शुक्रवार, २४ जून, २०११

Hightlight: ठळक बातम्या

*     अभिषेक बच्चन- यापूर्वी 'पा' चा दिग्दर्शक म्हणून मीडियासमोर उभा होतो...आता होणारा 'पा' (अर्थातच पापा, बाप) म्हणून उभा आहे.

*     पाच लाख टन साखर निर्यातीस केंद्राचा हिरवा कंदील...

*     इंदूर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस

गुरुवार, २३ जून, २०११

आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा; पथक सज्ज

मुंबई, ता. २३ - श्रीक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीनित्त आळंदी ते पंढरपुर मार्गावर पालख्यांबरोबर जाणार्‍या वारकरी बांधवांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे २२ जून ते ११ जुलै या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी संस्थेचे पथक सज्ज झाले आहे.

यावर्षी संस्थेचे वैद्यकीय पथक शनिवारी (ता. २५) नेहरूनगर, कुर्ला, मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास के. ई. एम. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, असे संस्थ्चे विश्वस्त डॉ. सुनिल हलुरकर यांनी कळविले आहे.

ही मोफत वैद्यकीय सेवा संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपुर या मार्गावर वारकर्‍यांना दिली जाईल. यासाठी संस्थेने सुमारे आठ रुग्णवाहिका, औषधांचा पुरेसा साठा आणि सेवाभावी १०० डॉक्टर व १५० स्वयंसेवकांचे पथक उपलब्ध करून दिले आहे. या समाजसेवी उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर पंढरपुरकडे पायी जाणार्‍या वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक ते औषधोपचार व वैद्यकीय सेवा ट्रस्टतर्फे अगदी मोफत पुरविली जाईल. पालखीच्या मार्गावरील सुमारे २९ ठिकाणी संस्थेतर्फे मदत पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. संस्थेने दोन वर्षात अशा प्रकारचे उपक्रम आळंदी, पंढरपुर, देहू, जेजुरी, उत्तराखंड, मुंबादेवी, महालक्ष्मी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, मांढरदेवी, दादर-चैत्यभूमी इ. ठिकाणी यशस्वीरितीने राबविले आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. हलुरकर (९८६९१ ०१५८२) आणि प्रभाकर कोंबेकर ( ९९८७३ ४७६११) येथे संपर्क साधावा.

वेळ आत्मचिंतन करण्याची...

इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड होण्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच उज्जेनहुन इंदूरला वास्तव्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्त्या करण्यात आली. पोलिसांनी तीन-चार दिवसातच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक युवती आणि दोन युवकांचा समावेश आहे...। या दुर्दैवी घटनेविषयी महाबली ब्लॉगचे नियमित वाचक रविंद्र बर्गले यांनी पाठविलेली ही प्रतिक्रिया:

इस नृशंस और वीभत्स घटना से सभी को झकझोर दिया है. लेकिन विचार करें तो पाते हैं, कि आधुनिक जीवन शैली से उपजे भटकाव और विकृति के मूल में वह आधुनिक जीवन-शैली है, जो युवा मनोविज्ञान को फैशन, लड़के-लड़कों की मित्रता, प्यार, फिल्मी ग्लैमर, क्लब और रेस्त्रां में मौज, शराबखोरी, दादागिरी, हिंसा के प्रति आकर्षित करती है. वास्तव में इस घटना के लिए समाज और समाज में नैतिकता और व्यवहारिकता के मानदंड निर्धारित करने वाला अन्य वर्ग (इनमें मुख्य रूप से मीडिया शामिल है) भी समान रूप से जिम्मेदार है, जिसने प्रत्यक्ष और परोक्ष रूप से अश्लीलता, अनैतिकता, और चारित्रिक पतन को मॉर्डनाइज़ेशन, ग्लोबलाइज़ेशन, फिल्मी फैशन, लाइफ-स्टाइल जैसे मिथकों की आड़ में न्यायोचित बनाया है. प्रिंट मीडिया के वे अखबार भी जिम्मेदार हैं- जो बाकायदा वेलेंटाइन डे, रोज़-डे और फ्रेंडशिप डे के परिशिष्ट निकाल कर मध्यमवर्गीय घर-परिवारों में ऐसी अनैतिकता की न केवल पैरवी कर रहे हैं, बल्कि उसे व्यवसायिकता के कुत्सित उद्देश्यों की पूर्ति के लिए दुराग्रहपूर्वक उन्हें प्रोत्साहित भी कर रहे हैं. यदि कुछ समय पूर्व बजरंग-दल द्वारा सार्वजनिक स्थानों पर अश्लीलता का प्रदर्शन करने वाले ऐसे वेलेंटाइनी जोड़ों का विरोध किया गया था, तो उसके मूल में समाज को ऐसे अपराधों से बचाने की ही भावना रही होगी, समाज का ठेकेदार बनने की नहीं. लेकिन दुर्भाग्य इस बात का है, कि समाज के वे लोग जिन्हें ऐसी संस्कृति का विरोध, सांस्कृतिक-प्रदूषण का विरोध करना चाहिए, उल्टे बजरंग-दल के पीछे ही हाथ-धोकर पड़ गए थे. खैर यह तो समाज को तय करना है, कि अपराध-मुक्त, सुसंस्कृत और प्रगतिशील सभ्य और स्वस्थ समाज के उसके मानदंड और कसौटी क्या हैं? उसकी प्राप्ति का मार्ग वेलेंटाइन-डे, रोज़-डे, फ्रेंडशिप-डे, शराबखोरी, डांस पार्टी, कॉकटेल पार्टी, फिल्मी फैशन, बुजुर्गों की अवमानना,, प्यार, ग्लैमर, शराबखोरी और हिंसा से होकर जाता है, या वे सुसंस्कृत, प्रगतिशील, सभ्य, सबल और स्वाभिमानी जीवन-शैली के पालन में जीवन की पूर्णता देखते हैं.
यदि समाज और मीडिया के सिपाही इस घटना का दोष पुलिस-प्रशासन या अपराधियों के बेखौफ होने या एक-दूसरे पर मढ़ने के बजाय आत्म-अवलोकन और मंथन करेंगे तो स्पष्ट दिखाई देगा कि ऐसे अपराधों के मूल में जो अनैतिकता, अश्लीलता और चारित्रिक-पतन है, वह समाज में कहां से प्रवेश कर रहे हैं. व्यक्ति, परिवार, समाज के साथ-साथ मीडिया को भी अपनी सकारात्मक भूमिका पर पुनर्विचार करना होगा.

अभिरूची...

बुधवार, २२ जून, २०११

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार


 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील.

बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक विभागाच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, अर्थ विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, शिक्षण विभाग सचिव व्ही. राधा, बेळगावचे माजी आमदार बी. आय. पाटील, रवी गिंडे आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत 'हिंदुत्व' प्रमुख मुद्दा नसेल: उमा भारती

लखनौ, ता. २२ (वृत्तसंस्था) - सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि राम मंदीर हा भाजप चा प्रमुख मुद्द नसेल. असे भाजप च्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे.

उमा भारती म्हणाल्या, की हिंदुत्व आणि राम यांच्यावर आपला विश्वास आहे. आम्हांला इथे रामराज्यच अपेक्षित आहे. राम मंदीराचा प्रश्न हा श्रद्धेचा भाग आहे मात्र राज्याच्या निवडणुकीसाठी तो राजकीय अजेंडा नसेल. आम्ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविणार आहोत.
मी हिंदुत्व आणि राम मंदीर प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मध्यंतरी साडेपाच वर्षे भाजप मध्ये नसताना देखील आपण याबाबत तडजोड केलेली नाही.

काँग्रेस सुद्धा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे घेणार असल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की केंद्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसने उत्तर देणे अपेक्षित आहे. "चोराकडे चोरच बोट कसे दाखवू शकेल?" असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख दिग्विजय सिंग हे राहुल गांधी यांची स्टेपनी असून त्यांना राज्यात (उत्तर प्रदेशात) कोणीही भाव देत नसल्याचा दावा उमा भारती यांनी केला. ते जिथे जातात तिथे मी त्यांना पराभूत करते हा तर योगायोग आहे. मी त्यांना मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये पराभूत केले असून तिथे ते प्रमुख होते, आता उत्तर प्रदेशची वेळ असल्याचेही त्या म्हणाल्या.

मंगळवार, २१ जून, २०११

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी शंकर, नियोजन विभागाचे सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे आदी उपस्थित होते.

राक्षस

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...