मुंबई, ता. २२- विक्रोळी येथे रविवारी झालेल्या रेल्वे अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्याची शासनाने गंभीर दखल घेतली असून पंधरा दिवसात यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यासह महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
विक्रोळी येथील रेल्वे अपघात प्रकरणी मंत्रालयातील दालनात श्री. भुजबळ यांनी आज बैठक घेतली. दुर्लक्ष करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार राज्य शासनास असल्याचे भुजबळ यांनी रेल्वेला बजावले. यावेळी भुजबळ म्हणाले की, मुंबई महानगरमध्ये दरवर्षी सरासरी चार हजारपेक्षा अधिक व्यक्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. सुमारे २५०० व्यक्ती अपंग होतात. म्हणजेच दररोज सरासरी ११ ते १२ व्यक्ती मृत्युमुखी पडतात, पाच ते सहा व्यक्ती अपंग होतात. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. विक्रोळीसारखी अशी जी ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विक्रोळी येथील या ठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्याची प्रक्रिया येत्या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षणही पूर्ण व्हावे. बैठकीस गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह रेल्वेचे प्रशासन अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान काल (ता. २१) विक्रोळी स्थानकात संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यामुळे रेल्वेची उपनगरी व मेल एक्सप्रेस सेवा सुमारे चार तास ठप्प झाली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील, रेल्वे पोलिसांनी याप्रश्नी दिलेल्या आश्वासनानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०
भारताची ३७३ धावांची आघाडी: डाव घोषित
नागपूर, ता. २१- राहुल द्रविडने केलेल्या १९१ धावा आणि महेंद्र धोनी याने त्याला दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे आज भारताने ५६६ धावा करून आपला डाव घोषित केला. नागपूर येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात आज सकाळीच सचिन तेंडुलकरने अवघ्या चार धावा काढून काही मिनिटातच मैदानातून परतला. सचिन आज आपले पन्नासवे शतक झळकावणार असे सगळ्यांनाच वाटत असताना चार धावा काढून ६१ धावांवर बाद झाल्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले होते. यानंतर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सुरेख खेळून द्रविड १९१ तर धोनीने ९८ धावा काढल्या. यात द्रविड याने एकूण २१ चौकार मारून आपले एकतिसावे शतक पूर्ण केले.
येडियुरप्पा अखेर दिल्लीकडे..
भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज (ता. २२) दुपारी हे वृत्त लिहिपर्यंत दिल्लीकडे रवाना झाले. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना रविवारीच दिल्ली येथे बोलावले होते, परंतु ते दिल्ली येथे न जाता पुट्टूपूर्ती येथे सत्य साईबाबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व सत्य साई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी येडियुरप्पा यांनी आपले दोन विश्वासू मंत्री दिल्ली येथे चर्चेसाठी पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त होते. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना पक्षाने याप्रकरणी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. दरम्यान भूखंड प्रकरण चव्हाट्यावर येताच येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या ताब्यातील भूखंड शासनास परत केले होते.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनामा देऊन पदच्युत व्हावे लागले. हे प्रकरण शमत नाही तोच येडियुरप्पा यांचे प्रकरण समोर आले.

सचिनच्या चाहत्यांची निराशा- शतक हुकले
नागपूर, ता. २१- फटकेबाज सचिन तेंडुलकरचे आज शकत हुकल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. नागपूर येथे सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात काल खेळ थांबला तेव्हा सचिनच्या ५७ धावा झाल्या होत्या. आज सचिन शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा अनेकांना होती. परंतु आज सचिन केवळ आणखी चार धावांची भर घालून अवघ्या ६१ धावांवर बाद झाला. त्याला न्यूझीलंडच्या अँडी मॅके याने बाद केले. सचिनचे होणारे शतक हे पन्नासवे शतक असल्यामुळे आज तो आपले ५० वे शतक नागपूर येथे पूर्ण करेल असे दिग्गजांसह त्याच्या चाहत्यांना देखील वाटत होते.
अकाली पावसाच्या नुकसानीचा लवकरच पंचनामा
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अकाली पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन, लवकरच पंचनामा देखील करण्यात येईल. यानंतर आर्थिक मदत देण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
फुले दाम्पत्याचे विचार आजही मार्गदर्शक- के. शंकरनारायणन्
मुंबई, ता. २१- देशातील सामाजिक तसेच आर्थितक विषमता दूर करण्यासाठी सकारात्मक परिवर्तनाची गरज आहे. यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. असे प्रतिपादन राज्यापाल के. शंकरनारायणन् यांनी केले.
वांद्रे (पश्चिम) येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या संकुलात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले, की देशाला महासत्ता बनविण्यासाठी, परिवर्तनाची मोठी आवश्यकता आहे. दैनंदिन जीनवात आपण सातत्याने छोटेमोठे बदल स्वीकारतो. मात्र, तेव्हाच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल देखील वेळोवेळी स्वीकारले पाहिजे. यासाठी आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची गरज असून हे केवळ फुले दाम्पत्याच्या विचारांमधूनच शक्य आहे. आजच्या महिला आणि विद्यार्थीनी यांनी फुले दाम्पत्याचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज आपण सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने वावरत आहात. महात्मा फुले पायाभूत सुविधांचे एक कृतीशील विकासक होते.
गुलामगिरी, शेतकर्याचा असूड आदी पुस्तकांबरोबरच मंडळी आणि सत्यशोधक समाज संस्था आदी माध्यमातूनही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा, विचारांचा प्रसार केला. त्यांनी मांडलेले त्री-भाषा सूत्र आज संपूर्ण भारतात वापरले जात आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. देशात विकास घडवून आणण्यासाठी युवा पिढीने फुले दाम्पत्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून सामाजिक परिवर्तनाचे दूर बनले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले. आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले.

कांद्यामुळे रडणे काय, आता कांदाच विसरा...
अकाली पावसामुळे यंदा राज्यात ठिकठिकाणी कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागला. परिणामी ऐन हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला. याचबरोबर जेवणाची चवही बदलली. मध्यंतरी, कांदा ५० रुपयांपर्यंत महाग होणार, या शक्यतेने रडू कोसळले. परंतु आता मात्र शिल्लक चांगल्या प्रतीचा कांदा रुपयांची शंभरी गाठणार असल्याचे वृत्त आहे. परिणामी कांद्यामुळे रडणे सोडाच, रडून-रडून डोळेही कोरडे झाले असून कांदा विसरण्याचीच वेळ आली आहे.
शनिवार, २० नोव्हेंबर, २०१०
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०
'कसाब' चा पुळका कशाला "साब"...
![]() |
| (संग्रहित छायाचित्र) |
संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत मुंबईतील महत्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन बेछुट गोळीबार करून देशाच्या अनेक नागरिकांना आणि कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देणार्या अधिकार्यांना देखील मारणार्या नराधम अतिरेक्यांपैकी कसाब हा एक अतिरेकी सुरक्षा पथकांच्या हाती जखमी अवस्थेत जीवंत सापडला. रुग्णालयातून उपचार घेऊन बरा झाल्यानंतर कसाबची रवानगी तुरुंगात करण्यात येऊन त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. स्वतंत्र सेल, स्क्वॉड, यंत्रणा..सर्वच अगदी स्वतंत्र..। खरंतर प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेर्यांनी कसाब याने गोळी झाडताना दाखविल्याची चित्रफीत उपलब्ध असताना आणखी पुरावे मागण्याची मुळात गरजच काय?
कसाब याचे जेवण, राहणी, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तैनाती, वाहतूक, वहन, तपासण्या, विशेष वकील इ.वर दररोज लाखो रुपये खर्च झाला असून हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात तर कधीच पोहोचला आहे. मध्यंतर तो तुरुंगाधिकार्यांशी वाईट वागला, कुटे थुंकला, तरीही सर्व काही निमुटपणे सहन करायचे..। इतकी सन्मानाची वागणूक त्याला कशाला हवी? पाकिस्तानमधील भारतीय वंशाच्या लोकांना अथवा भारतीय कैद्यांना मिळणारी वागणूक शासनाने ध्यानात घेणे नितांत गरजेचे आहे. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची देखील अनेक उदाहरणे आजकाल समोर येत आहेत. परंतु इतक्या मोठ्या देशद्रोह्याला, अतिरेक्याला पोलिस संरक्षणाची गरजच का? कसाबकडून मिळवायची तेवढी माहिती घेणे पूर्ण झाल्याचे सुरक्षा यंत्रणेचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याला जनतेच्या सुपूर्द करणे अथवा लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे आवश्यक ठरले आहे. दोन वर्ष उलटून देखील अद्याप त्यावर निर्णय न होऊ शकणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.
अतिरेकी, देशद्रोही यांच्यासाठी विशेष कायद्याची तरतूद घटनेत करण्यात यावी. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांना अजिबात पायबंद न बसता उलटपक्षी पोषक वातावरण, परिस्थिती निर्माण होईल. शासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देऊन संभाव्य खर्च टाळण्यात यावा. खर्च होणारी रक्कम शहीदांच्या कुटूंबांना दिल्यास मोठा आधार होऊन, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, हवे तसे शिक्षण घेता येईल, देशाच्या शिलकेत एकप्रकारे भरच पडेल, हाच विश्वास!
केंद्रीय माहितीचा अधिकार : जनतेला सिडको प्रशासनातर्फे आवाहन
सिडको महामंडळातील विविध विभागांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदारांकडून अर्ज प्राप्त होत असतात. परंतु काही अर्जदार आपल्या अर्जावर वा अपिलांवर फक्त माहिती अधिकारी एवढेच नमूद करून, संबंधित अधिकार्याचा हुद्दा अथवा विभागाचे नाव नमूद न करता अर्ज सादर करीत असतात. यामुळे संबंधित विभागाकडून विहीत कालावधीत अपेक्षित असलेली माहिती ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असल्याने संकलन करण्यास अधिक कालावधी लागतो. यामुळे संबंधित विभागाकडून विहित कालावधीलत माहिती उपलब्ध करून देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निर्दर्शनास आले आहे.
उपरोक्त बाब लक्षात घेऊन, सिडको प्रशासनाच्या वतीने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत सादर करायचे अर्ज/अपील- महाव्यवस्थापक (प्रशासन) सिडको भवन, तळमजला, यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील. जनतेच्या सुविधेकरता ही तरतूद येत असून जनतेने कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.
सहाय्यक जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी, आणि अपीलिय माहिती अधिकार्यांची सुधारित यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतचा विस्तृत फलक सिडको भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ तळ मजला येथे लवकरच प्रदर्शित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...