बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात येडियुरप्पा यशस्वी

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याला पदउतार करण्याच्या पक्षाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान देऊन बुद्धीकौशल्याने यातून सोडवणूक करून घेतली.
भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर दबाव वाढत होता. दरम्यान भूखंड गैरव्यवहारात नाव गोवले जाताच, येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते. यामुळे येडियुरप्पा यांची बाजू आणखी मजबूत झाली. या प्रकरणी त्यांना चर्चेसाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्ली येथे बोलावले असता, प्रारंभी स्वतः न जाता त्यांचे दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे पाठवून चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी श्री. येडियुरप्पा पुट्टूपूर्ती येथे जाऊन सत्यसाईबाबा यांच्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी यानंतर दिल्ली गाठून माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि रेड्डी यांच्या घोटाळ्याच्या फाइलीच सोबत ठेवल्या होत्या.
पक्षनेत्यांनी दिलेला आदेश पाळू अशी भूमिका कायम ठेवून अन्यथा पाठिंबा काढून घेण्याबाबत खडसावायला सुद्धा ते विसरले नाहीत. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या खासदारांनीही पाठिंबा जाहीर केला असून आपले नाणे खणखणीत असल्याचे येडियुरप्पा यांनी सिद्ध केले आहे.

बिहारमध्ये नितीशच्या नीतिची सरशी- १८४ जागांवर यश

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (संयुक्त) आणि भाजपा युतीने लढविलेल्या निवडणुकीत युतीला १८४ जागांवर यश मिळाले. विविध राजकीय पक्षांनी देखील नितीशकुमार यांना यशाचे धनी म्हणून श्रेय दिले आहे.
नितीशकुमार यांच्या काळात कायदा सुव्यवस्था सुधारल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नितीशकुमार यांनी खरोखरच विकास केला असून येत्या काही वर्षात बिहार राज्याविषयी असलेली मलिन प्रतिमा पुसली जाईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. विकासाच्या राजकारणालाच नागरिकांनी कौल दिल्याचे मत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची हॅट-ट्रिक गाठणार आहेत. यापूर्वी २००५ मध्ये देखील ते बिहारचे मुख्यमंत्री होते. परंतु २००० मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे अवघ्या सात दिवसातच त्यांना राजीनामा देणे भाग पडले होते. अभियंता असलेले नितीश उच्च विद्या विभूषित असल्यामुळे बिहारचे दिवस नक्की बदलतील असा ज्येष्ठ नागरिकांना देखील विश्वास आहे.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हिवाळी अधिवेशन निवासव्यवस्थेबाबत भुजबळ यांनी घेतला आढावा

नागपूर, ता. २१- येत्या १ डिसेंबरपासून नागपूर येते सुरू होत असलेल्या विधीमंडळ-हिवाळी अधिवेशनाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत आढावा घेतला. यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पीठासन अधिकार्‍यांच्या निवासस्थानांखेरीज यंदाही, रवीभवन येथे २४ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कमर्चारी यांच्यासाठी निवासव्यवस्था पूर्ववत राहील. कर्मचार्‍यांसाठी १६० सह ६४ अतिरिक्त निवासी गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींची निवास व्यवस्था देखील 'सुयोग' येथे करण्यात आल्याचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव, विविध विभाग वरिष्ठ अधिकारी, नागपूर येथील स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

विक्रोळी रेल्वे अपघात प्रकरणी शासनाकडून दखल पंधरा दिवसात संयुक्त बैठक: भुजबळ

मुंबई, ता. २२- विक्रोळी येथे रविवारी झालेल्या रेल्वे अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून पंधरा दिवसात यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासह महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
विक्रोळी येथील रेल्वे अपघात प्रकरणी मंत्रालयातील दालनात श्री. भुजबळ यांनी आज बैठक घेतली. दुर्लक्ष करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार राज्य शासनास असल्याचे भुजबळ यांनी रेल्वेला बजावले. यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबई महानगरमध्ये दरवर्षी सरासरी चार हजारपेक्षा अधिक व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. सुमारे २५०० व्यक्ती अपंग होतात. म्हणजेच दररोज सरासरी ११ ते १२ व्यक्ती मृत्युमुखी पडतात, पाच ते सहा व्यक्ती अपंग होतात. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. विक्रोळीसारखी अशी जी ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विक्रोळी येथील या ठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्याची प्रक्रिया येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षणही पूर्ण व्हावे. बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रशासन अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान काल (ता. २१) विक्रोळी स्थानकात संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळे रेल्वेची उपनगरी व मेल एक्सप्रेस सेवा सुमारे चार तास ठप्प झाली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील, रेल्वे पोलिसांनी याप्रश्नी दिलेल्या आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.

भारताची ३७३ धावांची आघाडी: डाव घोषित

नागपूर, ता. २१- राहुल द्रविडने केलेल्या १९१ धावा आणि महेंद्र धोनी याने त्याला दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे आज भारताने ५६६ धावा करून आपला डाव घोषित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात आज सकाळीच सचिन तेंडुलकरने अवघ्या चार धावा काढून काही मिनिटातच मैदानातून परतला. सचिन आज आपले पन्नासवे शतक झळकावणार असे सगळ्यांनाच वाटत असताना चार धावा काढून ६१ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले होते. यानंतर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सुरेख खेळून द्रविड १९१ तर धोनीने ९८ धावा काढल्या. यात द्रविड याने एकूण २१ चौकार मारून आपले एकतिसावे शतक पूर्ण केले.

येडियुरप्पा अखेर दिल्लीकडे..

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज (ता. २२) दुपारी हे वृत्त लिहिपर्यंत दिल्लीकडे रवाना झाले. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना रविवारीच दिल्ली येथे बोलावले होते, परंतु ते दिल्ली येथे न जाता पुट्टूपूर्ती येथे सत्य साईबाबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व सत्य साई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी येडियुरप्पा यांनी आपले दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे चर्चेसाठी पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त होते. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना पक्षाने याप्रकरणी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. दरम्यान भूखंड प्रकरण चव्हाट्यावर येताच येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनामा देऊन पदच्युत व्हावे लागले. हे प्रकरण शमत नाही तोच येडियुरप्पा यांचे प्रकरण समोर आले.

सचिनच्या चाहत्यांची निराशा- शतक हुकले

नागपूर, ता. २१- फटकेबाज सचिन तेंडुलकरचे आज शकत हुकल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. नागपूर येथे सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात काल खेळ थांबला तेव्हा सचिनच्या ५७ धावा झाल्या होत्या. आज सचिन शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतु आज सचिन केवळ आणखी चार धावांची भर घालून अवघ्या ६१ धावांवर बाद झाला. त्याला न्यूझीलंडच्या अँडी मॅके याने बाद केले. सचिनचे होणारे शतक हे पन्नासवे शतक असल्यामुळे आज तो आपले ५० वे शतक नागपूर येथे पूर्ण करेल असे दिग्गजांसह त्याच्या चाहत्यांना देखील वाटत होते.

अकाली पावसाच्या नुकसानीचा लवकरच पंचनामा

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अकाली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन, लवकरच पंचनामा देखील करण्यात येईल. यानंतर आर्थिक मदत देण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

फुले दाम्पत्याचे विचार आजही मार्गदर्शक- के. शंकरनारायणन्

मुंबई, ता. २१- देशातील सामाजिक तसेच आर्थितक विषमता दूर करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. असे प्रतिपादन राज्यापाल के. शंकरनारायणन् यांनी केले.
वांद्रे (पश्चिम) येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संकुलात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, की देशाला महासत्ता बनविण्यासाठी, परिवर्तनाची मोठी आवश्यकता आहे. दैनंदिन जीनवात आपण सातत्याने छोटेमोठे बदल स्वीकारतो. मात्र, तेव्हाच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल देखील वेळोवेळी स्वीकारले पाहिजे. यासाठी आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची गरज असून हे केवळ फुले दाम्पत्याच्या विचारांमधूनच शक्य आहे. आजच्या महिला आणि विद्यार्थीनी यांनी फुले दाम्पत्याचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहात. महात्मा फुले पायाभूत सुविधांचे एक कृतीशील विकासक होते.
गुलामगिरी, शेतकर्‍याचा असूड आदी पुस्तकांबरोबरच मंडळी आणि सत्यशोधक समाज संस्था आदी माध्यमातूनही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा, विचारांचा प्रसार केला. त्यांनी मांडलेले त्री-भाषा सूत्र आज संपूर्ण भारतात वापरले जात आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. देशात  विकास घडवून आणण्यासाठी युवा पिढीने फुले दाम्पत्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून सामाजिक  परिवर्तनाचे दूर बनले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले. आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले.

कांद्यामुळे रडणे काय, आता कांदाच विसरा...

अकाली पावसामुळे यंदा राज्यात ठिकठिकाणी कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. परिणामी ऐन हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला. याचबरोबर जेवणाची चवही बदलली. मध्यंतरी, कांदा ५० रुपयांपर्यंत महाग होणार, या शक्यतेने रडू कोसळले. परंतु आता मात्र शिल्लक चांगल्या प्रतीचा कांदा रुपयांची शंभरी गाठणार असल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्यामुळे रडणे सोडाच, रडून-रडून डोळेही कोरडे झाले असून कांदा विसरण्याचीच वेळ आली आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...