शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०
कथा ई-एज्युकेटेड चोराची...।
दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समिती मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कार्यालयात कॉम्प्यूटरची रॅम (रँडम ऍक्सेस मेमरी) चोरल्यामुळे एका संशयित सफाई कर्मचार्याला ताब्यात घेण्यात आले. बिच्चारा! @ हा सफाई कर्मचारी देखील ई-एज्युकेटेड किंवा माहिती तंत्रज्ञान विषयात प्रवीण असावा, किंवा बेरोजगारीची कुर्हाड याच्यावरही कोसळली असावी. अनेकांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे, आपण हजारांचा भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले? असे याला वाटले असावे आणि कार्यभाग साधला असावा. परंतु मांजर डोळे मिटुन दूध पिताना कोणी ना कोणी त्याला पाहतेच नां...। अगदी तेच केलंय क्लोज-सर्किट कॅमेर्यांच्या डोळ्यांनी...।
शाहीर आत्माराम पाटील यांना एक लाखांच्या मदतीची भुजबळ यांची घोषणा
शाहीर आत्माराम पाटील यांच्या औषधपाण्याचा आणि उपचाराचा खर्च भुजबळ फाऊंडेशनतर्फे केला जाईल. याचबरोबर त्यांना एक लाख रुपयांची मदत देखील दिली जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.
मुंबई येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिरात शाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनाची कहाणी सांगणार्या प्रभाकर ओव्होळ लिखित, "ऐका शाहिराची कथा" या पुस्तकाचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माहिती आयुक्त विजय कुवळेकर, डॉ. रवी बापट, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, या पुस्तकाच्या हजार प्रती शासनाच्या वतीने घेतल्या जातील असे सांगून शाहीर पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शाहीर आत्माराम पाटील म्हणाले की, आपले लेखन समाजासाठी असावे अशी सूचना साने गुरुजींनी केल्यानुसार आपण आजपर्यंत हेच पथ्य पाळत आलो आहोत. यावेळी श्री. कुवळेकर यांनी हा प्रकाशन सोहळा नसून कृतज्ञता समारंभ असल्याचे मत व्यक्त केले.
इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...
इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत.एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याच्या कार्याची भरारी महिलांनी मारली आहे. एकंदर सर्वच बाबतीत महिला अग्रेसर आहेत. मुलांनी मुलांशी आणि मुलींनी मुलींशी फक्त मैत्री करावी, हे विचार आता मागे पडले असून सध्याइंटरनेटच्या काळात मुलं अथवा मुली यांच्यात अंतर फारसे राहिलेले नाही.
मुलं आणि मुलींची मैत्री नाही असे आता अजिबात दिसत नाही. अगदी स्वच्छंदी, निखळ मैत्री या दोघांमध्ये असल्याचे अनेकदा दिसते (काही ठिकाणी विकृतीमुळे अपवादात्मक एकतर्फी काही गोष्टी घडतात, हे वेगळे).
काळ बदलल्याप्रमाणे जुन्या पिढीने सुद्धा हे बदल स्वीकारले असल्याचा हा परिणाम असावा...। जुनी पिढी म्हटली म्हणजे कडक स्वभाव, तिखट, मुलांना नेहमीच डोस देणारी, रागावणारी...वडिलांना तर 'हिटलर' या भावनेनेच पाहण्याकडे मुलांचा जास्त कल असतो, होता। घरात आई-वडिल, ताई-दादा, आजोबा-आजी कोणीही रागावले की मित्राकडे जाऊन किंवा मित्राला हे सर्व सांगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच डोळ्यात साचलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिल्यानंतर मोठ्ठ दडपण कमी झाल्यासारखं पूर्वी वाटत होतं. पण आजकाल इतकं मोठं कुटुंब सुद्धा दिसत नाही, असलं तरी आता हे सर्व दृश्य बदललं असून आज वडिल सुद्धा मुलांशी मित्राच्या नात्याने वागताना दिसतात. आपले बाबा कामावरून घरी परत केव्हा येतात याची वाट आजकाल मुलं पाहतात.
दिवसेंदिवस महागाई सातत्यानेच वाढत असून मुलंही लवकर समजुतदार होत असून, आपल्या पालकांना आपणही काहीतरी हातभार लावावा आणि घर चालवण्यात खारीचा वाटा उचलावा, या उद्देशाने अनेक मुलं-मुली earn and learn अर्थातच शिक्षणाबरोबरच काहीतरी छोटे-मोठे काम करून पैसे मिळवतात. इंटरनेटमुळे तर या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ताटातुट झालेली बहिणभावंडं इंटरनेटच्या माध्यमातून वेबकॅम, चॅटिंगच्या द्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. हो, एक मात्र आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, जी-टॉक मेसेंजर याद्वारे गुगल (सर्च इंजिन), याहू, सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी खातं (ईमेल-आयडी) उघडावं लागतं हे सांगायला नकोच...। खातं या शब्दाऐवजी अकाउंट हा शब्दप्रयोग सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर वाटतो...। असं अकाउंट उघडताना ज्यांना आपल्याशी बोलण्यासाठी आमंत्रित करायचं असेल त्यांचं अकाउंट देखील आपल्या अकाउंटशी जोडणं सक्तीचं आहे. यासाठी फ्रेंड्स-अकाउंट, फ्रेंड्स ची नावं Friends Name, Friends Address, Friend List असे छानसे शब्द वापरले जातात..बहिण असो अथवा भाऊ असो..यांनाही फ्रेंड च्या यादीमध्येच जोडावं लागतं.
"फ्रेंड" या शब्दामुळे दूर गेलेली मित्रमंडळी, बहिण-भाऊ, भावंडं खरंच अगदी क्षणात जवळ येतात, कामावरचं टेन्शन असो, की घरचं टेन्शन असो, दोघेही एकमेकांना सांगून मनं मोकळी करतात. मनात काही न साचल्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा फ्रेश मुडमध्ये कामास सुरवात करू शकतात. फ्रेंड..friend..या शब्दाची फोड आपण free-end..म्हणजेच अगदी न कळत कोणत्याही तणावाचा शेवट...असा इथे समजणे वावगे ठरणार नाही।
काश्मिर प्रश्नाचा एकदाच सोक्षमोक्ष लावावा
वर्षानुवर्ष धुमसत असलेल्या काश्मिर प्रश्नाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी देशातल्या नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या अयोध्या राम-मंदिर बाबरी मशिद यासारख्या संवेदनशील विषयावर न्यायालयाने तोडगा काढून निर्णय दिल्यानंतर ही मागणी जोर धरत आहे.
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०
क्रिडामंत्री गिल यांच्यावर पंतप्रधानांची नाराजी
क्रिडामंत्री श्री. गिल यांच्यावर पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नाराजी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर श्री. गिल यांनी पंतप्रधानांकडे स्कॉटलंड येथे जाण्याची परवानगी मागितली होती. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा स्कॉटलंड येथे होणार असून तेथील तयारीबाबत स्कॉटलंड येथे आपणांस आमंत्रित करण्यात आले असून यासाठी परवानगी द्यावी, असे गिल यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. परंतु पंतप्रधानांनी गिल यांना जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावरुनच पंतप्रधान गिल यांच्यावर नाराज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०
"राष्ट्र-कुल" नंतर होतेय हॉट अर्थातच "गरम"...
![]() | |
| (Kahi Aisa to nahi....) मा. प्रधानमंत्री महोदय : आप मुझसे बात मत करो..। |
"अमेरिका, इंग्लंड, भारत या तीन देशांचे प्रतिनिधी ब्रह्मदेवाकडे जातात आणि विचारतात..देवा, आमच्या देशातला भ्रष्टाचार कधी संपेल?...देव ध्यानस्थ होतो आणि डोळे उघडून अमेरिकेच्या प्रतिनिधीस सांगतो: थोड्याच वर्षात तुमच्या देशातला भ्रष्टाचार संपेल, काळजी करू नका...। इंग्लंडच्या प्रतिनिधीला सांगतो: जरा जास्त कालावधी लागेल...। भारताची वेळ येते तेव्हा ध्यानस्थ झाल्यानंतर बराच वेळ डोळे उघडतच नाही, उघडल्यानंतर देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात..ते पाहून सगळेच अवाक होतात, थोड्या वेळाने भारताचे प्रतिनिधी विचारतात तेव्हा देव सांगतो: काय करू बाबा...। तुमच्या देशातला भ्रष्टाचार जेव्हा संपेल..तेव्हा ते पाहण्यासाठी मी या विश्वात नसेन....।"
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कोणीतरी सांगितलेला हा विनोद आज आठवला...निमित्त आहे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे...। राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारी दरम्यान देण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. यासह निकृष्ट दर्जाचे बांधकाम, काम झाल्याचा देखील आरोप केला जात आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी काही दिवस अगोदर एक मोठा पूल कोसळल्यामुळे सूत्रांनी खडबडून सर्वांना जागे केले, या पुलाचे काम सेनेला देण्यात येऊन ही जबाबदारी सुद्धा पेलून अवघ्या काही तासात देशाच्या सैन्याने मजबूत पूल तयार करून दाखवला...। यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना प्रत्यक्ष सुरवात झाली, यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून दिलेला कारवाईचा इशारा आणि कामांच्या पूर्ततेबाबत केलेली तातडीची कार्यवाही यामुळे कामांना मूर्त स्वरूप आले. राष्ट्रकुल चे सर्वोसर्वा सुरेश कलमाडी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसनेच केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असा इशारा पंतप्रधानांनी दिल्यानुसार स्पर्धा समारोपाच्या दुसर्याच दिवशी हालचालींना सुरवात झाली असून तीन-चार दिवसातच चांगला वेग आला आहे. राष्ट्रकुल' निविदांची कागदपत्रे ताब्यात बांधकामातील घोटाळ्याबाबत या महिनाअखेरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने विविध विभागांना दिले आहेत. दिल्ली महापालिका, दिल्ली विकास प्राधिकरण, केंद्रीय सार्वजनिक विकास खाते या सर्वांना या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या सर्व निविदा प्रक्रियेबाबतची कागदपत्रे गोळा करण्यास प्राप्तिकर विभागाने सुरवात केली आहे. अर्थातच त्यात विविध व्यावसायिकांना देण्यात आलेल्या रकमा तसेच रक्कम देताना वजा केलेला कर, याची माहिती देखील घेण्यात येणार आहे. यासाठी खास पथक नेमण्यात आले असून याचबरोबर एखाद्या प्रकल्पाचा खर्च दाखविताना अतिरिक्त खर्च दाखवून कर टाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचाही संशय आहे, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने स्टेडियमच्या उभारणीपासून त्याला शासन मान्यता अर्थातच ऍक्रिडेशन कार्ड देण्यापर्यंतच्या सर्व निविदांची कागदपत्रं एकत्रित करण्याचे काम सुरू आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी सुरेश कलमाडींवर केलेल्या आरोपांवर श्री. कलमाडी यांनी अप्रत्यक्षपणे, आधी स्वतःच्या राज्यात काय चालले आहे, ते पाहा असेच सांगून एकप्रकारे त्यांना खडसावलेच आहे. स्पर्धा होतात की नाही, स्पर्धा सुरू झाल्यास यशस्वी होतात की नाही? असे अनेक प्रश्नांचा काहुर अनेकांच्या मनात असतानाच राष्ट्रकुल स्पर्धांना सुरवात झाली आणि बारा दिवस स्पर्धा झाल्या, या स्पर्धा यशस्वी झाल्या हे संपूर्ण जगाने इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहिले हे सांगायलाच नको. इतके प्रचंड आयोजन नियोजनबद्ध करणे काही थोडी-थोडकी आणि साधी गोष्ट नाही. हे फेडरेशनतर्फे माइक फेनेल यांनीही स्पष्ट केले.
बहुदा एखाद्या युद्धाचा खर्च व्हावा इतका प्रचंड खर्च (सत्तर हजार करोड रुपये) या स्पर्धा आयोजनात झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली स्टेडियम आता पुढे बहुदा स्वतःची सावलीच पहात राहणार असे सध्याचे तरी चित्र आहे. भ्रष्टाचार संदर्भात करण्यात येणार्या चौकशीमध्ये दोषी आढळतील ते आढळतील. श्री. कलमाडी यांनीही आपण चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. चौकशीअंती ते निर्दोष असल्याचे (खरोखरच) सिद्ध झाल्यास कलमाडी यांची मान उंचावेल यात कोणतेही दुमत नाही. मात्र आपल्याच घरातील सदस्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या लोकांमुळे यानंतर कलमाडी यांनी ताठ मानेने आणि मनाने जगायचे असल्यास पक्षात राहू नये असे मानणारे देखील नागरीक आहेत.
परंतु विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असेल ही शंका मात्र नाकारता येऊ शकत नाही, कारण म्हणतात नां...क्या करें, आदत से मजबूर है..। असे आहे; आग लागल्याशिवाय धूर निघत नाही...। आज संपूर्ण देशात कित्येक ठिकाणी, विभाग, खाती, क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलाय. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा, भ्रष्टाचाराला मान्यताच देऊन टाका..। या शब्दात सरकारवर ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराची कित्येक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, अनेक बाबी न्यायप्रविष्ट आहेत. या सर्वांसाठी एखादे जलद न्यायालय ते सुद्धा भ्रष्टाचार न करता सुरू करून तेथे देखील भ्रष्टाचार न करणार्या न्यायाधीशाची नियुक्ती करून चौकशीत पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे.
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०
दोन बायका: फजिती ऐका!
एक असतो हेडली..त्याला असतात तीन बायका..
पण तीन पैकी दोघींनी केलेली त्याची फजिती ऐका..
एकदा केला त्याने प्लॅन..
म्हणाला, कोणाला सांगाल तर उघडेन तलवारीचे म्यान..
पण बायका त्या बायकाच..
पोटात काही राहिले नाही..
दिली सूचना सरकारला..
सरकारने हेडलीला धरले..
बिचारा हेडली..
प्लॅन उघडकीला आला म्हणून..
दोघींना फटकारले, म्हणतो कसा,
यासाठीच का मी तुम्हाला हेरले..
बिचारा हेडली..
आता काय करावे हे नव्हते कळत..
आता काय करावे हे नव्हते कळत..
बसलाय आता तुरुंगात, बसलाय आता तुरुंगात..
जात्यावर पीठ दळत...।
==========वात्रटिका========उपहास=======जमलं का...!!!
पण तीन पैकी दोघींनी केलेली त्याची फजिती ऐका..
एकदा केला त्याने प्लॅन..
म्हणाला, कोणाला सांगाल तर उघडेन तलवारीचे म्यान..
पण बायका त्या बायकाच..
पोटात काही राहिले नाही..
दिली सूचना सरकारला..
सरकारने हेडलीला धरले..
बिचारा हेडली..
प्लॅन उघडकीला आला म्हणून..
दोघींना फटकारले, म्हणतो कसा,
यासाठीच का मी तुम्हाला हेरले..
बिचारा हेडली..
आता काय करावे हे नव्हते कळत..
आता काय करावे हे नव्हते कळत..
बसलाय आता तुरुंगात, बसलाय आता तुरुंगात..
जात्यावर पीठ दळत...।
==========वात्रटिका========उपहास=======जमलं का...!!!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...


