शुक्रवार, १० जून, २०११

तारकर्ली, गणपतीपुळे ऑक्टोबरनंतरच गाळमुक्त होणे शक्य

तारकर्लीमधील संगम पॉईंट येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे तेथे हायस्पीड बोटी चालविण्यात मोठा अडथळा येतो आहे. त्याचप्रमाणे गणपतीपुळे येथील खाडीमध्येही बराच गाळ साचलेला आहे. तो गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता श्री. भुजबळ यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर मेरिटाईम बोर्डाच्या ताफ्यात येत्या ऑक्टोबरपर्यंत चार नवीन ड्रेझर दाखल होत असून त्यानंतरच हा परिसर गाळमुक्त करता येऊ शकेल, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
            मुंबईला गेटवे ऑफ इंडियासमोर तरंगती जेटी तयार करण्याच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांना यावेळी दिली.
            याखेरीज सागरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाशी संबंधित विषयही बोर्डाने तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

एमटीडीसी कडून प्रशिक्षित व्यक्तींनाच यापुढे कोकणात स्नॉर्केलिंगचा परवाना

मुंबई, दि. 10 जून : मालवणसह कोकणात अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर खाजगी स्नॉर्केलिंग व्यवस्थापनांना पायबंद घालण्यासाठी या परिसरात केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेल्या व्यक्तींनाच परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची शिफारस करण्याचा अधिकार (Recommending Authority) हा सुद्धा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडेच असायला हवा, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे स्पष्ट केले. श्री. भुजबळ यांच्या या मागणीशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शविली.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी काल श्री. भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. शिंदे, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर, महाव्यवस्थापक श्री. चव्हाण, मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन डी.बी. रोहिला, बंदर अधीक्षक प्रदीप बढीये तसेच मेरिटाईम बोर्डाचे उपअभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, कोकणात सुरू असलेल्या बेकायदेशीर स्नॉर्केलिंगमुळे पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. अशा प्रकारांमुळे उद्भवणारी कोणतीही अपघाताची शक्यता टाळण्यासाठी तसेच या सुविधेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास साधण्यासाठी केवळ `एमटीडीसी`मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य दिले पाहिजे.
यावर सहमती दर्शवत मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या एकदम शंभर व्यक्तींसाठी परवानगी देण्याची तयारी दर्शविली. त्यांची निवड कशा प्रकारे करावी, किती टप्प्यात करावी, याबाबतचा निर्णय `एमटीडीसी`ने घ्यावा, असे सांगितले.
`एमटीडीसी`च्या स्कुबा डायव्हिंग संकुलातून व्यावसायिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग अभ्यासक्रम तसेच वाणिज्यिक प्रचलनासाठीही परवानगी देण्याची तयारीही मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दर्शविली. त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे हायस्पीड बोटींना प्रचलनासाठी दरवर्षी परवानगी घेत बसण्यापेक्षा `एमटीडीसी`च्या मागणीनुसार, किमान पाच वर्षांच्या कालावधीला परवानगी देण्याची बोर्डाची तयारी असून त्यासंदर्भात `एमटीडीसी`ने सविस्तर प्रस्ताव द्यावा, अशी सूचनाही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केली. आरोंदा व तारकर्ली येथील हाऊसबोट चालविण्यासाठीही अशा प्रकारची परवानगी देता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी `एमटीडीसी`मार्फत घारापुरी लेणी (एलिफंटा) येथील उपलब्ध असलेल्या जेट्टीच्या दुरुस्तीबरोबरच गणपतीपुळे, गुहागर, मुरुड हर्णै, हरिहरेश्वर, तारकर्ली, देवबाग, मुरुड जंजिरा येथे जेट्टी उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आली.
12व्या वित्त आयोगाअंतर्गत उपलब्ध निधीमधून मांडवा (जि. रायगड) येथे जेट्टीजवळ पर्यटक मार्गदर्शन केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्याबरोबरच स्वच्छतागृहांच्या अद्ययावतीकरणाचीही मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई येथे गेट-वे ऑफ इंडिया ते घारापुरी, मांडवा हार्बर क्रूझ सेवेसाठी 5 वर्षाकरिता हायस्पीड बोट चालविण्यासाठी परवाना आणि जयगड ते तौसाळ अशी फेरी बोट सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी `एमटीडीसी`कडून मेरिटाईम बोर्डाकडे करण्यात आली.
किरणपाणी (ता. आरोंदा, जि. सिंधुदुर्ग) येथील मेरिटाईम बोर्डाच्या कार्यालयाची मोडकळीस आलेली इमारत पर्यटकांची तात्पुरती सोय करण्यासाठी `एमटीडीसी`कडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने रंग गहिवरले: अजित पवार

मुंबई, ता. ९ - जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने चित्रकला सृष्टीचे रंग गहिवरले आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पिकासो म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मविभूषण एम. एफ. हुसेन यांनी स्वतःची चित्रकला शैली निर्माण केली होती. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अवलिया चित्रकाराने भारतीय चित्रकलेला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे.

पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेली बैठक

एम.एफ. हुसेन यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलाकार हरपला

मुंबई, दि. 9 जून : सुप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसैन यांच्या निधनामुळे भारत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराला कायमचा मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या सिद्धहस्त रंगरेखांच्या माध्यमातून या कलंदर कलाकाराने जगप्रसिद्ध कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या काही कलाकृती वादग्रस्त ठरल्या असल्या तरी भारताला विशेषतः महाराष्ट्राला कलेच्या जागतिक कॅनव्हासवर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीच्या माध्यमातून एम.एफ. हुसैन यांनी जागतिक कलाविश्वात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

अंधेरी येथील शिल्पग्रामसाठी एमटीडीसीची महापालिकेकडे जागा हस्तांतराची मागणी

मौजे मजासगाव, ता. अंधेरी येथे उपलब्ध असलेल्या 15 एकर जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून `शिल्पग्राम` विकसित करण्यात येणार आहे. तथापि, सातत्याने पाठपुरावा करूनही ही जमीन मुंबई महानगरपालिकेने महामंडळाकडे अद्यापही हस्तांतरित व केल्यामुळे या कामासाठी केंद्राकडून आलेला 5 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी वापरता येऊ शकलेला नाही. ही जागा महामंडळाला देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचे आयुक्त सुबोध कुमार यांना केली.
सदर जमिनीचे मूळ आरक्षण हे मनोरंजन मैदान असे होते. मात्र नगरविकास विभागाने ते बदलून `शिल्पग्राम` असे केले आहे. या जमिनीच्या ताब्यासाठी सन 2007पासून महामंडळाकडून महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली. हरियाणातील सूरजकुंडच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त असा शिल्पग्राम प्रकल्प उभारण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफा जवळच असल्याने या शिल्पग्रामला त्याचा निश्चितच लाभ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
त्यावर मुंबई महापालिका आणि पर्यटन महामंडळ यांनी एकत्रित चर्चा करून या प्रकरणी सामंजस्य करार सदृश बोलणी करता येऊ शकेल आणि महसूल उत्पन्न अथवा भाडेकरार आदी निकषांवर जागा हस्तांतरणाबाबत सर्व तांत्रिक बाबींवर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे सुबोध कुमार यांनी सांगितले.

मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी


मुंबई, दि. 9 जून : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करून घ्यावा, असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला.
श्री. भुजबळ म्हणाले, मुंबईच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिका, दोन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्हा नियोजन समित्या, केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग, वन, पर्यावरण आणि तत्सम अन्य सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संस्थांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. या विविध यंत्रणांमधील प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन करावी. तसे झाले तरच त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीतही सुसूत्रता प्रस्थापित होईल आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास साधणे शक्य होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.एम. रामचंदानी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संचालक एम.एस. चौहान, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक संजय पाटील, एमटीडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर यांच्यासह बंदरे, नगरविकास, वने या विभागांचे तसेच एम.एम.आर.डी.ए. आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, मुंबई पर्यटनदृष्ट्या खरोखरीच चांगली करावयाची असेल, पर्यटनस्थळांचे योग्य संवर्धन करावयाचे असेल तर इथल्या सर्व पर्यटनस्थळांच्या सद्यस्थितीची आणि तेथे करता येऊ शकणाऱ्या विकासकामांच्या माहितीची  देवाणघेवाण सर्व संबंधित यंत्रणांमध्ये झालीच पाहिजे. त्यामध्ये जी पुरातत्त्वदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत, त्यांचाही पुरातत्त्वविषयक निकषांनुसार संवर्धन व विकास करण्याबाबत कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे प्रचलित पर्यटनस्थळांबरोबर शहरात ठिकठिकाणी नवीन छोटे छोटे टुरिस्ट स्पॉटही विकसित झाले आहेत, काही निर्माण होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व ठिकाणांचेही व्यावसायिक सल्लागारामार्फत सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा विकसित करण्याची गरज आहे, याचाही अभ्यास करावा. एकूणातच सल्लागार आणि समन्वय समिती या दोहोंच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार झाला पाहिजे, अशी अपेक्षा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी अंधेरी येथील गिल्बर्ट हिल या हेरिटेज साईटचे संरक्षण, संवर्धन करून पर्यटकांचा ओघ वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. गिल्बर्ट हिल सध्या झोपड्यांच्या अतिक्रमणाने वेढले आहे. अतिशय सुंदर मंदिर आणि उद्यान असलेल्या या टेकडीकडे जाणारा रोप-वे विकसित करण्याबरोबरच हेरिटेज नियमांचा आधार घेऊन अतिक्रमणे हटविण्याबाबत अथवा त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय कार्यवाही करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. जुहू आणि वर्सोवा या किनाऱ्यांवर हंगामी स्वरुपात का असेना, पण पॅरासेलिंगसारख्या वॉटर-स्पोर्ट्सना परवानगी देण्याबाबतही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी मुंबईतील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमावी आणि आयुक्तांचे मार्गदर्शन व सल्ल्यानुसार पर्यटन महामंडळ मुंबईतील विविध विकासकामे करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कान्हेरी गुंफा, जुहू, गिल्बर्ट हिल, पवई तलाव, एरंगळ किनारा, महाकाली गुंफा, मनोरी चौपाटी, बँडस्टँड, जोगेश्वरी, गोराई परिसर, आरे कॉलनी, मढ आयलंड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी पर्यटनस्थळांसाठी सहा कोटी रुपये खर्चाची कामे करण्यात आल्याची माहिती दिली.
मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी बाणगंगा तलावातील गाळ काढण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे माहीम किल्ला आणि वरळी किल्ला यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यामध्ये झोपड्यांच्या अतिक्रमणाचा मोठा अडथळा असल्याचे सांगितले. राज्य पुरातत्व विभागाकडूनही सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एमटीडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी मरोळ गार्डन येथे पर्यटन महामंडळाने साडेसहा कोटी रुपयांच्या खर्चातून आधुनिक संगीत कारंजा विकसित केला असून मुंबई महापालिकेकडून ताबा घेतल्या जाण्याच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती यावेळी दिली.

पाण्यावर सहज उतरु शकणाऱ्या विमानसेवेच्या सादरीकरणाने पर्यटन मंत्री छगन भुजबळ प्रभावित

मुंबई, दि. 9 जून : जमिनीवरुन पाण्यावर किंवा पाण्यावरुन नोकेवर अशा प्रकारे सर्व सहज संचार करण्यास सक्षम असणाऱ्या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणाऱ्या विमानसेवेचे (अँफिबियन विमान) सादरीकरण पाहून राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आज अत्यंत प्रभावित झाले. ही सेवा पुरविणाऱ्या `मेहेर` या कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना श्री. भुजबळ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली.
मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (MAHAIR) ही अशा प्रकारची सेवा पुरविणारी भारतातली पहिली विमानसेवा कंपनी आहे. अंदमान व निकोबार बेटांवर त्यांनी ही अँफिबियन विमानसेवा पुरविण्यास सुरवात केली आहे. या कंपनीच्या वतीने आज श्री. भुजबळ यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर आदी यावेळी उपस्थित होते.
सादरीकरणानंतर श्री. भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राची 720 किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी तसेच राज्याच्या अन्य दुर्गम भागामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा कमालीची उपयुक्त ठरू शकते. ज्याठिकाणी विमाने उतरण्यासाठी धावपट्ट्या नाहीत अथवा हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड्स नाहीत, अशा ठिकाणी कोणत्याही जलपृष्ठावर उतरण्यास ही विमाने सक्षम आहेत. महत्त्वाचे म्हणजे इतर विमानसेवांच्या तुलनेत ही सेवा स्वस्तही आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा सकृतदर्शनी उपयुक्त दिसते. यामुळे पर्यटकांची सोय तर होईलच, पण त्याचबरोबर काही तातडीच्या प्रसंगी पाण्यातून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी सुद्धा या सेवेचा उपयोग करून घेता येऊ शकेल. त्यामुळे येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात कंपनीने शासनाला ठोस प्रस्ताव सादर करावा, जेणे करून ऑक्टोबर 2011पासूनच ही सेवा राज्यात कार्यान्वित करण्याबाबत विचार करता येऊ शकेल.

बुधवार, ८ जून, २०११

आचार्य रत्नानंद यांच्या निधनाबद्दल भुजबळ यांना शोक


मुंबई, ता. ८ - आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक असलेले अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी (वय ८७) यांचे बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, योग व अध्यात्मिक गुरू असलेल्या श्री श्री रवीशंकरयांचे अनुयायी जगभरात आहेत. सदैव हसतमुख असणार्‍या या महान गुरूच्या जीवनावर त्यांचे वडिल आचार्य रत्नानंद जी यांच्या मानवतावादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. आचार्य रत्नानंद यांच्या निधनामुळे श्री श्री रवीशंकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण शिष्यपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना लाभावे व आचार्य रत्नानंद जी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना श्री. भुजबळ यांनी केली आहे.

मंगळवार, ७ जून, २०११

शून्य हुआ देशभक्त व्यक्ति...

योगगुरू स्वामी रामदेव यांच्या बेमुदत उपोषण स्थळी सरकारने मध्यरात्री केलेल्या कारवाईनंतर सर्वत्र निषेध, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत...लोकप्रिय "महाबलि" ब्लॉगचे नियमित वाचक आणि मार्गदर्शक रविंद्र बर्गले यांनी व्यक्त केलेले हे मत...
(रविंद्र बर्गले, इंदौर)
मैं नहीं समझता कि भ्रष्टाचार के मुद्दे पर समग्र देश में इतना बड़ा तूफान खड़ा कर देने वाले महान संत, योगगुरू  को बदनाम करने का षड्यंत्र रचने और केंद्र सरकार में बैठी जनता के प्रति जवाबदेह सरकार द्वारा 1 लाख देशभक्त युवा, वृद्ध, बाल, स्त्रियों पर देश के आमजन पर हुए असामयिक बर्बर अत्याचार के बाद कुछ कहने के लिए शेष बचा है? दिल्ली में उस पूरे दिन और रात तक केंद्र सरकार ने जो किया, जो दृश्य उपस्थित किया वह देखने के बाद देशभक्त व्यक्ति शून्य हो जाता है, समय उसके लिए थम जाता है. शब्द उन भावों को स्वर नहीं दे सकते, देना भी नहीं चाहिए. जीभ की अपनी सीमा है, जीभ अपना काम कर चुकी. सत्ताधीश भी अपना कार्य कर चुके. जो कुछ भी क्रम से हुआ, मीडिया ने देखा. सारे देश ने देखा, बाबा रामदेव द्वारा उठाए गए देशभक्ति के उस भीषण ज्वार को, भारत के स्वाभिमान और गौरव के उत्थान के उस परम पुनीत स्वप्न को, योगधर्म से राष्ट्रधर्म के उनके निर्भीक और स्पष्ट आंदोलन को. वह आम जनता का जनता के लिए, जनता द्वारा आंदोलन था. सरकार अब भी कायम है, अपनी पूरी धृष्टता से, बनी हुई है, उसका आत्मविश्वास भी बढ़ा है,
और कुटिलता भी. बाबा ने अपने अनशन का आरंभ 4 जून को किया था तो टीवी पर उनकी आवाज़ में मैंने यह भावपूर्ण गीत सुना था, जो देश की जनता के लिए था, उनकी आवाज़ में यह पंक्तियां अब भी मेरे मस्तिष्क में गूंज रही हैं:
"राह कुरबानियों की ना वीरान हो,
तुम सजाते ही रहना नए काफ़िले.....
बांध लो अपने सर से कफ़न साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो

खींच दो अपने खूँ से ज़मी पर लकीर
इस तरफ आने पाए न रावण कोई
तोड़ दो हाथ गर हाथ उठने लगे
छू न पाए सीता का दामन कोई
राम भी तुम, तुम्हीं लक्ष्मण साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो
इस बार प्रतिक्रिया देने की बारी रामदेवजी की नहीं है. वे अपना कार्य कर चुके. अब प्रश्न जनता पर है, उसकी चुप्पी पर है, देखना है कि उसकी रगों में दौड़ने वाली इस आग में कुछ गर्मी बाकी है, या वह बर्फ हो चुकी है.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...