व्हिन्टेज ड्राइव्ह...आनंद लाँग ड्राइव्हचा... मुंबई, ता. ३० - मंत्री जरी असलो तरीही आपण हरहुन्नरी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज सिद्ध करून दाखविले. येथे आयोजित 'व्हिन्टेज कार रॅली' चे उद्घाटन करून त्यांनी अचानक चक्क रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला. चालवायला अत्यंत अवघड असलेल्या १९४७ ब्युईक कन्व्हर्टिबल चे स्टेअरिंग अत्यंत सफाईदारपणे हाताळले तसेच रॅलीचे संपूर्ण अंतर व्यवस्थित पूर्ण केले. अशी रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच मंत्री ठरल्याने त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ ड्रायव्हर ठरल्याने त्यांना "द सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट टू ड्राईव्ह इन द व्हिन्टेज कार रॅली" या विशेष पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. हॉर्निमन सर्कल ते बांद्रा आणि तेथून पुन्हा परत असा मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता. श्री. भुजबळ यांनी हे अंतर पूर्ण केले. या गाडीचे मालक नितिन दोसा यांनी ही कार चालविण्यास अत्यंत अवघड असून लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्याचे सांगितले. दरम्यान, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनतर्फे आयोजित रॅलीमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक डी. शिवान...