माझंही एक स्वप्न होतं: मी मोठा होईन, लेखक होऊन एक छानसं पुस्तक लिहिन...वाचकांच्या खूप खूप प्रतिक्रिया मिळवेन...पण, पण, पण काय? शेवटी उलटंच झालं. या पुस्तकामुळे बरंच काही आणि सर्व काही होत असतं. खूप खूप पुस्तकं वाचली असती, तर ते सहज शक्य झालं असतं, पण तेव्हा आजच्या इतकी अक्कल नव्हती नां, पुस्तकं फाडणं जास्त माहित होतं. इतकं तरी ठीक आहे, की 'थोडी फार' नाही तरीही 'फार थोडी', पुस्तकं वाचल्यामुळे आज इतकं तरी करू शकतोय. पण बरोबरीचे मित्र कुठल्याकुठे निघून गेले याचं "शल्य" बोचतयं मनातल्या मनात, पण सांगू कोणाला? "कर्म" माझं, काही इलाज नाही. आज 'पुस्तक दिवस' या मथळ्यामुळे काहीतरी उगाच लिहावसं वाटलं, म्हणून ही गिचमिड...
आज (२३ एप्रिल) सर्वत्र पुस्तक दिवस साजरा केला जातोय. खरंय। पुस्तकच आपल्याला सर्व काही देते. पुस्तकामुळे अनेक गोष्टी शक्य होतात. आजच्या या 'पेपरलेस्' होऊ पाहणार्या युगात अजूनही पुस्तकाशिवाय पानही हलत नाही. मानवाने कितीही प्रगती केली, तरीही पुस्तकाचे महत्व कमी होणार नाहीच. प्रगती केली तरीही पुस्तक...अधोगती केली/झाली तरीही पुस्तक...। किंबहुना पेपर म्हणजेच कागदाचे महत्वच दिवसेंदिवस वाढत आहे.
कॉम्प्यूटरमध्ये रेकॉर्ड जरी फीड केले जात असले, तरीही त्याची दखल, नोंद घेणे आवश्यक असतेच. विविध प्रकरणांमध्ये, घटनांमध्ये पुरावा म्हणून प्रत्यक्ष कागद, पुस्तकच वापरले, सादर केले जाते. लहानपणी शाळेत विद्यार्थ्यांना, पुस्तकी कीडा व्हा...असा उपदेश केला जातो. कित्ता गिरवण्याचे बाळकडू पाजले जाते. प्राचीन काळापासूनच पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगता येईल, अगदी जुने ग्रंथ पाहा, ते देखील कागदावरच रचून त्याचा ग्रंथ तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पुस्तक वाचण्यासाठी काही तास लागत असले, किंवा छोटेसे वाटत असले, तरी त्याची निर्मिती वाटते तितकी सोपी नाही. जसं आपण जेवण अवघ्या काही मिनिटात करतो, परंतु त्यासाठी स्वयंपाक करणार्या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागते? अगदी हे असेच आहे. पे आणि पै म्हणजेच पेपर अर्थात कागद आणि पैसा हे दोन प्रमुख घटक असून यावरच सगळे पुढचे अवलंबून असते. अनेकदा तर दोन्ही घटकांमुळे पुस्तकाचा आकार कमी-जास्त करावा लागतो. पुस्तक-निर्मितीचे एखादे पुस्तक वाचून निर्मिती जरी केली, तरी या गोष्टी प्रत्यक्ष कार्याला सुरवात केल्यानंतरच अनुभवता येतात. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे, एकच ओवी अनुभवावी..।
एक मात्र आहे, की पूर्वी मोठ्या आकारात असलेली अनेक पुस्तकं आज विज्ञानाच्या चमत्कारामुळे त्यांचा आकार लहान करता येणे शक्य झाले आहे.अगदी मुठीत मावेल इतक्या लहान आकारात "गीता" उपलब्ध आहे. यानंतरच्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती आणि विकास होऊन संगणकाचा शोध लागून हाच शोध माणसाच्या प्रगतीला पोषक ठरणारा अक्षरशः "टर्निंग पॉईंट" ठरला. आजकाल तर ई-पुस्तकं सुद्धा इंटरनेटवर दिसू लागली आहेत. सीडी,डिव्हीडीमध्ये मोठे पुस्तक सहजगत्या संग्रहित करता येते. पुस्तकंही इतिहासाप्रमाणेच अनेक वर्ष टिकतात, पुस्तक सातासमुद्रापार नाही गेले, तरी लेखकाला सातासमुद्रापार नेते किंवा लेखक सातासमुद्रापार नाही गेला, तरीही त्याचे पुस्तक त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सातासमुद्रापार नेते. एकच आहे, पुस्तकाला भीती असते, ती 'कसर' पासून, अर्थात वाळवीपासून. ही वाळवी पुस्तक पोखरताना कोणतीही 'कसर' बाकी ठेवत नाही, सगळी कसर काढून घेते. यावर उत्तम उपाय म्हणजे संगणक (कॉम्प्यूटर) चा आधार घेणे...।
वर सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचनामुळे माणुस विद्वान होतो, जगात त्याची वाहवा होते. पुस्तकाचे एखादे पान जरी वाचले तरीही तेवढी विद्या प्राप्त होऊ शकते. म्हणतात नां - क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिन्तयेत्...। एक सुभाषित आठवले, ते सांगतो आणि वेळेअभावी विषयाला पूर्णविराम देतो...
सुभाषित असे आहे- स्वदेशेशु धनं विद्या विदेशेशु धनं मति। परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वैधनं।(अर्थात, आपल्या देशात विद्या हेच धन असते, या धनाचे मूल्य विदेशात बुद्धी म्हणून केले जाते, तसेच चांगले चारित्र्य हे सर्वत्र धनासारखे असते.)
शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०
गुरुवार, २२ एप्रिल, २०१०
वसुधैव कुटुंबकम्...स्वप्न कधी साकार होणार?
आज (२२ एप्रिल) वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, आनंद वाटतो, परंतु संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब अर्थातच वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना, हे स्वप्न कधी साकार होणार ? खरंतर हे कोडंच आहे. इतकं मात्र म्हणता येईल, की अनेक पाकळ्या असलेल्या या फुलाची एक-एक पाकळी आता उलगडू लागल आहे. अनेक बडी राष्ट्र पृथ्वीचं रहस्य उलगडण्याच्या मागे सध्या लागली आहेत. यासाठी महाकाय अशी यंत्रणा सुद्धा राबवली जातेय. सुरवातीलाच यात दोष निर्माण झाला, तरीही हिंमत न हारता पुन्हा नव्याने सुरवात करून नव्या जोमाने मोहिम-शोध-कार्य सुरूच आहे. दुसरा भाग सांगायचा झाल्यास पृथ्वी एक आहे, पण इथे अनेक जाती-धर्म, भेद-भाव, राज-कारणं आहेत. अनेक देशांमध्ये हिंसा सुरूच आहे, निष्पाप मरताहेत, हिंसा करणारे मात्र हातावर तुरी ठेवून पसार होण्यात यशस्वी होत आहेत. हे सगळं का होतयं, केवळ सत्तेसाठीच नां? देशप्रेम राहिलं कुठे आता? असे अनेक प्रश्न निकाली काढण्याऐवजी माणसांऐवजी त्यांनाच जीवंत ठेवण्यात अनेक ठिकाणच्या सरकारांना स्वारस्य आहे. विविध देशांमध्ये बराच मोठा भाग नक्सलवादी, अतिरेकी, विघातक ताकदींच्या हातात आहे. याला जबाबदार कोणाला ठरवावे? हे सर्व का चालले आहे? केवळ पोटासाठी-खिशासाठीच नां? पण इतर निष्पापांनाही मनं आहेत, त्यांचेही कुटुंब आहे, त्यांची वाट पाहणारे घरी कोणीतरी आहेत, त्यांची तरी कदर व्हावी. बिचारी पृथ्वी...दररोज किती घटना पहाव्या लागताहेत तिला...सचेत असूनही अचेत व्हावे लागते आहे तिला, ते सुद्धा नाईलाजाने...एक दिवस नक्की येईल, तेव्हा माझी सर्व बाळं एकत्र येऊन जाती-भेद विसरून फक्त अखील मानव-माणूस म्हणूनच जीवन व्यतीत करेल आणि मी सुखी होईन...असं तिला नक्कीच वाटत असणार। "सर्वे भवंतु सुखिनः संतू निरामय"...असं माणसाचं निरामय जीवन पाहण्यासाठी सृष्टी आणि पृथ्वी रचयित्याचे डोळेही आसुसलेले असणारच...।
महाबलि
महाबलि
बुधवार, २१ एप्रिल, २०१०
शुक्रवार, ९ एप्रिल, २०१०
गुरुवार, १ एप्रिल, २०१०
इंटरनेट गावोगावी पोहोचणार, पण..
अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही....
अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही....
अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे....
अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत....
अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो....
अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात....
अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत....
अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही....
अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!

मंगळवार, ३० मार्च, २०१०
शुक्रवार, २६ मार्च, २०१०
कॉम्प्यूटर होतोय हुश्शार...
कॉम्प्यूटर, संगणक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात माहिती विश्लेषित करणारे, माहिती देणारे, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण असे आपण म्हणू शकतो. स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती, तसेच तर्क म्हणजे कल्पनाशक्ती...या दोन शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगी अचाट असतील अशी व्यक्ती अत्यंत चुणुकदार, हुशार मानली जाते. हत्ती या प्राण्याची स्मरणशक्ती देखील अचाट असते असे म्हणतात. बहुदा मानव आणि हत्ती यांच्या कल्पना आणि स्मृती या दोन गोष्टी ध्यानात घेऊनच संगणकाचा शोध लागला असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कॉम्प्यूटरमुळे मानव जरी जगाच्या पलिकडे आणि अलिकडे पोहोचला असला तरीही अद्याप कॉम्प्यूटर हुशार होतोय.
मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्याच त्याला समजणार. उर्वरित पाटी कोरीच की...। साध्या भाषेत सांगायचं झाल्यास बाळाला/मुलांना लहानपणीच जी भाषा ज्या भाषा शिकवल्या जातील त्याच त्यांच्या मेंदूत(हार्ड डीस्क) फीड होतात. तसच आहे इथेही। मात्र मानव जसा भावनाप्रधान आहे, तसे कॉम्प्यूटरच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, हे कॉम्प्यूटरद्वारे चालणार्या रोबोट मुळे लक्षात येते.
भारतात कॉम्प्यूटर बराच उशीरा आला असला तरीही जग जवळ येण्यास, या क्षेत्रात विलक्षण प्रगती होण्यास या देशातल्या हुशार नागरिकांमुळेच साध्य झाले आहे. शेवटी काय, इथे बिचार्यांना छान पैसे, पगार मिळत नाही नां. ही बाब पाश्चिमात्यांनी लक्षात घेतली आणि देशातल्या हिर्यांना त्यांच्या देशात आमंत्रण देऊन पैलू पाडले आणि त्याचा प्रकाश अख्ख्या जगाला मिळाला. एकेकाळी धूळपाटी असणार्या, बोरू ने लिहिले जाणार्या, अक्षरासाठी सुलेखन वही शाळेत सक्तीची करावी लागणार्या देशात आता कॉम्प्यूटरने क्रांती मात्र झाली आहे. कॉम्प्यूटरमुळे अक्षर खराब असले तरीही काहीच घाबरायचे नाही, विविध प्रकारचे सुंदर अक्षर असलेल्या विविध लीपी अस्तित्वात आल्या आहेत. सध्या तर इंटरनेटमुळे जग काय माणूसही एकमेकांच्या जवळ आलाय. कॉम्प्यूटरमुळे माणूस एकमेकांपासून दूर जातोय, तोडला जातोय, हे जितकं खरं वाटतयं, तितकच हे सुद्धा खरं आहे, की तो जवळ आलाय. उदाहरण द्यायचं झाल्यास, आपले नातेवाईक अमेरिकेत असल्यास क्षणार्धात त्यांना मेलद्वारे पत्र पाठविले जाते. वेब-कॅम च्या शोधामुळे क्षणात ते आपल्या समोर दिसू शकतात. एकाच नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे हे आहे. कॉम्प्यूटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन महत्वाचे हिस्से आहेत. माणसाच्या हृदय आणि मनाप्रमाणेच यांचे कार्य चालते. प्रश्न राहिला मज्जासंस्थेचा तो सुद्धा मदर-बोर्ड, मेमरीद्वारे सोडविला गेला आहे. एखाद्या विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल माणसाचे मन काही वेळा लगेच बदलते (हृदयपरीवर्तन) किंवा काही वेळा वेळ लागतो. तसेच कॉम्प्यूटरचे आहे. अनेक जणांनी अनेकदा एखाद्याविषयी वेगवेगळी माहिती सांगितल्यानंतर जशी अवस्था मनाची होते, जसा गोंधळ उडतो, तसाच गोंधळ कॉम्प्यूटरचाही उडतो आणि तो तसा संदेश देतो. हे त्याला कोणी भरवले? उत्तर सोपे आहे, माणसानेच...। एखादी व्यक्ती अती हुशार असते, तिची स्मरणशक्ती अचाट असते, तसेच महासंगणकाच्या बाबतीत (सुपर कॉम्प्यूटर) म्हणता येईल. एक कॉम्प्यूटर अनेक कर्मचार्यांचे काम करू शकतो आणि परिणामी तितक्या संख्येने लोक बेरोजगार होतात हे खरं आहे, पण प्रगती, विकास साधायचा असेल तर प्रवाहाबरोबर गेलेच पाहिजे असे म्हणतात. बेरोजगारांना शासनाने आधी काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य आणि पैसा देणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस येणारी प्रत्येक पीढी जुन्या पीढीपेक्षा हुशार असल्याचे जाणवत आहे, तसेच कॉम्प्यूटरचेही आहे. याचबरोबर थोडी मनोरंजनाची बाब म्हणजे पुर्वी माणसाची उंची जशी भरपूर होती, आकार मोठा होता (थोडक्यात देहयष्टी धिप्पाड) पण त्या तुलनेत आता लोक त्यापेक्षा कमी उंचीचे (खुजे) कॉम्पॅक्ट...। तसेच दिवसेंदिवस कॉम्प्यूटरचा आकारही अगदी कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॅपटॉप, फ्लॅट स्क्रीन, टीएफटी असे कॉम्प्यूटर छान वाटतात, पण अशी उंची माणसाची नसावी, हे देखील चुकीचे नाही. "आलेया देवाजीच्या मना, तेथे कोणाचेही चालेना" एवढे सांगून उंचीचा विषय इथेच सोडतो...असो.
सध्या मुलांना अगदी पहिल्या इयत्तेपासूनच कॉम्प्यूटरचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. मध्यंतरी काय, आजही अनेक मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीची दुखणी सुरू झाली आहेत. यावर उपाय म्हणून काही शाळांनी संपूर्ण शिक्षण कॉम्प्यूटरवरच देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दप्तराविना शाळा...असे आपण म्हणू. काही वर्षात तर सध्या सुरू असलेले पीएच.डी. किंवा संगणक क्षेत्रातले विविध कोर्सेस बंद होऊन दहावी कॉम्प्यूटर झालेला विद्यार्थी अत्यंत हुशार असेल. इंग्रजांच्या काळात जसे दहावी शिकलेला विद्यार्थी हुशार, त्याला नोकरी लगेच तयार... तसेच होईल असे वाटते. आणि हे देखील खरंच वाटतयं. फोटोशॉप सारखे विषय अनेक लहान मुलंही छान हाताळतात. म्हणजे आजच रोजगाराचे साधन त्यांना उपलब्ध असून सुटीमध्ये, लग्नसराईमध्ये ते याद्वारे अर्थार्जन करुन पालकांना हातभार लाऊ शकतात, किंवा स्वयंरोजगारित होऊ शकतात. कशाला हवे मग, पदवी आणि पदविका?
इंटरनेट
'इंटरनेट' हा विषय अतिशय गहन आहे. गुंतागुंतीचा...असं म्हटल्यास वावगं ठरू नये, कारण वेब-नेटवर्क...म्हणजे वेबचे प्रचंड जाळे, गुंतागुंत। सातत्याने वाढणार्या सायबर क्राईम अर्थात इंटरनेट गुन्हेगारी.. मुळे इंटरनेट चांगलच गाजतयं. याला पालकही थोडे जबाबदार आहेतच. पण त्याचा इथे काहीच संबंध नाही, संदर्भ मात्र आपल्याला सहज लक्षात येण्यासाठी दिलायं. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक युवकांना/ चॅटिंग(गप्पा) करण्याचा नादच लागलायं, छंदापेक्षा नाद हा शब्दच जास्त योग्य वाटतो. कारण या नादात ते प्रचंड पैसा गमावतात, फसवणुकीचे प्रकार होतात. पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकांचे 'इंग्रजी' या चॅटिंग, गप्पांमुळे पक्के झाले आहे. "हॅकिंग" नंतर पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी काय करावे? हे जरी कॉम्प्यूटरच सांगत असला तरीही अजूनही कॉम्प्यूरला स्वतःला अनेकदा निर्णय घेता येत नाहीत. आपण एखादा शब्द कॉम्प्यूटरवर लिहिल्यास तो तसा शब्द नसला तर त्यासारखे शब्द आपल्याला दाखवतो. उदा. ( set as wallpaper anyway. हे वाक्य आपण शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे तसे नसेल तर तो set as (कोणताही शब्द) anyway.) असे विचारतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजेच, होतोय की नाही अजून संगणक संपूर्ण-हुशार....। (कॉम्प्यूटरविषयी हे मत वैयक्तीक आहे, ते चूक असू शकते कारण लेखक कॉम्प्यूटर तज्ज्ञ नाही).

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...