मुख्य सामग्रीवर वगळा

लुधियाना येथील शाळेत वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रम

लुधियाना, ता. 29 - येथील स्प्रिंग डेल सिनियर सेकंडरी पब्लिक स्कूल मध्ये वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरस्वती स्तवन व पूजनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी पतंग उडविणे स्पर्धा, डेकोरेशन आणि सूर्यफुल बनविण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत इ. सातवीतील दमन प्रथम, सहाव्या इयत्तेतील राहुल कोहली दुसरा आणि सहावीतील राजिंदर तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले. व्यवस्थापकीय संचालक अविनाश कौर वालिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूल
ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूलच्या केजी तील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी वसंत ऋतूवर आधारित गाणी म्हणण्यात आली.

एव्हरेस्ट पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल
एव्हरेस्ट पब्लिक सिनियर पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमीनिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे संचालक राजिंदर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर भारतीय विद्या मंदीर स्कूल, एबीसी माँटेसरी स्कूल सह अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012