मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आचारसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांना हरकत नाही

मुंबई, ता. १६ - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी व चंद्रपूर महानगरपालिकेची १५ एप्रिल २०१२ रोजी निवडणूक असल्याने या महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहितेमधील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून १४ एप्रिल २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास हरकत नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचारसंहितेच्या कालावधीतच असल्याने त्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा होत आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करताना श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीत येणार्‍या सार्वजनिक सण-उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा कायम रहावा यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०११ रोजी निर्गमन केलेल्या आदर्श आचारसंहितेमधील परिच्छेद-३ (१७) मध्ये मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास अथवा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास हरकत नाही. परंतु यासाठी स्थानिक पातळीवर ज्या परवानग

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या शताब्दी महोत्सवाचे रविवारी उदघाटन

पुणे (ता. १५) - येथील श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ मार्च रोजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उदघाटन होणार असून यानिमित्त श्री. मोदी यांना 'गुजरात रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष श्री. नितिनभाई देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. भरतभाई शहा, उप कार्यकारी विश्वस्त श्री. हरीशभाई शहा, उपकार्यकारी विश्वस्त श्री. नैनेशभाई नंदू, सल्लागार समिती सदस्य हिराभाई चोखावाला आदी उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती देताना श्री. नितिनभाई देसाई म्हणाले, पुण्यातील गुजराती बांधवांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या श्री. पूना गुजराती बंधू समाज या संस्थेची स्थापना १९१३ साली करण्यात आली. यावर्षी संस्था शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत असून त्याचा शुभारंभ गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संस्थेतर्फे उभारण्

सिडकोतर्फे १६ मार्चपासून अर्बन हाट येथे 'वसंत मेळ्याचे' आयोजन

नवी मुंबई, ता. १६- सिडकोतर्फे सीबीडी, बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये १६ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान २४ दिवसीय वसंत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वसंत मेळ्यात राज्यासह इतर अनेक राज्यातील कलावंत सहभागी होतील. दर्जेदार हस्तकला आणि हातमागांवरील उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या आस्वाद व खरेदीचा लाभ रसिकांना घेता येईल. मेळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा मेळ्यात मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान चंदिगड या राज्यातील ज्यूट, रेशीम, कॉटनसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कला उत्पादने उपलब्ध असतील. याचबरोबर लाकडी खेळणी, टेराकोटाची उत्पादने, बांबूचे फर्निचर व गृहसजावटीच्या वस्तू, चित्रकला, आयुर्वेदिक, फ्लोरिकल्चर, चामड्याची विविध उत्पादने या मेळ्यातील आकर्षणे असतील. तसेच वसंत मेळ्यात विविध भाषांमधील दर्जेदार साहित्य देखील उपलब्ध असून यात नामवंत प्रकाशने व लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. वसंत मेळ्याला भेट देणार्‍या रसिकांना अॅम्फिथिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येईल, तसेच फुडकोर्टमध्ये कोकणी-मालवणी-कोल्हापुरी खाद्यपदार्थांबरोबरच र

cloudy climate

सूर्याला कितीही तेज असले तरीही छोटेसे ढग सूर्य झाकू शकतात...। तात्पर्य- गर्वाचे घर खाली.

सवड राजकारणातून...

मध्यप्रदेशचे वाणिज्य उद्योगमंत्री कैलाश विजयवर्गीय आणि आमदार जितू जिराती..अनुक्रमे श्री विष्णू आणि नारद यांच्या वेशभूषेत..! होळीनिमित्त इंदूरला हिन्द मालवा संस्थेतर्फे आयोजित बजरब ट्टू हास्य कवि संमेलनात या दोघे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोघेही चांगले गातात..श्री. विजयवर्गीय अनेकदा अनेक ठिकाणी सहज माईक हातात घेतात आणि मैफलींमध्ये रमून जातात. याचबरोबर दरवर्षी होळी, दिवाळीसारख्या विविध सणांमध्ये अशाप्रकारे सहभाग घेतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून इंदूरचे महापौर, मंत्री..असा श्री. विजयवर्गीय यांचा प्रवास आहे. (courtesy: NaiDunia)

आता आम्हीही झालोय हुश्शार...

आमच्या आजोबांच्या काळात सुद्धा पाणीटंचाई होतीच. माणसांबरोबर आमचीही संख्या वाढली आहे. माणसं जरी आमची संख्या कमी झाल्याचे सांगत असली तरीही असं नाही. अहो, आम्हीही माणसाच्या सोबतच रहातो की...! त्यामुळेच आम्हीही माणसांप्रमाणेच वेगवेगळ्या वसत्यांमध्ये विखुरले गेलोय. म्हणून आमची संख्या कमी झाल्यासारखं कदाचित वाटत असावं. माणसाप्रमाणेच आमचीही कामं वाढली आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा-श्राद्ध कायम होतात, वाढतात, होत असतातच. वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी..असं फक्त आता म्हणण्यापुरतंच राहण्याच्या मार्गावर आहे. वनराई, वृक्षांच्या जंगलाचं प्रमाण कमी होऊन परिणती सीमेंटच्या जंगलात झाली आहे. आमचाही नाईलाज झाला, सीमेंटच्या जंगलाचे चटके आमच्याप्रमाणेच माणसालाही नकोसे वाटतात. म्हणूनच पंखे, वातानुकूलितं यांचा शोध माणसानं लावला..। सर्वच जीवसृष्टीला जगण्यासाठी आवश्यक असलेला आणि ज्याला जीवन असं म्हटलं जातं, अशा पाण्यासाठी आजही भ्रमंती कायम आहेच. आमच्या आजोबांच्या काळात छान माठ होते..जीवो जीवस्य जीवनम्...या उक्तीप्रमाणे आम्ही माणसाने माठातलं पाणी संपवल्यावर उरलेलं पाणी पिण्याचा प्रयत्न आमच्या आजोबांच्या काळापासून करत आल

खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात १२ व १३ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई, ता. १०- सिडकोतर्फे हेटवणे धरणातून खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या १२ व १३ मार्चला वरील नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. १२ व १३ मार्चला सकाळी नऊपासून (९.००) हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. हे काम दुसर्‍या दिवशी म्हणजेच १३ मार्च दुपारी ३.०० पर्यंत चालणार असल्यामुळे सिडको क्षेत्रातील खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखेर अखिलेश च्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर अखेर, समाजवादी पक्षाची धुरा यशस्वीपणे पार पाडणारे आणि सांभाळणार्‍या अखिलेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे. समाजवादी पक्षाच्या बैठकीत अखिलेश यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अत्यंत कमी वयात (वय ३९) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मान अखिलेश यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत वडील मुलायमसिंग की मुलगा अखिलेश विराजमान होणार याबाबत संभ्रम होता. अखिलेश यांनी त्यांचे वडील मुलायमसिंग हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु पक्षाला मिळालेल्या यशामध्ये अखिलेश यांचा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनीच सांभाळावी अशी मागणी होती. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलायम यांचे बंधू आणि जसवंतनगरचे आमदार शिवपालसिंग यादव तसेच रामपूरचे आमदार आझम खान अखिलेश यांचे नाव पक्षाच्या बैठकीत सुचवतील. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बलराम यादव यांचे सुपुत्र आणि आमदार डॉ. संग्राम यादव तसेच हर्दोईचे आमदार नितिन अगरवाल हे अनुमोदन देतील. अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांकडू

प्रतीक्षा नवरदेवांची...

कमलादेवी आवटे यांना डॉक्टरेट

सोलापूर: येथील लेखिका, अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्या कमलादेवी आवटे यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील डॉक्टरेट ( पीएच. डी.) नुकतीच प्रदान केली. शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्यासाठी नव्या युगातील माध्यमांचा कसा उपयोग करता येऊ शकतो, याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनास विद्यापीठाने मान्यता दिली असून, या संशोधनामुळे एका नव्या अध्यापन पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.जी.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. कमलादेवी आवटे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य असून, शिक्षणशास्त्र अभ्यासक आणि लेखिका-वक्त्या म्हणून त्या सर्वज्ञात आहेत. पर्यावरणशास्त्र या विषयात एम.एस्सी. केल्यानंतर आवटे यांनी पुण्यातून एम.एड. पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या सर्वप्रथम आल्या. त्यानंतर सोलापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे लेखन- वाचन त्या

चलन फुगवटा...?

भगवान को मुझे पास करवानें को कहेना, नंदीजी...।

मनातली इच्छा नंदीच्या कानात सांगताना मुलगा...परिक्षा जवळ आली की हे असं होतंच...

निवडणूक याचिका विहित मुदतीत न्यायालयात दाखल करणे आवश्यक- राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, ता. २३ - महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या ग्राह्यतेविषयी वाद किंवा शंका असल्यास अशा निवडणुकीतील उमेदवाराने किंवा मतदाराने कायद्यातील तरतुदींनुसार निकालानंतर विहित मुदतीच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणे आवश्यक आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. या निवडणुका पार पडल्यानंतर मतमोजणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूकीच्या वैधतेबाबत तक्रारी येत आहेत निकालानंतर संबंधित कागदपत्रे सील केली जातात. सील केलेली कागदपत्रे सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय उघडता येत नाहीत. तसा अधिकार राज्य निवडणूक आयोगास नाही. यामुळे महानगरपालिका संदर्भातील निवडणूक याचिका निकालानंतर १० दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्यात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत निवडणूक याचिका १५ दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्या लागतात, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

pollution...?

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिका अंदाजानुसार ५४ टक्के मतदान

मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली.   दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.   प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.

दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात

मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. महानगरपालिकानिहाय तपशील असा - बृहन्मुंबई-     ज

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ - महिला उमेदवारांसाठी केवळ अडीच हजार रुपये अनामत रक्कम

मुंबई, ता. १३ - महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात आले. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्त्काळ परत करण्यात यावेत. तसेच यापुढे होणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही. परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी के

Growing Baby

I am growing now...I can write, make design...I collect chalks from my classroom..my mam also gives me chalks!!!

आठ मतदान केंद्रावर फेरमतदान जि.प., पं.स. क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, ता. 8 - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. याचबरोबर 8 मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय देखील राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरीही मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमद्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील

शुभं भवतु।

युवराज सिंग याला कॅन्सर...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.

we are wise than Guys'...

See them! How wise those cows are..! Surely they are wise than Guys/human beings. They are ready to cross the second lane of road. They are waiting for pass the vehicle.

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन

NAVI MUMBAI SANMAN FESTIVAL, AIROLI FROM 05th FEBRUARY 2012 AT AIROLI, CELEBRITIES LINED UP FOR THE SHOW

Film stars Sonu Sood, Vindu Dara Singh, Nishigandha Wad, Mukesh Rishi, Pankaj Dheer among others are roped in to entertain the crowd at the much-awaited 8 days long Navi Mumbai Sanman Festival, scheduled to be held at Chinchwali Ground, Sector - 05, Airoli, Navi Mumbai from 05th February 2012 at 05.00 P.M. onwards till 10.00 P. M.. The show will continue till 12th February 2012 from 07.00 P. M. to 10.00 P. M. For the 2nd Edition, City-based Socio-Cultural Organization Sanman Pratisthan, Airoli is bringing these celebrities to this part of the town to treat an expected crowd of over one lakh at a stretch of eight days. The festival will take off on 05th February 2012 at the hands of local MLA Shri Sandeep Naik in the presence of dignitaries from various spheres of life. Entering into second year the show is getting bigger and better. “We have meticulously planned something or the other for everyone cutting across caste affiliations to showcase their talents and skills. Stalls will h

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी: नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 2 - राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील सचिवालाय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागवलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे, नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला ज

सुर-तालांची सुरेख मैफल झाली सुनी...अजित पवार

मुंबई, ता. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या निधनाने सुर आणि ताल यांची सुरेख मैफल सुनी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतावर आपला अमीट ठसा उमटवला होता. स्वरांवरची त्यांची हुकूमत विलक्षण होती. अरूण पौडवाल यांच्या साथीने त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक मराठी गाणी चिरकाल स्मरणात राहण्याजोगी आहेत. त्यांनी संगीत संयोजन केलेल्या अनेक मैफली अजरामर ठरल्या आहेत. मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीतील त्यांचे योगदान माझ्यासारखे संगीतप्रेमी कधीही विसरणार नाहीत.

भर गई थैली...

महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस

-    १ डिसेंबर जागतिक एड्स दिन -    ८ मार्च जागतिक महिला दिन -    १५ मार्च जागतिक ग्राहक दिन -    २१ मार्च जागतिक वनदिवस -    २२ मार्च जागतिक जल दिवस -    ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस -    २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन -    ५ जून जागतिक पर्यावरण दिवस -    ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस -    ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन -    १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन -    २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन

लुधियाना येथील शाळेत वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रम

लुधियाना, ता. 29 - येथील स्प्रिंग डेल सिनियर सेकंडरी पब्लिक स्कूल मध्ये वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरस्वती स्तवन व पूजनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी पतंग उडविणे स्पर्धा, डेकोरेशन आणि सूर्यफुल बनविण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत इ. सातवीतील दमन प्रथम, सहाव्या इयत्तेतील राहुल कोहली दुसरा आणि सहावीतील राजिंदर तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले. व्यवस्थापकीय संचालक अविनाश कौर वालिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूल ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूलच्या केजी तील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी वसंत ऋतूवर आधारित गाणी म्हणण्यात आली. एव्हरेस्ट पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल एव्हरेस्ट पब्लिक सिनियर पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमीनिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे संचालक राजिंदर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याचबरोबर भारतीय विद्या मंदीर स्कूल, एबीसी माँटेसरी स्कूल सह अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

पुणे येथील 'त्या' बसचालकाची रवानगी वेड्यांच्या रुग्णालयात

पुणे, ता. 28 - गेल्या बुधवारी सकाळी येथे बस पळवून सुमारे 27 लोकांना जखमी करणाऱ्या त्या बसचालकाची रवानगी 1 फेब्रुवारीपर्यंत येरवडा वेड्यांच्या रुग्णालयात करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने पोलिसांना संबंधित बसचालक संतोष माने याला वेड्यांच्या रुग्णालयात निरीक्षणासाठी पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. माने याने मास्टर-की च्या सहाय्याने स्वारगेट बस स्थानकावरून बस पळवून नेली होती. यानंतर त्याने पादचारी मार्गासह, विरुद्ध दिशेने बस चालवून अनेकांना जखमी केले तर या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, काही वाहनांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Who is powerful...?

Republic Day celebration at NMMC General Hospital Vashi.

Flag hoisting was done at the hands of Shri Vithal More Saheb Leader of the house along with Shri Vikram Shinde Saheb Health Comittee Chairman.Ceremony was duly attented by Medical Superintendent along with his staff from all cadre

Garden at Shirdi...

पुणेः 'त्या' बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल होणार

पुणे, ता. 25 - आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची बसचा ताबा घेऊन सुमारे 40 गाड्या चिरडून तर 9 लोकांना ठार मारून 25 जणांना जखमी करणाऱ्या बसचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित बसचा चालक बसच्या सीटवर नाही हे पाहून दुसरा बसचालक संतोष माने याने बस सुरू केली. त्याने नंतर चुकीच्या दिशेने (राँग साइड) सुमारे अर्धा तास 16 किलोमीटरपर्यंत बस चालवून अनेक वाहनांचे नुकसान केले तसेच काही विक्रेते, पादचाऱ्यांना जखमी केले. शेवटी निलायम थिएटरजवळ माने याने बस थांबविली. सूत्रांनुसार, माने हा मनोरुग्ण असून त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना देखील शहरातील तीन विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येईल- नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 24 - प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते संबंधित जिल्ह्यात ध्वजारोहण करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत प्रजासत्ताक दिन येत असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली जात होती. त्यासंदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास हरकत नसली तरी नेहमीच्या ध्वजारोहण स्थळात बदल करण्यात येऊ नये, या समारंभात करण्यात येणारी भाषणे देशासाठी हुतात्मे झालेल्यांच्या आणि देशाच्या गौरवापुरतीच मर्यादित असावीत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक प्रचाराची भाषणे होणार नाहीत आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.

गुलमर्ग येथे हिमवृष्टी...

गुलमर्ग येथे शनिवारी (ता. 21 जानेवारी) मोठ्या प्रमाणात हीमवृष्टी (स्नोफॉल) होऊन स्की रिसोर्टमध्ये गोठलेले बर्फ कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही...

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान - नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 21 - महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सप्ताहभर मतदार जागृती अभियान राबवावे, असा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचना देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत. विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आ

दिल्ली येथे विमानसेवा पूर्वपदावर

नवी दिल्ली ता. 21 - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा पुन्हा पूर्व पदावर आली. गेले दोन दिवस दाट धुक्यामुळे येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती. आज धुके होते परंतु दृश्यमानता चांगली असल्यामुळे धुक्याचा विशेष प्रभाव न पडता कोणतीही विमानसेवा विस्कळीत झाली नाही. आज दृश्यमानता सुमारे 200 मीटर होती असे सूत्रांनी सांगितले. विमानोड्डाण सेवा गेले दोन दिवस विस्कळीत होऊन जवळपास 200 विमानांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन विमानांना 2 ते 8 तास विलंब झाला होता, 28 विमाने रद्द करावी लागली होती तसेच 19 विमानांचा मार्ग बदलविण्यात आला होता. दरम्यान इंदूर येथे देखील धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.

कॉर्पोरेट खोडी...

प्रत्येक क्षेत्रातच कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याची ही बोलकी खोडी...

काश्मिरने पांघरली बर्फाची शाल...

LOHRI & MAKAR SANKRANTI CELBERATED AT NAVI MUMBAI

16th Jan 2012 : Both “LOHRI & MAKAR SANKRANTI” were celebrated on 15th Jan 2012 at NMMC Ground, Sector – 04, Vashi, Navi Mumbai with great enthusiasm. It was a rare example of a joint celebration displaying the cultural of Punjab and Maharashtra promising a further boost to the secular sprit. The “LOHRI” fire was lit by the Honorable Shri Ganesh Naik, Guardian Minister Thane in the presence a huge gathering. He distributed “TIL & GUR” as per the traditional greetings on Makar Sakranti. Shri Sanjiv Naik, Honorable Member of Parliament, Shri Sandeep Naik, MLA and Shri Sagar Naik, Honorable Mayor of Navi Mumbai joined him along with presidents of all Gurudwaras of Navi Mumbai, Chairman of Punjabi Cultural & Welfare Association (PCWA) and prominent personalities of Navi Mumbai. . A colorful Punjabi cultural program organized under the banner of “NAVI MUMBAI SAHITYA & SANSKRUTI PARISHAD” and patronage of Shri Sagar Naik, Mayor of Navi Mumbai being the first such cultural

खारघर, द्रोणागिरी आणि उलवे परिसरात 19 व 20 जानेवारी दरम्यान पाणीपुरवठा बंद

मुंबई, ता. 17- नवी मुंबईच्या खारघर, द्रोणागिरी आणि उलवे नोड्समध्ये सिडकोद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. हेटवणे येथील मुख्य जलवाहिनीच्या तांत्रिक कामाकरिता गुरूवार (ता. 19) व शुक्रवार (ता. 20) या दोन दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरीकांनी पाण्याचा पुरेसा साठी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीळा-तीळाने बोलणे...

होत आहे कमी तीळा-तीळाने बोलणे.. आहेत याला बरीच कारणे.. फेसबुक सुद्धा यातले एक आहे... नको आता श्लोक अन् नको दोहे... नको आम्हां सुश्रुत, चरक वाग्भट... येतात विचार असे मनात पटपट.. पटपट विचाराचाच वाटतो आहे खेद... मित्रांनो, पण विसरू नका कोणी आपला घरचा "आयुर्वेद"...

निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची भेट ठरणार-मायावती

नवी दिल्ली - ता. 15: आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा विजय होणे हीच आपल्या वाढदिवसाची भेट ठरेल, असे मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले. आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. आचारसंहितेमुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले, की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पक्ष यंदा आपल्या वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. पक्ष कार्यकर्ते संक्रांत त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरी करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हेच आपले लक्ष्य असून निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे. यावेळी त्यांनी सर्व 403 जागांकरिता उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी 88 जागा अल्पसंख्यांक, 103 अन्य मागासवर्गीय, 85 मुस्लीम आणि 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण आणि 33 जागांसाठी क्षत्रिय उमेदवारांना पक्षातर्फे निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, की गेल्या निवडणुकीत चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उभे रहाण्याची संधी

गुळाची पोळी

नारायण..नारायण...

मकर संक्रांत शुभेच्छा...

हलव्याला असताता काटे...असतो तीळ मऊ... गुळाची पोळी लागते छान..घ्या पटकन अपुले पान.. करूया त्यात तिळ-गुळ मिक्स... राहू द्या स्नेह अमुच्यावर असाच फिक्स...

इंदूरमध्ये शीतलहर- शाळांना सुट्ट्या

मध्यप्रदेशात थंडीचा जोर वाढला असून काही भागात किमान तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. इंदूरमध्ये देखील नुकतेच 5 अंश तापमान नोंदविले गेले. इंदूरचे कलेक्टर राघवेंद्रसिंह यांनी शुक्रवार (ता. 13 जानेवारी) पासून 16 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत सर्व शासकीय व खाजगी शाळांच्या नर्सरीपासून इ. 8 वी पर्यंतच्या वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे. इ. 8 वी पासून पुढील वर्ग सकाळी नऊ पासून घेण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली. येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील. हेल्पलाईन आणि संकेतस्थळ या दहा महानगरपालिका क्षेत्राती

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012