मुंबई, ता. ९ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवती काँग्रेस या नवीन मंचाची स्थापना आणि पहिले अधिवेशन रविवारी (ता. १० जून) येथील षण्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे होत आहे. राज्यातील सुमारे आठ हजार युवती यावेळी उपस्थित राहणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवाप, तसेच राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन घेण्यात येणार आहे.
आजची युवती ही करीयरच्या नवनवीन वाटा शोधणारी आणि सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे वावरणारी आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १३ ते ३५ वयोगटातील युवकांचा सहभाग एकूण लोकसंख्येच्या ४२ टक्क्यांहून अधिक आहे. यानुसार राज्यातील युवतींची संख्या सुमारे पावणेदोन कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या युवतींना राजकीय प्रवाहात सामील करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा नवीन मंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. अधिवेशनात युवतींच्या अधिकार व विकासाची सनद प्रकाशित करण्यात येणार आहे. गेल्या एप्रिल व मे महिन्यात युवतींनीच ही सनद तयार केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे या निमंत्रक असून, यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय ग्रामविकासमंत्री अगाथा संगमा, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, तारित अन्वर, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच माजी आमदार, खासदार, ज्येष्ठ कार्यकर्ते, सदस्य उपस्थित रहातील.