सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

इटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्नाटकचा साबू गांगर राष्ट्रीय स्पर्धेत विजेते

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नाशिक (वार्ताहर) - नाशिक फेस्टिव्हल निमित्ताने भुजबळ फाऊंडेशन आणि आयडी स्पोर्ट्स आयोजित आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा शुक्रवारी नाशिकमध्ये उत्साहात संपन्न झाली. इटलीच्या 'लिकवी गॅस' टीमचा विवियानी इलिया तर राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचा साबू गांगर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे सहा हजार युरो आणि सव्वालाख रुपयांचे बक्षीस राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकचे खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
स्वीस येथील इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन, द युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल आणि इंडियाज सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारतात 'टूर द मुंबई' ही नाशिक आणि मुंबई येथे दोन टप्प्यात सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा दुसरा टप्पा रविवारी मुंबईत संपन्न झाला. नाशिकच्या स्पर्धेत सुमारे पाच हजार दोनशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. यात १०८ आंतरराष्ट्रीय, ६८ राष्ट्रीय स्पर्धक होते. उर्वरित स्पर्धकांमध्ये नाशिक शहरातील आम नागरीक, तरुण तरुणी आदींचा समावेश होता. सुमारे २५ हजार नाशिककरांनी विविध रेस पाहिल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धकांची मुख्य रेसपुर्वी सेरेमोनियल राईड झाली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जिंजर हॉटेलपासून ही राईड निघाली.
दरवर्षी फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणार्‍या टूर द फ्रान्स या स्पर्धेप्रमाणेच भारतात आयडी स्पोर्ट्सतर्फे टुर द मुंबई ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा गेल्या वर्षापासून घेत असल्याचे स्पोर्ट्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी सांगितले. दरवर्षी स्पर्धेत नवनवीन शहरे वाढविली जातील असेही ते म्हणाले.
संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग मुळे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याचा मुख्य उपाय म्हणजे इंधनाचा कमी वापर करणे, यामुळेच 'बर्न फॅट्स, नॉट फ्यूएल' हे घोषवाक्य बनवून भुजबळ फाऊंडेशनने सायकलिंगचा प्रचार प्रसार करण्यासाठी 'चरबी जाळा, इंधन वाचवा' हा पर्यावरण रक्षणाचा संदेश सायकल स्पर्धेद्वारे दिल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
स्पर्धेत अमेरिकेच्या रॅडिओशॅक चा मॅकवेन रॉबी याला द्वितीय तर दक्षिण आफ्रिकेच्या टीम बोनीटास चा डे टायटलर याला तृतीय क्रमांक मिळाला. यांना अनुक्रमे तीन हजार, दीड हजार युरो चा धनादेश देण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धेत ६३ किमी च्या राईडमध्ये कर्नाटकचा साबू गांगर यांना सव्वा लाखाचे प्रथम बक्षीस तर दिल्लीच्या सचिन कुमार यांना ८५ हजाराचे तर कर्नाटकच्या श्रीधर सावनूर यांना ६५ हजाराचे बक्षीस देण्यात आले.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरू याने आपल्याला जम्मू-काश्मिर येथील तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. शासनाने गुरूची ही मागणी सपशेल अमान्य करावी. फाशीची शिक्षा ठोठावण्यात या देशद्रोह्याला अद्याप फाशी झाली नाही, परंतू त्याची मागणी शासन अमान्य करीत असल्याचे ऐकून तरी या हल्ल्यात क्षती पोहोचलेल्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटेल.
संसदेवर हल्ला करून संसदेचे किंबहुना संपूर्ण देशाचेच पावित्र्य आणि शांतता भंग करणार्‍या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावून बरेच दिवस उलटले. परंतू दुर्दैवाने अद्याप यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेने त्वरीत सडेतोड प्रत्युत्तर देऊन चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले हे कौतुकास्पद आहे. मुंबई हल्ल्यातील एकमेव आरोपी अजमल कसाब यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्याच्या फाशी संदर्भात आपला निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, परंतू देशद्रोही, अतिरेक्यांच्या फाशीसाठी इतका विलंब होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा आणि शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. वास्तविक अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या कार्यवाहीसाठी, घातपाती कृत्त्यांबाबत, अतिरेकी कारवायांबाबत, घातक कृत्त्यांबाबत शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून अल्पावधीत निर्णय देणे आवश्यक आहे.
अफजल गुरू याने आपल्याला दिल्लीच्या तिहार कारागृहातून हलवून जम्मू-काश्मिर च्या कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी नुकतीच केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने शासनाकडे काही विचारणा केली आहे. गुरू याने संसदेवर हल्ला करताना हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या तसेच कायमची क्षती झालेल्या सुरक्षा कर्मचारी अथवा संबंधितांच्या कुटुंबियांच्या झालेल्या अवस्थेचा विचार तेव्हा केला नसावा. आपले कुटुंबीय जम्मू-काश्मिर येथे रहात असून आपल्याला भेटण्यासाठी येथे येणे त्यांना अडचणीचे होत असल्यामुळे आपल्याला जम्मू-काश्मिर कारागृहात हलविण्यात  यावे अशी मागणी त्याने केली आहे. संसदेवरील हल्ल्यात क्षती झालेल्या कुटुंबियांना तर त्यांच्या व्यक्तीस कायमचे गमवावे लागले आहे. त्यांची व्यक्ती त्यांना पुन्हा कधीही न भेटण्यासाठी देशासाठी बलिदान देऊन भारतमातेच्या कुशीत सामावली आहे. शासनाने याचे भान ठेवून गुरू याची कोणतीही मागणी मान्य न केल्यास खरोखर शहाणपणाचा निर्णय ठरेल, हाच विश्वास!
देशात झालेले अतिरेकी हल्ले:
१२ मार्च १९९३ - मुंबई - २५७ ठार
१४ फेब्रुवारी १९९८ -  कोईम्बतूर - ४६ ठार
१ ऑक्‍टोबर २००१ - जम्मू-काश्‍मीर विधानभवन - ३५ ठार
१३ डिसेंबर २००१ - नवी दिल्ली येथे भारतीय संसदेवर हल्ला
२४ सप्टेंबर २००२ - अक्षरधाम मंदिरावर हल्ला - ३१ ठार
१४ मे २००३ - जम्मूच्या लष्करी तळावर हल्ला - ३० ठार
२५ ऑगस्ट २००३ - मुंबईत कार बॉम्बचा स्फोट - ५२ ठार
१५ ऑगस्ट २००४ - आसाममध्ये स्फोट - १६ ठार
५ जुलै २००५ - अयोध्येत हल्ला
२९ ऑक्‍टोबर २००५- नवी दिल्ली तीन जागी बॉम्बस्फोट - ७० ठार
७ मार्च २००६ - वाराणसी येथे बॉम्बस्फोट - २१ ठार
११ जुलै २००६ - मुंबई लोकल रेल्वेगाड्यांत सात बॉम्बस्फोट - सुमारे २०० पेक्षा अधिक ठार
८ सप्टेंबर २००६ - मालेगाव मशिदीत बॉम्बस्फोट - ३७ ठार, सुमारे १२५ पेक्षा अधिक जखमी
१८ मे २००७ - हैदराबाद मक्‍का मशिदीवर हल्ला - ४ पोलिसांसह १३ ठार
२५ ऑगस्ट २००७- हैदराबाद लुम्बिनी पार्कमध्ये स्फोट - ४२ ठार
१३ मे २००८ - जयपूर - बॉम्बस्फोटांची मालिका - सुमारे १०० पेक्षा अधिक ठार

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

शुक्रवारी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या रविवारी दि. १३ फेब्रुवारी, २०११ रोजी मुंबई सायक्लोथोनचे (Tour-de-Mumbai-2011) आयोजन करण्यात आले आहे. या सायक्लोथोनचे प्रमुख आयोजक असलेल्या आय. डी. स्पोर्ट्सच्या वतीने सायक्लोथोन च्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध फशन डिझायनर नीता लुल्ला यांच्या कलेक्शनचा फेशन शो नुकताच मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी ramp वर सायकल चालवून उपस्थिताना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि सायकल चालवण्याचे महत्व सांगितले. सायक्लोथोन मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, नीता लुल्ला आणि आय. डी. स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अकिल खान उपस्थित होते.

झाडावरील नारळ काढण्याची समस्या


IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
पर्यावरण संतूलनासाठी गेल्या काही वर्षात लोक चांगलेच जागरूक झाले असून घरासमोर विविध झाडे, वेली, वृक्ष लावून पर्यावरणावरचे आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी नारळाचे वृक्ष देखील लावण्यात आले असून ठिकठिकाणाच्या नारळाच्या झाडांना फळे लागत असल्याचे दिसते. परंतू नारळाची झाडे बरीच उंच असल्यामुळे झाडाला लागलेली फळं काढता येणे शक्य होत नाही. झाडावरील फळं (शहाळे) काढण्यासाठी नारळाच्या झाडावर चढणारे भरपूर पैसे घेत असल्याची तक्रार असून यापेक्षा फळ झाडावरच असलेले चांगले अशी भावना लोकांची झाली आहे.

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

टीम से बाहर रखनें पर "हसी" को 'हसी'...

आगामी विश्वचषक क्रिकेट मैचों से ऑस्ट्रेलिया टीम के फ़िल्डर मायकल हसी इन्हें बाहर रखा गया है। चयन समिती के इस निर्णय से हसी को हसी आयी है। इंग्लैंड के ख़िलाफ एकदिवसीय मैच में हसी ज़खमी हुए थे। उनकी इस ज़खम से खिलवाड कर चयन समिती नें हसी इनके दिल को ठेंस पहुचाई है, और समिती के निर्णय पर हसी आ रही है, ऐसा श्रीमान हसी इन्होंनें वक्तव्य किया है।

इंदूरच्या किमान तापमानात वाढ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
११ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेल्या इंदूर शहराच्या किमान तापमानात गेल्या दोन दिवसापासून दोन अंशांनी वाढ झाली असून काल (ता. ९) शहराचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसाचे तापमान  देखील वाढतच असून रात्री देखील काही घरांमध्ये पंखे सुरू करण्याची गरज भासत आहे.

सिडकोतर्फे औरंगाबाद झालरक्षेत्राचा विकास आराखडा प्रसिद्ध

औरंगाबाद, ता. ९ - सिडकोने औरंगाबाद महानगर पालिका हद्दीलगत २८ गावातील १५००० हेक्टर क्षेत्राच्या औरंगाबाद झालर क्षेत्राकरिता प्रारूप विकास आराखडा ३ फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध केला आहे.
या आराखड्यात समाविष्ट प्रस्ताव, तपशिलात्मक अहवाल आणि विकास नियंत्रण नियमावली संदर्भात इच्छुकांकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी ७ फेब्रुवारी २०११ रोजी वृत्तपत्रांमधून जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. शासनपत्रात ही जाहीर सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात इच्छुकांनी आपल्या सूचना व हरकती सादर कराव्यात. हा प्रारूप विकास आराखडा अवलोकनार्थ सिडको च्या निर्मल, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात तसेच नियोजन विभाग, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई आणि सिडको कार्यालय,  नवीन औरंगाबाद येथे उपलब्ध आहे.
तसेच हा आराखडा परिशिलनाकरिता जिल्हाधिकारी औरंगाबाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद मुख्य प्रशासक (नवी शहरे), सिडको नवीन औरंगाबाद, उपसंचालक, नगर नियोजन विभाग, औरंगाबाद, सहाय्यक संचालक, नगर नियोजन विभाग औरंगाबाद, तहसिलदार औरंगाबाद आणि संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
प्रारूप आराखड्याचा प्रस्ताव, नियमावली आदी तपशिलासह अध्ययनाकरिता सिडकोच्या संकेत स्थळावर (www.cidcoindia.com) औरंगाबाद फ्रिंज एरिया लिंकवरून डाऊनलोड करता येईल. हा संपूर्ण आराखडा विक्रीकरिता सिडको कार्यालय नवीन औरंगाबाद येथेही उपलब्ध आहे. या संदर्भातील आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात मुख्य प्रशासक (नवीन शहरे), सिडको कार्यालय, उद्योग भवन, नवीन औरंगाबाद येथे सादर कराव्या, असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

फुलला वसंत...

वसंत पंचमी म्हणजेच प्रफुल्लित मन, टवटवी, हिवाळ्याने सुस्तावलेल्या चराचर सृष्टीला ऊब देऊन फुलं उमलली नाहीत, कोकिळेचे कुंजन आणि सृष्टीचे गुंजन स्वर ऐकू आले नाहीत, तर नवलच...!!!
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

राज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविणार

मुंबई, ता. ७ - राज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याची तसेच काही पथकर नाके बंद करण्याची शिफारस आज संबंधित समित्यांनी प्रस्तावित केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पथकराचे धोरण अधिक पारदर्शी होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा आवश्यक असल्याचे सुचविले होते. त्या अनुशंगाने शासनाने तीन स्वतंत्र समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्यांची बैठक गेल्या महिन्यात श्री. भुजबळ यांनी दोनदा घेतली होती. आज सायंकाळी रामटेक निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या समित्यांनी केलेल्या शिफारशींची माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, की खाजगीकरणाचे धोरण व पथकर प्रणाली रस्त्यांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर देशात वापरली जाते. राज्यातही या पद्धतीचा अवलंब करून सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्पही राज्यातच राबविला गेला. या धोरणामुळे रस्ते विकासात खाजगी गुंतवणूक होऊन राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद कमी वाहतुक असलेल्या रस्त्यांकडे (ग्रामीण मार्ग, अन्य जिल्हा मार्ग इ.) वळविणे शक्य होते. श्री. हजारे यांच्या सूचनेनुसार, खाजगीकरणांतर्गत प्रकल्पांमधील पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या पथकर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करण्याविषयी आणि पथकर स्थानकांवरील  अडचणी दूर करून वाहतुकीस अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याविषयीच्या स्वतंत्र ३ समित्यांची स्थापनाने शासनाने केली. यात मुख्य अभियंता स्तरावरील अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली असून त्यात डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, खाजगीकरण वि षयातील तज्ज्ञ तसेच सुचविण्यात आलेले प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या समित्या अभ्यास करीत आहेत.
राज्यातील विविध पथकर स्थानकांवर दररोज जमा होणार्‍या पथकराची एकत्रित माहिती शासनाकडे उपलब्ध होण्यासाठी 'सी-डॅक' ने विकसित केलेली संगणक प्रणाली वापरावी आणि ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करावी. काही मोठ्या पथकर स्थानकांवर सुरवातीस प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर गोळा करावा. प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेऊन ही प्रणाली संपूर्ण राज्यभर बसविण्याची शिफारस पहिल्या समितीने केली आहे.
राज्यात ई-टॅग योजना अंमलात आणून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पथकर वसुली करण्यासंबंधी कार्यवाही करावी. जेणे करून प्रवाशांचा वेळ पथकर स्थानकांवर वाया जाणार नाही. प्रारंभी मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे औरंगाबाद जालना रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू तसेच मुंबईतील एंट्री पॉईंट्स येथे प्रायोगिक तत्वावर राबवावी असे प्रस्तावित केले आहे. यातील अडचणी जाणून नंतर राज्यभर ही योजना राबवावी अशी शिफारस दुसर्‍या समितीने केली आहे.
तिसर्‍या समितीने राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ५६ पथकर नाके, राष्ट्रीय महामार्गावरील २८ पथकर नाके व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील ६१ पथकर नाके अशा एकूण १६५ पथकर स्थानकांचा अभ्यास केला. या नाक्यांदरम्यानच्या अंतराचा अभ्यास करून काही नाकी बंद करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पथकर नाक्यांवर काही सुविधा व सुधारणाही प्रस्तावित केल्या असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

लवकरच मासिक राशीभविष्य...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community आपल्या सर्व वाचक, मित्रमंडळी, हितचिंतक आणि ज्येष्ठ श्रेष्ठांच्या छान प्रतिसादामुळे या छोट्याशा ब्लॉगवर आणखी काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचे मासिक राशीभविष्य यापुढे आपणांस दरमहा या ब्लॉगवर वाचता येईल.
धन्यवाद..

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...