सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

छगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्‍या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्रकल्पांमध्ये वाढ, फूडपार्क उभारणी असे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अनेक उपयुक्त निर्णय घेण्यात आले आहेत. कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा लाभ निश्चितच मोठ्या प्रमाणात होईल. सबसिडीऐवजी रोख मदतीमुळे भ्रष्टाचारासही आळा बसेल. बटतगटांच्या विकासासाठी विशेष तरतूद करतानाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाचा ठरू शकतो. भारत-निर्माण योजनेसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून जाण्यास मोठी चालना मिळणार आहे.
शिक्षणासाठी करण्यात आलेली सुमारे ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद अत्यंत महत्वपूर्ण असून याअंतर्गत सार्वशिक्षण अभियानासाठी भरीव तरतूद केली आहे. तथापि, इयत्ता नववी व दहावीतील गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजनेच्या परीघात इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याची आवश्यकता होती. असंघटित क्षेत्रासाठीही स्वावलंबन पेन्शन योजना राबवित असतानाच ८० वर्षांवरील बीपीएलधारकांना ५०० रुपये पेन्शन, इंदिरा गांधी पेन्शन योजनेची मर्यादा ६० वर्षे, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षांपर्यंत खाली आणणे या निर्णयांचा समाजाच्या तळागाळातील नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने व आर्थिक स्वावलंबनासह जगण्यासाठी मोठा उपयोग होईल. जीवनावश्यक वस्तू व इंधनावर एक्साईज कर न आकारण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू ठरलेल्या मोबाईल, फ्रीज स्वस्त झाल्याचा फायदाही या वर्गास होईल.
आरोग्य क्षेत्रासाठी आपण भरीव तरतूद केली असली तरी हॉस्पिटलमधील उपचारांवरील खर्च वाढविण्याऐवजी नियंत्रणात ठेवता आला असता तर अधिक बरे वाटले असते, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

कोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे मात्र यात अनेक अडचणी आहेत.
पर्यटन विकासासाठी सर्व संबंधितांसमवेत तपशीलवार चर्चा करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे सांगून भुजबळ यांनी कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला.
रायगड किल्ला व परीसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी सारस्वत बँक आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे एकनाथ ठाकूर यांनी सांगितले. कार्याध्यक्ष संजय यादवराव व सुकथनकर यांनी कोकणातील पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या शासनाने दूर करण्याची विनंती केली.

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.
मराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती!

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

CIDCO organizes Vasant Mela at Urban Haat

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
The Urban Haat at Navi Mumbai has surfaced as the new happening destination for the exhibition and sale of artifacts of artisans from various states. Last year, the citizens of Navi Mumbai bought the artifacts from various states displayed at different exhibitions at Urban Haat and also experienced a great time. The exhibitions included CIDCO Navi Mumbai Festival, Kokan Saras, Maharashtra Mahotsav, Handloom Festival, Marathi Vyapari Mitramandal Mahotsav, Vasant Mela, Shravan Mela and Surabhi Dhamaka.


Now, Vasant Mela is being organized at Urban Haat from 9th to 20th March, 2011. With an objective to benefit the artists displaying their traditional folk art at the Urban Haat as well as the citizens, CIDCO aims to organize such exhibitions for the whole year at Urban Haat.

Through this appeal, Bachat Gats from all Zilla Parishads under Rural Development Department, Maharashtra, artisans related to Khadi Gramodyog Mandal as well as handloom, handicraft and food artists, sculptors and small businesses are being invited to participate in the Vasant Mela.

Any artist, NGO and Bachat Gat producing handloom, handicraft, food, herbal and floriculture products, art and paintings, books in various languages, bamboo and wooden furniture, jute, leather and terracotta products, and garden and nursery equipment can participate in this Vasant Mela in March 2011. To participate, contact Manager - Urban Haat, CBD Belapur, Navi Mumbai on 022-2756 1284 (0) / 95945 21169 (M) or e-mail manager.urbanhaat@gmail.com.





शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे.
श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाकुर्ली (ठाणे) येथे ७०० मेगावॉट क्षमतेचा गॅस पॉवर प्रकल्पही उभारला जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीला नव्या रेल्वे मार्गाने जोडले जाणार असल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कुठलीही वाढ न केल्यामुळे महागाई आटोक्यात राहण्यास मदत होईल. ई-तिकिटांच्या आरक्षण शुल्कातही कपात करण्यात आली आहे. शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अपंगांसाठी दिलेली सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढीव सवलतीसह विविध घोषणांमुळे हा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने आम-आदमी चा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी श्री. पवार यांनी व्यक्त केली.

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे.
महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्राशी कोकण जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. मुंबईसाठी ४२ नवीन गाड्या, सर्व लोकल ट्रेन १२ डब्यांच्या करण्याची घोषणा देखील मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. नंदीग्राममध्ये रेल्वेसाठी औद्योगिक पार्क आणि महाराष्ट्रात ७०० मेगावॅटचा वायू आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. तथापि, पायाभूत सुविधा निर्मिती आणि कारखाने यांच्या सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष दिले गेले असते तर हा अर्थसंकल्प परिपूर्ण झाला असता, असे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

रेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...! ५७.६३० कोटिंचे बजेट..

ममता बॅनर्जी सादर करीत असलेले रेल्वे बजेट २०११ ऐकताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी सादर करीत असलेल्या ५७.६३० कोटिंच्या रेल्वे बजेट २०११ चे ठळक मुद्दे...:-
* आम-आदमी अर्थात सामान्य माणसाला लक्षात घेऊन बजेट...

* सिंगूर येथे मेट्रो कोच फॅक्टरी

* रायबरेली कारखान्यातून पहिला कोच तीन महिन्यात

* अनेक गाड्यांची कोच साठी मागणी, नवीन कोच फॅक्टरींचा प्रस्ताव

* जम्मू काश्मिरमध्ये ब्रिज फॅक्टरी

* रेल्वे नेटवर्कला इम्फाळ जोडणार

* १८० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग

* ८५ नवीन सार्वजनिक-खाजगी प्रकल्प

* नंदीग्राममध्ये इंडस्ट्रियल पार्क

* रेल-रोको आंदोलने थांबविण्याचे प्रत्येकास आवाहन

* रेल्वे मार्गाजवळ राहणार्‍या बेघरांसाठी १०,००० निवारे

* रेल्वे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले.

*  ऑनलाइन बुकिंग स्वस्त होणार

* पायलट प्रोजेक्ट्समध्ये स्मार्ट कार्ड वापरले जाणार

* रेल्वेचे कर्मचारी हीच रेल्वेची मोठी संपत्ती

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे काम तातडीने मार्गी लावावे-भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.
गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि  ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता मोहिम

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.
एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्‍या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...