गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

Reflection: TOUCH ME IF U CAN...!!!

चिलीमधील कामगारांना वाचवण्याच्या यशामागे तंत्रज्ञानाचे यश...

चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने गाठावी शंभरी...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची कामगिरी विलक्षण आहे. नव्वदी पार झाली आहे..शंभरी तरी किमान पूर्ण करावी. आगामी अशियाई स्पर्धांमध्ये सुद्धा याप्रमाणेच किंबहुना यापेक्षा चांगले यश अपेक्षित आहे.

come on India..!!!

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारत दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर घसरला. उद्या (ता. १४) स्पर्धेचा समारोप आहे. अजूनही काही स्पर्धा हातात आहेत. आणखी थोडी मेहनत घेऊन खेळाडुंनी पुन्हा दुसरे स्थान प्राप्त करावे, सगळ्यांनी बळ एकवटून कसब, कौशल्य दाखवा..come on..come on India...Common India...!!!

संधी दिल्याशिवाय अनुभव येईल कसा..?

काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका भारतीय वंशाच्या डॉक्टरांवर त्यांना शस्त्रक्रियेचा पुरेसा अनुभव नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेत रुग्णाचे निधन झाल्यामुळे हा ठपका ठेवण्यात आला. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, परंतु अनेक क्षेत्र अशी आहेत, की जिथे अनुभवाशिवाय पुढचे पाऊल टाकू नये..टाकता येत नाही, टाकल्यास संबंधितांना धोका, हानी होऊ शकते. उदाहरणादाखल, रस्त्यावर वाहन चालवताना रस्त्याची माहिती नसल्यास एखाद्या खड्ड्यात वाहन जातेच नां..? अगदी तसेच आहे. मात्र यासाठी, असे सर्वच अनुभव घेण्यासाठी संधी मिळणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे महत्वाचे आहे. यासाठी ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी नवीन लोकांना, पदवी घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या तज्ज्ञांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्याला माहिती असलेले सर्व खाच-खळगे त्यांनी सांगणे आवश्यक आहे. नाहीतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी प्राप्त करून अनुभव नसल्यास व्यर्थच जाणार आहे, वय वाढून काही उपयोग नाही...। हे सुद्धा खरं आहे, की केवळ अनुभवच घेत रहायचे का? ही बाब मात्र स्वतः व्यक्तीने ठरवावी. अनुभवाबरोबर त्या क्षेत्रात आणखी संशोधन करण्यासाठी त्यात प्रयोग करावेच लागतात. पण भलत्या-सलत्या रुग्णावर, ठिकाणी प्रयोग करू नये...। जुन्या लोकांनी नवीन लोकांना संधी द्यावी, हे मात्र नक्की।

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

बलसागर भारत होवो...CWG भारतीय मल्लांना सॅल्युट।

दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी कुस्तीमध्ये सलग दहा (10) सुवर्ण पदके प्राप्त करून देशाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या नावलौकिकात उज्जवल यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. देश सर्वच बाबतीत पुढे आहे. खेळाडूंना अनेक दिवसांपासून दिलेले प्रशिक्षण आणि मिळालेल्या सुविधा, मार्गदर्शन आणि त्यांचा हुरुप..यामुळेच हे शक्य झाले आहे. पुरुष खेळाडूंची बरोबरी महिला खेळाडूंनी सुध्दा केली आहेच. नेमबाजीद्वारे आपले लक्ष्य सहज टिपुन सुवर्ण पदकांचे मानकरी देखील आपण ठरलो आहोत.
देशाने आपल्या पिलांना मोठे करण्यासाठी जगात कुठेही स्वच्छंदपणे उडून यश मिळवण्यासाठी त्यांच्या पंखांना असेच बळ कायम देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सुद्धा व्यसनापासून दूर रहावे, देशाने सुद्धा भ्रष्टाचारापासून दूर व्हावे..। असे झाल्यास भारत खरंच महाशक्ती होऊन बलशाली होईल, यात शंकाच नाही.


===========================================राष्ट्रकुल स्पर्धा, CWG============================================

Go to Hell..met..!

Look at this Helmet. This Helmet has been broken! Obviously we can say..Hey..Hel..l..met..! Go to Hell to met..

दसर्‍यापूर्वीच सुवर्ण प्राप्ती

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत खरोखर लक्षणीय कामगिरी करून..हम भी किसीसे कम नही...हे जगाला दाखवून दिले आहे. खेळाडूंच्या मनोकामनेप्रमाणे शेवटपर्यंत द्वितीय स्थानावर भारत राहो, हीच सदीच्छा..

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...