी. सावळाराम, शांता शेळके आणि ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग अधिक श्रवणीय बनविण्यामध्ये खेबुडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. लावणी हा गीतप्रकार सर्वाधिक हाताळणाऱ्या खेबुडकरांनी तितक्याच ताकतीने भक्तिगीते, भावगीते, बालगीते, प्रेमगीते सुध्दा लिहीली. 'पिंजरा...

अंधेरी येथील नूतन 'आरटीओ' इमारतीचा पहिला मजला 15 दिवसांत सुसज्ज करावा - छगन भुजबळ

मुंबई, दि. 2 मे : अंधेरी (पश्चिम) येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कामकाज नूतन इमारतीतून सुरू व्हावे, या दृष्टीने या इमारतीच्या किमान पहिल्या मजल्याचे संपूर्ण काम येत्या 15 दिवसांच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: भेट देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंधेरी (पश्चिम) येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताब्यातील भूखंडाच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामाचा श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत स्टील्ट अधिक दुमजली असणार आहे. हे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम बाकी असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे, जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतरित करता येऊ शकेल. त्याचबरोबर पाणी व विजेच्या जुन्या जोडण्याही...

नवी मुंबई मेट्रो शहराचा चेहरा बदलणार: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले. श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्ध...

सुट्टीची भटकंती...(८)

घरी परत जायचं मामीला सांगितल्यानंतर मामीन आणखी दोन दिवस राहण्याचा आग्रह केला. खूपच आग्रह झाल्यामुळे मी सुद्धा होकार दिला. आज मामी पापडाचा..बिबडी..हा प्रकार तयार करणार होती. माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता. पहाटे साडेतीनला काहीतरी खुडबुड ऐकून मला जाग आली. पाहतो, तर मामी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती....(काही कारणास्तव उर्वरित भाग उद्या...)

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

नवी मुंबई नियोजित मेट्रो रेल्वे स्थानकाचेभूमिपूजन आणि प्रकल्पाचा शुभारंभ कुदळ मारून करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण   

ओसामा अखेर संपला..ओसामाचे अलकायदा आता पडणार ओस...

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या सीमेनजीक वेगात सुरू केलेल्या ओसामा शोध मोहिमेस रविवारी मध्यरात्री (ता. २ मे) अखेर यश मिळाले. अमेरिकेच्या पथकास अपेक्षित यश मिळून ओसामाला ठार मारण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यामुळे सुमारे तीन हजार लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. ओसामाचा म्होरक्या ओसामा लादेन याचे यामागे मास्टरमाईंड असल्याचे मानले जात होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची लढाई अशीच सुरु राहणार असून, अल कायदाविरुद्धच्या लढाईतील हा सर्वात मोठा विजय आहे. आमची लढाई इस्लामविरुद्ध नसून, दहशतवाद्यांविरुद्ध आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याची अमेरिकी सैन्याला मदत झाल्याने मी त्यांचे आभार मानतो." दरम्यान ओसामा याला ठार मारल्यास अमेरिकेस आणखी गंभीर परिणाम भागावे लागतील अशी माहिती गेल्या आठवड्यात अल कायदा या संघटनेने दिल्याचे वृत्त आहे. ओबामा यांनी लादेनला ठार मारल्याची घोषणा केली तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर अ...

नवरी नटली...आता बाई सुपारी फुटली...खंडेरावाच्या...

सुपारीच्या झाडाला फुटलेला मोहोर...