रविवार, ६ मार्च, २०११
शुक्रवार, ४ मार्च, २०११
लोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने संवर्धनाचे काम करावे: भुजबळ
मुंबई, ता. ४ - लोणार सरोवर परिसरातील प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. तशाच तोडीचे काम राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभाग मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन उपसचिव राजीव निवतकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद सर्कलचे उपअधिक्षक ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम्, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी रामस्वामी तसेच सार्व. बांधकाम व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणार सरोवराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबतही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) यांच्याकडून सरोवरात लोणार शहरातून जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत सविस्तर अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सरोवराभोवती चेन-लिंक फेन्सिंग करण्यात यावे, परीसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पिसाळ बाभळीच्या झाडांची समूळ तोडणी शक्य नसली तरी किमा न छातीएवढी कापणी वनखात्याच्या परवानगी करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली. लोणार अभयारण्यातून जाणारा लोणार-मंठा रस्ता अंतर कमी होण्याच्या दृष्टीने लोणारा-पांग्राडोळे शिव ते देऊळगाव कुडपाळ फाटा ते मंठा असा बायपास करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. लोणार सरोवर परिसरातील प्रस्तावित भूसंपादनातील शेतीसंबंधी कास्तकारांना अधिकाधिक मोबदला देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
जगातील उल्कापात-निर्मित सरोवरांच्या ठिकाणी विकसित केलेल्या सुविधांचा अभ्यास करा
लोणार परिसर विकासाची ही चर्चा अत्यंत प्राथमिक असून जगात अशा प्रकारे उल्का पडून निर्माण झालेली मोजकी सरोवरे आहेत. त्याठिकाणी संबंधित देशांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सोयीसुविधा विकसित केल्या आहेत, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. लोणार येथे कोणत्या सुविधा निर्माण करता येऊ शकतील, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार: भुजबळ
मुंबई ता. ४ - शिवकालिन रायगड जसाच्या तसा उभारण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री, केंद्रीय सचिवांसह भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. याबाबत श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह त्यांनी रायगडखेरीज राज्यातील अन्य पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांच्या संवर्धनाच्या कामाबाबतही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
डाव्यांनी फुलेंचा शेतर्यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडे
मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...!
हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. यानंतर रंगलेल्या प्रकट मुलाखतीत प्रतिमा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वानखेडे यांनी आपल्या जीवनसंघर्षातील अनुभवाचे बोल ऐकवले. शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत वानखेडे यांच्या अभ्यासाला खुद्द पी. साईनाथ यांनी सलाम केला आहे. वानखेडे यांनी एस. एम. जोशी यांचे सहाय्यक म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. "पोळा हा सण साजरा करताना शेतकरी आपल्या शेतावर काम करणार्या गड्याला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो. आणि पोळ्याच्या आदल्या रात्री वर्षभर राबणार्या बैलाची खांदशेकणी करतो. खांदशेकणी बैलाच्या खांद्याला लोण्याने चोळले जाते. मात्र कर्जबाजारी झालेला शेतकरी आपण बैलाची खांदशेकणी वा गड्याला पुरणपोळीही खाऊ घालू शकत नाही, या दुःखानेच शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतो. शेतकर्यांच्या आत्महत्या ही संपलेल्या आंदोलनातून उत्पन्न झालेली 'सायलेंट मूव्हमेंट' " . या शब्दात त्यांनी भारत आणि इंडियातील विषमतेची दरी किती खोल आ हे हे दाखवून दिले.
या मुलाखतीत वानखेडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या माया यांनीही मेटीखेडा या आपल्या गावात ग्रामपंचायतीत सर्व महिला निवडून आणण्याच्या प्रयोगाची माहिती दिली.
उत्तम साहित्यकृती - डॉ. बापट
आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साहित्यिक डॉ. रवी बापट यांनी आपल्याला हे पुस्तक खूप आवडल्याचे सांगतानाच वानखेडे यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे टराटरा फाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. समाजात मोठे म्हणून मिरवणारे लोक हे ढोंगी आहेत. त्यांचे खरे रूप उघडकीस आणल्याशिवाय जनता जागरूक होणार नाही. असे म्हणत त्यांनीही नाव न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांचे वस्त्रहरण केले. "मार्क्सवादी भ्रष्ट झाला तर क्रूर होतो आणि गांधीवादी भ्रष्ट झाला की ढोंगी होतो" हे वानखेडे यांचे वाक्य सुभाषितच असल्याचे ते म्हणाले
उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ
![]() |
| ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख |
मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.सचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.
एचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
गुरुवार, ३ मार्च, २०११
मुंबईमध्ये वॅक्स म्युझियमच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य: भुजबळ
![]() |
| हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकास विनम्र अभिवादन...! |
मुंबई, ता. २ - लंडनमधील मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या तोडीचे वॅक्स म्युझियम मुंबईमध्ये उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.
लोणावळा येथील 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' चे आर्टिस्ट सुनील कंदल्लूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेण पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ गिरगाव चौपाटीनजीकच्या इक्सिया इव्हेंट लाऊंजमध्ये श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, आपण स्वतः लंडन येथील मादाम तुसाँ म्युझियमला भेट दिली असून विविध देशांच्या महान व्यक्तींचे मेणाचे पुतळे असलेले हे म्युझियम पाहण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात. तसे म्युझियम जगात कुठेही आपल्या पाहण्यात नाही. परंतू गेल्या आठवड्यात लोणावळा परीसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मुद्दाम 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' भेट दिली आणि स्तंभित झालो. मादाम तुसाँ इतके हे म्युझियम भव्य नाही, मात्र सुनिल कंदल्लूर या कलाकाराची कामगिरी मात्र मादाम तुसाँ वॅक्स आर्टिस्टच्या तुलनेत कुठेही कमी नाही. त्या कलाकारांच्या तोडीचा हा कलाकार आपल्या देशात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. तयार करण्यात आलेला हा पुतळा अत्यंत तेजस्वी आणि सजीव वाटत आहे. जणू काही छत्रपतीच या सभागृहात अवतीर्ण झाल्याचा भास होतो आहे. त्यांच्या पाणीदार डोळ्यांमधील तेज, धारदार नाक ही सारी वैशिष्ट्ये पुतळ्यात हुबेहुब उतरली आहेत. शिवरायांकडे पाहिल्यानंतर लोकांना आदरयुक्त जरब वाटते. तीच भावना या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर होत असून पाहणारा नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच या पुतळ्याची वाखाणणी करून प्रशस्तीपत्रक दिले आहे. यामुळे कलाकाराच्या कामगिरीला दाद दिल्याखेरीज रहावत नाही.
मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण नाही- कंदल्लूर
आपण मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसून मादाम तुसाँ म्युझियमला भेटही दिलेली नाही. परंतू चमत्कार अथवा साक्षात्कार म्हणून आपण काम करून पुतळे साकारत गेलो. गेल्या १३ वर्षात घेतलेल्या परिश्रमांचे मिळालेले फळ म्हणजे छत्रपतींचा पुतळा आपल्या हातून साकारला गेला. या शब्दात भारावून गेलेल्या आर्टिस्ट कंदल्लूर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भुजबळ यांचाही मेण-पुतळा तयार करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रमुख रोहिदास लोखंडे, म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन मोनाली कुलकर्णी यांनी केले.
बुधवार, २ मार्च, २०११
कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशातील तरुण पिढीचे योगदान मोलाचे: भुजबळ
मुंबई, दि. 2 मार्च : देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या तरूण पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे केले.
माटुंगा (पूर्व) येथील 'वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ऍन्ड रिसर्च'च्या सभागृहात काल सायंकाळी झालेल्या 'कृषी-धन-2011' या कार्यक्रमात ते बोलत होते. द एनर्जी ऍन्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूट (TERI) आणि वेलिंगकर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी 'कृषी-धन' (www.teriin.org/events/krishidhan/) या वेबसाइटचेही श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वेलिंगकर इन्स्टिटयूटचे समूह संचालक डॉ. उदय साळुंखे, 'टेरी'च्या पश्चिम प्रादेशिक केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजली पारसनीस, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यांच्याबरोबरच देशातील विविध मॅनेजमेंट संस्थांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कृषी क्षेत्राला वगळून आपण कदापि प्रगती करू शकणार नाही, असे स्पष्ट करून श्री. भुजबळ यांनी नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी, अन्नधान्य व उत्पादन वृध्दीसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद स्वागतार्ह बाब असल्याचे सांगितले.
कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये युवा उद्योजकांनी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि शेतीखालील जमिनीचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर उत्पादन वृध्दीचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हरितक्रांतीमुळे देशामध्ये जी कृषी प्रगतीची लाट आली, ती पुढे नेण्यासाठी नवीन धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन, शेतकऱ्यांना उपयुक्त व दर्जेदार मार्गदर्शन व कौशल्य विकास, सुलभ दराने आर्थिक सहकार्य यांसह हवामानाबाबत जागृती व मार्गदर्शन, संगणकाधारित तंत्रज्ञानाचा विकास, भू-आरोग्याबाबत दक्षता आदी बाबतीत नवीन कृषी उद्योजक खूप योगदान देऊ शकतात. अंतराळ तंत्रज्ञान किंवा जैव-तंत्रज्ञान आदी नव्या शाखांतील ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करणे ही काळाची गरज आहे.
कृषी-पर्यटनासारख्या वेगळया संकल्पनेचाही तरुण उद्योजकांना लाभ घेता येऊ शकेल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणात चालना देण्याची क्षमता कृषी-पर्यटनामध्ये आहे. यातून नियमित शेतीबरोबरच अधिकची मिळकत शेतकऱ्यांना होऊ शकते. स्थानिक बेरोजगारी तसेच हंगामी शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न आदी समस्यांवर कृषी पर्यटन एक चांगला उपाय ठरू शकते. पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांसाठी सुध्दा कृषी पर्यटन एक चांगला अनुभव आणि मिळकतीचे साधन ठरू शकते. त्यामुळे या क्षेत्रामध्येही तरूण उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध राज्यांतून आलेल्या व्यवस्थापन संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कृषी-उद्योगविषयक सादरीकरण केले. त्यामध्ये हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संघाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी श्री. भुजबळ यांच्या हस्ते 30 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
'ये लालटेन लालूजी का है!'
यावेळी 'टेरी'च्या पश्चिम विभागीय प्रमुख अंजली पारसनीस यांनी श्री. भुजबळ यांना सौर-कंदील भेट दिला. तो स्विकारत असतानाच त्याचा स्वीच ऑन करून श्री. भुजबळ यांनी तो आपल्या एका हातात धरला आणि विद्यार्थ्यांकडे पाहात आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत 'ये लालटेन लालूजी का है!' त्यांच्या या हजरजबाबीपणावर सभागृहात प्रचंड हशा पिकला. टाळयांच्या गजरात विद्यार्थ्यांनी त्यांना दाद दिली.

खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपयांची मदत: अजित पवार
मुंबई, ता. १ - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाडी पात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना केरोसीनचा पुरवठा करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले की, कोकणच्या खाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी दोन ड्रेझरची खरेदी करण्यात येणार आहे. परंतु ड्रेझर येईपर्यंत शेजारच्या राज्यांमधून भाडोत्री ड्रेझर आणून गाळ उपसण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटी रुपये देण्यात येतील.
बाह्य इंजिनधारक आणि बिगर यांत्रिक नौकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करेसीन पुरवण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने इतर राज्यांचा अभ्यास करून आठवडाभरात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
उद्योगमंत्री नारायण राणे, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायमंत्री मधुकर चव्हाण, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय सचिव अनिल डिग्गीकर, मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. पाटील, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...