मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पुणे येथे कसबा मंडळातर्फे गणेश चतुर्थीला पुरस्कार वितरण

पुणे, ता. १८- येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेसोत्सव मंडळातर्फे उद्या (ता. १९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडळातर्फे पुण्यातील नामवंतांना श्री कसबा पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल. पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर पुण्यातील नामवंतांना श्री. भटकर यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वश्री वैद्य खडीवाली, कॉटनकिंग चे मालक प्रदीप मराठे, सरहद संस्थेचे संजय नहार, सनईवादक प्रमोद गायकवाड आणि गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांना पुरस्कार देण्यात येईल. मंडळाचे माजी अध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने निरगुडकर परिवार व कसबा गणपती मंडळातर्फे भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून हा पुरस्कार यंदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना श्री. भटकर यांच्या हस्ते देण्यात येईल.

Grasshopper green...

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका

मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. जिल्हानिहाय मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या अशी-  ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळ

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली. ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा स

रमाबाई रानडे...

मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली- http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks (या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्‍यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).

नवी मुंबई येथे जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक

नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक काँग्रेस भवन वाशी येथे नुकतीच संपन्न झाली...

Thousands of school students to attempt to create a Guinness World Record

Vashi (Navi Mumbai), June 12: The Fortis Foundation in association with the Navi Mumbai District Lions International, Fortis Hiranandani Hospital, Vashi, Navi Mumbai Association of Paediatrics and Indian Association of Occupational Health, Thane and Raigad branch have joined hands to launch an impactful series of community campaign - Clean Hands To Save Life ™ that endeavours at highlighting the need and importance of hand hygiene in maintaining good health. According to India’s public health association statistics only 30 percent of Indian population wash their hands before preparing food, 38 percent wash their hands before eating and just over 53 percent of the country’s population wash their hands after defecating. Large sections of the country’s population have the ‘misconception’ that they do not need to wash their hands which apparently look clean and will not make them sick.   Proper hand hygiene practice can keep deadly diseases like typhoid, diarrhoea and hep

नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली...

नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार

मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.

नामयोगी दत्ताभैया महाराज यांना आज आदरांजचली

नामयोगी दत्ताभैया महाराज यांना रविवार (ता. १० जून) रामनगर येथे आदरांजली वाहण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता स्वामी सिद्धारुढ शिवमंदीर, बाजीप्रभू चौक, रामनगर  येथे आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे अध्यक्षस्थानी असतील. सद्गुरूदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्वीकर, शरदराव पुसदकर उपस्थित असतील.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पहिले अधिवेशन 'आज': राज्यभरातून ८ हजार युवतींची उपस्थिती

मुंबई, ता. ९ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवती काँग्रेस या नवीन मंचाची स्थापना आणि पहिले अधिवेशन रविवारी (ता. १० जून) येथील षण्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे होत आहे. राज्यातील सुमारे आठ हजार युवती यावेळी उपस्थित राहणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवाप, तसेच राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजची युवती ही करीयरच्या नवनवीन वाटा शोधणारी आणि सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे वावरणारी आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १३ ते ३५ वयोगटातील युवकांचा सहभाग एकूण लोकसंख्येच्या ४२ टक्क्यांहून अधिक आहे. यानुसार राज्यातील युवतींची संख्या सुमारे पावणेदोन कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या युवतींना राजकीय प्रवाहात सामील करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा नवीन मंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. अधिवेशनात युवतींच्या अधिकार व विकासाची सनद प्रकाशित करण्यात येणार आहे. गेल्या एप्रिल व मे महिन्यात युवतींनीच ही सनद तयार केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या निमंत्रक असून, यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्

कवतुक पाहुण्यांचे... (नईदुनिया- जश्न ए मालवा...)

दै. नईदुनियाच्या ६५ वर्षांच्या वाटचालीनिमित्त राजवाड्यासमोर चित्रकलास्पर्धेत चित्रकारांच्या कुंचल्याचे कौतुक करताना आणि पहाताना पर्यटक...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन २०१२ – २०१४ जिल्हाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी ( दि. ३० मे) :   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत निवडणूक २०१२-२०१४ जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हानिहाय एकत्रित आलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रवक्ता मोहन बाफना यांनी एकत्रित बैठक घेऊन नावांसंदर्भात चर्चा करून जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली.  यानुसार जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी अशी(तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची नावे २ जून नंतर जाहीर करण्यात येतील)-रत्नागिरी- सर्वश्री शेखर निकम, रायगड- वसंत ओसवाल, ठाणे शहर जितेंद्र आव्हाड, ठाणे ग्रामीण- आनंद ठाकूर, भिवंडी- शेख खलिद गुड्डू,  उल्हासनगर- ज्योती कालानी, नवी मुंबई- गोपीनाथ ठाकूर, मिरा भाईंदर- मोहन पाटील, पुणे ग्रामीण- सुरेश घुले, पिंपरी चिंचवड- योगेश बहल, सातारा- शशिकांत शिंदे, सांगली शहर- इद्रिस नायकवाडी, सांगली ग्रामीण- विलासभाऊ शिंदे, सोलापूर शहर- महेश गादेकर, सोलापूर ग्रामीण- के. पी. पाटील, नाशिक शहर- रविंद्र कोशिरे, नाशिक ग्रामीण- अॅड. रविंद्र पगार, धुळे शहर- चंद्रकांत केले, धुळे ग्रामीण- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- श्रीमती कमलाताई

'ज्वारी-बाजरी' मध्ये लाल मुंग्यांमुळे व्यापारी त्रस्त

इंदूर ता. २७- ऊन मी म्हणत असून पार्‍याने ४१ अंश सेल्सिअस पार केले आहेत. मध्यप्रदेशमध्ये 'नवतपा' म्हणून सध्या(जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) च्या नऊ दिवसांकडे पाहिले जाते. या नऊ दिवसांमध्ये जितके ऊन कडक असेल तितका पाऊस छान पडतो असे म्हणतात. उन्हाळ्यात विशेषतः लाल मुंग्यांचा त्रास सर्वत्र असतो. मात्र येथील बाजारपेठेत सध्या धान्य व्यापारी त्रस्त आहेत ते म्हणजे यांच्याकडील ज्वारी, बाजरीमध्ये लाल मुंग्या झाल्या आहेत. बाजूलाच साखरेची पोती असून त्यात मात्र मुंग्या झाल्या नाहीत, हे विशेष...

SRI GURU GRANTH SAHIB’S INSTALLATION CERMONY

21st May 2012. :- The installation ceremony of “Sri Guru Granth Sahib Ji” at the New Gurudwara Sri Guru Singh Sabha (Regd.), Kharghar, Navi MUmbai was performed at the hands of “Baba Nariender Singh Ji, Head of Langer Saheb Nanded (Mukhee)” on 20th May 2012 (Sunday) with great religious fervor and dedication. According to the “Sikh Mariyada” Bawa Nariender Singh Ji recited the “first hukamnama” from Sri Guru Granth Sahib Ji to the assemble Sadh Sangat. On this occasion, Baba Nariender Singh Ji, explained in depth the historical back ground of compilation of “Sri Guru Granth Sahib Ji by the Guru Arjun Dev Ji”, Its installation at Sri Harmandir Sahib, Amritsar (Punjab) and “THE GURU MANYO GRANTH DICTATE” issued by “Sri Guru Gobind Singh Ji, 10th Guru of the Sikhs in 1707 A. D. at Nanded Sahib (Maharashtra)”. He further exhorted the assembled Sadh Sangat to religiously follow the ideals of the Gurus as enshrined in “Sri Guru Granth Sahib Ji”. “Punj Piaras” and sewadars ca

to be a mom...

घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी जळगाव दौर्‍यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले. ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.         महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्‍चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगावमध्ये विविध शाळांच्या सुमारे

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे

Shadow

am in shadow of...

God Bless you...

गुढी-पाडवा, हिंदू नववर्ष शुभचिन्तन...

युवराज सिंगची हॉस्पिटलमधून सुट्टी...

क्रिकेटपटू युवराज सिंग याची आज बोस्टन (अमेरिका) येथील हॉस्पिटलमधून अखेर सुट्टी करण्यात आली. केमोथेरपी च्या तिसर्‍या आणि शेवटच्या चरणानंतर युवराज याला सुट्टी देण्यात आली आहे. "अखेर तिसरे चरणही संपले, आता आपण मी जाण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही, मी मोकळा झालोय...माझ्या सर्व चाहत्यांना आणि अमिष्ट चिंतन करणार्‍यांचे आभार.." या शब्दात युवराजने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात युवराज याला बोस्टन येथे केमोथेरपी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. युवराज मैदानावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊल ठेऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान युवराज याचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळाले आहेत. सचिनचे शतकांचे शतक अर्थात महाशतक झळकल्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरचे ट्विटर वर tweet करून अभिनंदन केले आहे.

बच्चन कुटुंबीयांकडे ४ अरब...

लखनौ- वृत्तसंस्था: बॉलीवुड चे बिग-बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे ३ अरब ६१ लाख ७ हजार ३११ रुपये, तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडे ४३ करोड ९ लाख ३० हजार २३ रुपयांची संपत्ती असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १७) समाजवादी पार्टीतर्फे जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी भरलेल्या नामांकनात देण्यात आलेल्या संपत्तीविषयी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. या शपथपत्रानुसार, बच्चन दाम्पत्त्याकडे तीन अरब ४३ करोड ७० लाख ३७ हजार ३३४ रुपयांची चल संपत्ती असून १५० करोड रुपयांची अचल संपत्ती आहे. दागिने- अमिताभ यांच्याजवळ २६ करोड २३ लाख ७ हजार ६८८.    जया बच्चन- १३ करोड ३४ लाख ६२ हजार २९९ रुपयांचे दागिने. लग्झरी कार- अमिताभ ६ करोड ३२ लाख २६ हजार ५५४ रुपयांच्या लक्झरी कार. कृषि भूमी- अमिताभ- दौलतपूर (उत्तर प्रदेश) ५० लाख आणि मुजफ्फरपूरमध्ये २९ करोडची कृषि भूमी. जया बच्चन- काकोरी येथे १.४५ करोड आणि भोपाळ येथे ३.५ करोड रुपयांची भूमि. (सौजन्य- नईदुनिया)

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे. श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक