मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली. ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा स...

रमाबाई रानडे...

मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली- http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks (या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्‍यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).

नवी मुंबई येथे जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक

नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक काँग्रेस भवन वाशी येथे नुकतीच संपन्न झाली...

Thousands of school students to attempt to create a Guinness World Record

Vashi (Navi Mumbai), June 12: The Fortis Foundation in association with the Navi Mumbai District Lions International, Fortis Hiranandani Hospital, Vashi, Navi Mumbai Association of Paediatrics and Indian Association of Occupational Health, Thane and Raigad branch have joined hands to launch an impactful series of community campaign - Clean Hands To Save Life ™ that endeavours at highlighting the need and importance of hand hygiene in maintaining good health. According to India’s public health association statistics only 30 percent of Indian population wash their hands before preparing food, 38 percent wash their hands before eating and just over 53 percent of the country’s population wash their hands after defecating. Large sections of the country’s population have the ‘misconception’ that they do not need to wash their hands which apparently look clean and will not make them sick.   Proper hand hygiene practice can keep deadly diseases like typhoid, diarrhoea and...

नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली...

नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार

मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.

नामयोगी दत्ताभैया महाराज यांना आज आदरांजचली

नामयोगी दत्ताभैया महाराज यांना रविवार (ता. १० जून) रामनगर येथे आदरांजली वाहण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता स्वामी सिद्धारुढ शिवमंदीर, बाजीप्रभू चौक, रामनगर  येथे आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे अध्यक्षस्थानी असतील. सद्गुरूदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्वीकर, शरदराव पुसदकर उपस्थित असतील.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पहिले अधिवेशन 'आज': राज्यभरातून ८ हजार युवतींची उपस्थिती

मुंबई, ता. ९ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवती काँग्रेस या नवीन मंचाची स्थापना आणि पहिले अधिवेशन रविवारी (ता. १० जून) येथील षण्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे होत आहे. राज्यातील सुमारे आठ हजार युवती यावेळी उपस्थित राहणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवाप, तसेच राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजची युवती ही करीयरच्या नवनवीन वाटा शोधणारी आणि सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे वावरणारी आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १३ ते ३५ वयोगटातील युवकांचा सहभाग एकूण लोकसंख्येच्या ४२ टक्क्यांहून अधिक आहे. यानुसार राज्यातील युवतींची संख्या सुमारे पावणेदोन कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या युवतींना राजकीय प्रवाहात सामील करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा नवीन मंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. अधिवेशनात युवतींच्या अधिकार व विकासाची सनद प्रकाशित करण्यात येणार आहे. गेल्या एप्रिल व मे महिन्यात युवतींनीच ही सनद तयार केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या निमंत्रक असून, यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्...

कवतुक पाहुण्यांचे... (नईदुनिया- जश्न ए मालवा...)

दै. नईदुनियाच्या ६५ वर्षांच्या वाटचालीनिमित्त राजवाड्यासमोर चित्रकलास्पर्धेत चित्रकारांच्या कुंचल्याचे कौतुक करताना आणि पहाताना पर्यटक...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन २०१२ – २०१४ जिल्हाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी ( दि. ३० मे) :   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत निवडणूक २०१२-२०१४ जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हानिहाय एकत्रित आलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रवक्ता मोहन बाफना यांनी एकत्रित बैठक घेऊन नावांसंदर्भात चर्चा करून जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली.  यानुसार जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी अशी(तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची नावे २ जून नंतर जाहीर करण्यात येतील)-रत्नागिरी- सर्वश्री शेखर निकम, रायगड- वसंत ओसवाल, ठाणे शहर जितेंद्र आव्हाड, ठाणे ग्रामीण- आनंद ठाकूर, भिवंडी- शेख खलिद गुड्डू,  उल्हासनगर- ज्योती कालानी, नवी मुंबई- गोपीनाथ ठाकूर, मिरा भाईंदर- मोहन पाटील, पुणे ग्रामीण- सुरेश घुले, पिंपरी चिंचवड- योगेश बहल, सातारा- शशिकांत शिंदे, सांगली शहर- इद्रिस नायकवाडी, सांगली ग्रामीण- विलासभाऊ शिंदे, सोलापूर शहर- महेश गादेकर, सोलापूर ग्रामीण- के. पी. पाटील, नाशिक शहर- रविंद्र कोशिरे, नाशिक ग्रामीण- अॅड. रविंद्र पगार, धुळे शहर- चंद्रकांत केले, धुळे ग्रामीण- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- श...