मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

What is "Visa"?

A visa is a form of permission for a non-citizen to travel to, enter, transit or remain in a particular country. A visa does not guarantee entry. That remains the right of the immigration officials of the country concerned. Some countries may ask visitors to present return tickets and evidence of means to cover their intended stay. Some countries may refuse entry to visitors who do not comply with their requirements regarding general appearance and clothing. Some countries have compulsory currency exchange regulations on first entry. Only the country/countries you plan to visit can provide up-to-date information about visa requirements for South African passport holders. Types of Visa: Tourist Visa       A Tourist Visa is given to those visiting India for tourism or other non-business related purposes and is generally valid up to 6 months. Business Visa       A Business Visa is given those who are doing business in India such as m...

भारतीय हत्ती तुर्कमेनिस्तानात- सरकारकडूनच कायद्याची पळवाट!

भारतीय हत्तींची एक जोडी तुर्कमेनिस्तानमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. तुर्कमेनिस्तान सरकारच्या विनंतीवरून ही जोडी पाठविण्यात येणार आहे. भारत सरकारकडून दोन हत्ती भेट मिळावे अशी अपेक्षा तु्रकमेनिस्तान सरकारने केली होती. परंतु वन्यजीवांना भेट देण्यावर भारतात बंदी असल्यामुळे ते शक्य नव्हते. आता, दोन्ही देशांमधील प्राणिसंग्रहालयां दरम्यान देवाण-घेवाण करण्याच्या प्रस्तावाखाली दोन भारतीय हत्ती तिकडे पाठविण्यात येतील. याचाच अर्थ सरकारने स्वत:चा कायद्याची पळवाट शोधून काढली आहे. कायदे करणार्‍यांनीच शक्कल लढवून कायद्याची पळवाट शोधून काढली आहे, इतरांनी अशा पळवाटा शोधण्यात वाईट काय..? म्हणतात नां, कायदे तितक्या पळवाटा...!

सांग दर्पणा कशी मी दिसते..

                                                      ।..सांग दर्पणा कशी मी दिसते..।                                                     ।।..माझ्यामुळे रूप तुझे रे खुलते..।।

विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्‍यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या. यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

"बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अ‍ॅड. अधिक शिरोडकर आदी जहांगिर आर्ट गॅलरी मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नामवंत कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. अधिक शिरोडकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. अ‍ॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्‍यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यां...

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे. दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आण...

Om..ओम्...!!!

इंडो-चायना फटाके: यंदाचा आनंद ठरणार उद्याची डोकेदुखी...!

न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा बहुसंख्य ठिकाणी 125 डेसिबलपेक्षा कमी आवाजाचे फटाके बाजारपेठेत उपलब्ध करण्यावर निर्मात्यांचा भर आणि विक्रेत्यांचा कल आहे. फटाक्यांच्या उत्पादनासाठी फटाके उत्पादकांनी चिनी फटाके उत्पादकांच्या सहकार्याने यंदा इंडो-चायना फटाके दिसतील. कमी आवाजाचे आणि या फटाक्यांमधून विविध रंग ओसंडून असल्यामुळे ग्राहकांना आणि शासनाला दोघांनाही आनंद होईलच. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे लवकरच हा आनंद मावळून ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताचा किती मोठा भूभाग बळकावला आहे याची कल्पना देखील न करता येईल असे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेख, बातम्यांवरून वाटते. सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने अक्षरशः कॅप्चर केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चायना मार्केट च्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय. इंडो-चायना फटाके त...

Ye hai India...

निसर्गाने स्वतःच भारताचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न...आपल्या देशावर मानवासह निसर्ग सुद्धा प्रेम करतो, हेच तर या माध्यमातून सांगायचे नसेल नां?

जादू चालणार..फक्त मतदारांची!

बिहारमध्ये सध्या निवडणुकांमुळे विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचार सभांमध्ये झाडल्या जात आहेत. सत्तेवर येण्यासाठी सत्ताधारी अथवा विरोधक..कोणीही असले तरीही विविध युक्त्या, क्लुप्त्या केल्या जातात. दिवसा एकमेकांविरुद्ध तोफा डागून रात्री एकाच थाळीत जेवणारे..असा विचार राजकारण्यांबद्दल केला जातो. काही अंशी हे खरंही आहे. मतदारांना एकाच प्याल्यात उतरवून, स्वतः मात्र कुठेतरी काळोखात, किंवा उजेडातही एकमेकांचे प्याल्यांची भेट घालुन मेळ घालायचा असा प्रकार अनेक जण सर्रासपणे करतात. नीतिश कुमारांसह, लालुप्रसाद यादव, सुषमा स्वराज, छगन भुजबळ यांच्यासारखी दिग्गज मंडळी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. नुकताच सुषमा स्वराज यांनी, "गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जादू सगळीकडे चालेलच असे नाही" असे विधान करून मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी, राहुल गांधी यांना गंगेत बुडवा असे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देखील चुकीचे उद्गार काढून संघाचे मन दुखावले आहेच....

न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ घोषित

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी (ता. २५) भारतीय संघाची (टीम इंडिया) घोषणा करण्यात आली. मात्र घोषित झालेल्या संघात युवराजसिंग याचा समावेश करण्यात आलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरभजन सिंगबरोबर प्रग्यान ओझा, अमित मिश्रा यांना समावेश करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना ४ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे सुरु होईल. दुसरा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे, तर तिसरा सामना २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान नागपूर येथे होईल. अशी आहे टीम इंडिया: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, हरभजन सिंग, झहीर खान, ईशांत शर्मा, एस श्रीसंत, चेतेश्वर पुजारा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा.

झाले इंदूरकर रसिक मंत्रमुग्ध: गीतरामायण

येथील लोकमान्य नगरमध्ये रविवारी (ता. २४) आयोजित गीत रामायण कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्या गीतांनी इंदूरच्या रसिक-श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे स्मरण यावेळी प्रत्येकाला झाले. श्री. श्रीधर फडके यांच्या प्रत्येक पदाला आणि गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली, विवेक घळसासी यांच्या निवेदनाने श्रोत्यांना खुर्च्यांना खिळवून ठेवले. गेले तीन दिवस घळसासी यांच्या सुरू असलेल्या रामकथेच्या प्रवचनाचा समारोप काल करण्यात आला. श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाच्या सुरेल स्वरांचे श्रेय बाबूजी आणि ग.दि. माडगूळकर यांना असल्याचे सांगून आपण फक्त त्यांचे महान कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गाताना शब्दांमागील भावनांसह स्पष्ट शब्दोच्चार करणे आणि भावगीत संगीतबध्द करताना शब्दांच्या वजनासकट त्यातला भाव, कवीची भूमिका रसिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच या दोन्हींसह गाणे ‘जिवंत करणे’ या गोष्टींना आपल्या कारकीर्दीत त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. संगीतातली नवी वळणे आत्मसात करताना त्यांचा एक धागा परंपरेशी घट्ट जोडलेला होता, त्यामुळेच बाबुजी सुरांच्या गाभ्या...

कथा ई-एज्युकेटेड चोराची...।

दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्‍याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्‍हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्‍यांच्या डोळ्यांनी...।

शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा

शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्‍या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.

money makes all

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत. एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभा...

काश्मिर प्रश्नाचा एकदाच सोक्षमोक्ष लावावा

वर्षानुवर्ष धुमसत असलेल्या काश्मिर प्रश्नाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी देशातल्या नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या अयोध्या राम-मंदिर बाबरी मशिद यासारख्या संवेदनशील विषयावर न्यायालयाने तोडगा काढून निर्णय दिल्यानंतर ही मागणी जोर धरत आहे.

butterfly...

क्रिडामंत्री गिल यांच्यावर पंतप्रधानांची नाराजी

क्रिडामंत्री श्री. गिल यांच्यावर पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नाराजी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर श्री. गिल यांनी पंतप्रधानांकडे स्कॉटलंड येथे जाण्याची परवानगी मागितली होती. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा स्कॉटलंड येथे होणार असून तेथील तयारीबाबत स्कॉटलंड येथे आपणांस आमंत्रित करण्यात आले असून यासाठी परवानगी द्यावी, असे गिल यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. परंतु पंतप्रधानांनी गिल यांना जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावरुनच पंतप्रधान गिल यांच्यावर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

"राष्ट्र-कुल" नंतर होतेय हॉट अर्थातच "गरम"...

(Kahi Aisa to nahi....) मा. प्रधानमंत्री महोदय : आप मुझसे बात मत करो..। श्री. कलमाडीजी : सर, मैने क्या किया, के आप मुझसे नाराज है...? " अमेरिका , इंग्लंड , भारत या तीन देशांचे प्रतिनिधी ब्रह्मदेवाकडे जातात आणि विचारतात..देवा , आमच्या देशातला भ्रष्टाचार कधी संपेल ?... देव ध्यानस्थ होतो आणि डोळे उघडून अमेरिकेच्या प्रतिनिधीस सांगतो: थोड्याच वर्षात तुमच्या देशातला भ्रष्टाचार संपेल , काळजी करू नका...। इंग्लंडच्या प्रतिनिधीला सांगतो: जरा जास्त कालावधी लागेल...। भारताची वेळ येते तेव्हा ध्यानस्थ झाल्यानंतर बराच वेळ डोळे उघडतच नाही , उघडल्यानंतर देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात..ते पाहून सगळेच अवाक होतात , थोड्या वेळाने भारताचे प्रतिनिधी विचारतात तेव्हा देव सांगतो: काय करू बाबा...। तुमच्या देशातला भ्रष्टाचार जेव्हा संपेल..तेव्हा ते पाहण्यासाठी मी या विश्वात नसेन....।" महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कोणीतरी सांगितलेला हा विनोद आज आठवला...निमित्त आहे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे...। राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारी दरम्यान देण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमध...

दोन बायका: फजिती ऐका!

एक असतो हेडली..त्याला असतात तीन बायका.. पण तीन पैकी दोघींनी केलेली त्याची फजिती ऐका.. एकदा केला त्याने प्लॅन.. म्हणाला, कोणाला सांगाल तर उघडेन तलवारीचे म्यान.. पण बायका त्या बायकाच.. पोटात काही राहिले नाही.. दिली सूचना सरकारला.. सरकारने हेडलीला धरले.. बिचारा हेडली.. प्लॅन उघडकीला आला म्हणून.. दोघींना फटकारले, म्हणतो कसा, यासाठीच का मी तुम्हाला हेरले.. बिचारा हेडली.. आता काय करावे हे नव्हते कळत.. आता काय करावे हे नव्हते कळत.. बसलाय आता तुरुंगात, बसलाय आता तुरुंगात.. जात्यावर पीठ दळत...। ==========वात्रटिका========उपहास=======जमलं का...!!!

सोने झाले सोन्यासारखे..

अशी खचितच एखादी व्यक्ती असेल, की जिला सोनं आवडत नाही, आकर्षण नाही...। अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत समाजातील सगळ्याच घटकांना सोन्याची क्रेझ असते. त्यातल्या त्यात महिलांचं तर विचारुच नका। सोनं न आवडणारी महिला शोधूनही सापडणार नाही. सोन्याचा उपयोग विशेषतः मध्यमवर्गीयांना व्यवहार करण्यासाठी चांगलाच होतो. कोणत्याही अडचणीत पैसा जवळ नसला, कमी पडत असला, ऐनवेळी इमर्जन्सी उद्भवल्यास सोनंच शेवटी पैसा मिळवून देणं हा एकमेव पर्याय असतो. इतकं अमूल्य महत्व सोन्याचं आहे. परंतु दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत असून मध्यमवर्गीयांसाठी तरी ते सोन्यासारखेच जणू झाले आहेत. परिणामी आगामी लगीन सराईमध्ये आपल्या मुलीच्या अंगावर सोनं घालण्याबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या (ही बातमी टाइप होईपर्यंत) सोन्याने वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे. थेंबे थेंबे तळे साचे..या उक्तीप्रमाणे एक-एक ग्रॅम सोनं जमवायचा विचार केला तरीही तो सहजासहजी शक्य नाही. कारण सतत वाढणार्‍या महागाईमुळेच उद्याची चिंता असलेली सामान्य व्यक्ती एकदम दोन हजार रुपये देऊ शकत नाही. आज अनेक देणी द्यायची असल्यामुळे पैशाला जणू पाय फुटले असल्याचे चित्र आहे. ...

भुजबळ यांची वेबसाइट...

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेबसाइट तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या चिंतन ग्रुपने ही वेबसाइट तयार केली असून www.chhaganbhujbal.org असा वेबसाइटचा पत्ता आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकर आणि भाषा संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या हस्ते वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. भुजबळ यांच्या जीवनकार्याची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने चिंतन ग्रुपने हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी भुजबळ यांनी सांगितले, की अनेकांनी आपल्याला जीवनकार्य लिहिण्याची विनंती केली. परंतु अद्याप आपल्याला बरेच कार्य करायचे आहे. ही वेबसाइट नियमित अपडेट केली जाणार असून इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचा पर्याय उपलब्ध असलेल्या या वेबसाइटमध्ये भुजबळ यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. भुजबळ यांच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या बातम्या, छायाचित्रे आणि वृत्तपत्रातील कात्रणांचा येथे समावेश असेल.

उपमुख्यमंत्री भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहत

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ६२ वा वाढदिवस (ता. १५) त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यासह राजस्थान, बिहार आदी राज्यातून भुजबळ यांना शुभेच्छा संदेश देण्यात आले. याचबरोबर विविध ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह, अनेक कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हे सुद्धा होते. या दोघांनीही राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री भुजबळ यांचाही आज वाढदिवस असून त्यांनाही राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.

दसर्‍यानिमित्त बाजारपेठ तेजीत

मध्यंतरी पितृपक्ष, श्राद्धपक्षामुळे मरगळलेल्या स्थितीत असलेल्या बाजारपेठेत दसर्‍यापूर्वीच आज अष्टमीपासूनच तेजी आली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी देखील दिवाळी व आगामी लगीनसराई पाहता, सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.

DEVISAL...

विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ ला ग्लासगो येथे

एकोणीसव्या राष्ट्रकुल स्पर्धांची सांगता काल दिल्ली येथे झाल्यानंतर राष्ट्रकुलाचा ध्वज ग्लासगो प्रशासनाच्या सुपुर्द करण्यात आला. तत्पूर्वी न भूतो न भविष्यति इतक्या चांगल्या प्रकारे सांगता समारंभ पार पडला.सध्याच्या नियोजित योजनेनुसार सन 2014 मध्ये 3 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा अर्थातच commonwealth games चालतील. यात वेटलिफ्टिंग, जिम्नॅशियम, ऍथेलेटिक्स, रेसलिंग, मॅरेथॉन, रग्बी, टेनिस अशा प्रमुख १७ क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत अखेर शंभरी पार..स्वप्न साकार

राष्ट्रकुल स्पर्धेचा आज समारोप होत असून, सुरवातीस मनोदय व्यक्त केल्याप्रमाणे भारत द्वितीय स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. दुसर्‍या स्थानासाठी इंग्लंडने सुद्धा भारताची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर भारतीय खेळाडुंनी आपले स्वप्न खरे ठरवत, मनोदयाला जागून दुसरे स्थान टिकवून ठेवले. भारताला एकूण १०१ पदकं मिळाली असून यात ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्राँझ अशी पदकं प्राप्त झाली.

हेही नसे थोडके...अखेर शंभरी गाठली।

राष्ट्रकुल (CWG) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुपारपर्यंत अखेर पदकांची शंभरी गाठलीच..। भारत सध्या (१४ ऑक्टोबर दुपारी ३.००) तिसर्‍या स्थानावर असला, तरीही दुसर्‍या स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी एक संधी अजून हातात आहे. आतापावेतो भारताला ३७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदकं मिळाली आहेत..पाहू या आणखी काय होते ते..।

Reflection: Touch Me..If U Can...!!!

चिलीमधील कामगारांना वाचवण्याच्या यशामागे तंत्रज्ञानाचे यश...

चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने गाठावी शंभरी...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची कामगिरी विलक्षण आहे. नव्वदी पार झाली आहे..शंभरी तरी किमान पूर्ण करावी. आगामी अशियाई स्पर्धांमध्ये सुद्धा याप्रमाणेच किंबहुना यापेक्षा चांगले यश अपेक्षित आहे.

come on India..!!!

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारत दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर घसरला. उद्या (ता. १४) स्पर्धेचा समारोप आहे. अजूनही काही स्पर्धा हातात आहेत. आणखी थोडी मेहनत घेऊन खेळाडुंनी पुन्हा दुसरे स्थान प्राप्त करावे, सगळ्यांनी बळ एकवटून कसब, कौशल्य दाखवा..come on..come on India...Common India...!!!

संधी दिल्याशिवाय अनुभव येईल कसा..?

काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका भारतीय वंशाच्या डॉक्टरांवर त्यांना शस्त्रक्रियेचा पुरेसा अनुभव नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेत रुग्णाचे निधन झाल्यामुळे हा ठपका ठेवण्यात आला. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, परंतु अनेक क्षेत्र अशी आहेत, की जिथे अनुभवाशिवाय पुढचे पाऊल टाकू नये..टाकता येत नाही, टाकल्यास संबंधितांना धोका, हानी होऊ शकते. उदाहरणादाखल, रस्त्यावर वाहन चालवताना रस्त्याची माहिती नसल्यास एखाद्या खड्ड्यात वाहन जातेच नां..? अगदी तसेच आहे. मात्र यासाठी, असे सर्वच अनुभव घेण्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे महत्वाचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी नवीन लोकांना, पदवी घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या तज्ज्ञांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्याला माहिती असलेले सर्व खाच-खळगे त्यांनी सांगणे आवश्यक आहे. नाहीतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी प्राप्त करून अनुभव नसल्यास व्यर्थच जाणार आहे, वय वाढून काही उपयोग नाही...। हे सुद्धा खरं आहे, की केवळ अनुभवच घेत रहायचे का? ही बाब मात्र स्वतः व्यक्तीने ठरवावी. अनुभवाबरोबर त्या क्षेत्रात आणखी संशोधन करण्यास...

बलसागर भारत होवो...CWG भारतीय मल्लांना सॅल्युट।

दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी कुस्तीमध्ये सलग दहा (10) सुवर्ण पदके प्राप्त करून देशाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या नावलौकिकात उज्जवल यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. देश सर्वच बाबतीत पुढे आहे. खेळाडूंना अनेक दिवसांपासून दिलेले प्रशिक्षण आणि मिळालेल्या सुविधा, मार्गदर्शन आणि त्यांचा हुरुप..यामुळेच हे शक्य झाले आहे. पुरुष खेळाडूंची बरोबरी महिला खेळाडूंनी सुध्दा केली आहेच. नेमबाजीद्वारे आपले लक्ष्य सहज टिपुन सुवर्ण पदकांचे मानकरी देखील आपण ठरलो आहोत. देशाने आपल्या पिलांना मोठे करण्यासाठी जगात कुठेही स्वच्छंदपणे उडून यश मिळवण्यासाठी त्यांच्या पंखांना असेच बळ कायम देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सुद्धा व्यसनापासून दूर रहावे, देशाने सुद्धा भ्रष्टाचारापासून दूर व्हावे..। असे झाल्यास भारत खरंच महाशक्ती होऊन बलशाली होईल, यात शंकाच नाही. ===========================================राष्ट्रकुल स्पर्धा, CWG============================================

Go to Hell..met..!

Look at this Helmet. This Helmet has been broken! Obviously we can say..Hey..Hel..l..met..! Go to Hell to met..

दसर्‍यापूर्वीच सुवर्ण प्राप्ती

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत खरोखर लक्षणीय कामगिरी करून..हम भी किसीसे कम नही...हे जगाला दाखवून दिले आहे. खेळाडूंच्या मनोकामनेप्रमाणे शेवटपर्यंत द्वितीय स्थानावर भारत राहो, हीच सदीच्छा..

Hare Krishna!!