मुंबई, ता. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या निधनाने सुर आणि ताल यांची सुरेख मैफल सुनी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतावर आपला अमीट ठसा उमटवला होता. स्वरांवरची त्यांची हुकूमत विलक्षण होती. अरूण पौडवाल यांच्या साथीने त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक मराठी गाणी चिरकाल स्मरणात राहण्याजोगी आहेत. त्यांनी संगीत संयोजन केलेल्या अनेक मैफली अजरामर ठरल्या आहेत. मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीतील त्यांचे योगदान माझ्यासारखे संगीतप्रेमी कधीही विसरणार नाहीत.