सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

मराठी चित्रपटांच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान द्यावे - अजित पवार

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १८ - मराठी चित्रपट निर्मितीसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
मराठी रंगकर्मींच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नाट्य निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
नाट्यनिर्मात्यांना तांत्रिक कारणास्तव अनुदान मंजूर होत नाही, अशी अडचण सांगितल्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, की मराठी चित्रपटांना ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते तीच पद्धत नाट्यनिर्मात्यांना अनुदान देण्यासाठी अनुलंबली जावी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह उभारले जावे. यासाठी जिल्हा विकास आराखड्यात निधीची तरतूद करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. नाट्यगृहांच्या उभारणीसाठी स्थानिक आमदारांच्या विकास निधीतूनही मदत घेता येईल. तसेच नागपूर येथे आणखी एक नाट्यगृह उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यवाही करावी असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले, की विविध संस्थांना मंजूरी आणि अनुदान देण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया बदलण्यात येणार आहेत. यानंतर निर्मात्यांना अतिशय व्यवस्थित आणि अडथळ्याविना अनुदान मिळेल. आमदार हेमंत टकले, वित्त व नियोजन विभाग मुख्यसचिव सुधीर श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेत्री व निर्मात्या स्मिता तळवलकर, लता नार्वेकर, दीपक करंजीकर, दिलीप जाधव, सुधीर भट, संतोष कोचरकर, चंदू लोकरे, प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते.

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

मध्य प्रदेशात पुन्हा थंडी

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community थंडी पूर्ण जाणार अशी चिन्हं असतानाच पुन्हा एकदा मध्य प्रदेशात थंडीने डोके वर काढले आहे. दहा अंशांच्या वर सरकत चाललेला पारा पुन्हा एकदा प्रदेशातील काही भागात रात्री दहा अंशांवर स्थिरावला आहे. महाशिवरात्री  पर्यंत थंडी अशीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः अनेक मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

इंदूरमध्ये भूगर्भातून आवाज?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
शुक्रवारी (ता. 18) सकाळी सातपासून बराच वेळ शहराच्या पश्चिमेस भूगर्भातून मोठा आवाज ऐकू येत होता. विहीर खोदण्यासाठी सुरुंग लावल्यानंतर ब्लास्टिंग करताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आवाज येत होता. अनेकांनी याबाबत मोबाईलद्वारे एकमेकांकडे विचारणा केली. नेमका कुठून आवाज येत होता, हे समजू शकले नाही.

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

रस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे जहाज 
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

कॉमेडी का फट़का...

बगळ्यांची माळफुले..अजुनी

वसंताच्या संध्याकाळी गच्चीत गेलो, आज काहीतरी वेगळा फोटो काढायचा असा विचार मनात घोळथच होता, इतक्यात ही मोठ्ठी बगळ्यांची रांग दिसली...चटकन क्लिक केले..नंतर ही ओळ (बगळ्यांची माळ फुले, अजुनी अंबरात...) नकळत तोंडातून बाहेर पडली...
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

पुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 11 मार्चला पारितोषिक वितरण

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
पुणे, ता. 17 - एड्स, लोकसंख्यावाढ, कुपोषण व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या व सेवा परम् कर्तव्यम् मानणाऱ्या चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'भ्रष्टाचार व प्रतिबंधक उपाय' या ज्वलंत व धगधगत्या भ्रष्टाचार या विषयाशी निगडित निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुणे विद्यापीठांतर्गत समाविष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेस पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम पारितोषिक रु. 1111/-, द्वितीय 751/-, तृतीय 501/- व उत्तेजनार्थ 251/- व सर्वांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र येत्या 11 मार्चला पुण्यात कै. द. वि. निकम स्मृती पुरस्कार कार्यक्रमात मान्यवरांना देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक निलेश दिलिप कोकाटे, गेणबा सोपानराव मोझे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, येरवडा, पुणे, द्वितीय- सौरभ वसंत उबाळे, डी. ई. एस. लॉ कॉलेज, पुणे, तृतीय- अजिंक्य अनिलराव शिंदे, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव- पुणे यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ - ताई भागवत धुमसे-श्री. साईबाबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोपरगाव, परिमल दिलिप शिंदे- बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी-पुणे, सुरेंद्र तुळशीराम बनसोडे- जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय भेडा, ता. नेवासा अहमदनगर, नानासाहेब गव्हाणे- वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, रानडे इन्स्टिट्यूट डेक्कन, पुणे, चैताली मोहन साबणे- श्रीराम धामणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, म्हसरूळ शाखा, दिंडोरी रोड नाशिक, प्रत्युषा गोविंद जाधव- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, मानसी माधव कंगणे- शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओतुर-पारनेर, अहमदनगर, प्रिया देसले- श्रीमती पुष्पाबाई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कँप, मालेगाव-नाशिक, स्मिता जयंत देंडगे- आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, एरंडवणे-पुणे आणि रघुनाथ कोकाळे- मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर, पुणे यांना जाहीर करण्यात आले आहे. असे अध्यक्ष आनंद थोरात यांनी कळविले आहे.

Reflection

Reflection...like mirror!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

शासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंदरसिंह

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर, ता. १५ - सीबीआय ला तपास सुरू करण्यापूर्वी शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. अनेक अशी प्रकरणे आहेत, ज्यात परवानगी मिळतच नाही. शासन कोणतेही असो, प्रथम आपल्या हिताचा विचार करूनच नंतर तपासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत सीबीआयला 'फ्री हँड' मिळणार नाही, तोपर्यंत त्याचा दुरुपयोगच होत राहील. असे मत माजी सीबीआय-प्रमुख जोगिंदरसिंह यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की केवळ हातावर हात ठेवून सुवर्ण पदक मिळू शकत नाही, त्यासाठी मेहनत आवश्यक असते. कायद्यात बदल करणे सध्या नितांत आवश्यक आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, की काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास आयोगाची आवश्यकता नव्हती, ही जबाबदारी सीबीआय देखील पार पाडू शकले असते. आरुषि प्रकरणाचे कोडे अद्याप उलगडले नसल्याच्या प्रश्नावर, सीबीआय जादू ची छडी नसून साक्षीदार, पुरावे मिळून देखील देशात शेकडो आरुषिंसारखी प्रकरणे अद्याप गुलदस्त्यात पडून आहेत. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सध्या फक्त राजा यांनाच संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून अद्याप बरेच काही बाकी आहे.
विदेशी बँकांमधील काळ्या पैशासह देशात दररोज तयार होणार्‍या काळ्या पैशाकडे सुद्धा शासनाने पहावे. दररोज कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी डील होत आहेत. करचुकवेगिरी न होता केवळ आयकर जरी नियमित आणि व्यवस्थित जमा झाला, तरीसुद्धा शासकीय कोषात चांगला पैसा खेळू लागेल.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...