मध्यंतरी झालेल्या अकाली पावसामुळे राज्यासह देशाच्या अनेक भागात मुख्यत्वे कांदा हे हाती आलेले पीक खराब होऊन कांद्याने न चिरताच डोळ्यात पाणी आणले होते. सुमारे चाळीस रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेल्यानंतर शासनाने त्वरीत हालचाली केल्यामुळे काही राज्यात जाणवणारी कांद्याची कमतरता आणि परिस्थितीनुरुप वाढलेले भाव कमी होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमधून कांदा संबंधित राज्यात पुरवला जाणार असल्याचा निर्णय कृषि मंत्रालयाने घेतला आहे.
खाण्यासाठी आणि स्वयंपाकात चवीपुरता का होईना, कांदा मिळणार असल्याचा आनंद आणि गुदगुल्या ग्राहक आणि गृहिणींना होत आहे.
रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०
शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०
आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या कागदपत्रे गहाळ
आदर्श गृहनिर्माण सोसोयटीची कागदपत्रे गहाळ झाल्याबद्दल विभागाचे नगरविकास विभागाचे सचिव गुरुदास बाजपे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गृहनिर्माण सोसोयटीतील सदनिका प्रकरणी राजीनामा देण्याच्या हाय कमांडने केलेल्या सूचनेमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागली. स्वच्छ प्रतिमा असलेले पृथ्वीराज चव्हाण अशी त्यांची ख्याती आहे. आगामी निवडणुका ध्यानात घेऊन काँग्रेसने चांगली खेळी खेळल्याचे आता विरोधकांचा आरोप खरा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रकरणाची कागदपत्र गहाळ होतातच कशी? आता आदर्श गृहनिर्माण सोसायटीच गहाळ न होवो म्हणजे मिळवले..। तसे येत्या डिसेंबरमध्ये आदर्श सोसायटीची जागाच जमीनदोस्त करण्यात येण्याच्या वृत्ताला सूत्रांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. यातच सर्व काही आले असल्याचा सूर आहे.
विठ्ठल उमप यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली
मुंबई. ता. 26- जांभूळ-आख्यान या विस्मरणीय लोकनाट्यामुळे जनमानसांवर अधिराज्य गाजविलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा लोकरंगनायक काळाच्या पडद्याआड गेला. मनोरंजन आणि प्रबोधन यांची सुरेख सांगड घालणारे स्व. उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत रंगभूमीची सेवा केली, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.
लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला-उपमुख्यमंत्री पवार
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे लोककलेचा जाणता रंगकर्मी हरपला आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री विठ्ठल उमप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की उमप यांनी लोककलेचा प्रत्येक कलाप्रकार आत्मीयतेने हाताळला. जांभुळ-आख्यान सारखा कार्यक्रम सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. वयाच्या 80 वर्षानंतर देखील ते तळमळीने लोककला सादर करीत होते. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते
कार्यरत होते आणि लोककलेची साधना करीत होते.
उपेक्षितांच्या दुःखांना वाचा फोडणारा कलावंत हरपला - छगन भुजबळ
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या निधनाने फुले-शाहू-आंबेडकरांचा महान वारसा जोपासणारा आणि आपल्या कलेच्या माध्यमातून उपेक्षितांची दुःखे अभिजनांपर्यंत पोचविणारा अस्सल लोककलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. महात्मा जोतीराव फुले याच्या अखंडावर आधारित "गीतफुले' या मी निर्माण केलेल्या ध्वनिफितीमध्ये उमप यांनी "सर्वांचा निर्मिक आहे एक' ही कविता म्हटली होती. उमप यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त नुकताच माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. शाहीर उमप यांच्या निधनाने आंबेडकरी लोकचळवळीचे आणि राज्याच्या लोककला क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. शाहीर आत्माराम पाटील यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राने आपला आणखी एक महान लोककलाकार गमावला आहे.
झी मराठी वाहिनीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सारेगमप या संगीत मालिकेचे ते मार्गदर्शक होते.

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०
How to enable touchpad of notebook/laptop having Windows 7 operating system?
Firstly restart you system. Then open Control Panel, after that click on System restore. Wait few seconds..follow instructions (if appear).
Go to- Control Panel > System restore
Only, do this, thats all..! Bss!..आपका काम हो गया, आपले काम झालेच..। एकदम सोप्पी गोष्ट करा.
Sushrut Jalukar.

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०
तेंडुलकरने "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्यासाठी भुजबळ यांची विनंती
मुंबई, ता. २४- सन २०११ हे वर्ष महाराष्ट्र शासन पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" होण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. तेंडुलकर यांच्या सहमतीसाठी कृषिमंत्री व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केली आहे.
भारतीय पर्यटन विकास महामंडळाने अभिनेता आमीर खान, झारखंडने महेंद्रसिंग धोनी, गुजरातने अभिनेता अमिताभ बच्चन यांची "टुरिझम ब्रँड ऍम्बॅसेडर" म्हणून नियुक्ती केली आहे. याच धर्तीवर तेंडुलकर यांची नियुक्ती करावी अशी भुजबळ यांची इच्छा असून त्यांनी तसे पत्र तेंडुलकर यांना पाठविले आहे. भुजबळ यांच्याकडे याव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार असल्यामुळे, ज्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या योग्य सुविधा नाहीत त्या उपलब्ध करता येऊ शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना पंचतारांकित सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०११ हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटनाच्या संधी पर्यटकांना समजाव्यात, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी राज्याकडे आकृष्ट व्हावे आणि राज्याच्या महसूलात पर्यटनाद्वारे अधिकाधिक वृद्धी व्हावी, यादृष्टीने योग्य प्रचार-प्रसिद्धीची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

शासनातर्फे विविध क्रीडास्पर्धांना ५० लाखांचे अनुदान
मुंबई, ता. २४- राज्यातील प्रत्येक जिल्हा कबड्डी असोसिएशनला सिंथेटिक मॅट उपलब्ध करून दिली जाईल. याचबरोबर राज्यात दरवर्षी होणार्या "छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धे" सह इतर विविध क्रीडा स्पर्धांसाठी शासनातर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री ऍड. पद्माकर वळवी, क्रीडा विभाग सचिव संजय कुमार, क्रीडा विभागाचे सचिव संजयकुमार यावेळी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, की कबड्डी हा खेळ मातीवर खेळला जातो परंतु याचा प्रसार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने होत आहे. परिणामी, नजीकच्या काळात कबड्डी मॅटवर खेळणे अनिवार्य होईल. यादृष्टीने राज्यातील खेळाडूंना सिंथेटिक मॅटवर कबड्डीचा सराव करणे आवश्यक असल्याने प्रत्येक जिल्ह्यास एक सिंथेटिक मॅट शासनाच्या निधीतून उपलब्ध करून दिली जाईल.
राज्यात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर पुरुष/महिलांची "छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा" आयोजित केली जाते. यासाठी शासनातर्फे २१ लाखांचे अनुदान दिले जात असे. मात्र गत कालावधीतील विविध बाबींच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन आता ५० लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.
कबड्डी स्पर्धेप्रमाणेच शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या "कै. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा, कै. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा" आणि व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी सुद्धा प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

भारत पुन्हा आठव्या स्थानावर
चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये १४ व्या स्थानावर घसरलेल्या भारतीय स्पर्धकांनी पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी करून क्रमवारीमध्ये भारताला आठव्या स्थानावर आणले आहे. आतापर्यंत (हे वृत्त लिहिपर्यंत) भारताला सुवर्ण- 7, रजत-१२ आणि कांस्य 20 पदके मिळाली आहेत.
यजमान चीन प्रथम, दक्षिण कोरिया द्वितीय आणि जपान तृतीय स्थानावर आहे.

मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात येडियुरप्पा यशस्वी
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याला पदउतार करण्याच्या पक्षाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान देऊन बुद्धीकौशल्याने यातून सोडवणूक करून घेतली.
भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर दबाव वाढत होता. दरम्यान भूखंड गैरव्यवहारात नाव गोवले जाताच, येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते. यामुळे येडियुरप्पा यांची बाजू आणखी मजबूत झाली. या प्रकरणी त्यांना चर्चेसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्ली येथे बोलावले असता, प्रारंभी स्वतः न जाता त्यांचे दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे पाठवून चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी श्री. येडियुरप्पा पुट्टूपूर्ती येथे जाऊन सत्यसाईबाबा यांच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी यानंतर दिल्ली गाठून माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि रेड्डी यांच्या घोटाळ्याच्या फाइलीच सोबत ठेवल्या होत्या.
पक्षनेत्यांनी दिलेला आदेश पाळू अशी भूमिका कायम ठेवून अन्यथा पाठिंबा काढून घेण्याबाबत खडसावायला सुद्धा ते विसरले नाहीत. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या खासदारांनीही पाठिंबा जाहीर केला असून आपले नाणे खणखणीत असल्याचे येडियुरप्पा यांनी सिद्ध केले आहे.

बिहारमध्ये नितीशच्या नीतिची सरशी- १८४ जागांवर यश
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (संयुक्त) आणि भाजपा युतीने लढविलेल्या निवडणुकीत युतीला १८४ जागांवर यश मिळाले. विविध राजकीय पक्षांनी देखील नितीशकुमार यांना यशाचे धनी म्हणून श्रेय दिले आहे.
नितीशकुमार यांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुधारल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नितीशकुमार यांनी खरोखरच विकास केला असून येत्या काही वर्षात बिहार राज्याविषयी असलेली मलिन प्रतिमा पुसली जाईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. विकासाच्या राजकारणालाच नागरिकांनी कौल दिल्याचे मत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची हॅट-ट्रिक गाठणार आहेत. यापूर्वी २००५ मध्ये देखील ते बिहारचे मुख्यमंत्री होते. परंतु २००० मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे अवघ्या सात दिवसातच त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. अभियंता असलेले नितीश उच्च विद्या विभूषित असल्यामुळे बिहारचे दिवस नक्की बदलतील असा ज्येष्ठ नागरिकांना देखील विश्वास आहे.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०
हिवाळी अधिवेशन निवासव्यवस्थेबाबत भुजबळ यांनी घेतला आढावा
नागपूर, ता. २१- येत्या १ डिसेंबरपासून नागपूर येते सुरू होत असलेल्या विधीमंडळ-हिवाळी अधिवेशनाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत आढावा घेतला. यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पीठासन अधिकार्यांच्या निवासस्थानांखेरीज यंदाही, रवीभवन येथे २४ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कमर्चारी यांच्यासाठी निवासव्यवस्था पूर्ववत राहील. कर्मचार्यांसाठी १६० सह ६४ अतिरिक्त निवासी गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींची निवास व्यवस्था देखील 'सुयोग' येथे करण्यात आल्याचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव, विविध विभाग वरिष्ठ अधिकारी, नागपूर येथील स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...