मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

फुलला वसंत...

वसंत पंचमी म्हणजेच प्रफुल्लित मन, टवटवी, हिवाळ्याने सुस्तावलेल्या चराचर सृष्टीला ऊब देऊन फुलं उमलली नाहीत, कोकिळेचे कुंजन आणि सृष्टीचे गुंजन स्वर ऐकू आले नाहीत, तर नवलच...!!!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

राज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार

मुंबई, ता. ७ - राज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची तसेच काही पथकर नाके बंद करण्याची शिफारस आज संबंधित समित्यांनी प्रस्तावित केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पथकराचे धोरण अधिक पारदर्शी होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्याचे सुचविले होते. त्या अनुशंगाने शासनाने तीन स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांची बैठक गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांनी दोनदा घेतली होती. आज सायंकाळी रामटेक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या समित्यांनी केलेल्या शिफारशींची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, की खाजगीकरणाचे धोरण व पथकर प्रणाली रस्त्यांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर देशात वापरली जाते. राज्यातही या पद्धतीचा अवलंब करून सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पही राज्यातच राबविला गेला. या धोरणामुळे रस्ते विकासात खाजगी गुंतवणूक होऊन राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद कमी वाहतुक असलेल्या रस्त्यांकडे (ग्रामीण मार्ग, अन्य जिल्हा मार्ग इ.) वळविणे शक्य होते. श्री. हजारे यांच्या सूचनेनुसार, खाजगीकरणांतर्गत प्रकल्पांमधील पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या पथकर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करण्याविषयी आणि पथकर स्थानकांवरील  अडचणी दूर करून वाहतुकीस अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याविषयीच्या स्वतंत्र ३ समित्यांची स्थापनाने शासनाने केली. यात मुख्य अभियंता स्तरावरील अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली असून त्यात डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, खाजगीकरण वि षयातील तज्ज्ञ तसेच सुचविण्यात आलेले प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या समित्या अभ्यास करीत आहेत.
राज्यातील विविध पथकर स्थानकांवर दररोज जमा होणार्‍या पथकराची एकत्रित माहिती शासनाकडे उपलब्ध होण्यासाठी 'सी-डॅक' ने विकसित केलेली संगणक प्रणाली वापरावी आणि ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करावी. काही मोठ्या पथकर स्थानकांवर सुरवातीस प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करावा. प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेऊन ही प्रणाली संपूर्ण राज्यभर बसविण्याची शिफारस पहिल्या समितीने केली आहे.
राज्यात ई-टॅग योजना अंमलात आणून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर वसुली करण्यासंबंधी कार्यवाही करावी. जेणे करून प्रवाशांचा वेळ पथकर स्थानकांवर वाया जाणार नाही. प्रारंभी मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे औरंगाबाद जालना रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू तसेच मुंबईतील एंट्री पॉईंट्स येथे प्रायोगिक तत्वावर राबवावी असे प्रस्तावित केले आहे. यातील अडचणी जाणून नंतर राज्यभर ही योजना राबवावी अशी शिफारस दुसर्‍या समितीने केली आहे.
तिसर्‍या समितीने राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ५६ पथकर नाके, राष्ट्रीय महामार्गावरील २८ पथकर नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील ६१ पथकर नाके अशा एकूण १६५ पथकर स्थानकांचा अभ्यास केला. या नाक्यांदरम्यानच्या अंतराचा अभ्यास करून काही नाकी बंद करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पथकर नाक्यांवर काही सुविधा व सुधारणाही प्रस्तावित केल्या असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

लवकरच मासिक राशीभविष्य...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community आपल्या सर्व वाचक, मित्रमंडळी, हितचिंतक आणि ज्येष्ठ श्रेष्ठांच्या छान प्रतिसादामुळे या छोट्याशा ब्लॉगवर आणखी काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचे मासिक राशीभविष्य यापुढे आपणांस दरमहा या ब्लॉगवर वाचता येईल.
धन्यवाद..

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

इंदूरमध्ये थंडावली थंडी

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
गेले दोन महिने इंदूरकरांना चांगलेच गार करून गरम कपडे परिधान करण्यास परावृत्त करणारी थंडी दोन दिवसांपासून थंडावली आहे. रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली असून ११ अंश सेल्सिअसवर सध्या रात्रीचे तापमान स्थिरावले आहे. वसंत पंचमीनंतर थंडीचा जोर आणखी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. थंडीमुळे बाहेर निघालेली ब्लँकेट्स, स्वेटर धुवून पुन्हा पुढच्या थंडीत वापरता यावी म्हणून कपाटात परत ठेवली जात आहेत.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०११

प्रतापगडच्या जीर्णोद्धारासाठी तातडीने १ कोटी ३१ लाख मिळणार


IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 

मुंबई, ता. २ - प्रतापगड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय समाधानकारक असल्याने तातडीने १ कोटी ३१ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
येथील सह्याद्री अतिथिगृहात किल्ले प्रतापगडच्या जीर्णोद्धारासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यमंत्री सचिन अहिर आदींसह स्थानिक आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. प्रतापगड जीर्णोद्धार समिती, पर्यटन विकास निधी आणि लोकसहभागातून हे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या माध्यमातून पुरातत्व दृष्टिकोनातून हा विकास केला जाणार आहे. त्यात किल्ल्यावरील अवशेषांचे मूळ स्वरूपात जतन करणे, गडाची तटबंदी, दरवाजे, बुरूज यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे आदींचा समावेश आहे.
कामाचा आवाका प्रचंड असल्याने जीर्णोद्धार समितीने प्रतापगड विकासाच्या पहिल्या भागाचा आराखडा चार टप्प्यात तयार करून सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार वर्षात १२ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात १ कोटी ३१ लाख रुपयांची आवश्यकता असून यातून ध्वजबुरुज ते जुन्या दरवाज्यापर्यंतच्या दोन्ही तटबंदीचे नूतनीकरण केले जाईल. ही रक्कम तातडीने उपलब्ध करून दिली जाईल. सीएफ फंडातून देखील निधी दिला जाईल, हा निधी जिल्हाधिकार्‍यांमार्फत खर्च केला जाईल. कामाच्या पूर्ततेप्रमाणे जिल्हाधिकारी तो वितरीत करतील आणि कामावर लक्ष देखील ठेवतील. नंतरच्या टप्प्यासाठी दरवर्षी डीपीटीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

GOLDEN HITS TO MARK ITS GOLDEN JUBILEE


Vashi: Golden Hits, a conceptual musical presentation of old melodies, has come a long way since its inception almost five years down the line. It has witnessed many ups and downs during this tedious and breathtaking journey to provide the old music buffs from city jurisdiction and beyond their dose of entertainment in accordance with ever increasing demand for inclusion of select numbers.

Anmol Entertainment which is the brain behind these musical concerts of Golden Hits is all geared up to commemorate its 50th show on February 5, Saturday, timings being from 8.30pm. The mega musical show of celebrating Golden Jubilee of Golden Hits will have who’s who from difference spheres of life which is devised to pay obeisance to music maestros that have given the Indian film industry their best shot to reckon with.

“This is a much-sought after musical nite in Navi Mumbai which will have songs of almost all great musicians that have chipped in immensely to the Indian cinema which we sing to unleash our pain and agony. This will be a memorable moment in the history of Golden Hits under Anmol Entertainment. We will try and provide the bests to our humble music lovers at the Golden Jubilee show,” said Navi Mumbai’s own singer and music director, Ajit Mestry, the architect of this musical initiative.   

The show will stage evergreen compositions of legendary music directors like Naushad, S D Burman, Shankar-Jaikishan, Roshan, Laxmikant Pyarelal, Madan Mohan, R D Burman, Kalyanji-Anandji, O P Nayyar and C Ramchandran. The singers that will imitate the great personalities with their soothing voice include Rana Chatterjee, Sandeep Shah, Anand Bahal,  Sangeeta Malekar, Sampada Goswami, Debu Mukherjee, Narendra Bhansali and Ajit Mestry. Sandeep Kokil will look after the campering part.

आई, तू रडू नकोस...

"प्लास्टिक ऍनिमिया" झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाचे हे बोल आहेत...त्याला झालेल्या असाध्य रोगामुळे आणि डॉक्टरांनी त्याला आता अवघ्या एका महिन्याची मुदत दिल्यामुळे दिवसभर रडणार्‍या आणि आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या पिटुकल्याला डोळे भरून पाहणार्‍या आईला कृष्णा सारखा समजावत असतो.
आपण वाचणार नाही याची जाणीव असलेला सहा वर्षांचा कृष्णा हा चिमुरडा मात्र बिनधास्त आहे. कृष्णाच्या शरीरात नवीन रक्त तयार होणे जवळजवळ बंद झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्याचे गरीब आई-वडील पैशाअभावी त्याच्यावर औषधोपचार करण्यात असमर्थ ठरले आहेत. इंदूरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरू आहेत. चार महिन्यातून सहा वेळा त्याला "ओ पॉझिटीव्ह" रक्त देण्यात आले आहे. डॉक्टरांनी कृष्णाच्या आई-वडिलांना बोनमॅरो ट्रान्सप्लँटेशनचा आणखी एक सल्ला दिला आहे. परंतू यासाठी, त्यांच्याजवळ नसलेल्या आणि इतके जमवणे शक्य नसलेल्या १५ लाख रुपयांची गरज आहे. कृष्णाचे वडील आरएस कुशवाह मजूर असून त्यांच्या डोक्यावर अगोदरचाच सुमारे दीड लाख रुपयांचे अक्षरशः ओझे आहे. कृष्णाची बहिण नंदिनी कृष्णासाठी देवापुढे दररोज याचना करत असून कोणाकडूनही काही मदत मिळवण्यासाठी धडपडत आहे...त्याला मदत करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पुढे सरसावले आहेत. कृष्णा याला मदत करण्यासाठी मोबाईल क्रमांक ९९२६५२७४९९ येथे संपर्क साधण्याची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे.
कृष्णा हे सगळे शांतपणे पहात आहे...कदाचित आपल्याला लोकांनी मदत केली नाही तरी, काळ आपल्याला आपल्या कुशीत सामावून घेईल याची जाणीव या चिमुरड्याला झाली असावी..

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-पवार

मुंबई, ता. १ - पैठण (जि. औरंगाबाद) येथील संतपीठातील अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले आहेत.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात संतपीठाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजेय देवतळे, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार संजय वाकचौरे, प्रकाशमहाराज बोधले आदी उपस्थित होते.
संतवाड़्मयाचे शिक्षण देणारे देशातील हे एकमेव संतपीठ असून तीनवर्षांपूर्वी या संतपीठाची स्थापना झाली आहे. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. संतपीठातील अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गाच्या भरतीच्या प्रक्रियेबाबत दोन महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरवात करावी. तसेच संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत देखील प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
श्री. टोपे म्हणाले, की संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना पत्र दिले जाईल. यानंतर अभ्यासक्रमाबरोबर आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल.

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मूळ संचिकेची माहिती केवळ अर्जाद्वारे मिळणार

मुंबई, ता. १ - नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या भूखंडांच्या संदर्भातील मूळ संचिकेची माहिती आता केवळ अर्जाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी माहिती व कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी भूमी व भूमापन विभागातील संबंधित नोडच्या अतिरिक्त भूमि व भूमापन अधिकारी/भूमि व भूमापन अधिकारी/सहाय्यक भूमि व भूमापन अधिकारी किंवा क्षेत्राधिकारी/ कार्यालयीन सहाय्यक, लिपीक यांचेकडे लेखी अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
भूमी व भूमापन विभागाच्या अधिलेख कक्षामध्ये साडेबारा टक्के योजनेच्या संचिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्त खातेदार, त्यांचे प्रतिनिधी, विधीज्ञ व इतर व्यक्ती यांना या संचिकांची हाताळणी आवश्यकतेनुसार करण्याची अनुमती होती. परंतू अनेकदा प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या संचिकेतील काही महत्वाची कागदपत्रे गहाळ होणे, मूळ संचिका गहाळ होणे अशा बाबी निदर्शनास आल्या आहेत. हे ध्यानात घेऊन, व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचनेनुसार आता संचिकांच्या प्रत्यक्ष हाताळणीवर प्रतिबंध घालण्यात आला असून यापुढे खातेदार, त्यांचे प्रतिनिधी व विधीज्ञ यांना संचिकांची अभिलेख कक्षात जाऊन हाताळणी करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या माहिती अथवा कागदपत्रांसाठी स्वतः प्रकल्पग्रस्तांना लेखी अर्ज किंवा प्रमाणित छायाचित्रासह अधिकारपत्र सादर करणे आवश्यक राहील. यानुसारच अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात मागविलेली माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदार माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये देखील अर्ज करू शकतो, असे कळविण्यात आले आहे.

जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर

नाशिक, ता. १ - देशातील जातिनिहाय जनगणना सन २०११ च्या मुख्य जनगणनेनंतर म्हणजेच जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
श्री. भुजबळ यांनी २७ जुलै २०१० रोजी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जातिनिहाय जनगणनेच्या संदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. नियोजन आयोगाने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात ओबीसी जनगणनेची शिफारस केल्याचा दाखलाही पत्रात दिला होता. हे पत्र पंतप्रधान कार्यालयामार्फत पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहविभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या सामाजिक अध्ययन प्रभागाकडे पाठविण्यात आले होते. यानुसार असिस्टंट रजिस्ट्रार जनरल श्रीमती प्रतिभा कुमारी यांचे उपरोक्त माहिती देणारे पत्र आपल्याला नुकतेच प्राप्त झाले असल्याचे खासदार भुजबळ यांनी सांगितले. जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करावयाच्या जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पत्रात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर देखील आपल्याला माहिती देण्यात यावी अशी विनंती देखील समीर भुजबळ यांनी केली आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...