पुणे (ता. १५) - येथील श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ मार्च रोजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उदघाटन होणार असून यानिमित्त श्री. मोदी यांना 'गुजरात रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष श्री. नितिनभाई देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. भरतभाई शहा, उप कार्यकारी विश्वस्त श्री. हरीशभाई शहा, उपकार्यकारी विश्वस्त श्री. नैनेशभाई नंदू, सल्लागार समिती सदस्य हिराभाई चोखावाला आदी उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना श्री. नितिनभाई देसाई म्हणाले, पुण्यातील गुजराती बांधवांच्या उन्नतीसाठी झटणार्या श्री. पूना गुजराती बंधू समाज या संस्थेची स्थापना १९१३ साली करण्यात आली. यावर्षी संस्था शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत असून त्याचा शुभारंभ गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संस्थेतर्फे उभारण्यात येणार्या प्रस्तावित गुजरात भवनचे भूमिपूजनही श्री. मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एफटी समूहाचे संचालक जिग्नेशभाई शहा उपस्थित रहाणार आहेत. गुजराती बांधवांसाठी अभिमानाचा विषय असलेले मा. नरेंद्र मोदी यांना यावेळी गुजरात रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्थेच्या मोठ्या आश्रयदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १८ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी पाच वाजता गणेश क्रीडा रंगमंच येथे हा भव्य सोहळा होणार आहे.
श्री. हरीशभाई शहा म्हणाले, संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त शनिवारी (ता. १७) मार्चला '१०२ नॉक आऊट' या नाटकाचा प्रयोग सायंकाळी सातला होईल. सौम्या जोशी यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक मुंबई थिएटर गाईड या संस्थेतर्फे सादर केले जाणार आहे. तर रविवारी १८ मार्च रोजी दुपारी साडेचारला गुजरात सरकारतर्फे 'गुजरात स्वर्णिम महोत्सव' हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यानंतर सायंकाळी पाच वाजता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे उदघाटन करण्यात येईल. तसेच यावेळी संस्थेच्या शतक महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशनही मा. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होतील, असेही शहा यांनी सांगितले.