मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल.

जिल्हानिहाय मतदान होणार्या ग्रामपंचायतींची संख्या अशी-
ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळे १०८, जळगाव १३१, नंदुरबार ५३, पुणे २२०, कोल्हापूर ४७७, सांगली ४५९, सातारा ३२५, सोलापूर १९४, औरंगाबाद २१८, बीड ७०३, हिंगोली ६२, जालना २८५, लातूर ३५३, नांदेड १७७, उस्मानाबाद १६५, परभणी १२५, अमरावती २६२, अकोला २७७, बुलडाणा २७८, वाशिम २८७, यवतमाळ १००, नागपूर २४६, भंडारा ३८०, चंद्रपूर ६१, गडचिरोली ३९, गोंदिया ३५७ आणि वर्धा ११५. एकूण ७, ७५६.