मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाशिम जिल्हा परिषद व 6 पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान

मुंबई दि. 29 – वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 6 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 3 डिसेंबर 2013 ते शनिवार दि. 7 डिसेंबर 2013 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून सोमवार, दि. 9 डिसेंबर 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक जेथे अपिल नाही तेथे शनिवार दि.14 डिसेंबर 2013 व जेथे अपिल आहे तेथे बुधवार दि. 18 डिसेंबर 2013 हा असून रविवार दि. 22 डिसेंबर 2013 रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दि. 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात येऊन निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात येतील. सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व ...

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार: सोनिया गांधी

नागपूर, दि. 21 नोव्हेंबर 2013: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. आई जन्म देते तर ही योजना गरजूंना पूनर्जन्म देईल, असे प्रतिपादन यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केले आहे. नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे विस्तारीकरण आणि राज्यपातळीवरील लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीमती सोनिया गांधी यांनी गुरुवार दि. 21 नोव्हेंबर 2013 लाखो नागरिकांच्या साक्षीने या योजनेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी आणि आरोग्य राज्य मंत्री श्रीमती फौजिया खान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, खा.श्री मुकूल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री श्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री श्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री अनिल देशमुख, राज्यमंत्री श्री राजेंद्र मुळक, खा.श्री विलास मुत्तेमवार आदी नेते देखील य...

भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी (20 नोव्हेंबर 2013) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत दुस-यांदा भोसरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मान आयोजक महेश लांडगे यांना व भोसरीकरांना देण्यात आाला. या स्पर्धा भोसरीतील ज्येष्ठ पै. किसनराव शंकरराव लांडगे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष पिं.चिं. मनपा कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन व समस्त भोसरी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मान्यतेने महाराष्ट्र केसरी 2013 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी महापौर नानासाहेब शितोळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी (19.11.2013) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ...

कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले- अजित पवार

मुंबई, ता. 25 : जागतिक उद्योगविश्वात भारताची शान वाढविणारे द्रष्टे उद्योजक डॉ. नीळकंठराव कल्याणी यांच्या निधनाने उद्योगजगताचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. कल्याणी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. भारत फोर्ज कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक प्राप्त करून देऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी ते दिशादर्शक होते. उद्योग संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या कल्पकतेने केले. त्याचवेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या उद्योगांचा विस्तार केला. आपल्या समूहाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादाचा सेतू साधला होता. कर्मचाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक होते. कर्मचाऱ्यांनाही कुटुंब प्रमुखासारखा त्यांचा आधार वाटायचा. कर्मचारी आणि त्यांच्यात केवळ औपचारिक संबंध नव्हते तर आपुलकीचे नाते होते. हेच त्यांचे बळ होते. त्याच जोरावर त्यांनी आपल्या उद्योग समूहाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या निधनाने ...

सिडको संचालक मंडळाची बैठक उत्साहात: वाळूज, द्रोणागिरी, नेरुळ विविध पायाभूत सुविधांच्या अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता

मुंबई, ता. 31 मे- सिडको संचालक मंडळाची विविध योजने अंतर्गत पायाभूत सुविधा अंदाजपत्रकीय बैठक नुकतीच झाली. बैठकीत विविध योजनांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली. नवी मुंबईतील 12.5 टक्के योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता, प्रकल्पगस्तांच्या पाल्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यावेतनात वाढ आणि समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास मंजुरी असे महत्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतले. बैठकीस श्री. संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (नगर विकास-1) श्री. यु.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, श्री. नामदेव भगत, संचालक, सिडको, श्री. वसंत भोईर, संचालक, सिडको उपस्थित होते. सर्व विषयासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. नवी मुंबई प्रकल्पगस्तांच्या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित उपकमांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या सिडकोच्या समुदाय सामाजिक बांधिलकी धोरणास संचालक मंडळाने मंज...

दमा असूनही दम-दार गाणारे विष्णुबुवा...

जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग। कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।। अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता. रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्‍या भिक्षेकर्‍याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय. विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे...

संवेदनशील मतदान केंद्रांबाबत सतर्कता बाळगावी- राज्य निवडणूक आयुक्त

पुणे, दि. 16 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिल्या.           पुणे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 63 रिक्त जागांच्या होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 29 मार्च 2013 रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात श्रीमती सत्यनारायण यांनी आज येथे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींसह अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.            मतदान यंत्रे, मार्कर पेन व इतर मतदानाच्या साहित्याबाबत आढावा घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक असलेल्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संबंधितांना निवडणुकांची माहिती द्य...

जागतिक महिला दिन संदेश, शुभेच्छा

English madhe LADY, Marathit MAHILA, Hindi madhe NARI... Yanchi saath nasel tar, aahe baatch Adhuri... Theva lakshat ek goshta, ek na ek divas padel hi Sampurna Duniyela BHARI...!!! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechha. इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी... यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी... ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही संपूर्ण दुनियेला भारी...!!! जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा.

अकोला येथे काँग्रेस मेळावा उत्साहात

अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे. अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ...

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...