स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुलकर्णी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार सर्वश्री प्रताब आसबे यांना गुरुकुल पुरस्कार, प्रकाश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, प्रकाश सावंत, शशिकांत सांडभोर, निशांत सरवणकर यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार उल्हास पवार, माजी आमदार अरविंद सावंत, श्रीमती स्वप्नगंधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र पांचाळ यांनी केले. स्वप्नगंधा कुलकर्णी यांनी आभार मानले.
शुक्रवार, ११ मार्च, २०११
सोमवार, ७ मार्च, २०११
'मी मराठी" चा ४०० वा प्रयोग सादर
मुंबई, ता. ७ - प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात काल (ता. ६) लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरची प्रस्तुती असलेला 'मी मराठी' या सांगितिक कार्यक्रमाचा चौथा वर्धापनदिन तसेच ४०० वा प्रयोग सादर करण्यात आला. राज्याचे पर्यावरणमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, की लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा वारसा त्यांचे सुपुत्र नंदेश आणि संदेश यांनी अत्यंत समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. विठ्ठल उमप यांची लोककलेवरील निष्ठा, संचार, प्रभुत्व इ. कौशल्याची प्रचिती 'मी मराठी' या कार्यक्रमातून येते. विठ्ठल उमप यांना जनतेने जे प्रेम दिले तसेच प्रेम उमप बंधूंना देखील लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ढोलकीसम्राट राजाराम जामसंडेकर, पंडित बी. ए. तुपे गुरुजी, पत्रकार युवराज मोहिते यांच्यासह श्रीमती वत्सला विठ्ठल उमप उपस्थित होत्या.

एलिफंटा महोत्सवास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. ६ - महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एलिफंटा महोत्सव-२०११ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे पर्टटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडण्याच्या दृष्टीने पर्यटनास प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने असे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरते, यात खंड पडू न देण्याची दक्षता घेतली पाहिजे असे मत यावेळी श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवात डॉ. राजा आणि राधा रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याने वातावरणात गहिरे रंग भरले तर पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाच्या दुसर्या (शेवटच्या) दिवशी गीता चंद्रन यांचे भरतनाट्यम् आणि देवकी पंडित यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, महोत्सवासाठी गेट वे ऑफ इंडिया तसेच घारापुरी येथून विशेष लाँचची व्यवस्था करण्यात आली होती.
अर्जुनसिंग यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्याला मुकलो: अजित पवार
मुंबई, ता. ४ - माजी केंद्रीयमंत्री अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे आपण एका ज्येष्ठ नेत्याला मुकलो आहोत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की अर्जुन सिंग प्रदीर्घ काळ देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल अशा विविध जबाबदार्या त्यांनी सांभाळून सामान्यांच्या हितास प्राधान्य दिले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून काम करताना देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दीर्घ काळ स्मरणात राहतील.

अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे मागासवर्गीयांचा भक्कम पाठीराखा हरपला: भुजबळ
मुंबई, दि. 4 फेब्रुवारी : ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे देशातील अल्पसंख्य, मागासवर्गीय समाजाचा भक्कम पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, अर्जुन सिंग हे भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घेतलेल्या कणखर पुढाकारामुळेच मागासवर्गीय समाजाला हा लाभ होऊ शकला. अल्पसंख्य, मागासवर्गीय समाज याबद्दल नेहमीच अर्जुन सिंग यांचा ऋणी राहील, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे रविवार, ६ मार्च, २०११
शुक्रवार, ४ मार्च, २०११
लोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने संवर्धनाचे काम करावे: भुजबळ
मुंबई, ता. ४ - लोणार सरोवर परिसरातील प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. तशाच तोडीचे काम राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभाग मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन उपसचिव राजीव निवतकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद सर्कलचे उपअधिक्षक ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम्, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी रामस्वामी तसेच सार्व. बांधकाम व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणार सरोवराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबतही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) यांच्याकडून सरोवरात लोणार शहरातून जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत सविस्तर अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सरोवराभोवती चेन-लिंक फेन्सिंग करण्यात यावे, परीसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पिसाळ बाभळीच्या झाडांची समूळ तोडणी शक्य नसली तरी किमा न छातीएवढी कापणी वनखात्याच्या परवानगी करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली. लोणार अभयारण्यातून जाणारा लोणार-मंठा रस्ता अंतर कमी होण्याच्या दृष्टीने लोणारा-पांग्राडोळे शिव ते देऊळगाव कुडपाळ फाटा ते मंठा असा बायपास करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. लोणार सरोवर परिसरातील प्रस्तावित भूसंपादनातील शेतीसंबंधी कास्तकारांना अधिकाधिक मोबदला देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
जगातील उल्कापात-निर्मित सरोवरांच्या ठिकाणी विकसित केलेल्या सुविधांचा अभ्यास करा
लोणार परिसर विकासाची ही चर्चा अत्यंत प्राथमिक असून जगात अशा प्रकारे उल्का पडून निर्माण झालेली मोजकी सरोवरे आहेत. त्याठिकाणी संबंधित देशांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सोयीसुविधा विकसित केल्या आहेत, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. लोणार येथे कोणत्या सुविधा निर्माण करता येऊ शकतील, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार: भुजबळ
मुंबई ता. ४ - शिवकालिन रायगड जसाच्या तसा उभारण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री, केंद्रीय सचिवांसह भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. याबाबत श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह त्यांनी रायगडखेरीज राज्यातील अन्य पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांच्या संवर्धनाच्या कामाबाबतही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
डाव्यांनी फुलेंचा शेतर्यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडे
मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...!
हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. यानंतर रंगलेल्या प्रकट मुलाखतीत प्रतिमा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वानखेडे यांनी आपल्या जीवनसंघर्षातील अनुभवाचे बोल ऐकवले. शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत वानखेडे यांच्या अभ्यासाला खुद्द पी. साईनाथ यांनी सलाम केला आहे. वानखेडे यांनी एस. एम. जोशी यांचे सहाय्यक म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. "पोळा हा सण साजरा करताना शेतकरी आपल्या शेतावर काम करणार्या गड्याला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो. आणि पोळ्याच्या आदल्या रात्री वर्षभर राबणार्या बैलाची खांदशेकणी करतो. खांदशेकणी बैलाच्या खांद्याला लोण्याने चोळले जाते. मात्र कर्जबाजारी झालेला शेतकरी आपण बैलाची खांदशेकणी वा गड्याला पुरणपोळीही खाऊ घालू शकत नाही, या दुःखानेच शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतो. शेतकर्यांच्या आत्महत्या ही संपलेल्या आंदोलनातून उत्पन्न झालेली 'सायलेंट मूव्हमेंट' " . या शब्दात त्यांनी भारत आणि इंडियातील विषमतेची दरी किती खोल आ हे हे दाखवून दिले.
या मुलाखतीत वानखेडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या माया यांनीही मेटीखेडा या आपल्या गावात ग्रामपंचायतीत सर्व महिला निवडून आणण्याच्या प्रयोगाची माहिती दिली.
उत्तम साहित्यकृती - डॉ. बापट
आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साहित्यिक डॉ. रवी बापट यांनी आपल्याला हे पुस्तक खूप आवडल्याचे सांगतानाच वानखेडे यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे टराटरा फाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. समाजात मोठे म्हणून मिरवणारे लोक हे ढोंगी आहेत. त्यांचे खरे रूप उघडकीस आणल्याशिवाय जनता जागरूक होणार नाही. असे म्हणत त्यांनीही नाव न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांचे वस्त्रहरण केले. "मार्क्सवादी भ्रष्ट झाला तर क्रूर होतो आणि गांधीवादी भ्रष्ट झाला की ढोंगी होतो" हे वानखेडे यांचे वाक्य सुभाषितच असल्याचे ते म्हणाले
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...