बुधवार, २३ मार्च, २०११

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ


मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले.
हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून गेली 26 वर्षे ते कार्य करीत आहे. निरपेक्ष व नि:स्वार्थ भावनेने अव्याहत कार्य करीत राहिलेला ज्येष्ठ समाजसेवक, अशा शब्दात हेमराज शहा यांचा गौरव करून भुजबळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात, मुंबईतील मराठी व गुजराथी बांधवांमध्ये बंधुत्वाची भावना वाढविण्यासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या हेमराज शहांना राज्याच्या राजकारणात महत्वाचे पद मिळावे यासाठी आमची सर्व ताकद त्यांच्या मागे उभी करू, असे सांगितले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई, मुंबई समाचारच्या संपादक श्रीमती पिंकी दलाल, जन्मभूमिचे संपादक कुंदन व्यास, कवी सुरेश दलाल आदी मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा वेध घेतला.
सत्काराला उत्तर देताना हेमराज शहा म्हणाले की, वयाच्या सत्तरीत प्रवेश करताना मला आता कोणत्याच मोठया पदाची अपेक्षा नाही. मी माझे अंगीकृत कार्य यापुढेही निरलसपणे करीत राहणार आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराथी बांधवांचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी येत्या मे महिन्यात एक मोठे अधिवेशन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आजपर्यंतच्या आपल्या वाटचालीत गुजराथी बांधव, पत्रकार, प्रकाशक, लेखक इत्यादी अनेकांचे खूप सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
या अभीष्टचिंतन सोहळयास विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. श्री. अंकित त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सोमवार, २१ मार्च, २०११

black money..सोने की चिड़िया

Few days ago (Friday: 18-03-2011 on Sanskaar Channel), there was a telecast of Lt. honble Rajeev Dixit, saying that the Indian Black Money deposted in World Bank comprises 380 Lakh Crore. If this amount is brought to India, It is such a huge amount that we can distribute 10 Kg. gold to each family of India with this and this way we can again become "Sone ki Chidiya" or "Sone ka Sher". He further added that this can be possible by 3 ways-
1. If Indian Govt. signs UN's "Treaty Against Curruption (TAC) for which UN itself has appealed to India many a times earlier.
2. Indian Govt enacts a law to this effect.
3. Supreme Court directs Indian Govt to do so (recently supreme court has issued guideline to form a panel in this regard)


It should be noted that even after distributing 10 kg gold, we would be in position to pay off our whole debts and will be in a position to lend to the world bank and other countries of strategic importance. This way we can press China and Pakistan to return our land and keep on lower end.

Dear All, Please send your valuable Comments. [only click below on "post a comment"]

कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भुजबळ

मुंबई, दि. 21 मार्च : कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी आपले ठोस प्रयत्न सुरू असून येत्या वर्षभरात पर्यटन विकासाची जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
विधान परिषद सदस्य सर्वश्री राजन तेली, संजय दत्त, भाई जगताप, परशुराम उपरकर, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री. भुजबळ बोलत होते.
श्री. भुजबळ यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण रिव्हिएरा सर्किट अंतर्गत सर्किट-1, सर्किट-2 व सर्किट-3 साठी अनुक्रमे 3 कोटी 2 लाख रुपये, 2 कोटी 88 लाख 54 हजार रुपये व 1 कोटी 34 लाख 42 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास प्राप्त झाला. हा सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाला असून त्याअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून विजयदुर्ग येथील निवास व्यवस्था, उपाहारगृह, वाहनतळ व जलक्रीडा इत्यादी कामांचा समावेश आहे. या सुविधा खाजगीकरणाद्वारे सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी मालवण जेट्टीचे बांधकाम व मजबुतीकरणही करण्यात आले. त्याचबरोबर दिवेआगार, उभादांडा येथे रॉयल टेंट तसेच धामापूर व आंबोली येथे पर्यटक निवासांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
कोकण विकास पॅकेज अंतर्गत राज्य शासनाकडून सन 2004मध्ये 3 कोटी 60 लाख रुपये वितरित करण्यात आले. हा निधीसुध्दा खर्च होऊन त्याअंतर्गत निर्धारित कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहितीही भुजबळ त्यांनी दिली.
12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार रायगड जिल्ह्यासाठी 24 कोटी 80 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 52 कोटी 57 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 18 कोटी 89 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 82 कोटी 99 लाख रुपये तर मुंबईसाठी 45 कोटी 73 लाख रुपये असा सुमारे 225 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर करून महाराष्ट्र पर्यटन महामंडळास वितरित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या निधीतून तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा व स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि कुणकेश्वरसाठी 5 कोटी 70 लाख रुपये खर्चाची कामे प्रगतीपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पर्यटन विकासाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना 9 कोटी 25 लाख 45 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सन 1999मध्ये स्थापन करण्यात आलेले सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळ हे विविध कारणांमुळे स्थापनेपासूनच कार्यरत नसल्याने ते सध्याच्या कंपनी कायद्याअंतर्गत इझी एक्झिट स्कीम-2011अंतर्गत बंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे सागरी क्षेत्र पर्यटन विकास महामंडळ हे कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन करण्याची प्रक्रिया सुध्दा सुरू असल्याची माहितीही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

* गुहागरमध्ये पर्यटक सुविधा विकसित करताना स्थानिक लोकप्रतिनिधींची मतेही विचारात घेणार

12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सागरी किनारा पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आलेल्या निधीतून सुधारित कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी 6 कोटी रुपयांच्या निधीतून गुहागर येथे पर्यटक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची मते विचारात घेऊनच या सुविधा निर्माण करण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
सर्वश्री हेमंत टकले, विक्रम काळे, सतीश चव्हाण, रमेश शेंडगे, प्रकाश बिनसाळे, श्रीमती उषाताई दराडे या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, 12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याची विशेष गरज याअंतर्गत सागरी किनारा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाला सन 2006-07 ते सन 2007-08 या दोन वर्षांत अनुक्रमे 62.50 कोटी व 57.50 कोटी रुपये तर सन 2009-10मध्ये 105 कोटी रुपये असे एकूण 225 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आले. तथापि, या कामांची अंमलबजावणी करताना जागेची उपलब्धता, वन विभागाच्या अडचणी, सी.आर.झेड. निर्बंध इत्यादी कारणांमुळे मंजूर करण्यात आलेली कामे हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही. परंतु, आता या निधीचे फेरआढावा घेऊन नियोजन करण्याबाबत मी स्वत: बैठका घेतलेल्या आहेत. त्यानुसार या वर्षात केंद्राकडून आलेला निधी अजिबात अखर्चित न राहाता त्याचा पूर्णत: विनियोग करण्यात येईल. गुहागरसाठी राखून ठेवलेल्या 6 कोटी रुपयांचा विनियोगही संबंधितांशी सल्लामसलत करून योग्य त्या सुविधांवर खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.
अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली.
ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्थांच्या प्रतिनिधींनी आमच्या गणपतीपुळे आणि तारकर्ली किनार्‍यांची पाहणी करावी. तेथे कोणकोणत्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, कोणती साधने आपल्याला लागतील, कोणत्या सुविधा विकसित करण्यात येतील, किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच त्यांची निगा कशी राखणार, लागणारा निधी व त्याचा विनियोग यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. तसेच स्थानिक नागरिकांनाच लाइफ सेव्हर म्हणून प्रशिक्षित करून आपल्या कामात सहभागी करण्याची सूचनाही केली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर उपस्थित होते



होळीनिमित्त जनतेला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, - होळीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यानी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांची उधळण करत आपल आनंद द्विगुणित करताना दुसर्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तसेच पर्यावरणाची हानी न पोहोचवता होळी, धूळवड व रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

रविवार, २० मार्च, २०११

धूळवडीला विजयी होण्याचे वेस्ट इंडीज् चे स्वप्न धुळीत...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळी न खेळल्यामुळे तोंडाशी आलेला विजय न झाल्यामुळे सगळीकडूनच रोष ओढावलेल्या भारतीय संघाने आज सुटकेचा निश्वास सोडला. होळी आणि धूळवडीनिमित्त संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या आजच्या सामन्यात इंडीजच्या संघाला चांगलीच धूळ चारून विजयी होण्याचे इंडीज संघाचे स्वप्न अक्षरशः धुळीत मिळवले.
नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा संघाचा निर्णय निर्णायक ठरला. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अत्यंत ढिसाळ खेळी आणि फलंदाजी करून आफ्रिकेला सहज विजय मिळवून दिल्याबद्दल संघाविरुद्ध सगळीकडेच रोष होता. तर संघाच्या वरिष्ठांनी संघावर ताशेरे ओढून संघाला सक्त ताकीद दिली होती. याचा चांगलाच परिणाम झाल्याचे आज चेन्नई येथे झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या एक दिवसीय सामन्यात जाणवले. सचिनचे शतकांचे शतक आजच्या सामन्यात पूर्ण होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. काही वेळातच तंबूत परतणाऱ्या सचीनच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. आजच्या यशाचा मानकरी ठरलेल्या युवराज सिंह याची कामगिरी खरोखरच प्रशंसनीय होती. संघात नव्यानेच सामील झालेल्या अश्विनी याची कामगिरी देखील लक्षात घेण्यासारखी ठरली. आजच्या विजयामुळे भारताने9 गूण प्राप्त करून दुसरे स्थान टिकवण्यात यश मिळवले असेच म्हणावे लागेल. येत्या गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताकडून अपेक्षा उंचावल्या असून नाणेफेक जिंकल्यास, धावांचा मोठा डोंगर मात्र आव्हानात्मकरित्या उभा करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!

शुक्रवार, १८ मार्च, २०११

धन्य ते जपान...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
गेल्या आठवड्यात जपानमध्ये रिश्टर स्केल 8.1 तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात झालेली प्रचंड हानी आणि यानंतर आलेली त्सुनामी यांचा सामना अजूनही जपान करतोय. सुमारे 15 हजार नागरिक बेपत्ता असल्याचा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितच फार मोठी असेल. फुकुशिमा शहर जवळपास फुंकलेच गेले असून शिमग्यापर्यंत शिमा शिल्लक राहणार की नाही अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना वाटत असून अभ्यास करून त्यांनी 48 तासांची मुदत दिली. जपानच्या अणूभट्ट्यांमध्ये लागलेली आग यानंतर झालेले रेडिएशन यामुळे तर आता रेडिएशनचे हे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या अणूभट्ट्या वाचविण्यासाठी अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतू सदैव सैनिका पुढेच जायचे..या उक्तीप्रमाणे या देशाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि विकास निश्चितच प्रशंसनीय आहे. वारंवार किरकोळ प्रमाणावर भूकंप होत असल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकास, लहान मुलांना देखील भूकंपजन्य परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि काळजीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणच फार मोठी भूमिका पार पाडत आहे. त्सुनामी येऊन पुढे झालेले नुकसान हा भाग वेगळा...मात्र न डगमगता संपूर्ण देश निसर्गाने घातलेल्या घाल्याविरुद्ध लढतोय, हे कौतुक. मानवतेच्या भूमिकेतून अमेरिकेसारख्या बलाढ्यांनी मदतीचा हात पुढे केला, तरीही स्वतःची लढाई स्वतःच लढू आणि रेडिएशनचे संकट आणि सावट दूर करण्यासाठी पणाने उपाययोजना लवकरात लवकर शोधू..असा निर्धार करण्यात आला आहे. जपानच्या या हिंमतीस मानाचा मुजरा...!!!

बुधवार, १६ मार्च, २०११

निघाले देश बुडवायला..

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
जपानमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या भूकंप आणि त्सुनामी मुळे सगळीकडे पाणीच पाणी होऊन आणि हजारो घरे, मालमत्ता पुरात वाहून गेल्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली. जीवंत राहिलेल्यांनी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून पाणी-पाणी झाले. संपूर्ण देशच जणू निसर्गाने पाण्यात बुडविल्यासारखी स्थिती जपानमध्ये निर्माण झाली आहे. जपानमध्ये निसर्गानेच देश बुडवला आहे. तर भारतात मात्र विविध घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा साठविणे, कर चुकवेगिरी आदी विविध प्रकाराने माणसांकडूनच मानव-निर्मित सुनामी येऊन यातच बहुदा देश बुडवला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवार, १५ मार्च, २०११

ऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १५ - ऍम्युझमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले. इंडियन असोसिएशन ऑफ ऍम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित अकराव्या "ऍम्युझमेंट एक्स्पो" या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तंत्रज्ञान जितक्या गतीने विकसित होते तितक्याच गतीने ऍम्युझमेंट (मनोरंजन) उद्योगांनी या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या विविध उपक्रमात सुद्धा सातत्याने नाविन्यपूर्णता आणि अभिनवता आणण्याची गरज असते. तसे झाले तरच एकदा येणारा पर्यटक, ग्राहक पुन्हा तिथे येईल. तसेच नवीन ग्राहकांची देखील भर पडेल. ग्राहकांची सुरक्षितता जपण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिण्याची गरज आहे.
सुमारे पाच हजार कोटिंचा ऍम्युझमेंट उद्योगाच्या आशिया-पॅसिफिक विभागातील वृद्धीचा दर ५.५ टक्के प्रतिवर्ष इतका आहे. तोच युरोपसह अन्यत्र ५ टक्के आहे. म्हणूनच अनेक परकीय गुंतवणुकदार कंपन्या भारतात या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. देशात महानगरांसह छोट्या-छोट्या खेड्यांमधील नागरिकांचा ओढाही ऍम्युझमेंट पार्ककडे वाढू लागला आहे. त्यांना आवश्यक त्या मनोरंजन सुविधा उपलब्ध करण्यासाठी देशातील व परकीय उद्योजकांनी गुंतवणुक करण्याची गरजही भुजबळ यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमास एयएएपीएय चे संस्थापक सदस्य अशोक गोयल, अरुणकुमार मुच्छला, बलवंत चावला, एमजीएम आनंद, राजन शाह, ट्रेड शो समितीचे चेअरमन अजय सरीन आदी मान्यवर आणि देशातील उद्योजकांसह १४ देशांमधील उद्योजक उपस्थित होते.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...