मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी: नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 2 - राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथील सचिवालाय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागवलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे, नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. दहा महानगरपालिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रे वापरण्यात येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून 1 लाख 30 हजार मतदान यंत्रे मागविली आहेत. यापेक्षा अधिक मतदानयंत्रे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले होते. तसेच यापैकी सुमारे 5 टक्के मतदानयंत्रे सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. यंत्रांची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेमुळे एकत्रित मतमोजणीचा निर्णय घेण्यासाठी एवढा कालावधी लागला. तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी एका मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागतात, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
 
जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता शिथिल होणार

पूर्वनियोजनानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार होती. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या क्षेत्रात निकालापर्यंत लागू असलेली आचारसंहिता मतदानानंतर विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात येईल. परंतु निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील आचारसंहिता महानगरपालिकांचे निकाल लागेपर्यंत कायम राहील, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012