दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दीपावलीच्या दिव्यांच्या झगमगाटात लखलखटाने सुरुवात होणार्या प्रकाशपर्वात नव्या आशांच्या किरणांनी उर्जा मिळणार्या नागरीकांना ही मिळणारी उर्जा, भार-नियमन सहन करण्यासाठी सांभाळून ठेवावी लागणार आहे. पुन्हा एकदा भारनियमन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक वर्षांपासून राज्य भीषण वीज टंचाईचा सामना करीत असून, याची झळ खरंतर वीज ग्राहकांपेक्षा वीज मंडळालाच बसली आहे. इतकी प्रचंड वीज टंचाई एका दिवसात होत नाहीच, सुरवातीलाच हे जाणवल्यानंतर त्वरीत हालचाली, उपाययोजना झाल्या असत्या, तर आज हे चित्र नसते. दिवसेंदिवस लोकसंख्येबरोबरच गरजाही वाढणार हे शाश्वत सत्य आहे. वीज मंडळाने राज्यात ठिकठिकाणी असलेल्या वीज निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्याची योजना हाती घेऊन सुद्धा आता अनेक दिवस उलटून गेले आहेत. नियोजित कालावधीत सगळ्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी सध्या तरी सुतराम शक्यता नाही. मध्यंतरी एप्रिल २०१० मध्ये राज्यात १९ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता होती, परंतु प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुमारे १४ हजार पाचशे मेगावॅट झाली. उर्वरित तब्बल पाच हजार मेगावॅटची गरज अगदी अल्प प्रमाणात भागू शकली. यानंतर पावसाळ्यात हीच मागणी कमी होऊन सुमारे ३ हजार आठशे मेगावॅट पर्यंत हे प्रमाण खाली आले. एका अर्थाने, पावसाळा असल्यामुळे वरुणराजाची कृपादृष्टीच झाली, पावसाळा पथ्यावर पडला! परंतु हिवाळ्यापासून शेतांमध्ये पाणी देण्यासाठी पंप वापरले जाणे, सणासुदीनिमित्त वीजेची मागणी वाढणार असल्यामुळे भार नियमनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील भुसावळ, खापरखेडा, परळी, उरण, चंद्रपूर, कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होणार असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. याचबरोबर, यासाठी केंद्राकडून नियमित व नियंत्रित कोळसा पुरविण्यात यावा, महाराष्ट्राला २०१२ पर्यंत भारनियमन मुक्त करण्यासाठी राज्याची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. 'प्रत्येकाला वीज' या केंद्राच्या घोषणेला राज्य निश्चितच पूर्णत्वास नेईल, मात्र राज्यातील औष्णिक प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर लागणारा कोळसा नियमित मिळावा, त्याचा दर्जा चांगला असावा, दरावर केंद्राचे नियंत्रण असावे अशी मागणी देखील त्यांनी केली होती. अकराव्या व बाराव्या पंचवार्षिक योजनेतून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीतर्फे अनेक प्रकल्पांची क्षमता वाढवून व काही नवीन कार्यान्वित करून २०१७ पर्यंत २०,७३१ मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शहरात आठ तास तर ग्रामीण भागात बारा तासांचे भारनियमन करण्यात आल्यामुळे सहाजिकच उद्योग, व्यवसायासह शेती आदी घटकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादन, उत्पन्न घटले...। यासह, खासगी वीजग्राहकांसह शासकीय कार्यालये, नगरपालिका, विविध संस्थांकडे देखील असलेली थकबाकी मंडळ वसुल करण्यात अपयशी झाल्यामुळे नुकसान आणि परिणती तोटा वाढला. सध्या महावितरणला दरमहा तब्बल २०० कोटिंचा फटका बसत आहे.
त्रासदायक ठरलेल्या भारनियमनामुळे नियमित वीजेची बिलं भरणारे अनेक ग्राहक देखील बिलं भरेनासे झाले आहेत. भारनियमन जास्त झाल्यास वीज कार्यालयावर मोर्चे, मोडतोड, हाणामारी असे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे राजकीय पुढारी असो वा बडी व्यक्ती, कुणालाही वीजबिलात माफी मिळणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
वीज कार्यालयावर हल्ला झाल्यास त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरळ घरी निघून जावे. १५ दिवस कार्यालयात येऊ नये. त्यांचा पगार त्यांना घरपोच देण्यात येईल, अशा सूचना महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून राज्यभरातील वीजकार्यालयांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे संबंधितांना याची जाणीव होऊन वीज कार्यालयावर होणार्या हल्ल्यांना जरब बसेल असे वीज मंडळाला वाटत असावे.
अशा प्रकारे हल्ले, घटना घडू नयेत यासाठी मंडळ व ग्राहक यांच्यात सामंजस्य होणे गरजेचे आहे, भले, बुरे ते घडून गेले...यानुसार उपाययोजना होणे आवश्यक आहे. विशेषतः युवाशक्तीला विश्वासात घेऊन संयुक्तपणे मोहिम राबवण्यात यावी. वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत कोणतीही वीज दरवाढ न करणे आणि ..ताणले की फाटते..याप्रमाणे वीज ग्राहकांना वेठीस न धरणे या गोष्टींची त्वरीत अंमलबजावणी केल्यास काही अंशी तोटा भरुन निघू शकेल, हाच विश्वास!
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०
what is "Blog"? (in short)
A blog is a personal diary. A daily pulpit. A collaborative space. A breaking-news outlet. A collection of links. Your own private thoughts. Memos to the world.
Your blog is whatever you want it to be. There are millions of them, in all shapes and sizes, and there are no real rules.
In simple terms, a blog is a web site, where you write stuff on an ongoing basis. New stuff shows up at the top, so your visitors can read what's new. Then they comment on it or link to it or email you.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०
गेले कुठे ते दिवस...?
खबरदार जर टाच मारूनी जाशील पुढे चिंधड्या..उडवीन राई राई एवढ्या...!!! कवितेतल्या या ओळींची आज आठवण झाली...निमित्त आहे भारत-पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेचे..! या कवितेची रचना करण्यात आली, तेव्हाचा काळ म्हणजे खरंच बहुदा सुवर्णयुगच म्हणावा लागेल...!!
सीमेवर सैनिक शत्रुशी लढताना, शत्रूने आपल्या हद्दीतून पुढे कूच करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असताना देशभक्त स्वाभिमानी भारतीय शिपायाने शत्रूला तो एकही पाऊल आणखी पुढे गेल्यास अगदी मोहरी एवढे त्याचे तुकडे करून टाकेन..असा सज्जड दम भरणारा शिपाई...। असा या रचनेचा आशय आहे. आजकाल याप्रकारच्या नवीन कविता सुद्धा ऐकिवात नाहीत. आजकाल तर आपणच एकमेकांचे पाय मागे ओढत आहोत, धीर देण्याऐवजी घाबरलेल्या व्यक्तीला आणखी घाबरवत आहोत असे चित्र निर्माण झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेवर नेहमीच काही ना काही सुरूच असते. भारत स्वतः कधीच काही करत नाही, हे सुद्धा खरंय. परंतु खोड काढण्यात पाकिस्तान वरचढ आहेच. नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानमधील चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहेत. यानुसार वाघा सीमेवर अनेक वर्षांपासून दररोज होणारी परेड आणि संध्याकाळी ध्वज उतरवताना होणार्या अत्यंत कडक हालचाली (कवायत) आता मंदावणार आहेत. यात साधेपणा आणि सहजता येणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात या कवायतीबद्दल असलेलं चित्र बहुदा पुसलं जाईल.
सीमेवर होणारा अनावश्यक गोळीबार थांबविणे, सीमा चुकून ओलांडणार्यांना गोळ्या न घालणे, सीमेलगत बांधकामे ते सुद्धा बेकायदेशीर बांधकामे न करणे, तस्करीला आळा घालणे या प्रमुख उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे...! खरंतर, अशा प्रकारच्या घटना सीमेवर घडत आहेतच हे निर्विवाद सत्य असल्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे. याच कारणावरून सुद्धा भारताने पाकिस्तानला जाब विचारून कारवाई करणे आणि आपल्या सैनिकांना शाबासकी देऊन त्यांच्या कृतीमागे खंबीरपणे सरकारने उभे राहणे देशातल्या नागरिकांना अपेक्षित आहे. सीमावर्ती भागात घुसखोरी होत असल्यास सैन्याला एकही गोळी सरकारच्या परवानगीशिवाय मारता येत नाही. एखाद्या सैनिकाने असे केल्यास त्याला चौकशीला सामोरे जावे लागते. परिणामी सैनिकाला सहजासहजी कोणताही निर्णय घेता येत नाही. वरहुकुम, आता तर चर्चेतच ठरले आहे, की "चुकून" सीमा ओलांडणार्यांना गोळ्या घालू नये. यामुळे पाकिस्तानकडून बहुदा अशा चुका वारंवार घडतील, एखाद्या घुसखोरास पकडल्यास चुकून असे झाल्याचे सांगितले की त्याची सुटका...। बिचार्या सैनिकांना देखील बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. कारण तसा आदेशच असल्यामुळे ते सुद्धा करणार काय, काय करू शकणार? आणि ते हे दुःख सांगणार कोणाला..? शासनाच्या या निर्णयाचा शासनाने पुन्हा विचार करावा, हीच अपेक्षा.
त्रस्त समंधा शांत हो..त्रस्त समंधा शांत हो..शत्रुचा संहार करूनी, शत्रुचा संहार करूनी नंतर निवांत हो..निवांत हो...या ओळी लिहिल्या नाही तर औरच..

ब्लॉग म्हणजे काय?
ब्लॉग ही एक वैयक्तिक रोजनिशी आहे. दररोजचे व्यासपीठ..असेही आपण म्हणू शकतो. इथे आपण आपले स्वतःचे विचार मांडू शकतो. मत व्यक्त करू शकतो. जे अपेक्षित आहे ते लिहू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ब्लॉग म्हणजे एक वेबसाइटच असते. आपण दररोज येथे वेगवेगळ्या नोंदी लिहू शकता. नवीन नोंद, लिखाण पानाच्या वरच्या बाजूस दिसते. जेणेकरून अभ्यागत किंवा वाचक, नवीन काय आहे? ते वाचू शकेल. यानंतर त्यांना संबंधित विषयावर आपले मत मांडण्याची संधी सुद्धा येथे टिप्पणी (comment) द्वारे त्यांना मिळू शकते. विषय पूर्ण झाल्यानंतर खालच्या बाजूस comments/टिप्पणी लिहिण्यासाठी एक चौकोन दिसेल, येथे टिप्पणी लिहिली जाते.
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०
What is "Visa"?
A visa is a form of permission for a non-citizen to travel to, enter, transit or remain in a particular country. A visa does not guarantee entry. That remains the right of the immigration officials of the country concerned.
Some countries may ask visitors to present return tickets and evidence of means to cover their intended stay. Some countries may refuse entry to visitors who do not comply with their requirements regarding general appearance and clothing.

Some countries have compulsory currency exchange regulations on first entry. Only the country/countries you plan to visit can provide up-to-date information about visa requirements for South African passport holders.
Types of Visa:
Tourist Visa
A Tourist Visa is given to those visiting India for tourism or other non-business related purposes and is generally valid up to 6 months.
Business Visa
A Business Visa is given those who are doing business in India such as making sales or establishing contacts on behalf of a company outside of India. This type of Visa may be valid for one year or more with multiple entries. However, the period of stay in India (for each visit) under this category is limited to six months only.
Journalist Visa
A Journalist Visa is given to professional journalists and photographers for up to three months' stay in India. For applicants who to make a documentary in India, kindly contact the Press and Information wing in the Embassy/Consulate.
Conference Visa
This type of Visa is for international conferences, or on certain subjects, as decided by the Government of India from time to time. Such a Visa can be issued only after clearance for the said conference is received from the Government of India.
Transit Visa
A transit visa is granted for the sole purpose of enabling the holder to travel through India to reach his/her ultimate destination. Change of purpose is not allowed. The Transit visa is valid for direct transit only for a maximum period of 3 days. For a stay in India beyond 3 days, an appropriate visa should be obtained.
Entry Visa
An Entry Visa is issued to those of India origin visiting India for tourism or other non-business related purposes. Members of the family of a person employed in India are also eligible for Entry visa. In the latter case, documents establishing the employment of the spouse along with a copy of his/her Employment visa must be attached.
Employment Visa
An Employment Visa is granted to those who are an employee of an Indian company. The Embassy/Consulate may grant Employment visa valid for a year irrespective of the duration of the contract. Further extension up to 5 years could be obtained from MHA/FRRO in the concerned state in India.
Student Visa
Student visas are given to bona fide students to pursue regular studies at recognised institutions in India. The Visa has multiple entry options and is valid for the period of study as approved by the educational institution in India.
Missionaries Visa
Missionary Visas are granted for those going to India for religious purposes and a single entry visa is issued.
Research Visa
Research Visas are given to Research Professors or Scholars and to participants attending research Conferences/Seminars/Workshops. Applicants should apply for this Visa at least six weeks before their date of departure to India.
Sports Visa
This visa is for professional and amateur sportspeople, judges and adjudicators who want to come to India to participate in their field of sport. In fact, it's an invitation letter from India to the persons involved in sports. (Information: Through sources and may be vary. Please ensure before using reference)
भारतीय हत्ती तुर्कमेनिस्तानात- सरकारकडूनच कायद्याची पळवाट!
भारतीय हत्तींची एक जोडी तुर्कमेनिस्तानमध्ये पाठविण्यात येणार आहे, असे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. तुर्कमेनिस्तान सरकारच्या विनंतीवरून ही जोडी पाठविण्यात येणार आहे. भारत सरकारकडून दोन हत्ती भेट मिळावे अशी अपेक्षा तु्रकमेनिस्तान सरकारने केली होती. परंतु वन्यजीवांना भेट देण्यावर भारतात बंदी असल्यामुळे ते शक्य नव्हते. आता, दोन्ही देशांमधील प्राणिसंग्रहालयां दरम्यान देवाण-घेवाण करण्याच्या प्रस्तावाखाली दोन भारतीय हत्ती तिकडे पाठविण्यात येतील. याचाच अर्थ सरकारने स्वत:चा कायद्याची पळवाट शोधून काढली आहे. कायदे करणार्यांनीच शक्कल लढवून कायद्याची पळवाट शोधून काढली आहे, इतरांनी अशा पळवाटा शोधण्यात वाईट काय..? म्हणतात नां, कायदे तितक्या पळवाटा...!
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०१०
विजयी उमेदवारांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे: भुजबळ
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गोरगरीब शेतकर्यांच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने अठरा पैकी सोळा जागा जिंकून विजय मिळवला. यानिमित्त विजयी उमेदवारांनी त्यांची रामटेक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की बाजार समितीमधील प्रत्येक घटकाला आपल्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु प्राधान्य गोरगरीब शेतकर्यांच्या हिताला असावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम करावे. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्या, राबवाव्या.
यावेळी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, भास्करराव बनगर, जगदीश होळकर, भाऊसाहेब भवर आदी उपस्थित होते

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०
मुंबई येथे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन
![]() |
| "बर्ड्स अँड बिग कॅट्स" प्रदर्शन उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, किरण शांताराम, अॅड. अधिक शिरोडकर आदी |
अॅड. शिरोडकर यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांमध्ये रमले आहेत. त्यांनी काढलेली दुर्मिळ छायाचित्रे "बर्ड्स अँड बिग कॅट्स" या प्रदर्शनात आहेत. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शिरोडकर यांनी पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले असून, हे प्रदर्शन मनाला आनंद आणि निसर्गाच्या वैविध्याचा परिचय करून देणारे आहे. डिजिटल युगात छायाचित्रणाची कला बरीच सुलभ झाली आहे. परंतु जुन्या कॅमेर्यांनी छायाचित्रण करताना खूप कसरत आणि मेहनत करावी लागते. मनासारख्या छायाचित्रासाठी विशिष्ट क्षणाची वाट पहावी लागत असून, संयमाच्या या परीक्षेत शिरोडकर यांनी अद्वितीय यश संपादन केले आहे. त्यांचा अभ्यास विचारात घेऊन त्यांना पर्यावरण विषयक विविध समित्यांवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
वन्यजीवनाविषयी असलेली ओढ आपल्याला शांत बसू देत नाही. दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत आहे, जंगल कमी होत असून ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. याविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केल्याचे श्री. शिरोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमास किरण शांताराम, विठ्ठल कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"
ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे.
दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आणला कोणी? अर्थातच चहा हे सुद्धा इंग्रजांचेच पेय होते. इंग्रज भारतातून परत जाताना सॉरी हा शब्द आणि चहा हे पेय सोडून गेले असावे..।
पूर्वी गावाच्या चौकात, मोकळ्या मैदानात होणार्या कुस्तीच्या स्पर्धा आता जवळपास नाहीशा झाल्या आहेत, काही शहरांमध्ये अजूनही होतात हा अपवाद. ठिकठिकाणी उभारलेल्या व्यायामशाळा, एखाद्या आठवडे बाजाराच्या मैदान, शाळेचे प्रांगण अशा ठिकाणी मुद्दाम तशी जमीन तयार करून तेथे कुस्ती खेळली जाते. कुस्ती या शब्दाची जागा देखील रेसलिंग या शब्दाने घेतली आहे. शुभरात्री या शब्दाऐवजी गुड-नाईट सहजपणे नकळत म्हटले जाते. सुप्रभात ऐवजी गुडमॉर्निंग, दिनचर्या ऐवजी रुटीन, हो ऐवजी ओके, सस्पेंड, कॅज्युअल, टाइम-लिमिट, चेंज, बॅकग्राउंड असे कितीतरी शब्द दररोजच्या बोलण्यात वापरले जातात. इंग्लिश + मराठी = मिंग्लीश असे नवीन समीकरण आता तयार झाले आहे. बर्याच प्रमाणात हे बदल आवश्यक सुद्धा आहेत, असेही अनेकदा प्रत्यय येतात. याचबरोबर, फक्त बॅकग्राउंड म्हणजेच पार्श्वभूमी हा शब्द उच्चारायचा असल्यास मागचे बॅकग्राउंड असा शब्दप्रयोग केला जातो, बॅकग्राउंड हे मागचेच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पू्र्वी वापरले जाणारे "शाळा-बिळा, जिलबी-बिलबी, आलतू-फालतू, चहा-वहा, बटाटे-बिटाटे, बाजार-बिजार, भाजी-बीजी, नाश्ता-बिश्ता" असे शब्दांमागून येणारे अनेक शब्द मात्र अजून तसेच वापरले जातात. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी यशस्वीपणे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम् commonwealth games) च्या माध्यमातून "व्हाइटवॉश" हा मधुन-मधून ऐकला जाणारा शब्द आता सर्रासपणे नियमित वापरण्यास प्रसार माध्यमांसह, बोलीभाषेतही सुरवात झाली आहे. खरंतर, टक्कर, पराजय, हार, धुव्वा उडवणे या मूळ शब्दांच्या ऐवजी "व्हाइटवॉश" हा शब्दप्रयोग करण्यात आलेला दिसतो, अशा विविध इंग्रजी शब्दांमुळे मराठी शब्द पार धुतले गेले आहेत! हे मात्र खरं आहे, की मिंग्लीश जरी असले, तरीही हे नवीन मराठी टाकाऊ अजिबातच नाही, कालानुरुप होत असलेले हे बदल कोणीही नाकारू नये हे मात्र नक्की...!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...