शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

रस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे जहाज 
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

कॉमेडी का फट़का...

बगळ्यांची माळफुले..अजुनी

वसंताच्या संध्याकाळी गच्चीत गेलो, आज काहीतरी वेगळा फोटो काढायचा असा विचार मनात घोळथच होता, इतक्यात ही मोठ्ठी बगळ्यांची रांग दिसली...चटकन क्लिक केले..नंतर ही ओळ (बगळ्यांची माळ फुले, अजुनी अंबरात...) नकळत तोंडातून बाहेर पडली...
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

पुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 11 मार्चला पारितोषिक वितरण

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
पुणे, ता. 17 - एड्स, लोकसंख्यावाढ, कुपोषण व गुटखा याविरुद्ध जनजागरण करणाऱ्या व सेवा परम् कर्तव्यम् मानणाऱ्या चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'भ्रष्टाचार व प्रतिबंधक उपाय' या ज्वलंत व धगधगत्या भ्रष्टाचार या विषयाशी निगडित निबंध स्पर्धा घेण्यात आली. पुणे विद्यापीठांतर्गत समाविष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेस पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रथम पारितोषिक रु. 1111/-, द्वितीय 751/-, तृतीय 501/- व उत्तेजनार्थ 251/- व सर्वांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र येत्या 11 मार्चला पुण्यात कै. द. वि. निकम स्मृती पुरस्कार कार्यक्रमात मान्यवरांना देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक निलेश दिलिप कोकाटे, गेणबा सोपानराव मोझे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, येरवडा, पुणे, द्वितीय- सौरभ वसंत उबाळे, डी. ई. एस. लॉ कॉलेज, पुणे, तृतीय- अजिंक्य अनिलराव शिंदे, मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहगाव- पुणे यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ - ताई भागवत धुमसे-श्री. साईबाबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोपरगाव, परिमल दिलिप शिंदे- बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी-पुणे, सुरेंद्र तुळशीराम बनसोडे- जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय भेडा, ता. नेवासा अहमदनगर, नानासाहेब गव्हाणे- वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, रानडे इन्स्टिट्यूट डेक्कन, पुणे, चैताली मोहन साबणे- श्रीराम धामणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, म्हसरूळ शाखा, दिंडोरी रोड नाशिक, प्रत्युषा गोविंद जाधव- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, मानसी माधव कंगणे- शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओतुर-पारनेर, अहमदनगर, प्रिया देसले- श्रीमती पुष्पाबाई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कँप, मालेगाव-नाशिक, स्मिता जयंत देंडगे- आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय, एरंडवणे-पुणे आणि रघुनाथ कोकाळे- मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर, पुणे यांना जाहीर करण्यात आले आहे. असे अध्यक्ष आनंद थोरात यांनी कळविले आहे.

Reflection

Reflection...like mirror!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

शासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंदरसिंह

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर, ता. १५ - सीबीआय ला तपास सुरू करण्यापूर्वी शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. अनेक अशी प्रकरणे आहेत, ज्यात परवानगी मिळतच नाही. शासन कोणतेही असो, प्रथम आपल्या हिताचा विचार करूनच नंतर तपासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत सीबीआयला 'फ्री हँड' मिळणार नाही, तोपर्यंत त्याचा दुरुपयोगच होत राहील. असे मत माजी सीबीआय-प्रमुख जोगिंदरसिंह यांनी व्यक्त केले. एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की केवळ हातावर हात ठेवून सुवर्ण पदक मिळू शकत नाही, त्यासाठी मेहनत आवश्यक असते. कायद्यात बदल करणे सध्या नितांत आवश्यक आहे. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले, की काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास आयोगाची आवश्यकता नव्हती, ही जबाबदारी सीबीआय देखील पार पाडू शकले असते. आरुषि प्रकरणाचे कोडे अद्याप उलगडले नसल्याच्या प्रश्नावर, सीबीआय जादू ची छडी नसून साक्षीदार, पुरावे मिळून देखील देशात शेकडो आरुषिंसारखी प्रकरणे अद्याप गुलदस्त्यात पडून आहेत. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सध्या फक्त राजा यांनाच संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून अद्याप बरेच काही बाकी आहे.
विदेशी बँकांमधील काळ्या पैशासह देशात दररोज तयार होणार्‍या काळ्या पैशाकडे सुद्धा शासनाने पहावे. दररोज कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी डील होत आहेत. करचुकवेगिरी न होता केवळ आयकर जरी नियमित आणि व्यवस्थित जमा झाला, तरीसुद्धा शासकीय कोषात चांगला पैसा खेळू लागेल.

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

व्हॅलेंटाइन...अडथळा अंतराचा..!

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
दिवसभर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला काही तासांचा पण क्षणांप्रमाणे वाटणारा वेळ..भावी आयुष्य, मैत्रीच्या पुढच्या प्रवासात घालवायच्या आयुष्याची रंगविलेली स्वप्नं..रात्री झोपताना येणाऱ्या उद्याच्या कल्पनेचे कप्पे हृदयातून मनात साचवून झोपलेला तो किंवा ती...। खिडकीबाहेरून येणारा मंद वाऱ्याबरोबरचा सुवासाचा दरवळ..आणि, आणि सकाळी हळूच गालावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्याने किंवा तिने स्पर्श करून व्हॅलेंटाइन डे च्या दिलेल्या शुभेच्छा..।

एक काळ होता, त्या काळात घरातल्या महिलांनी परपुरुषाच्या समोर यायचे नाही. अगदी महत्त्वाचंच असल्यास अथवा संभाषण साधायचं असल्यास पडद्यामागे राहून बोलणी करायची..। या प्रघातामध्ये कालांतराने बदल होत जाऊन एकविसाव्या शतकात तर हे सगळं पडद्याआड गेलं आहे. वडील म्हणजे हिटलर वाटणाऱ्या मुलांना आता वडील म्हणजे मित्रच वाटू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय.

मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलू नये, बघू नये..मुलीने मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये अशा विचारांची बैठक आता बदललीये. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम देव दर्शनासाठी मंदिरात जाणार्‍या मुला-मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोणताही किंतू, परंतु न बाळगता अथवा एकमेकांशी बोलल्यास घरचे काय म्हणतील? याचा विचार न करता एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एकत्र जमलेली मुलं-मुली बिनदिक्कत भेटून विचारांचे आदान प्रदान करतात. पूर्वीचे अत्यंत कडक असे घरातले वातावरण सुद्धा बदललेले असून अनेक घरांमध्ये बिनधास्त वातावरण असल्याचे जाणवते. शालेय शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात जाणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या सुद्धा वाढते आहेच. माणसाचे बदललेले विचार अथवा विचारांच्या बैठकीत झालेले चांगले परिवर्तन याचे द्योतक असल्याचे मानावे लागेल.

शिक्षण घेताना एकमेकांची झालेली ओळख, या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास, गरजा यांची जाणीव होऊन अनेकदा ही मैत्री आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात बदलल्याची उदाहरणं अगदी डोळ्यासमोरची आहेत. दिवसभर घराच्या बाहेर असल्यामुळे घरच्या सदस्यांपेक्षा किंबहुना मित्र-मैत्रिणीच जवळचे वाटून त्यांच्याशी सुख-दुःखं शेअर करून डोक्यावरचं टेन्शन घालवूनच घरी परत यायचं असा मनसुबा सुद्धा अनेक मुलं रचतात आणि तशी कृती करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडं स्थैर्य आल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या लग्नाचा विषय घरात सुरू होतो..आणि सुरू होते काळजी...।   

आपलं शिक्षण सुरू असताना, इंटर्नशिप करताना, आर्टिकलशिप करताना आपल्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांशी झालेली ओळख आणि या ओळखीतूनच झालेली मैत्री, मित्र-मैत्रिणीकडून एखाद्या यक्ष प्रश्नावर दिले गेलेले सोल्युशन आणि त्याचा प्रभाव या गोष्टी हृदयाच्या एका कप्प्यात नकळत केव्हा घर करून त्यात घट्ट बसतात हे कळतही नाही.

एकमेकांना भेटून घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा केव्हा भेट होईल या विचाराने जीव कासावीस होतो, आणि जाणीव होते प्रेमाची! सध्याचे दिनमान अतिशय खराब असून संपूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं असतं असा जोडीदार निवडणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. वृत्तपत्र, टीव्हीवर सुद्धा फसवणुकीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत असल्यामुळे चिंता असतेच..! त्यातल्या त्यात माहितीतला मुलगा किंवा मुलगी असली तर चांगलंच अशी भूमिका मन घेऊ लागतं आणि
याला आकार मिळून स्वप्नं प्रत्यक्ष साकार होण्याची प्रतीक्षा सुरू होते. दोघांची भेट झाल्यानंतर मनाची स्पंदनं सुद्धा आतून बाहेर डोकावतात आणि विचार बाहेर येतात. वडील जरी फ्रेंडली वागत असले तरीही मुलांना सगळ्यात जवळची व्यक्ती आईच वाटते नां...।

भावी आयुष्य सुद्धा सोबत काढायचं दोघांनी ठरविल्यानंतर घरी सगळ्यात आधी आईला सांगितलं जातं. नंतर आई सुद्धा योग्य वेळ पाहून वडिलांना हे सांगते आणि पुढच्या हालचाली सुरू होतात. मुलगा किंवा मुलगी काही आई-वडिलांच्या पाहण्यात असतो तर काहींना नोकरीमुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बिचाऱ्या मुलांवर संस्कारच चांगले झालेले असतात नां...। परंतू पुढच्या सोपस्कारांसाठी क्वचित प्रसंगी हे संस्कार (सध्याच्या भाषेत) आडकाठी ठरतात. मुलगी दुसऱ्या घरी जाणार अथवा मुलगा दुसऱ्याच्या मुलीला सून म्हणून घरी आणणार असतो.  यापूर्वी ती दोघं मित्र-मैत्रीण असल्यामुळे काहीच न विचारलेल्या या दोन जीवांना आता काही नां काही विचारले जाते. आई-वडिलांनी नाही विचारले तरीही तिसऱ्या पिढीतली मंडळी यांना दशकापूर्वी महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा समजला जाणारा...दोन हृदयांमध्ये अंतर निर्माण करणारा म्हणजेच जात हा मुद्दा विचारतात..आणि बिचाऱ्या तो-तिला चटकन गरगरल्यासारखे होते. सार्वजनिक ठिकाणी जातिभेद न मानणारे आजही हा प्रसंग स्वतःवर ओढवल्यास सहजासहजी मानायला तयार होत नाहीत, हे सत्य आहे. सत्य हे कटू असते म्हणतात नां, ते ही दोघं अनुभवतात. इतके दिवस आदराने पाहिल्या जाणाऱ्या या मुलाकडे, मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आपल्या चांगल्या, हुशार मुलगा, मुलीच्या जीवनात का आले? या नजरेने कटाक्ष टाकून अक्षरशः दोघांना रडवेले केले जाते. तरीही, पालक मुलांच्या व्हॅलेंटाइन पुढे नतमस्तक होऊन त्यांना कधीही न तुटणाऱ्या गाठीत बांधणारेही पालक
या 21 व्या शतकात आहेत. यांचा आदर्श घेऊन आणि झपाट्याने पुढे सरकणाऱ्या काळाला वंदन करून फक्त आणि फक्त "मानव हीच जात" मानावी! नव्या युगाच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन काही अनुरूप नसलेले विचार बदलण्याची नितांत गरज आहे.

मुंबई मॅरेथॉनप्रमाणेच मुंबई सायक्लोथॉनही आंतरराष्ट्रीय बनविणार- भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १४ - मुंबई मॅरेथॉन आज केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे. हजारो आंतरराष्ट्रीय स्पर्धक यात सहभागी होतात. आता मुंबई सायक्लोथॉनचा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे आणि यासाठी प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे स्पर्धेस मिळणार्‍या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत अडथळा आणण्यासाठी दर करण्याकरिता भुजबळांची धाव
आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर सर्व स्पर्धक सी-लिंकच्या दिशेने रवाना झाले. यावेळी केबलस्टेडच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धकांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही छायाचित्रकार मध्येच उभे होते. काही अक्षरश: रस्त्यावर आडवे झाले होते. आधीच्या राऊंडचे काही सायकलस्वारही नेमके याच मार्गाने उलटे येत होते. यांना भुजबळ यांनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून छायाचित्रे काढण्याची विनंती केली.  स्पर्धेत सी-लिंकवरील एकूण १०४ किमी च्या १२ लॅप सुरळीत आणि उत्कंठापूर्ण पद्धतीने पार पडल्या.

अमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १३ - अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मुंबई सायक्लोथॉन 'टूर द मुंबई-२०११' मध्ये आज अमेरिकेच्या रेडिओशेक टीमच्या रॉबी हंटर याने राजीव गांधी सागरी सेतूच्या साक्षीने १०४ किमी. चे अंतर पार करून विजेतेपद पटकाविले. इटलिच्या लिक्विगॅस टीमचा इलिया व्हिव्हियानी आणि यूके मोटरपॉईंट टीमच्या जॉनी एकव्हॉय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे १५ हजार, सहा हजार आणि तीन हजार युरोचे बक्षीस मिळाले.
भुजबळ फाऊंडेशन, आयडी स्पोर्ट्स, युनियन सायक्लिक इंटरनॅशनल आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १२ देशांचे विविध संघ तसेच तीन देशांच्या राष्ट्रीय संघांच्या सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला. यासह २८ किलोमीटरची ऍमॅच्युअर राईड, प्रत्येकी १५ किलोमीटरच्या कॉर्पोरेट व ग्रीन राईड्स, ३ किलोमीटरची किड्स राईड अशा अन्य विभागांमध्ये एकूण ९५०० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभागी होऊन "पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा" हा संदेश दिला.
१२ आंतरराष्ट्रीय संघांव्यतिरिक्त भारताच्या स्पर्धकांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यात अमरदीपसिंग, सी. राजेश (दोघेही भारतीय रेल), सोम वीर, विनोद मलिक, सतबीरसिंग व अतुल कुमार (सर्व इंडियन आर्मी) यांचा समावेश होता. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह, आमदार पंकज भुजबळ आदींच्या हस्ते फ्लॅग राईड करण्यात आले. आयडी स्पोर्ट्स चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी परीश्रम घेतले. डेव्हिड मॅक्वेड यांनी रेस डिरेक्टर म्हणून काम पाहिले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...