बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

वाराणसी ब्लास्ट- पुन्हा शांत का आहे सरकार?

वाराणसी येथे काल (ता. ७) संध्याकाळी बॉम्बस्फोट होऊन दोन ठार तर सुमारे २५ जखमी झाले. दोन जीवंत बॉम्ब जप्त करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी दोन संशयितांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी एका अतिरेकी संघटनेने स्वीकारल्यानंतर देखील सरकारने कठोर पावले उचलण्याऐवजी केवळ शांततेचे आवाहन केले आहे.  मुंबईवर २६-११ चा भीषण हल्ला होऊन देखील तेव्हा संधी असूनही आणि पुरावे उपलब्ध असून देखील पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा या माध्यमातून संधी आहे. सरकारने शांत न बसता काहीतरी करण्याची गरज आहे.

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त

1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
   2. के.व्ही.के. सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
   3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
   4. डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
   5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जुन १९७७
   6. एक्स.एल. शकधर : १८ जुन १९७७ ते १७ जुन १९८२
   7. आर.के. त्रिवेदी : १८ जुन १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
   8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
   9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
  10. टी.एन. शेषन् : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
  11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जुन २००१
  12. जे. एम. लिंगदोह : १४ जुन २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
  13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
  14. बी.बी. टंडन : १६ मे २००५ to २८ जुन २००६
  15. एन. गोपालस्वामी : २९ जुन २००६ ते १९ एप्रिल २००९
  16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ पासून अद्याप...
यापैकी टी. एन. शेषन् यांनी निवडणूक आयोगाचे महत्व शासन व मतदारांना पटवून दिल्यापासून नागरीक निवडणूक आयोगाबाबत जागरूक झाले. टी. एन. शेषन् यांची कारकीर्द महत्वाची मानली जाते.

मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर

मुंबई, ता. ६- लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोहर जोशी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तसेच शिवसैनिकांनी जोशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.  माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही श्री. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.

सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आशेला पालवी

(वृत्तसंस्था)- अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरूंगात जीवंतपणीच जगण्याची आशा मावळलेल्या भारतीय वंशाच्या सरबजितसिंग याच्या जगण्याच्या आणि तुरूंगातून सुटका होण्याच्या आशेला पालवी फुटली आहे. त्याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
काही वर्षांपूर्वी लाहोर येथील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरबजितसिंग याला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित प्रकरणात मनजितसिंग ही व्यक्ती खरा आरोपी असल्याचे सरबजितसिंग याचे वकील ओवेस शेख यांनी सांगितले असून ते लवकरच तसे पुरावे देखील न्यायालयात सादर करणार आहेत. मनजितसिंग सुमारे तीन वर्षे कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असून, तो बॉम्बस्फोटाच्या वेळी लाहोरमध्ये होता असे पुरावे सापडल्याचे शेख यांनी सांगितले. सरबजितसिंग याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी भेटवस्तू बनविल्या असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीडी प्रकाशन

जन्माचे सार्थक झाले भीमा तुझ्यामुळे या सीडीचे अनावरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रमोद हिंदूराव

सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

नागपूर, ता. ५- अमृतसर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय  खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री व खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या मुलींनी या स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ दाखवत आपली चुणूक दाखविली आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. कर्णधार निकिता पवार, प्राजक्ता कुचेकर, पौर्णिमा सपकाळ आदींचा संघात समावेश होता. चंद्रकांत कांबळी यांनी मार्गदर्शक म्हणून तर एस. जी. भास्करे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

नवीन पनवेल येथे शहीद तुषार चव्हाण उद्यानाचे पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते उदघाटन

नवीन पनवेल, ता. ५- येथील सेक्टर-११ मध्ये लेफ्टनंट तुषार शामराव चव्हाण नूतनीकृत उद्यानाचे राज्याचे जलसंपदामंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी श्री. तटकरे म्हणाले, की भविष्यातील गरज ओळखून भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सिडकोचा भर आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्यामुळे सिडकोची जबाबदारी भविष्यात वाढणार आहे. नवी मुंबईचा विकास करताना सिडकोने प्रामुख्याने लोकोपयोगी मोकळ्या जागेवर सौंदर्यात भर घालणार्‍या उद्यानांची निर्मिती केल्यामुळे आजचा क्षण आपण पहात आहोत.
सिडकोचे अध्यक्ष नकूल पाटील म्हणाले, की नवीन पनवेल येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता सकारात्मक विचार केला जात आहे. कार्यक्रमास नगरपरिषद अध्यक्ष सुनिल मोहोड, नगरसेविका शशिकला सिंह, शहीद लेफ्टनंट चव्हाण यांचे आई-वडिल, सिडकोचे मुख्य अभियंता ए. एस. पाटील, अतिरिक्त मुख्य अभियंता संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे, उद्यान अधिकारी टी. आर. कांबळे आदी उपस्थित होते. आभार सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी केले.

जैतापूर प्रकल्पामुळे कोणतीही हानी नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, ता. ५- जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. विधान परिषद अधिवेशन प्रसंगी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी पवार यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीत एका प्रश्नावर आपले मत व्यक्त केले.
जैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नसून नागरीकांचा फायदाच होणार आहे. अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनीही या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्याला डिसेंबर २०१२ पर्यंत भारनियमनमुक्त करण्याचे शासनाचे नियोजन आहे. राज्याच्या विविध भागात कार्यान्वित होणार्‍या नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे राज्याला वीज उपलब्ध होईल. याचबरोबर वाढीव वीज मिळण्याची विनंती देखील केंद्राकडे करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. फीडर सेपरेशन, सिंगल फेजिंग आदी सुधारणाही केल्या जात आहेत. दरवर्षी होणारी विजेची मागणी ध्यानात ठेवूनच नियोजन करण्यात आले आहे.
आपले मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चांगले ट्यूनिंग असून त्यांच्या संसदेच्या अनुभवामुळे राज्यातील जनतेला चांगला रिझल्ट मिळेल असे पवार यांनी सांगितले. यावेळी सुयोग शिबिर प्रमुख प्रविण पुरो, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक शिवाजी मानकर उपस्थित होते.

मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही-भुजबळ

नागपूर, ता. ५- मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेतून पाच डिसेंबरला निवृत्त होणार्‍या अकरा सदस्यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानपरिषदेचे अकरा सदस्य पाच डिसेंबरला निवृत्त होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भुजबळ यांच्या मनोगतावर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा रोख भुजबळ यांच्याकडेच असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न श्री. रावते यांनी केला. यावर भुजबळ यांनी त्यांच्या टिप्पणीवर बोलताना म्हणाले, की अभिनय ही एक अभिजात कला आहे. ती कोणालाही सहजसाध्य नाही. नाट्य आणि नाटकीपणा यातही फरक असतो. माझ्या या नाट्यामुळेच मी २५ वर्षे तुमचा नेता होतो. विरोधी पक्षनेता बनलो आणि सत्तारूढ पक्षाला धारेवर धरले ते देखील याच नाट्याच्या जोरावर, याचं भान असू द्या. मला जे जमलं ते सगळ्यांनाच जमेल असे नाही.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य डॉ. एन. पी. हिराणी यांच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकताना, डॉ. हिराणी हे उत्तम नाट्य अभिनेते आहेत, मात्र त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यात कधीही नाटकीपणा जाणवू दिला नाही या शब्दात त्यांचे कौतुक केले. यानंतर नाट्य विषयावर शिवसेना नेते रावते व भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सुमारे तीस वर्षे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य राहिलेल्या बी. टी. देशमुख यांना काही उद्योजकांच्या विरोधी प्रयत्नांमुळे निवडणूकीत निवडून येण्यापासून वंचित रहावे लागल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या माध्यमातून विधीमंडळात थेट प्रवेश न करू शकणार्‍या विविध क्षेत्रातील विद्वान, तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ कायदेमंडळास व्हावा या दृष्टीने विधान परिषद सभागृहाची रचना करण्यात आली आहे. परंतू, या सभागृहापासून सरस्वतीपुत्र दूर रहायला लागले आणि लक्ष्मीपुत्रच पुढे येऊ लागल्यास व्यासपीठाचे औचित्य आणि पावित्र्य राहणार नाही अशी भीती श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...